MCS Salam Bahrain 2014

Page 50

बायको: मग बोला ना, कुणी अडवलंय? नवरा: आता मी काही बोलतच नाही सरळ म्हणतोच तुला «मी तुझा कोण?» बायको: हा प्रश्न कि संशय? नवरा: तसं वगैरे काही नाही हं बायको: मग हा संशयास्पद प्रश्न कशाला? कोण म्हणजे काय? पती, पतीराज आहात माझे. नवरा: माहित आहे «पती» काय म्हणतेस.

मी म्हणतोय «मी तुझा कोण?”

बायको: अहो तेच सांगतेय « तुम्हाला नवरा म्हणते ते कळले नाही का? अहो धनी, हव असल्यास इं ग्रजीत husband आहात माझे. नवरा: मला ते कळू न चुकलंय तरी सुद्धा मला तुला म्हणायचं आहे “ मी तुझा कोण?» बायको: (वाढलेल्या स्वरात) कळल पण म्हणता आणि वर मलाच विचारताय “मी तुझा कोण?” (बायकोचा स्वर अधिकच चढला) चार चौघात चारशे ते पाचशे लोकांच्या साक्षीने तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं अक्षता डोक्यावर पडल्यात इष्ट मित्र मंडळींच्या आशीर्वादाने आपलं डोक्याला डोकं लावलं. भटजीने मंगलाष्टके म्हणलीत पारं पारिक रित्या आपल्याला नवरा बायको बंधनात बांधलं. बायको म्हणून तुम्ही माझा स्वीकार केलात. त्याच बायकोचा तुम्ही नवरा आता आणि डोकं फोडू न सांगायला हवा का? नवरा: नको तुझ्या डोक्याला मार लागेल. शरीरातला रक्ताचं तेवढं प्रमाण कमी होईल आणि उघड्या डोळ्यांनी मला ते बघवला जाणार नाही. बायको: बघवल जाणार नाही ना मग आता डोळे बंद करा आणि कामाला लागा आणि हो «कोणाचा» तेवढा नाद सोडा. नवरा: कामाला तर मी लागणारच आहे पण डोळे बंद करून नाही “डोळे उघडू न!” डोळे बंद करून मी रात्रीच तेवढं काम करू शकतो. बायको : "बडबड काय करताय ! फाजीलपणा सोडा” नवरा: भलतंच काही समजू नकोस मनात विचार चालू असतो रात्री त्यामुळे डोळे बंद होतात आणि चांगल काही लिहिल जात. माझ्या “लिखाणाबद्दल बोलतोय मी.” बायको : तुमची ना कमालच आहे . नवरा : कमालीचाच आहे मी म्हणूनच म्हणतोय तुला “मी तुझा कोण?” बायको: हातातले कप टे बलावर ठे वले आणि खुर्चीवर बसून आणि डोळे बंद करून दबल्या स्वरात बडबडली “अहो ! तुम्हाला काय वेड लागलंय का? नवरा: नाही बुवा ! सध्या तरी नाही तू माझ्यावर अशीच रागवत राहिलीस तर लागण्यची तेवढी शक्यता आहे . बायको : मग असे वेड लागल्यासारखे का करत आहात. नवरा: छे ! छे ! तू समजतेस तसे काही नाही. “मी वेड्या सारखं करतोय असे तुला का वाटत?” बायको : वाटायला नको “कोणाचा” पाढा घेऊन बसलात आणि वर मलाच विचारता “अहो ! जरा का ?” नवरा: “का ? कशासाठी?” बायको : आपल्याला ना डॉक्टर कडे जायचे आहे . नवरा : तुझ्याकरिता माझी सोबत हवी आहे का ?

५०

तयार होता


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.