Page 1


рек


20 January 2014

MESSAGE I am happy to learn that Maharashtra Cultural Society is launching its annual magazine “Salam Bahrain�. I understand that this edition of magazine is a special edition to honor the achivements and contribution of women in the development & growth of India. Further the participation of President Award winner and Iconic mother of India Smt. Sindhutai Sapkal will be an enlightning experience to all the members. I wish the Maharashtra Cultural Society all the best in its future endeavours.

( Dr. Mohan Kumar ) Ambassador to the Kingdom of Bahrain


संपादकीय नमस्कार मंडळी आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभकामना !! आजच्या सुमुहुर्तावर संपादक मंडळाच्या वतीने “सलाम बाहरीन” २०१३ चा स्त्री विशेषांक आपल्या हाती दे ताना मला विशेष आनंद होतो आहे . सलाम बहरीन अंक हा आपल्या मंडळाचा अविभाज्य घटक आहे . या मध्यमातून आपण आपल्या मराठी लेखकांना व कवींना लिखाणासाठी प्रोत्साहन दे तो. आपली मातृभाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करतो तसेच एकमेकांशी सुसंवाद ही साधतो. आपल्या महाराष्ट्र दे शा पासून दरू राहून त्याच्या परं परे ची आठवण करून दे ण्याचे महत्वाचे कार्य ही अंकामधून साधले जाते. सर्व लेखक , लेखिका, कवी , कवियत्री यांनी आपल्या घाईगर्दीच्या वेळापत्रकातून वेळात वेळ काढू न सलाम बहरीन साठी दर्जेदार साहित्य उपलब्ध केल्या बद्दल मनस्वी आभार. या वर्षी सर्व सभासदांनी दर्जेदार साहित्याचा वर्षावाच केला म्हणून काही साहित्य फक्त इ-सलाम बहरीन मध्ये प्रकाशित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुद्रक , मुद्रितशोधक , टं कलेखक , कार्यकारी मंडळ , जाहिरातदार व जाहिरात संकलक आणि वरील सर्व मंडळी आपल्या कौटु ं बिक व व्यवसायिक जीवनातून वेळ दे त असताना घरात समजूतदार पणा दाखवणारे त्यांचे कुटु ं बीय अशा सर्वांचा या अंकाला हातभार लागला आहे . संपर्ण ू संपादक मंडळ व कार्यकारी समितीच्या अथक परीश्रामाने पूर्ण झालेला हा अंक आपणास नक्कीच आवडे ल असे आम्हाला वाटते. नजर चुकीने काही त्रुटी असल्या तर त्या आपण समजून घ्यालच ,कारण अंक आपल्या मंडळाचा आहे आणि मंडळ आपलेच आहे .. या यशस्वी वाटचालीत सहकार्य केल्या बद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. कळावे,

लोभ आहे च तो वृद्धिं गत व्हावा ही विनंती ! जय हिं द .. जय महाराष्ट्र आपला स्नेहांकित

मुकंु द आनंद ढाके संपादक- सलाम बहरीन २०१३


अध्यक्षीय नमस्कार मंडळी,

नवीन वर्षाच्या व गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सलाम बहरीनचा हा २८ वा अंक ... “स्त्री विशेषांक” म्हणून प्रसिद्ध होत आहे . ‹रमाबाई ..ते..सिंधता ु ई› या सार्थ नावाने हा विशेषांक भारतीय महिलांचे ...व विशेष करून मराठी स्त्रियांचे योगदान व बलिदान यांची दखल घेणारा ठरणार आहे . या वर्षीचा हा अंक आणखीनच विशेष झालंय. कारण या अंकाचे प्रकाशन साक्षात माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते होत आहे . ज्यांच्या जीवन चरित्रावर व योगदानावर हा अंक आधारित आहे त्या माई सिंधुताई यांच्या उपस्थितीत या अंकाचे प्रकाशन व्हायचा या योग हे आपले भाग्यच म्हणायला हवे. या प्रकाशन सोहोळ्याची तुलना एखाद्या चित्रपटाच्या «प्रीमियर» शो बरोबर करावीशी वाटते.

मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा सर्व सभासदांच्या पाठींब्याने व थोरांच्या आशिर्वादाने २०१३-१४ या कालावधीसाठी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. अगदी नवीन चेहेऱ्यांची «तरुण» कार्यकारी समिती स्थापन झाली. या आधीच्या कार्यकारी समितीमधील अविस्मरणीय अनुभव अतिशय मोलाचा ठरला. या आधी «प्रसिद्धी प्रमुख» म्हणून काम करतांना विविद माध्यमांचे नियोजन करण्याचा अनुभव असल्याने या वर्षी बहरीन मधील आघाडीच्या वृत्तपत्र, मासिके, रे डिओ (आकाशवाणी) व भारतातील टी.वी. ने मंडळाच्या कार्याची योग्य तो दखल घेतली. Your FM 104.2 ने आपल्या कार्यक्रमाची “Media Partner" म्हणून साथ दिली. या सर्व प्रयत्नांचे फलीत म्हणून आज आपल्या महाराष्ट्र मंडळाचे नाव व अस्तित्व बहरीनसह इतर दे शांतील भारतीयांपर्यंत पोहोचले आहे . आपल्या मंडळातील पूर्वीच्या अध्यक्षपद भूषवलेल्या जाणकारांसोबत केलेल्या कार्याचा व त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव दे खील मोलाचा ठरला. «सल्लागार समिती» स्थापन करण्याचा निर्णय किती मोलाचा व महत्वाचा होता हे मागील एक वर्ष काम करतांना लक्षात आले. त्यांच्या अनुभवाचा व वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाचा माझ्या समितीला कार्यक्रम व उपक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मदत झाली.

२०१३-१४ या काळात महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळच्या कक्षा अधिक रुंदावल्या. महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष या नात्याने बहरिनमधील व इतर दे शांतील बऱ्याच संस्थांसोबत संबंध जोडल्या गेले. अबूधाबी , दब ु ई, कतार अशा अनेक दे शांच्या भेटीवर असतांना तिथल्या महाराष्ट्र मंडळांना आवर्जून भेट दिली व त्यांच्या कार्यकारी समिती सोबत चर्चा केली. आखाती दे शातील सर्व महाराष्ट्र मंडळांमध्ये संवाद असावा व कार्यक्रमांची दे वाण-घेवाण व्हावी यासाठी पुढाकार घेतला. या निमित्ताने हि सर्व महाराष्ट्र मंडळे जोडली गेली. त्याचाच परिपाक म्हणजे माई सिंधुताई सपकाळ यांचा बहरीन सोबतच अबूधाबी येथे सत्कार समारं भ होत आहे . त्याच बरोबर आपल्या “सलाम बाहरीन”च्या प्रकाशन समारं भाचे मुख्य प्रायोजक म्हणून दब ु ई येथील प्रख्यात मराठी उद्योजक श्री. धनंजय दातार यांचा “अल अदिल” हा उद्योग समूह पुढे आला आहे .

माझ्या कार्यकारी समिती मधील सर्व सदस्य, सल्लागार समिती, महिला समिती, संपादकीय मंडळ, वेळोवेळी मदतीला धावून येणारे मंडळातील स्वयंसेवक व सर्व सभासदांच्या सहकार्याने २०१३-१४ मधील सर्व नियोजित कार्यक्रम व उपक्रम यशस्वीपणे पार पडले. जाहिरातदार, वृत्तपत्रे, आकाशवाणी (FM Radio) व टी.व्ही. चेनल्स यांच्या मदतीने मंडळाचे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचले. असाच आपला लोभ असावा...व उत्तरोत्तर वृद्धिं गत व्हावा हिच इच्छा !

जय हिं द ...जय महाराष्ट्र.

आपला स्नेहांकित

अभय चांदजकर

अध्यक्ष २०१३-२०१४ महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ बहरीन (abhay.chandajkar@gmail.com)


रमाबाई ते सिंधूताई ...... शेवटी आई ताई माई...... आई नाही तर कांही नाही हे खरे आहे .मात्र बापही आम्हाला हवा आहे . ज्या घरात बाप नसतो, त्या घरावर कुणीही दगड मारतो. ‘वंदे मातरम ्’ तरीही आई घराच मांगल्य तर ....... बाप दाराच असतील हे कबुलच केलं पाहिजे, आईचं बाईचं योगदान चार गुंजेनी जास्त आहे . आई बाळाला जन्म दे ते. स्वत: खस्ता खाते.लेकराला पदरानी झाकते. तो पदर फाटका असला तरी ती डगमगत नाही. चुकून बाप मेला तर—आईचं कंु कुच पूसन ू नेतो. आई मात्र पांढऱ्या कपाळानी मुलांसाठी जगत असते. ती दस ऱ्यासाठीच जगत असते . ु मला वाटतं बाईच्या जातीला घडवतांना दे वाने नक्की अओव्ह्र टाईम केला असेल. त्याशिवाय बाई येवढी शोशीक कशी, ती स्वत:ला बाजूला ठे वून लेकरांसाठीच तर खेड्यावरचीमाय जास्त जगते. लेकराच्या अंगाखालच ओलं फडक स्वत: फडक्यात गुंडाळते.ह्याला सुखी ठे व म्हणून नियंत्याला आळवते.लेकराकडे घोट ती गिळते. घोटभर पाणी पिवून रात्र काढते, तरीही .... ती जगत

जाते. त्यातल्या त्यात वापरते,बाळाला कोरड्या पाहून विधवापणाचे कडू असते.

पती निधनानंतर चार लेकरांना आई कष्ट करून सांभाळते.मात्र मोठे झाल्यावर जेव्हा चार मुलंएका आईला सांभाळत नाहीत तेव्हा तिचे काळीज रक्तबंबाळ होते.म्हणूनच “मां की दआ खाली नही ु जाती और मां की बददआ टाली नही जाती”हे सर्व एक बाईच करू शकते.म्हणून बाई नाही तर ु काही नाही. जगात कितीतरी विधवा आयांची मुल क्लासवन ऑफिसर आहे त.म्हणून स्त्रि जात ही राष्ट्राचा कणा आहे .कुठल्याही परिस्थितीत ती परिस्थितीवर मात करते.संकट कोसळले तर ती त्यावर पाय दे ऊन उभी रहाते.लेकरांसाठी रडता रडता आईच्या डोळ्यात मोतीबिंद ू पडलेत.मात्र ...... कुठल्याही लेकरांनी आईच्या गळ्यात चार मोती नाही बांधलेत.ही त्यागाची मूर्ती म्हणजेच दे शाची महिला.घरासाठी उभी राहते,दे शाला योगदान दे ते.ती फक्त महिला असते.ताई आई माई ......आणि तरीही एक बाईच असते एवढे खरे .सलाम बहरीन स्त्री विशेषांकास शुभेच्छा!!

सौ. सिंधता ू ई सपकाळ. (माई)


अनुक्रमणिका अनु. क्र.

शीर्षक

लेखक / कवी

पान क्र.

१)

विज्ञान जगतातील भारतीय सौदामिनी

सौ. अर्चना कुलकर्णी

११

२)

सावित्रीच्या लेकी किती सुरक्षित

सौ. दिपाली सुतार

१४

३)

महिलांसाठी योगासने

सौ. शिल्पा अभ्यंकर

१६

४)

आई

सौ. अनघा दे शमुख

२०

५)

स्त्री भ्रूण हत्या

सौ. वृंदा अभ्यंकर

२०

६)

माई

सौ. शितल रोडे

२१

७)

महाराष्ट्राच्या तेजोमय कीर्ती शलाका

श्री. पृथ्वीराज रोडे

२२

८)

मेहेर

श्री. मिहीर ठकार

२५

९)

पंचांगावरून आकाश दर्शन

श्री. अविनाश फडणीस

३२

१०)

स्वागत नव वधूचे

सौ. रसिका जोशी

३६

११)

ओळख

श्री. मुकंु द ढाके

३६

१२) दे वाभूमितन ू दिसणारा स्वर्ग – बहर इन

श्री. प्रवीण मानकर

३८

१३)

अन्नपूर्णा ते अन्न हे पूर्ण ब्रह्म

श्री. शरद कुलकर्णी

४०

१४)

ख्मेर स्त्रीजीवन

श्री. अमोल उकीडवे

व्यथा गर्भवतीची

१५) टोस्ट मास्टर मधील अनुभव

४१

सौ. शिल्पा धुमे

४४

श्री. पराग नाडकर्णी

४५

१७) स्त्री शिक्षणाची वाटचाल

सौ. मृण्मयी बापट

४७

१८)

नातं कोण(?)च

सौ. ज्योती माहुले

१९)

नेहमी आपण बायकांबद्दल ...

१६)

सावित्रीच्या लेकी किती सुरक्षित ?

२०) परिवार का सुख नारी के हात मे

सौ. रसिका जोशी

५६

सौ. मनीषा बापट

५७

Maharashtra Cultural Society, PO Box 10527, Manama. Bahrain. Reg. No. 38 /S/TAGR. Tel. 17272050 Society for Social, Cultural , Educational & Sports activities.

४९


डावीकडू न बसलेले: �ी.ऋ�षकेश रानडे (मा�हतीतं�ज्ञान सिचव), �ी.योगेश खंडागळे (मुख्यसिचव), �ी. अभय चांदजकर(अध्यक्ष), �ी.�दनेश वेदक (उपाध्यक्ष), �ी.पृथ्वीराज रोडे (सांस्कृ ितक सिचव) ु ी कुलकण� (म�हला कायर्का�रणी सदस्य), �ी.�वशाल गोसावी (ख�जनदार), डावीकडू न उभे: सौ.मंज� �ी. अशोक शेट्ट� (जनसंपकर् सिचव), �ी.�ीकांत डहाळे (जनसंपकर् सिचव), सौ.अपणार् बापट (म�हला कायर्का�रणी सदस्य), �ी.सु�जत सुतार (��डा सिचव), सौ.सुवणार् मलमकर (म�हला कायर्का�रणी सदस्य)

�ी. यशोधन अभ्यंकर उपसंपादक सौ.धन�ी चांदजकर

�ी. मुकुंद आनंद ढाके संपादक

संपादन सिमती सौ. वैशाली ढाके

लेखन सहाय्य सौ. गौर� कुलकण� जा�हरात संकलन �ी. पृथ्वीराज रोडे

�ी. ऋ�षकेश रानडे उपसंपादक (इ-सलाम बहर�न) सौ. अपणार् बापट मु��तशोधन �ी. शरद कुलकण�

�काशक

मा�हती व तं�ज्ञान �ी. रामचं� रायकर

Maharashtra Cultural Society, P.O. Box: 10527 Manama, Kingdom of Bahrain. Tel. (Office): (+973) 17 272 05 - Email: mcs.bahrain@gmail.com (या अंकातील लेखक व कवी यांच्या मतांशी संपादक�य मंडळ आ�ण कायर्का�रणी सिमती सहमत असेलच असे नाह�.)

१०


मध्यंतरी ‘Leadership or technology doesn’t know gender’ हा एक अत्यंत सुंदर सुविचार वाचनात आला आणि माझ्या डोक्यात विचारमंथन सुरु झाले की हे कितपत खरे आहे . विचार करता करता मी शोध घ्यायला सुरुवात केली की विज्ञान व संशोधन क्षेत्रामध्ये भारतीय महिलांचे योगदान कितपत आहे , व मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. भारतीय विज्ञान व संशोधन क्षेत्रामध्ये पुरुषांचे योगदान तर उलेखनीय आहे च पण स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या क्षेत्रात काम करत आहे त. खरे तर पूर्वी कधी नव्हे अश्या प्रगतीच्या किंवा कदाचित उत्क्रांतीच्या एका वेगळ्या अनवट वळणावर आपण उभे आहोत. आणखी काही वर्षामध्ये अशी एक अवस्था स्त्रियांना प्राप्त होणार आहे की त्यामुळे फक्त त्यांच्यापुरतीच नव्हे, तर संपूर्ण जगाची परिमाणे बदलून जातील. आयुष्यात के आणि सी एकत्र येणे खुपच गरजेचे असते. नॉलेजचा ‘के’ आणि कम्युनिकेशनचा ‘सी’ तुम्हाला यशस्वी बनवतो. केवळ ज्ञान असून भागत नाही. कधी इतरांना सांभाळू न घेत, तर कधी त्यांची मदत घेत पुढे जावं लागतं. तरच यशस्वी होणं शक्य असतं व माझ्या मते स्त्रियांना हे तंत्र चांगलेच अवगत आहे . स्त्रिया आज फक्त आर्थिक गरज म्हणून काम करत नाहीत, तर तो त्यांच्या क्षमतांचा आविष्कार असतो. मी आज अश्याच विज्ञान व संशोधन क्षेत्रातील काही स्त्रियांचा लेखाजोखा सादर करणार आहे . डॉ. टे सी थॉमस भारताची ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगद्विख्यात टे सी थॉमस ह्या अग्नी ५ ह्या भारताच्या महत्वकांक्षी, लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्र-विकसन प्रकल्पात प्रोजेक्ट डायरे क्टर म्हणून कार्यरत होत्या. ह्या क्षेपणास्त्र विकसनामुळे, भारताला आंतरखंडीय आणि त्याच्या शत्रुदे शातील महत्वाच्या शहरावर सुद्धा हल्ला करायची क्षमता प्राप्त झाली आहे . डॉ. परमजीत खुराणा – ह्या दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पती आण्विक जीवशास्त्र विभागात कार्यरत आहे त. त्यांचे संशोधन प्रामुख्याने सर्व-हवामान (All-Weather Crops) बियाणे विषयात असून वनस्पती Genomics वर केंद्रित आहे . त्यांनी सुधारीत गहू, तांदळ ू आणि तुतीच्या दषु ्काळ-प्रतिरोधक जाती विकसित केल्या आहे त ज्यात वातावरणातील उच्चतणाव, उष्णता आणि अतिनील किरणे रोधकक्षमता आहे . हे संशोधन कृ षीक्षेत्रासाठी वरदान ठरले आहे .  डॉ. मिताली मुखर्जी - Institute Of Genomics and Integrative Biology, Delhi.

मुखर्जींचे संशोधन मानवी Genomics वर वैयक्तिक औषध (Personalized Medicines) ह्या विषयात आहे . ह्या संशोधनामध्ये प्रत्येक मानवी शरीररचनेनस ु ार औषधे विकसित / निर्माण केली जातील. डॉ. शुभा टोळे – (Tata Institute of Fundamental Research) २० ऑक्टोबर २०१० हा दिवस शुभा टोळे ह्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरला, कारण चेतासंस्था शास्त्रातील ह्यांच्या संशोधनासाठी विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित असा शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने ह्यांना सन्मानित करण्यात आले. ह्यांचे संशोधन General Science and Nature

११


Neuroscience ह्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. Genetic Mechanism जे मेंदच ू ्या विकासावर ताबा ठे वते त्या संदर्भातील ह्यांचे संशोधन विज्ञान जगतात महत्वाची कामगिरी बजावत आहे . ह्यांच्या संशोधाने Autism व Schizophrenia ह्या आजारांचे मूळ कारण शोधण्याची एक दिशा विज्ञानाला मिळवून दिली.

डॉ. सुजाता रामदोराई - TIFR, मुंबई येथे गणिताच्या प्राध्यापिका आहे त. सध्या ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा विद्यापीठ संलग्न), प्रा. रामदोराई ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर Algebraic Number Theorist म्हणून प्रसिद्ध आहे त. त्यांचे कार्य Iwasawa Theory वर प्रमाणित धरले जाते. त्या प्रथम आणि एकमेव भारतीय आहे त, ज्यांनी २००६ मध्ये प्रतिष्ठित ICTP रामानुजन पुरस्कार पटकावला. तसेच त्या २००४ मध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या आहे त. त्या २००७ पासून २००९ पर्यंत राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या सदस्या होत्या. पुढे २००९ पासून त्या पंतप्रधान वैज्ञानिक सल्लागार समितीच्या आणि नॅशनल इनोव्हेशन कौन्सिलच्या सदस्या आहे त. डॉ. शशी वाधवा – ह्यांच्या संशोधनात

Developmental Neurobiology, Quantitative Morphology and Electron Microscopy ह्यांचे मोठे स्थान आहे . ह्यांनी

प्रामुख्याने विकसनशील मानवी मेंदच ू ्या अभ्यासावर भर दिला आहे , ज्यात Human Spinal Cord, Visual Pathway, Cerebral Nuclei and the Autonomic Innervation (मज्जातंत,ू स्नायू, किंवा शरीराचा भाग कार्यक्षम करणे) of Human Urinary Bladder चा अभ्यास केला गेला आहे . ह्या अभ्यासामुळे आण्विकस्तरावर (Molecular Level) सहभागी प्रक्रियांचा विकास समजून रोगनिदानविषयक साहित्य आणि प्राणीप्रयोगासाठी तुलनात्मक / आधाररे खा माहिती उपलब्ध केली आहे . सध्या त्यांची प्रयोगशाळा श्रवणविषयक (Auditory) Nuclei, उच्च-श्रवणविषयकक्षेत्र, मज्जासंस्थेसंबंधी क्रियेचा परिणाम, इत्यादींवर संशोधन करीत आहे . हा अभ्यास गर्भधारणेदरम्यान अर्भकाचे श्रवण उत्तेजित करण्यासाठी परिणामकारक होऊ शकतो. ह्यामुळे साधारण आणि असाधारण अश्या दोन्ही मुलांच्या भाषासंपादन आणि अध्ययन-संबंधित विकारांमध्ये, तसेच सामान्य मुलांची शिक्षणक्षमता सुधारण्यासाठी मदत होऊ शकेल. प्रो. इं दिरा नाथ – ह्या कुष्ठरोग (Leprosy) आणि रोगप्रतिकार (Immunology) ह्या विषयांमध्ये जागतिक कीर्तीच्या अधिष्ठाता आहे त, तसेच त्यांना ह्या अभ्यासक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री दे खील मिळालेली आहे . ह्यांचे संशोधन क्लिनिकल तपासणीसाठी निदान, Immunotherapy आणि Antigens साधने निर्माणासाठी आहे . ह्यांच्या संशोधनामुळे कुष्ठरोग उपचार आणि लस विकासाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे . त्या आपणास जीवन आणि मानवी क्षमतेच्या अरुंद दृष्टीपलीकडे जाऊन विचार करण्याची प्रेरणा दे तात. अखिल भारतीय मेडिकल सायन्स संस्था (जैवतंत्रज्ञान विभागाच्या) प्रमुख व एस.एन. बोस केंद्र येथे संशोधक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे त. ह्यांच्या संशोधनामुळे भारताला जगाच्या नकाशावर एक मानाची जागा मिळवून दिली. प्रो. नाथ ह्या ‘L'Oreal-UNESCO 2002’ award for ‘Women in Science – Asia / Pacific Region’ सन्मानाने गौरविल्या गेलेल्या पहिल्या भारतीय आहे त. प्रो. नाथ ह्यांनी १९७० मध्ये कारकीर्द सुरू केली तेव्हा, भारतात कुष्ठरोग रुग्णांची सर्वाधिक संख्या होती, पण प्रो. नाथ ह्यांच्या संशोधनामुळे त्यात लक्षणीय घट झाली. ह्यांनी १९८६ मध्ये AIIMS येथे भारतातील पहिला विभाग विकसित केला, जिथे रोगापासून संरक्षण कसे मिळते ह्याचा अभ्यास, आण्विक जीवशास्त्र आणि आधुनिक जीवशास्त्रामध्ये biomedical कर्मचारी प्रशिक्षण दिले जाते. प्रो. अन्ना माणी - प्रतिष्ठीत भारतीय हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभागाच्या माजी उप-महासंचालक होत्या. त्यांनी हवामानाच्या साधन-विषयाच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले. सौरकिरणे, ओझोन आणि पवनऊर्जा मोजमाप क्षेत्रातील संशोधनात त्या अग्रेसर होत्या. ह्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये पदवी घेतली. त्यांना नोबेल पुरस्कार विजेता सी.वी.रमण यांच्या बरोबर काम करायचे

१२


भाग्य प्राप्त झाले. रुबी (माणिक) आणि डायमंड (हिरा) च्या ऑप्टिकल गुणधर्मांवर त्यांनी संशोधन केले व पाच वैज्ञानिक पेपर प्रकाशित करण्यात आले. प्रो. सुलोचना गाडगीळ - Centre for Atmospheric and Oceanic Sciences (CAOS), बेंगळु रू येथे भारतीय हवामानशास्त्रज्ञ आहे त. ह्यांनी अनित्य, लहरी व परिवर्तनशील पावसावर मात करून त्यानुसार शेतीपद्धतींमध्ये बदल कसा घडवायचा ह्याबद्दल संशोधन केले आहे . त्यांनी संशोधनाने सिद्ध केले की मॉन्सून हा एक अवाढव्य समुद्री-वात (Gigantic Land-Sea Breeze) नसून ग्रहांचे हं गामी स्वरुपातील स्थलांतरांचे प्रगटीकरण आहे . त्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्याने भारतातील विविध प्रांतांच्या भौगोलिक पर्जन्य असमानतेला (Variability) अनुरूप शेतीपद्धतीचा विकास करून दाखवला. ह्या सगळ्या महान स्त्रियांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान पाहता मला सुविचाराचा अर्थ चांगलाच उमगला. वैज्ञानिक हा स्त्री किंवा पुरुष नसतो तर तो फक्त वैज्ञानिकच असतो. या क्षेत्रामध्ये स्त्रियांसमोर खुपच कठीण आव्हाने आहे त. भारताच्या वैदिक इतिहासात जर डोकावून पाहिले तर अगदी पुरातन कालापासून स्त्रिया ह्या संशोधन किंवा तत्वज्ञान क्षेत्रात आपले स्थान टिकवून आहे त. त्यात तत्वज्ञानातील काही ठळक नावे म्हणजे गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, घोषा ई. ह्या होत्या वैदिक भारतातील सौदामिनी. मी ज्यांचा उल्लेख वरील लेखात केला आहे त्या आहे त आधुनिक भारतातील सौदामिनी. जागेअभावी मी काही मोजक्याच विदष ु ींचा उल्लेख केला आहे , पण बाकीच्यांचे कार्यसुद्धा उल्लेखनीय आहे . आपल्या दे शामध्ये बऱ्याच भागात अजूनही विज्ञान ह्या क्षेत्राबद्दल अनास्था आणि अज्ञान आहे , तरी पण ह्या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करून ह्यांच्यासारख्या अनेक सौदामिनी, विज्ञान क्षेत्रामध्ये चमकत राहणार ह्यात शंकाच नाही आणि ह्यांच्या कार्याचा गौरवादाखल हा श्लोक म्हटल्याशिवाय राहावत नाही: या दे वी सर्वभत ू ेषु बुद्धीरूपेण संस्थित:

नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः

सौ. अर्चना कुलकर्णी

******** टीप: ह्या माहितीचा स्त्रोत हा विविध माध्यमे आहे त आणि माहितीतील सत्यता बहुतांशी पडताळू न घ्यायचा प्रयत्न केला आहे . इं ग्रजी शब्दांचे मराठी भाषेत रुपांतर करताना काही शब्द चपखल बसलेले नाहीत म्हणून ते कंसात निर्देशित केले आहे त ह्याची नोंद घ्यावी.

Email: creativeshetty@gmail.com

१३


“गेल्या काही वर्षापासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे .” अशी बातमी हल्ली टी.व्ही.वर झळकत आहे ,आणि ती ऐकत असतांना वाटले की काही गोष्टी किती सहज आणि सोप्या असतात आणि काही अस्तित्व आहे त्या पेक्षा ही कठीण आणि असह्य. आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत.स्त्री-पुरुष समान वा स्त्रीला समाजात अतिशय महत्त्वाचे स्थान आणि तिची ओळख म्हणजे कर्तुत्ववान आणि स्वावलंबी.स्त्री म्हटले की ममता,प्रेम,वात्सल्य,स्नेह समोर येतात आणि विशेष म्हणजे श्री. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या twitter वर असे twit करतात की, Lot of men act like they are doing a favor by asking women for their hand in marriage. But let’s think about this. She changes her name, changes her home, leaves her family, moves in with you, bares a child for you. Pregnancy destroys her body. She gets fat almost gives up in the delivery room due to extreme pain. she going through even the kids she delivers bear your name. Until the day she dies, everything she does benefits you. so really who is doing favor to whom?

असो ! काळ बदलला आहे आणि काळासोबत उदयाची पहाट दाखवणाऱ्या ज्या स्रीयासाठी खंबीरपणे व संघर्ष करणाऱ्या त्या सावित्रीबाई फुले.खरच असे म्हणतात एका नाण्याच्या दोन बाजू एक उजेडाची त्र एक अंधाराची. स्रीयांच्या जीवनात चार भिंती,चूल,मुल एवढे च आयुष्य असणाऱ्या स्रीयांची चक्क गाथा काही औरच झाली आहे .बालविवाह,मुंडन,स्रीयांची हत्या यांसारखे अनेक प्रश्न उभे होते. स्रियांना समाजात दयु ्यम स्थान होते. सावित्री बाईंनी शिक्षणाचे महत्व समजावले.त्यांना लिहायला वाचायला शिकवले.मुलगी शिकली प्रगती झाली ही उक्ती प्रचलीत झाली.सावीत्रींनी सगळ्या हालअपेष्ठा सहन करून स्रियांना एक नावलौकिक मिळवून दिला.आज अनेक क्षेत्रात स्त्री काम करत आहे नव्हे तर अगदी यशस्वी दे खील आहे .घर आणि ऑफीस सांभाळू न ति तिची ओळख,आस्तित्व निर्माण करत आहे .पण स्त्रीच आस्तित्व एवढ नाजूक असते यांची जाणीव आज होत आहे . का? कारण याला कारणीभूत कदाचित स्त्रीच. शिक्षण माणसाची प्रगती करते,त्याची प्रतिष्ठा,पद,सन्मान मिळवून दे ते.शिक्षणाने माणसाची कक्षा रुंदावते,आकांक्षा वाढतात.सारासार विचार करायला लागतो.आणि जगण्याची श्रेणी सुद्धा. नवीन टे क्कनोलॉजी वाढत सायन्स आणि fashion यात स्त्री तर बदलली आहे आणि त्यातच विकृ ती ही आलीच. मलामाझ्यामताप्रमाणे कदाचित fashion आणि शिक्षण याच्या गफलती वृत्ती बाहे र आहे . शिक्षण माणसाला बदलते पण standardness कपड्यामुळे कदाचित ग्लामौरच्या नावा खाली होणारे अंगप्रदर्शन व अवाजवी attitude हे हिं सा करायला प्रवृत्त होतेंय. १०० % चूक आपलीच आहे असे नव्हे पण ५० % तर नक्कीच. आई वडील सांगतात मुलीना सातच्या आत घरी असावे याचा अर्थ कधीच समजतच नाही पण त्याचा अर्थ उशिरा कळतो. सावित्रिनी standard आणि fashion हे कधीच केले नाही. त्यांनी फक्त आनंदाने जागण्यास आणि जगवण्यास शिकवले आहे . fashion च्या नावाखाली सर्रास आढळणारी गैरवर्तणूक हे कशाचे प्रतिक आहे . खरे तर कॉलेजमध्ये ड्रे सकोड साठी केलेली सक्ती, घरातील चर्चा, आंदोलने , आक्षेप आणि पालकांकडू न घातली जाणारी बंधने आणि तारुण्यातील जोश आणि बेकार वृत्ती, जरी आपण कितीही नाकारले तरी बाईपण सिध्द करायला झगडा द्यावा लागतो हे सत्य. शेवटी प्रगतदे शात स्त्री ला अग्नीपरीक्षा द्यावी लागते हे खरे . म्हणतात ना , आपले राखावे आणि दस ु ऱ्यांना यश द्यावे. थोडे भानावर येऊन स्त्रीने स्त्रीत्व जपावे कारण उद्या कोणी सावित्री येईल की नाही माहित नाही पण निदान या स्वतंत्र दे शात मी सावित्रीची लेक आणि मी सुरक्षित आहे एवढे तर म्हणता आले पाहिजे !!!! सौ. दिपाली सुतार

१४


योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा दवा ु . प्राचीन काळापासून भारतात प्रचलित असलेली ही विद्या आता साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे . योगासनांमळ ु े शरीर तर सुडौल होतेच, त्याचबरोबर मनालाही स्थैर्य मिळते. योगासनांचा विचार करताना प्रामुख्याने तीन अंगांचा विचार केला जातो - आसने, प्राणायाम आणि ध्यान. योगासने हा प्रत्येक वयोगटातील लोकांना करता येण्याजोगा व्यायाम आहे . मुलांना योगासनांचा फायदा शरीर लवचिक करण्यासाठी होतो. विविध अवयवांना योग्य ताण दिल्याने उं ची वाढते. तसेच एकाग्रता वाढण्याचा फायदा अभ्यासात होतो. तरुण आणि वृद्ध व्यक्तींनाही योगाभ्यासाचा खूप फायदा होतो. स्नायू बळकट होतात; कामाचा शीण येत नाही आणि शांत झोप लागते. आज आपण महिलांसाठी योग आणि तो ही विशेषतः चाळीशी नंतरचा योग ह्याचा विचार करणार आहोत. चाळीशीनंतर शरीरात अनेक बदल होतात. Hormonal imbalance, thyroid, रक्तदाब, मधुमेह अशा तक्रारी सुरु होतात. इथून पुढे रजोनिवृत्ती म्हणजेच menopause ची सुरुवात होते. अशा वेळी शरीर सुदृढ आणि मन शांत असणे गरजेचे असते. त्यासाठी योगासनांसारखा दस ु रा उत्तम पर्याय नाही. आता आपण वेगवेगळ्या समस्या आणि त्यासाठी करावयाची आसने बघूया. (१) वजन कमी करणे – योगासनांनी वजन खूप कमी झाले नाही तरी शरीर सुडौल होते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. खालील आसने नियमित करून त्याच्याबरोबर चालण्यासारखा सोपा व्यायाम आणि थोडे से आहाराकडे लक्ष दिल्यास वजन निश्चितच कमी होते. (१.१) सूर्यनमस्कार – सूर्यनमस्कार हा सर्वार्थाने चांगला व्यायाम आहे . ह्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतो. एका सूर्यनमस्कारात १० आसने आहे त. जलद गतीने सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा calorie burning साठी उपयोग होतो. सुरुवात १२ पासून करून हळू हळू नमस्कार वाढवत जावेत. (१.२) सायकलींग – पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात दम ु डू न सरळ करा. पाय जमिनीवर न टे कता परत वर आणा. (१.३) पोलो – पाठीवर झोपा. डावा पाय पहिल्यांदा डावीकडू न आणि नंतर उजवीकडू न गोलाकार फिरवा. नंतर उजवा पाय उजवीकडू न आणि डावीकडू न गोलाकार फिरवा. आणि मग दोन्ही पाय एकत्र जुळवून हा व्यायाम साधारण ५ ते १० वेळा करा.

(१.४) अनंतासन – डाव्या कुशीवर झोपा. उजवा पाय गुडघ्यात न वाकवता वर खाली करा. नंतर उजव्या कुशीवर झोपून डावा पाय वर खाली करा. हा व्यायाम साधारण २० वेळा करा. (२) मधुमेह – ह्यामध्ये मुख्यत्वे pancreas (स्वादपि ु ंडला चालना दे णारी) activate करणारी आसने आहे त.

(२.१) जठर परिवर्तनासन – हे आसन कापडी पट्ट्याच्या सहाय्याने केले जाते. पाठीवर झोपा. दोन्ही पायांच्या तळव्यांमध्ये पट्टा अडकवा. पाय ९०o मध्ये वर उचला. पट्टा वापरल्यामुळे पाय ताठ रहाण्यास मदत होते. नंतर पाय डोक्याच्या सरळ रे षेत उजवीकडे जमिनीवर टे कवण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोटाला चांगला पीळ बसतो. हे आसन प्रत्येक बाजूने २ ते ३ मिनिटे करावे.

१६


(२.२) पश्चिमोत्तानासन – या आसनात सबंध शरीराची मागची म्हणजे पश्चिम बाजू अतिशय तीव्रतेने ताणली जाते. सुखासनात बसून पाय सरळ करा. श्वास सोडा. हात लांबवा. हाताचा अंगठा आणि दोन बोटांनी पायाचा अंगठा पकडा. पाठीचा कणा ताणा. सुरुवातीला पाठ कुबड आल्यासारखी दिसेल, कारण पाठीचा कणा फक्त खांद्याच्या भागापासून ताणला जाईल; परं तु पाठीच्या ओटीपोटाच्या मागच्या भागापासून कणा ताणायचा प्रयत्न करा आणि हात खांद्यापासून पुढे लांबवा. कपाळ गुडघ्याला टे का. या आसनामुळे पोटातील अवयवांचे कार्य सुधारते. पचनक्रिया सुधारते. Pancreas activate होतात. या आसनांबरोबरच अर्धमत्स्येन्द्रासन, वक्रासन, सर्वांगासन, हलासन हि आसनेदेखील उपयोगी पडतात. (३) पाठदख ु ी, कंबरदख ु ी – ही आसने back bending प्रकारात येतात. Back bending मुळे पाठीचे स्नायू बळकट होतात. मात्र हि आसने preventive म्हणून केली जातात. खूप प्रमाणात पाठदख ु ी अथवा कंबरदख ु ी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही आसने करावीत. (३.१) भुजंगासन – हे आसन पोटावर झोपून ३ टप्प्यांमध्ये केले जाते. पहिल्या प्रकारात, पोट संपन ू छाती सुरु होते त्याठिकाणी तळवे जमिनीवर टे कवा. श्वास घ्या. तळवे जमिनीवर घट्ट दाबा आणि धडापासून शरीर वर उचला. थोडा वेळ दीर्घ श्वसन करीत आसन टिकवा. दस ु ऱ्या प्रकाराला वक्रहस्त भुजंगासन म्हणतात. तळवे खांद्यांच्या रे षेत जमिनीवर दाबा आणि फक्त नाभीपर्यंतचा भाग वर उचला. कोपरे जमिनीपासून वर वाकवलेल्या अवस्थेत ठे वा. ह्यात पाठीच्या मध्यभागावर चांगला ताण जाणवतो. तिसऱ्या प्रकारात हात डोक्याच्या रे षेत जमिनीवर दाबा आणि धडापासून शरीर वर उचला. पाठीच्या सर्वात शेवटच्या मणक्याला ताण जाणवतो. भुजांगासनाचे हे तीनही प्रकार सरावाने थोडा वेळ टिकवण्याचा प्रयत्न करा. हे आसन म्हणजे दख ु ावलेल्या पाठीच्या कण्यावर रामबाण उपाय आहे . मणक्याच्या चकत्या किंचित सरकलेल्या असतील तर हे आसन केल्यामुळे त्या मूळच्या जागी येतात. पाठीच्या कण्याला बळकटी येते आणि छाती पूर्णपणे फुगवली जाते. (३.२) ऊर्ध्वमुख श्वानासन – ऊर्ध्वमुख म्हणजे वरती केलेले तोंड आणि श्वान म्हणजे कुत्रा. हे आसन कुत्र्याने स्वताःचे अंग ताणून डोके उचलले म्हणजे दिसणाऱ्या दृश्याप्रमाणे दिसते. पोटावर झोपा. पायांमध्ये २ फुट अंतर ठे वा. तळवे कंबरे च्या बाजूला जमिनीवर ठे वा. श्वास घेऊन डोके व घड वर उचला. हात पूर्णपणे ताणा. गुडघे जमिनीवर न टे कवता डोके व धड शक्य तितके मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. हि स्थिती अर्धे ते एक मिनिट टिकवा. या आसनामुळे पाठीच्या कण्याला नवजीवन मिळते. पाठीतील उसण, सायटिका हे विकार असलेल्या लोकांना व कण्यातील चकत्या सरकलेल्या लोकांना हे आसन लाभदायक ठरते. या आसनामुळे पाठीचा कणा सुधढ ृ बनतो आणि पाठदख ु ी बरी होते. ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण योग्य रितीने होऊ लागते आणि तो भाग निकोपी बनतो. (४) cholesterol & thyroid (४.१) सर्वांगासन – या आसनात सर्व शरीराला व्यायाम मिळतो. पाठीवर झोपा. श्वास घ्या आणि पाय ९०o मध्ये वर उचला. त्यानंतर हलकासा झोका घेऊन कंबर उचला आणि धड काटकोनात वर आणा. डोके, मान, खांदे व दं ड एवढे च भाग जमिनीवर टे कलेले असावेत. हे आसन सरावाने ५ मिनिटांपर्यंत टिकवता येते. ह्या आसनाचे महत्व कितीही सांगितले तरी थोडे च. आपल्या प्राचीन ऋषींनी मानवतेला दिलेले हे एक महान वरदान आहे . सगळ्या सर्वसाधारण विकारांवर हे एक रामबाण औषध आहे . Hormonal imbalance साठी हे आसन प्रामुख्याने केले जाते. मानेतील thyroid आणि parathyroid ग्रंथींना जालंदरबंधामुळे (हनवटी कंठात जाणे) रक्ताचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊ लागतो. शरीराचे गुरुत्व या आसनात बदलते. त्यामुळे पोटाच्या अवयवांवर चांगला परिणाम होतो. शरीर यंत्रणेमधील विषद्रव्ये (toxins) निघून जातात, मूत्रमार्गाच्या तक्रारी, गर्भाशय सरकणे, मासिक पाळीच्या बाबतीतील त्रास, मुळव्याध हे त्रास असणाऱ्या व्यक्तींना हे आसन उपयोगी पडते. हे आसन योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावे. उच्च रक्तदाब अथवा मानेचे आजार असणाऱ्या लोकांनी हे आसन करू नये.

१७


(४.२) हलासन – हल म्हणजे नांगर. हे आसन नांगरासारखे दिसते. हा सार्वांगासनाचा पुढचा टप्पा आहे . सर्वांगासन करा. हनवटी कंठात रुतवू नका. धड किंचित खाली आणा. हात आणि पाय डोक्यावरून मागे न्या. पायाची बोटे जमिनीवर टे कवा. हि स्थिती १ ते ५ मिनिटे टिकवा. ह्या आसनामुळे pancreas activate होतात. Arthritis या वात विकारासाठीपण हे आसन केले जाते. उच्च रक्तदाब असणारी व्यक्ती हे आसन करू शकते. पाय डोक्याच्या मागे जमिनीवर टे कवता येत नसतील तर खुर्चीच्या आधाराने अर्ध हलासन दे खील करता येते. त्याचे दे खील तेवढे च फायदे आहे त. (४.३) शीर्षासन – हे डोक्यावर उभे राहण्याचे आसन असून सर्वात महत्वाच्या योगासनांपैकी एक आहे . ह्या आसनाला सर्व आसनांचा राजा असे संबोधण्यात आले आहे . हे आसन योगशिक्षकाच्या मार्गदर्शनखाली करावे. शीर्षासन नियमित केल्यामुळे मेंदच ू ्या पेशींमध्ये शुद्ध रक्ताचा प्रवाह वाहू लागतो. त्यामुळे ह्या पेशींना नवचैतन्य लाभून विचार शक्ती वाढते. Hormonal imbalance, thyroid साठी हे आसन केले जाते. रक्तदाबाचा विकार असेल तर हे आसन करू नये. (४.४) मत्स्यासन – मत्स्य म्हणजे मासा. या विश्वाचा मूळ आणि आधार म्हणजे विष्णू. त्याच्या मस्त्यावताराचे नाव या आसनाला दिले गेले आहे .पाठीवर झोपा. जमत असल्यास झोपलेल्या अवस्थेत पद्मासन घाला. मान व छाती वर उचलून कमान करा. डोके मागे खेचन ू टाळू जमिनीवर टे का. हि स्थिती ३० ते ६० सेकंद टिकवा. ह्या आसनात पाठीचा छातीमागाचा भाग पूर्णपणे ताणला जातो आणि छातीही चांगलीच फुगवली जाते. श्वसन अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागते. मान ताणली जात असल्याने कंठस्थ ग्रंथी सुधारतात. (५) रजोनिवृत्ती किंवा पाळीच्या तक्रारी – वरती उल्लेख केल्याप्रमाणे सर्वांगासन आणि हलासन यांच्याबरोबर खालील आसनांचा समावेश करावा. (५.१) द्विपाद उत्तानपादासन - पाठीवर झोपा. उजवा पाय ९०o मध्ये वर उचला. पायाची बोटे स्वतःकडे आणि टाचा छताकडे ढकला. गुडघे मात्र ताठ ठे वायचा प्रयत्न करा. पायावर चांगलाच ताण जाणवतो. प्रथम एकेका पायाने (एकपाद उत्तानपादासन) व नंतर दोन्ही पायांनी हे आसन करा. या स्थितीत २ ते ३ मिनिटे रहाण्याचा प्रयत्न करा. (५.२) भद्रासन – सुखासनात बसा. पायांच्या टाचा आणि चवडे एकत्र जुळवा. पाय जास्तीत जास्त स्वतःकडे खेचा. थोडा वेळ या स्थितीत थांबा आणि डोके पायावर अथवा जमिनीवर टे कवायचा प्रयत्न करा. डोके टे कत नसल्यास उशीचा वापर करा. या आसनामुळे ओटीपोट, पोट व पाठ या अवयवांमध्ये रक्ताचा भरपूर पुरवठा होतो. या आसनामुळे सायटीकाचे दख ु णे कमी होते. हे आसन स्त्रियांना वरदानासारखेच आहे . हे आसन नियमित केले असता मासिक पाळीमधील अनियमितता दरू होते. गर्भवती स्त्रिया दररोज काही मिनिटे या स्थितीत बसल्या तर प्रसूतिच्या वेळेस वेदना कमी होतात व व्हेरिकोज व्हेन्सचा धोका टाळतो. (Dr. Grantly Dick-Read यांच्या Child birth without pain या ग्रंथात गर्भवती स्त्रियांसाठी या आसनाची शिफारस करण्यात आली आहे ). (५.३) सुप्त भद्रासन – भद्रासनात बसा आणि पाठीवर झोपा. लोड किंवा उशीच्या सहाय्याने पाठीवर झोपले तरी चालू शकते. (५.४) उपविष्ठ कोनासन – पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. प्रथम एक व नंतर दस ु रा पाय एकमेकांपासून लांब न्या. पायांमधील अंतर जास्तीतजास्त वाढवा. पायाची मागची बाजू संपूर्णपणे जमिनीवर टे कलेली राहील याची दक्षता घ्या. पायाची बोटे पकडा. काही वेळ याच स्थितीत राहा आणि श्वास सोडू न पुढे वाका. या आसनामुळे गुडघ्यामधील शिरा ताणल्या जातात.

१८


ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण योग्य तऱ्हेने होऊ लागते आणि तो भाग निकोपी बनतो. मासिक पाळी नियमित व नियंत्रित होण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. (५.५) अधोमुख श्वानासन – अधोमुख म्हणजे तोंड खाली वळवणे. पोटावर झोपा. पायात एक फुट अंतर ठे वा. हाताचे तळवे छातीच्या बाजूला जमिनीवर टे कवा. धड वर उचला. हात ताठ करा. डोके आतल्या बाजूस पावलांच्या दिशेने वाळवा व टाळू जमिनीवर टे कवा.कोपरे सरळ राहतील याची काळजी घ्या. गुडघे न वाकवता टाचा खाली टे का. या स्थितीत ३० ते ६० सेकंद थांबा. आपल्याला थकवा आला असेल तर या आसनामध्ये अधिक काळ राहल्याने थकवा दरू होतो. शर्यतीत धावल्यानंतर थकून जाणाऱ्या स्पर्धकांसाठी हे आसन विशेष उपयोगी ठरते. (५.६) पर्वतासन – पद्मासन अथवा सुखासनात बसा. बोटे एकमेकांत गुंफून हात डोक्याच्या वर सरळ ताणा. १ ते २ मिनिटे या स्थितीत थांबा. या आसनामुळे संधीवाताच्या वेदना नाहीश्या होतात; तसेच खांद्यातील ताठरपणा जातो. पोटाचे अवयव आत खेचले जातात. प्राणायाम – या सगळ्या आसनांच्या जोडीला प्राणायाम व ध्यान धारणा करणेही तितकेच महत्वाचे आहे . सर्वसाधारणपणे आपण फुफ्फु साचा फक्त ३० टक्के वापर करतो. पण प्राणायामाने आपण ही क्षमता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो. प्राणायाम शक्यतो रिकाम्या पोटी करणे चांगले. पण हे कठीण वाटले तर १ कप दध ु , चहा किंवा कॉफी घ्यायला हरकत नाही. जेवण झाल्यावर मात्र ३-४ तास उलटल्याखेरीज प्राणायाम करू नये. प्राणायाम करून झाल्यावर अर्ध्या तासाने अल्प आहार घ्यायला हरकत नाही. प्राणायामाचे काही प्रकार पुढीलप्रमाणे – कपालभाती (कपाल – कवटी, भाती – प्रकाश) – यात श्वास घेण्याची क्रिया (पूरक) संथ असते तर श्वास सोडण्याची क्रिया (रे चक) जोरात असते. त्याचबरोबर ओटीपोट आत व बाहे र खेचले जाते. यकृ त, स्वादपि ु ंड व पोटाचे स्नायू यांचे चलनवलन होऊन त्यांना जोम लाभतो. त्यामुळे पचन सुधारते. नासिकामार्ग मोकळा होतो. डोळ्यांना थंडावा लाभतो आणि आल्हाददायक वाटते. भस्त्रिका – भस्त्रिका म्हणजे भट्टीचा भाता. लोहाराच्या भात्याप्रमाणे हवा आत घेतली जाते व जोरात बाहे र फेकली जाते. भास्त्रीकेला आजच्या युगात instant energiser म्हणून दे खील संबोधले जाते. शरीराच्या चलनवलनासाठी भस्त्रिका प्राणाची निर्मिती करते. ह्यात एक पूरक श्वास घेऊन एक रे चक श्वास जोरात सोडला जातो – ज्या प्रमाणे आपण सर्दी झाल्यावर शिंकतो तसेच. नाडीशोधन प्राणायाम – शोधन म्हणजे शुद्धीकरण, स्वच्छ करणे. नाडीशोधन प्राणायाम हा शरीरातील नाड्या अथवा रक्तवाहिन्या शुद्ध करण्यासाठी केला जातो. सुखासनात अथवा पद्मासनात बसा. पाठीचा कणा ताठ ठे वा. उजव्या हाताच्या अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करा. अनामिका आणि करं गळीने डावी नाकपुडी बंद करा. प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. हे झाले एक आवर्तन. अशी सलग ८ ते १० आवर्तने करा. श्वासोच्छवास संथ गतीने करा. नेहमीच्या श्वासानापेक्षा नाडीशोधन प्राणायामामुळे शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. त्यामुळे तजेलदार वाटते व डोके शांत राहते. ध्यान – सर्वात महत्वाची आणि बरे चदा दर्लक्षित केली जाणारी क्रिया. ज्या प्रमाणे शरीर स्वच्छ ठे वण्यासाठी ु आपण रोज स्नान करतो तसेच ध्यान हे मनासाठीचे स्नान आहे . मन, ज्याच्यात सतत विचारांचे काहूर माजलेले असते, त्याला स्थिर करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे . Modern भाषेत सांगायचे तर मनातील excess, unwanted विचार delete करण्याचे बटन म्हणजे ध्यान. सुरवातीला ध्यान लावणे कठीण वाटत असले तरी सरावाने ते सहज जमू शकते. सुरवातीला खूप विचार येतील, तरी ते येऊ द्या. आपल्या डाव्या हाताला भूतकाळातील विचारांची, मध्ये वर्तमानकाळातील विचारांची आणि उजव्या बाजूला भविष्यातील विचारांची, अशा ३ काल्पनिक टोपल्या ठे वा. मग जसे जसे विचार येतील त्याप्रमाणे ते या काल्पनिक टोपलीत टाकायला सुरवात करा. काही काळानंतर असा क्षण येईल की तुम्ही विचार येण्याची वाट बघाल. तो क्षण म्हणजेच ध्यान. कुठलेही काम एकाग्रतेने करणे हे दे खील एक प्रकारचे ध्यानच आहे . आसने, प्राणायाम आणि ध्यान धारणा हि निरोगी शरीराची तसेच मनाची गुरुकिल्ली आहे . या त्रिसूत्रीचे नियमित आचरण केल्यास त्याचा फायदा होईल यात काही शंका नाही. सौ. शिल्पा यशोधन अभ्यंकर Email: shilpa306@gmail.com

१९


आई प्रत्येकाच्या जीवनातला अखंड प्रेमाचा निर्मळ झरा. आयुष्यात ज्याला आईचे भरभरून प्रेम लाभले तो खरा ऐश्वर्यसंपन्न.

"आई सारखे दै वत साऱ्या जगातावर नाही." म्हणून ‘श्री’ काराच्या नंतर शिकणे अ आ ई” ह्या भावगीताच्या ओळी मला सतत आठवतात. असं म्हणतात की परमेश्वर माता-पित्याच्या रुपात प्रत्येक घराघरात वसतो आणी आपली कृ पादृष्टी ठे वतो. आई, माता, मा, जननी, मदर अशी वेगवेगळी संबोधन पण तिच्यातले भाव मात्र सर्वत्र सारखेच. ममता, वात्सल्य,करुणा, शांती,क्षमा, पावित्र्य, त्याग, मांगल्य, प्रेम अशा अनेक गुणांची ती खाण. तिला आयुष्यात फक्त आणि फक्त नि: स्वार्थ दे णंच माहीती आहे . त्याच्या मोबदल्यात काहीही न मागणार असं हे परमेश्वराच रुप खरोखरच अतर्क्य. परमेश्वरानी स्त्रीरुपात घेतलेले हे सगळ्यात श्रेष्ठ रूप.आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचे जगज्जेते स्वामी विवेकानंद, श्रीमद् आद्य शंकराचार्य हे जरी या स्थूल जगापासून विरक्त होते, तरीही आईच्या अंत्यक्षणी ते आईच्या सान्निध्यात राहिले. तिचे ऋण, तिचे श्रेष्ठत्व त्यांनी जपलं. मानव ह्याचा अर्थ ज्याला नऊ माता आहे त असा तो मानव.त्या नऊ मातांपासून मानव आपलं आयुष्य समृद्ध करतो. जन्मदात्री, गोमाता, गुरुमाता, जन्मभूमी, सरस्वतीमाता, लक्ष्मीमाता, धरणीमाता, गंगामाता, तुलसीमाता अश्या या नऊ मातांमध्ये जन्मदात्री ही अग्रणी. आणि हया सर्वमाता मनुष्याला जीवनाच्या सर्वांगानी समृद्ध करतात. आपण सर्वजण हया सर्वमातांचे ऋण समजून जर त्यांचे ऋणी राहिलो तर तो परमेश्वर संतष्ट ु होऊन या पृथ्वीवर स्वर्ग वसेल यात काही आश्चर्यच नाही. 'वंदे मातरम ्'

सौ. अनघा लक्ष्मीकांत दे शमुख

स्त्री भ्रूण हत्या – व्यथा गर्भवतीची माझ्या पोटातील गर्भ, माझ्या काळजाचा तुकडा, कसे धजावते मन, करण्या मुली तुझी हत्या?

करण्या गर्भपात, माझ्यावर सगळ्यांचाच दबाव, जगणे झाले नकोसे, दे वा आता तरी धाव.

नाहीस तू वंशाचा दिवा, साऱ्या गोतावळ्यासाठी, दे वाघरातील समईची, ज्योत तू माझ्यासाठी.

आतुरले मन, नाद पैजणांचा घुमावा कानात,

विकृ त वासना जगाची, बांधेल चाळ तुझ्या पायात.

अर्थार्जनासाठी मी घराबाहे र, परी जीवाला असे घोर, नासावेल का कोणी? घरी एकली माझी पोर.

सगळी कमाई लागेल ओताया, तुझ्या सासरच्या पायाशी, काय खाऊ? कशी जगू? कर्जाचा डोंगर उशाशी.

रूढी, कुळाचार, चालीरीती, माझ्या भोवती पाश, आधी सुधारा समाज, करा अविचारांचा नाश.

माझ्या पोटी गर्भ मुलीचा, दोष मला, कारण मी बाई, दे ण्यास जन्म मूलाला, लागतेचना पण एक आई?

२०

सौ. वृंदा अरुण अभ्यंकर


माई जरी दयाळू आणि कृ पाळू

न मागसी जरी तू

असे प्रभू गगनात |

लाचार मदतीचा हात |

परी आम्हा दिसे तो

नि:शंक असशी तू

सदय तुझ्या नयनात ||

मिळे ल तुजला साथ ||

असशी जगी जर

प्रार्थना,सदिच्छा,

तू सर्वांच्या हृदयात |

असे सदा स्मरणात |

राहे न कुणी मग

मिळो न तुजला

निर्बळ आणि अनाथ ||

कारुण्य पुन्हा दारात ||

अनमिट माया असे

सौ. शितल पृथ्वीराज रोडे

तुझ्या उदरात | होतसे बाल्य आश्वस्त तुझ्या पदरात ||

२१


महाराष्ट्राच्या तेजोमयी किर्तीशलाका जागतिक स्तरावर विविध राष्ट्रातील मानवी विकासाचा-मानवी समाजाचा विकासातील आढावा घेताना पौराणिकप्राचीन –प्रागैतिहासिक कालखंडापासून आधुनिक काळापर्यंतचा धांडोळा घेत असताना असंख्य जगद्विख्यात विभूतींची नावे किंवा त्यांची शृंखला आपल्या नजरे समोर येते. ज्यामध्ये समाजसुधारक , समाजसेवक, साहित्यिक, कलावंत, तत्वचिंतक, ऋषीमुनी , संत-पंडित-महात्मे , लोकनायक, लोकनेते, लोकसेवक, शास्त्रज्ञ, राजेमहाराजे, उद्योजक, क्रांतिकारक, लढवय्ये, विचारवंत, वगैरेंचा समावेश होतो आणि त्याचबरोबर पुरुष व महिला विभूतींचाही समावेश त्यात आढळतो. पौराणिक कालखंडात समाजोद्धाराचे महान कार्य करणाऱ्या पुरुष व्यक्तींना "दे वत्व" जसे बहाल करण्यात आले तसेच महिला (स्त्री) विभुतींना "दे वता" किंवा ‘शक्तीमाता’ आणि पुढे "भवानीदे वी-जगदं बा-अंबामाता" अशा बिरुदांनी ओळखले जाऊ लागले. भारत दे शात अशा दे वतांची ‘शक्तिपीठे ’ निर्माण झाल्याचे दिसते. उदाहरणार्थ माहुरगढ (रे णुकादेवी), कोल्हापूर (महालक्ष्मी), कोंकण (एकवीरादे वी), तुळजापूर (भवानीमाता-तुळजाभवानी), अमरावती (अंबामाता), वणी (सप्तशृंगीमाता), पुणे (चतुशंग ृ ीमाता), औधसंस्थान (भवानीआई), काश्मीर (वैष्णवीदे वी), मुंबई (मुंब्रादेवी), कर्नाटकसौंदची (यल्लमादे वी) आणि कोलकताची (कालिका), राजस्थान (पद्मावती), मध्यप्रदे शची ( दर्गा ु माता) अशा दे वी-दे वता आणि त्यांची उपठाणी त्याकाळापासून प्रचलीत आहे त. या महिला मातादे वींचे कार्य त्याकाळी अद्वितीय व चमत्कृतीयुक्त आणि सामान्य माणसांच्या दृष्टीने अनाकलनीय व प्रचंड ताकदीचे असेल म्हणून त्यांना दे वीत्व-शक्तीदे वी मानवी समाजाकडू न बहाल झाले असले पाहिजे. प्राचीन-ऐतिहासिक कालखंडातही कित्ता घडलेला असावा म्हणून वीर,शूर राण्या महाराण्यांना दे वत्व प्राप्त झालेले असले पाहिजे. (उदाहरणार्थ प्रभू रामचन्द्र राजाची पत्नी सीतामाई, राणी दर्गावत ीची दर्गाद ु ु े वी) इत्यादी. या विवेचनाचा मुद्दा असा आहे की, पुरुषांमधील कर्तबगारांना, समाजोद्धाराकांना, जसे दे वत्व प्राप्त झाले (उदाहरणार्थ श्रीकृ ष्ण द्वारकाधीश, श्री. मल्हारीमार्तंड खंडोबा, कानडू राजा श्री. विट्ठल, भैरवराजा- (कालभैरव ) इत्यादी)तसेच कार्य करणाऱ्या महिला समाजोदधारकांना दे वित्व प्राप्त झाले असले पाहिजे. थोडक्यात पुरुषांच्या बरोबरीने, कदाचित त्यापेक्षा सरस कार्य महिलांकडू नही करण्याची परं परा जगातील इतर प्रदे शांप्रमाणे भारतामध्येही चालत आलेली आहे . त्यात खंड पडलेला आढळत नसून उलट सातत्यच असलेले जाणवते. राजेशाहीच्या परं परांमध्ये राणी चन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी दर्गावत ी या आणि ु इतर राजघराण्यातील कर्तबगार राज्यकर्त्या राण्या भारतात होऊन गेल्या आहे त. या राण्या म्हणजे त्या त्या काळातील शूर-वीर दामिनीच होत. छत्रपती शिवरायांच्या जन्मदात्या राजमाता राणीमा जिजाऊ (जिजाबाई), होळकर घराण्यातील राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या करत्तृ ्वाचा आढावा घेत असतानाच इं ग्रजांच्या राजवटीच्या दरम्यान ज्या महिला समाजसेविका समाजोदधारक म्हणून कार्यरथ होत्या व ज्यांचे कार्य अजरामर ठरले त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, कॅ. लक्ष्मी, सरोजिनी नायडू यांच्याशिवाय आधुनिक भारताच्या चढणघडणीत-शिक्षणक्षेत्रात सातारच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, मदर टे रेसा, इं दिरा गांधी, सिंधुताई सपकाळ, डॉ. मेबेल आरोळे , अंतराळवीर सुनिता विल्यम्स, कल्पना चावला, खेळामध्ये सुवर्णकन्या पी.टी. उषा, सायना नेहवाल, माजी. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, संसद अध्यक्ष मीराकुमार, अनुताई वाघ, गोदाबाई परुळे कर, कवयित्री पद्मा गोळे , इं दिरा संत, बहिणाबाई चौधरी, शांताबाई शेळके, संगणक क्षेत्रातील सुधा मूर्ती, कलाक्षेत्रातील गानसम्राज्ञी लतादीदी, आशा भोसले, सिनेक्षेत्रातील हे मामालिनी, माधुरी दीक्षित, रे खा, मीनाकुमारी, नूतन, नर्गीस, सुलोचना, आशाबाई काळे , ललिता पवार अशा अनेक महिलांची कर्तबगारी नेत्रदीपक/ लक्षवेधक आहे . वैष्णवसंत कालखंडात संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, यांचे ही कार्य अजोड आहे . याशिवायही अनेक महिला किर्तिवंत होवून गेलेल्या आहे त आणि सध्याही कार्यरत आहे त. या सर्वांचा आढावा येथे मांडणे शक्य नाही आणि म्हणून खालील परिच्छेदामध्ये राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, अनुताई वाघ आणि सिंधुताई सपकाळ यांच्या महान समाजकार्याची अल्पशी ओळख सांगितली आहे .

२२


मातोश्री जिजाबाई विदर्भातील सिंदखेड राजा येथील जाधव कुटु ं बातील माहे र. वेरुळच्या भोसले घराण्यातील सासर, शहाजीराजे यांच्या धर्मपत्नी. शहाजीराजे अन्य राजदरबारी सरदारकी करत असताना आपलेही स्वतंत्र राज्य असावे असे स्वप्न उराशी बाळगून त्याचा ध्यास घेतला. शिवाजीराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. लहानगा शिवबा (खेळण्याबागडण्याच्या वयात) अंगापिंडाने भरत असतानाच्या वयात जिजाऊनी केलेल्या संसारातून शिवबांनी “रयतेचे” राज्य स्थापन करण्याचा निर्णय मावळ्यांच्या संगतीने रायरे श्वराला साक्षी ठे वून घेतला आणि अंमलात आणला. त्यावेळी जिजाऊनी शिवरायांना दिलेली प्रेरणा फलद्रुप झाली म्हणून रयतेला आपले स्वतंत्र राज्य छत्रपती शिवरायांच्या अथक शौर्यातून प्राप्त झाले. तो इतिहास दै दीप्य असल्याने अजरामर झालेल आहे . त्यामागे खरी स्फूर्ती मातोश्री जिजाबाईंची होती. हे कोणालाही विसरता येणार नाही कारण रयतेच्या स्वतंत्र राज्याच्या त्याच मुळ स्त्रोत आहे त/ होत्या. त्यांच्या शिकवणुकीनुसार शिवबांनी राज्य चालवले आणि ते अजरामर शककर्ते छत्रपती शिवाजी राजे म्हणून महाराष्ट्राला मिळाले.  

राजमाता-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पूर्वीच्या बीड जिल्ह्यातील व आत्ताच्या अहमदनगर जिल्ह्यामधील चोंढी (ता. जामखेड) येथील नानकोजी शिंदे पाटील यांच्या कुटु ं बात जन्म. पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी वयाच्या ८ व्या वर्षी विवाह. होळकर घराण्याला इं दरू (मध्यप्रदे श) परगणा प्राप्त . होळकरांचे तिथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. पती खंडेराव यांचा आकस्मात मृत्यू. सासरे सरदार मल्हारराव होळकर राज्य कारभार पाहत असताना त्यांच्या निधना नंतर अहिल्या बाईंचा मुलगा मालेराव गादीवर बसला मात्र नऊ महिन्या नंतर त्यांचे निधन झाले . मालेरावानंतर राज्याच्या कारभाराची सूत्रे राजमाता अहिल्या दे वींकडे आली. त्यांनी राज्यकारभार नेटका करताना जी कामे केली ती अजरामर ठरली. मंदिरे , पाण्याच्या बारवा, नद्यांवरचे घाट, तलाव, विहिरी अशा जनहिताच्या सोयी त्यांनी निर्माण केल्या. त्या “महे श्वर” भक्त होत्या. त्यांनी ग्रंथ लेखन ही केले. आपल्या कर्तुत्वाने त्यांनी करारी व सचोटीचा राज्यकारभार केला त्यामुळे त्यांचा गुणगौरव अजरामर ठरलेला आहे .

क्रांतिज्योती (ज्ञानज्योती) सावित्रीबाई फुले. थोर समाजसुधारक दलितांचे कैवारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या धर्मपत्नी. माहे र पुणे-बंगलोर हमरस्त्यावर शिरवळ खंडाळे नजीक नायगाव येथील नेवासे पाटील घराण्यातील. ज्योतीबांकडू न अक्षरधडे घेऊन ज्ञानसाधना. मुलींसाठी शाळा सुरु करून मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा दे त भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. स्त्रीने शिक्षक म्हणून काम करणे त्या काळी अशक्यप्राय तर होतेच, परं तु स्त्रियांनी मुलींना शिक्षण दे णे, शाळा शिकणे हे दे खील समाजाला वर्ज्य होते. दलितांना शिक्षण तर दरु ापास्तच होते. त्याकाळी पती ज्योतीराव यांच्या स्फूर्तीने स्वत: शिक्षण घेऊन तेही घरकाम, शेतीकाम करून ज्ञान मिळविले आणि समाजातील कर्मठ विघ्नसंतुष्टी लोकांचा धर्मवाद्यांचा शेण-चिखल, कचरा, दगडधोंडे यांचा मारा अश्लाघ्य (अश्लील) बोल सहन करून शिक्षिका म्हणून त्यांनी हिमतीने काम केले ते शिक्षणप्रसाराचे! म्हणून सावित्रीबाई क्रांतीज्योती तद्वत ज्ञानज्योती ठरल्या. आज व पुढेही महिला शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्थान मिळवतात, त्याचा मूळ स्रोत सावित्रीबाई फुले याच आहे त म्हणूनच त्या अजरामर आहे त.

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ पद्मभूषण कर्मवीर अण्णा यांच्या, लक्ष्मीबाई धर्मपत्नी. त्यांचे माहे र सोलापूरचे. सासर ऐतवडे येथील पाटील घराण्यातील. अण्णांच्या

२३


शिक्षणप्रसार कार्यात पूर्ण साथ दिली. वसतिगृहात राहून शिकणा-या मुलांना पोटच्या मुलांची माया दिली. रयत शिक्षण संस्था व तिची सातारा येथील वसतिगृहे चालविताना अंगावरील सौभाग्यालंकार (मंगळसूत्र) न कुरकुरता स्वयंनिर्णयाने सराफा-सोनारांकडे विकले, गहाण टाकले. केवळ खेड्यापाड्यांतून, वाड्या-वस्त्यांतून, द-या खोर-यातून शिक्षण घ्यायला आलेल्या मुलांचा शिक्षणाचा, अन्नपाण्याचा खोळं बा होऊ नये म्हणून! लक्ष्मीबाईंना “वहिनी” व “माई” म्हणून ओळखले जाई. दे शात आणि दे शाबाहे र कार्यरत असणा-या अनेक विद्यार्थ्यांच्या मागे अण्णांएवढी लक्ष्मीबाई यांचीपण प्रेरणा असल्याने त्याही अजरामर आहे त.

अनुताई वाघ

महाराष्ट्राच्या कोकणपट्टीतील ठाणे परिसरामधील डहाणू कोसबाड परिसराच्या आदिवासी लोकांसाठी आपले पूर्ण आयुष्य अनुताई वाघ यांनी खर्ची घातले. डहाणु-जव्हार-मोखाडा वगैरे मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ, जंगली, सोयीसुविधांपासून वंचित असणा-या भागात राहाणारे ठाकर, महादे व, भिल्ल आणि वारली इत्यादी आदीवासी जमातींचे पाडे अन त्यामध्ये राहणारे वावरणारे फाटकेतुटके आदिवासी यांचा विकास शासकीय –प्रशासकीय तसेच सामाजिक स्तरावर शेकडो कोस दरू असताना अनुताई वाघ यांनी त्यांना विकसित करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतेले.

या आदिवासी जमातींमध्ये असणारी स्वसंस्कृती जपत त्यांना शिक्षण, राहणीमान त्यांच्या अंगची कौशल्ये त्यांच्या कला (वारली चित्रकला, वाद्ये, नृत्यकला) यांना योग्यरीत्या विकसित करण्यासाठी आश्रमशाळा, शासकीय योजना यांचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे या पाड्यांमधील माणसे शिकू लागली आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाकडे धावू लागली, त्याचे श्रेय अनुताईंना जाते, म्हणून त्या अद्वितीय ठरतात.

सिंधूताई सपकाळ अनाथांची आई सिंधूताई! अशी ज्यांची ओळख सर्वत्र आहे त्या सिंधुताई वऱ्हाड भूमीतल्या ! मराठवाडा, खान्दे श, पश्चिम महाराष्ट्र या एकूण मराठी मुलख ू ातल्या अनाथ मुलांची आई म्हणून त्यांच्यासाठी मायेने ममत्वाने कैवारी बनल्या. सिंधुताईंनी असंख्य प्रापंचिक असह्य चटके सोसल्यानंतर द:ु खाच्या वेदनांनी त्या अनाथ मुलांना मायेची ऊब दे णाऱ्या सिंधस ु ागर झाल्या ! आई बनल्या ! अनाथांची आई होण्याचे अवघड काम सिंधुताईंनी लीलया पेलेलेले आज दिसते जे अद्वितीय असे आहे . अनाथांचे पालनपोषण, शिक्षण व त्यांना स्वावलंबी बनविण्याचे सिंधूताई यांचे कार्य अजोड असून ते अजरामर ठरणारे आहे . कोटी कोटी प्रणाम...!

महाराष्ट्राच्या या आणि अशा अनके तेजोमयी किर्तीशलाकांच्या महान अजरामर कार्यास - श्री. पृथ्वीराज रामकृ ष्ण रोडे . Email: prithvirajrode80@gmail.com

http://www.facebook.com/mcsbahrain

२४


मेहेर "काळजी करु नका, लवकरच सुटका होईल तिची" एवढं बोलुन सुईणीने दार लावून घेतले. ब-याच वेळाच्या धावपळीनंतर है दरभाई बाहे रच्या बाकावर बसले. डोळे मिटले. अस्माच्या सुखरुप सुटकेसाठी अल्लाकडे दवा ु मागितली आणि चिंतातरू अवस्थेत भूतकाळात जाऊन पोहोचले. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा प्रयत्न करुन बघावा कि नाही हा विचार करण्यात प्रथम है दरभाईचा आणि हा विचार अस्माबिबीला सांगितल्यावर दोघांच्या चर्चेत, एकमेकांचा बराच वेळ निघून गेला. घरची बेताची परिस्थिती, शाळे ची तुटपुंज्या पगाराची नोकरी यातून तीन तोंडं कशीबशी पोसली जायची. त्यात आणखी जबाबदारी वाढवावी की नाही असा विचार नेहमी है दरभाईंच्या मनात असे. पण बायकोने दिलेले आधाराचे व साथ दे ण्याचे शब्द ऐकून है दरभाई अस्वस्थ झाले आणि आपण ही जबाबदारी नक्की पार पाडु अशा विश्वासाने घेतला निर्णय !

है दरभाई अभिनंदन !, नक्षत्रासारख्या मुली आल्यात तुमच्या घरात, हातात हात घेउन !"

मोराच पिसं फिराव, अशा अपेक्षेत असताना अचानक विंचवाची नांगी डसावी अस काहीसं घडलं आणि है दरभाईंची तंद्री भंग पावली. आपण धनुरर्ध नसून फक्त धनुष्य आहोत, बाण चालवणारा कोणीतरी वेगळाच आहे ह्याची साक्ष त्यांना पूरेपरू पटली. हा निर्णय घेण्यापूर्वीची आपली द्विधा मन:स्थितीच मूर्त रुप घेऊन प्रकट झाली नाही ना, असा पुस्तकी विचार त्यांच्या मनात आला.

बायकोने दिलेले आधाराचे आश्वासन मनात परत आठवून, ते आत गेले, तिघींना प्रेमाने भेटले.

दोन नव्या प-यांच्या कानात कलमा पढू न है दरभाई बाहे र आले. तोपर्यंत हमदचाचा आणि चाची मेहविशला घेऊन पोहोचले होते.


नुकतेच बक्षिसाचे मिळालेले पेढे अब्बूनी वाटू न टाकले म्हणुन काहिशी नारज झालेली मेहविश, आपल्या दोन नव्या छोट्या छोट्या बहिणींना बघुन खूप खूष झाली. आता आपण दीदी झालो ही नवीन जाणीव तिला गुदगुल्या करुन गेली. मैत्रिणींना आपल्या या नव्या बाहुल्यांच्या गंमती-जंमती किती सांगू आणि किती नको, असं होतसे मेहविशचं !

मधली सुट्टी कमी पडते म्हणून की काय, आता वर्गातही हिच्या गप्पा सुरु झाल्या.

शाळे तल्या सहकारी शिक्षकाकडू न याची तक्रार आल्यानंतर एक दिवस है दरभाई, मेहविशला खूप रागावले.

खूप म्हणजे जरा जास्तच ! घरात खाणारी तोंड वाढली तरी आपला पगार तेवढाच आहे , ह्या विवंचनेतन ू घालमेल वाढली, त्रागा वाढला, या सगळ्याचा राग आपण मुलीवर काढला. राग तिच्यावर नसून आपल्या स्वत:वरच आहे याची जाणीव होऊन है दरभाईंनी मनातल्यामनात अल्लाची माफी मागितली.

"अस्मा, आजपासुन मी घरी उशिरा येईन, दोन खाजगी शिकवण्या मिळाल्या आहे त"

है दरभाईनी आपला निर्णय ऐकवला.

रोज ऊशिरा येण्यामुळे मेहविशबरोबरची संध्याकाळची नमाज आता चुकू लागली.

पैसा खुदा नाही पण खुदापेक्षा कमी नाही ह्याची प्रचिती पदोपदी येत होती.

आपल्या साध्या सोप्या आयुष्याची, केवळ एका मोहापायी, किती परवड करुन घेतली आहे असे ब-याचदा वाटे है दरभाईंना; पण तेवढ्यापुरतच !

जबाबदारी झटकणारा, पळ काढणारा माणूस नव्हता तो.

पण त्याच वेळी ही जबाबदारी पेलणार तरी कशी? दिवसेंदिवस सगळच अवघड होत जाणार आहे हे कळू न चुकल होत त्या दोघांनाही.

अस्माबिबीचा दिवस तर कसे उजाडे आणि कसा मावळे हे तिच तिलाही कळत नसे.

मेहविशच्या रुपाने घरात एक परीच होती जणू !

अम्मीची गडबड, धावपळ तिला कळत होती आणि तिच्या परीन ती अम्मीला मदतही करत असे.

घराचा निवांतपणा जणू नाहीसाच झाला होता.

असेच तीन चार महिने निघून गेले, दषु ्काळातला दिवस जातो तसे....

"हमदचाचा हजला जाऊन आलेत नुकतेच, हे झमझमचं पाणी पाठवल आहे "

है दरभाईंनी निरोप दिला. काही वेळ गेला आणि अचानक अवघड गणित सुटलेल्या पोरासारखा त्यांचा चेहरा उजळला.

"अस्मा, अस्मा लवकर बाहे र ये, माझा विचार तुला पटतो का बघ..”

"हमदचाचा आणि चाची दोघांच आता वय झालय, त्यांना आता काही पोर-बाळं होण्याची शक्यता नाही.

मी काय म्हणतो, मेहविशला जर त्यांचाकडे ठे वली तर?"

अस्माबिबीचा, एकाचवेळी वात्सल्यानं, काळजीनं, आणि रागाने भरुन गेलेला चेहरा वाचून है दरभाई तेवढयापूरते शांत बसले.

२६


पोटच्या पोरीला वा-यावर सोडू न तुम्हाला साथ दे ईन अस वचन नव्हत दिलं तुम्हाला मी"

कयामतच्या दिवशी अल्लाला काय तोंड दाखवणार आपण ?

अस्माबिबीच्या या टाहोला काहीच प्रतिसाद दिला नाही है दरभाईंनी; त्यांचा निर्णय झाला होता.

पोरीला जन्नतची सफर करून आणण्याची स्वप्न बघणा-या बापाला तिच्या साध्या रोजच्या गरजेच्या वस्तुही आणून दे ता येऊ नयेत याच द:ु ख फक्त त्यालाच कळत होत. बापाची माया दिसत नाही हे च खरं ! ब-याच खटाटोपानंतर बायकोला तर समजावलं, आता पोरीच मन कस वळवणार? हाच गहन प्रश्न है दरभाईंसमोर होता. तीन चार दिवसांच्या सरावानंतर ते मेहविशला घेऊन बजारात गेले, खाउ घेऊन दिला, तिचा आवडता पोपटी रं गाचा फुगा पण घेऊन दिला येताना.. आपली घालमेल होईल, कुचंबणा होईल, मन रागाने भरून जाईल, पण कुठल्याही परिस्थितीत मुलीवर हात उचलयचा नाही असं अगदी पक्क ठरवल होत त्यांनी, सरावाच्या वेळी !

पण... त्यांना खूप रागही आला आणि हातही उचलला.

जेव्हा मेहविशनं संमती दिली अब्बूच्या अवघड प्रस्तावाला, तिही सुद्धा जराही वेळ न घालवता !

मग राग कोणाचा?

हा राग होता मुलीने अवेळी दाखवलेल्या समजूतदारपणाचा ! त्यांना अपेक्षित असं काहीच घडलं नाही याचा !

पोर पटकन तयार झाली याचा!

आपल्या नाकर्तेपणाचा, मजबूरीचा, या ओढगस्त परिस्थितीचा ; कशाकशाचा म्हणून नाही?

त्यांच काळीज अगणित निखा-यांनी भरुन गेल !

डोळे पुसन ू त्यांनी पुढे चालत गेलेल्या मेहविशकडे पाहिलं, इतका वेळ फुगा घेऊन नाचत जाणारी पोर आता शांतपणे पाऊले टाकीत चालली होती. फुगा कधीच सोडू न दिला होता... तोही अल्लाच्याच स्थितप्रज्ञपणे हळू हळू वर वर जात होता.

लांब लांब आणखी लांब जाणा-या फुग्यातून जणू है दरभाईंची नजरच मेहविशकडे बघत होती.

प्राक्तनातला मोहोर अलगद बाजूला ठे वूनी कलम घेतले शिरी

मनांतरीचे द:ु ख सरे ना काहूर दाटे ऊरी

मेहविशला सोडू न है दरभाई घरी आले. मेहविशच्या आवडत्या आंब्याच्या झाडाखाली कितीतरी वेळ बसून राहिले. दर आठवड्याला नक्की भेटत जाऊ या आश्वासानातला खोटे पणा अजूनही बोचत होता मनाला ! कुठू न कुठे आलो आपण? है दरभाईंना स्वत:चीच खूप लाज वाटत होती अंधार पडल्यावर ते घरात आले. आजच्या व इथून पुढच्या कुठच्याच नमाजात आता जान असणार नव्हती. मेहविश हमदचाचांकडे चांगलीच रूळली, का नाही? एवढे लाड होत होते दोघांकडू न तिचे ! पण शेफारुन गेली नाही ! अब्बूनी आपल्याला इथे का ठे वल असेल हे तिला हळू हळू उमगत होते. द:ु ख होई पण वाईट वाटले नाही. हमदचाचा पण अल्लाचा माणूस ! फार मनकवडा ! पोरीला हळू वार फंु कर घालून तो जखमेचा विसर पाडायचा खूप प्रयत्न करीत असे.

पण कधीतरी खूपच हट्टाला पेटली तर शेजारच्या आमराईत फिरायला नेत असे मेहविशला !

२७


लहान पोरच ती! तिच्या हक्काच प्रेम नव्हतं ना तिच्यापाशी....कधीकधी ती एकटीच विचार करीत बसे..

अनेक शंका अनेक कोडी

मन मलाच दे ई मनी

अंतरात का अंतर वाढे का वाढत जाई दरी

दोन दोन तान्हुल्यांना सांभाळताना अस्माबिबीची खूपच तारांबळ उडत असे. त्यांना हृदयाशी घेताना तर तिचा जीव अगदी व्याकुळ होऊन जाई.

आपण आपल्या पोरीचा अधिकार हिसकावून घेतला याची टोचणी सतत तिच्या मनाला लागलेली असे.

शेजारणीसारखा आपल्याला पुनर्जन्मही नाही हे पाप फेडायला ! असला जहन्नुमी निर्णय आपण घेतला तरी कसा... एक ना अनेक .. हे सर्व विचार तिला भयंकर अस्वस्थ करीत असत.

आज सहा महिने झाले, भेटू, भेटू म्हणून भेट टळली जात होती.

पण मुलीन फारच हल्लागुल्ला केला तेव्हा हमदचाचा सरळ तिला गावी घेऊन आले आणि थेट शाळे त येऊन पोहोचले.

जुन्या मैत्रिणींना भेटून मेहविशची तर ईदच झाली.

"चाचा, घरामागची बाग विकावी म्हणतो, कोणी गि-हाईक असेल तर सांगा”

है दराभाईंनी हतबलतेतन ू आणि नाईलाजातून घेतलेल निर्णय हमदचाचांना ऐकवला.

"अरे पण पोरीला भेट तरी आधी"

नजर चुकवन ू नुसताच आवाज आला, “नको चाचा, नकोच!”

“मलाही खूप वाटत तिला कडकडू न भेटावं, पोटाशी धरावं, पण काय करू? गळ्यात पडू न परत यायचा हट्ट धरला तर ?

पुन्हा तोच प्रसंग!

येताना एकाएका क्षणात युगांचे अंतर संपवून आलेली मुलागी जाताना मात्र पावलोपावली अडखळत होती. अंधार वेढत चालला होता, सावल्या लांब होत होत्या. पाखरू पुढे पण सावली मात्र जणू घराकडे जात होती. माया वेडीच ! होते.

परत एकदा समंजसपणाचा बुरखा मेहविशनं चढवला होता.त्यातून डोळ्यातील अश्रू बरोबर झाकले जात

आज पुन्हा मी विलग होतसे

भाग्यच माझे कापूनी खांदा दरू आम्हाला करी

माझ्या फांदीतूनी

अस्माबिबीला मेहविश येऊनही न भेटल्याच जेव्हा कळल तेव्हा तिच्या रागाचा बांध फुटला.

"तिने परत यावं हा हट्ट माझाच असेल तर तुम्ही माझही तोंड पाहणार नाही का?" निरं तर वाहणा-या जखमेतील रक्ताचा एक थेंब है दरभाईंचा काळजावर येऊन पडला आणि निखारे ठे वून गेला.

"अजून काही दिवसांनी बुरखापण पाठवावा लागेल पोरीसाठी, ती वेळ जास्त लांब नाही....

ते काही नाही,मला माझी पोरगी माझ्याजवळच पाहिजे....."

अस्माबिबीन सोडलेले हे विखारी शब्दबाण है दरभाईचे लचके तोडत होते.

नि:शब्द मनाने ते परत त्याच आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले. जखमी मन आता विचार करू लागलं...

२८


पहाटे ला त्यांचा पक्का निर्धार झाला. श्रीमंत बापाचा फाटक्या शिक्षकावर विजय झाला होता.

पुढच्याच रविवारी खुप खाऊ घेऊन है दरभाई हमदचाचांकडे पोहोचले आणि आपण मेहविशला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहोत असे सांगितले.

"सुभानल्ला" ! फार नेक विचार केला तू है दर !" मी तर तुला त्याचवेळी सांगितल होतं,

तुझी वेल तुझ्याच अंगणात राहू दे ..

पण काही हरकत नाही, सर्वांच भलं होईल असा रस्ता अल्ला प्रत्येकाला दाखवतोच !"

“चार दिवस राहिली पण फार लळा लावला पोरीन.. माझी अम्मीच बनून गेली...”

नुकतीच घरात आलेली मेहविश अब्बाला बघून हरखून गेली आणि गळ्यात पडू न रडू लागली.

थोडा वेळ है दरभाईंनी अपेक्षित हट्टाची वाट बघितली आणि न राहवून स्वत:च मेहविशला म्हणाले,

"चला, आपल्याला घरी जायचय !"

"हो? खरच?" गळ्यतली मिठी सोडवत मेहविशन विचारल, मी अम्मीला भेटणार?" लाख चांदण्याची चमक त्या दोन चिमुकल्या डोळ्यात एकवटली होती.

"हो, सगळ्यांना भेटणार, आता आपण परत कधीही वेगळ व्हायचं नाही माझ्या बाळा !"..

बांध फुटला होता.. पाणी वाहत होत..

मेहविश बाजूला जाऊन एकदम शांत उभी राहिली, काहीतरी अनपेक्षित अघटित घडणार याची कुणालाच कल्पना नव्हती. "मी नाही तुमच्याबरोबर येणार.. अब्बू मी इकडे च राहणार..चाचा, चाची माझे खूप लाड करतात, ते खूप चांगले आहे त." एवढे बोलून मेहविश बाहे र पळाली.

स्वत:ला स्वत:मध्येच गाडू न घ्याव अस वाटलं है दरभाईंना क्षणभर !

सर्वांच भलं होईल असा रस्ता अल्ला प्रत्येकाला दाखवतो......पुढच प्रश्नचिन्ह सर्वांच्याच मनात उमटलं..

खिन्न मनाने है दरभाई उठले, दरवाज्यापर्यंत आलेल्या हमदचाचांकडे वळू नही न बघता चालू लागले..

मन एकीकडे .. पाऊल एकीकडे ...

बाहे र पडलेली मेहविश आता थेट आमराईत घुसली होती...फुगा परत आकाशात वर वर चालला होता..

एक असह्य उद्वेग आसमंतात भरून गेला होता…

मन मोडल्याचा आवाज थोडाच येतो?

एकच इच्छा काळजातली

ईश्वरा होऊदे पुरी

उभे असूदे झाड

गेला मोहोर करपूनी तरी.

श्री. मिहीर ठकार Email : itsmihir@gmail.com

२९


पंचांगावरून आकाश दर्शन आपणा सर्वांचे नूतन वर्षाभिनंदन. आकाश दर्शन म्हणजेच आकाशातील ग्रहांचे व तार्यांचे निरीक्षण, त्याच्या बद्दल माहिती व आणखी पुढे जाऊन त्याचा अभ्यास वगैरे. सर्वसामान्य माणूस खगोलशास्त्रामधे (Astronmomy किंवा Cosmology) ह्या मध्ये करिअर करत नाही तरी सुद्धा आकाशातील ग्रह व तार्यांचे कुतूहल प्रत्येकाला असतेच. असे हे आपल्या डोक्यावर असणारे रोजचे आकाश पाहणे हा एकदम सोप्पा व बिनखर्ची छन्द आहे . एखादे माहिती पुस्तक आणि आपले दोन डोळे ह्या गोष्टीने सुद्धा आपण आकाशातील अनेक गोष्टी व घडामोडी माहीत करून घेवू शकतो. पुढे आवड वाढल्यास आपण द्विनेत्रि (Binoculars) व दर्बि ु ण (टे लिस्कोप) खरे दी करून त्यामध्ये खूप अभ्यास व निरीक्षणे करू शकतो. खगोलशास्त्र हे असे शास्त्र आहे की ज्या मध्ये हौशी लोकांच्या निरीक्षणामुळे मुळे खूप नवे नवे शोध लागले आहे त. त्या मुळे ह्या विषयात हौशी लोकांना सुद्धा व्यवसाईक (प्रोफेशनल) लोकांच्या एवढे च महत्व आहे व जगभरात हौशी आकाशप्रेमींच्या हजारो संस्था असून त्या मधून लाखो खगोलप्रेमी लोक आपले निरीक्षणाचे काम करत असतात. एकदा अवकशातील १२ राशी २७ नक्षत्रे व इतर तारकासमुहांची माहिती झाली की कोणत्या वेळी काय बघता येईल आणि आता आकाशामध्ये कोणते तारे व ग्रह असतील हे कळण्या चे सर्वात सहज उपलब्ध असलेले साधन म्हणजे जवळ जवळ प्रत्येक घरी असणारे पंचांग.

आपल्याकडे पंचांग हे एक धार्मिक विधी साठी लागणारे व गुरुजींच्या सोयी साठी आपण आणलेले एक पुस्तक असाच समज असतो. परं तु पंचांग हे एक अत्यंत अचूक आणि बहुतांशी शास्त्रीय असे विद्वान गणितज्ञानी बनवलेले तयार कोष्टक आहे . (उदा. Logtables किवा Trignometric Table.)

३२


बहुतांशी म्हणण्याचे कारण की त्यातील काही भाग हा फलित व धर्मशास्त्रीय इं टर्प्रेटेशन असतो जे खगोल शास्त्रा व्यतिरिक्त व व्यक्ती सदृश असते. परं तु हा भाग फार थोडा असतो व बाकी सगळे ग्रहगणित असते.

पंचांगास इं ग्लीश मधे एफिमर्रीस (Ephimeries) किवा ऑल्मनॅक (Almanac) खगोलशास्त्रीय व वैज्ञानिक संस्था व प्रयोग शाळांमधे जगभर वापरले जाते. एखाद्या दिवसाची

१ तिथी २ वार

३ नक्षत्र

४ करण

म्हणतात. जे अनेक

५ योग ही पाच अंगे म्हणजे पंचांग.

असे जरी असले तरी पंचागामध्ये इतर किती तरी कोष्टके दिलेली असतात.

प्रत्येक पान हे एका पंधरावड्याचे म्हणजेच पक्षाचे (शुद्ध किंवा शुक्ल आणि वद्य किंवा कृ ष्ण) असते.

व त्या पक्षाच्या शेवटच्या दिवसाची म्हणजेच अमावस्या किंवा पौर्णिमेची सकाळी ५.३० ची कंु डली दिलेली असते.

भारतात सकाळी ५.३० वाजता ची कारण तेव्हा ग्रीनविच (शून्य अक्षांश) वर रात्रीचे १२.०० वाजलेले असतात.

कंु डली म्हणजे त्या वेळचे आकाश नि ग्रहस्थिति. ही एका विशिष्ठ पद्धतीने लिहिली असल्या मुळे एकदम काहीतरी अवघड वाटते परं तु ही सुद्धा सोप्या पध्दतीने एखाद्या नकाशा प्रमाणे लिहिता येते की जी कोणालाही सहज समजू शकेल. ह्या लेखात आपण फक्त आकाश निरीक्षणापुरताच विचार करत असल्यामुळे आपण कंु डलीच्या खोलात शिरणार नाही.

कंु डली तील १ आकड्या चे स्थान लग्न स्थान म्हणजेच उगवति चे अर्थात पूर्व दिशेचे स्थान. (ह्याचा लग्न म्हणजे विवाहाशी काही संबंध नाही. केवळ शाब्दिक साम्य.) १ ते १२ ही स्थाने लग्न कंु डलीतील ठरलेली व कायम असतात. तेव्हा ह्या स्थानात बघून आपल्याला सकाळी ५.३० ला पूर्वेला कोणते ग्रह आहे त ते सहज कळू शकेल. रवि सुद्धा

३३


तिथेच असेल हे कळू शकते कारण ही जवळ जवळ सूर्योदयचीच वेळ आहे . तसेच इतर ग्रह कुठे आहे त ते ही कळते.

७ आकड्या पासूनचे ग्रह हे संध्याकाळी ५.३० नंतर उगवणार हे ही कळते त्यामुळे संध्याकाळी पूर्व क्षितिजावर चे ग्रह कळू न येतील की जे आपल्याला जवळ जवळ रात्रभर आकाशात दिसतील.

तसेच रवि च्या पुढील व मागील राशीतील ग्रह हे आपल्याला सुर्यतेजा मुळे दिवसा दिसणार नाहीत. ते एकतर सुर्योदयाच्या आधी काहीवेळ (१२ आकड्यातील) नाहीतर सूर्यास्ता नंतर पश्चिमेला काही वेळ (१ व २ आकड्यातील) दिसतील.

हे आकडे प्रत्यक्ष सूर्योदय नि सूर्यास्ताच्या वेळेनस ु ार अड्जस्ट करावे लागेल. (कंु डली ५.३० ची आहे प्रत्यक्ष सूर्योदय हा थोडा काळ पुढे मागे होतो व निरीक्षण स्थानावर ही अवलंबन ु असतो.)

उदाहरणासाठी आता आपण १५ जानेवारी चे आकाश घेऊ कारण त्या दिवसाची कंु डली दिलेली आहे . रवि हा प्रथम स्थाना मध्ये आहे आणि तिथे १० हा आकडा आहे . ह्याचा अर्थ रवि हा १० व्या म्हणजेच मकर राशीत असून पहाटे मकर राशी पूर्व क्षितिजावर आहे . त्यामुळे रवि जवळचा बुध हा सुर्यतेजा मुळे दिसू शकणार नाही.

तसेच ९ ह्या आकड्यात शुक्र आहे . म्हणजेच शुक्र हा नवव्या राशीत म्हणजेच धनू राशीत आहे व ५.३० च्या आधी २ तास धनू रास उगवणार आहे . त्या मुळे तो ३.३० नंतर पूर्व क्षितिजावर उगवणार आहे व त्या वेळेस अंधार असल्याने शुक्र व्यवस्थित दिसेल व सुमारे दोन तास दिसेल व नंतर सूर्यप्रकाशात नाहीसा होईल.

बरोब्बर १२ तासांनी ४ आकडा लिहिलेले घर म्हणजेच कर्क राशी उगवायला सुरवात होईल. (२४ तासात १२ राशी म्हणजेच एक राशी २ तास उगवतिला असतील व पुढे पुढे सरकत जातील.)

आता ३ आकड्यात गुरू आहे म्हणजेच मिथुन राशीत गुरू असून तो सूर्यास्ताच्या आधी सुमारे दोन तास उगवत आहे . त्यामुळे तो सूर्यास्ता नंतर पूर्वा क्षितिजावर थोडा वरच्या बाजूला दिसेल. कारण तो उगवून सुमारे २ तास झालेले असतील.

सध्या गुरू हा पुनर्वसू नक्षत्रा मधे असून संध्याकाळी पुनर्वसू नक्षत्राच्या चार तार्यांच्या मध्ये फार सुंदर दिसतो आहे . पुनर्वसु नक्षत्रास इं ग्लीश मध्ये गेट्वे ऑफ हे वन्स म्हणतात कारण सर्व ग्रह आणि सूर्य यांच्या भ्रमण कक्षा ह्या , ह्या चार तार्यांच्या मधूनच जातात.

पुढे तसेच मंगळ हा ६ आकड्यात आहे म्हणजेच तो सहाव्या राशीत कन्येत असून रात्री १० नंतर पूर्वेला उगवेल. आता आपल्याला सहज कळले असेल की पुढे शनि हा ७ व्या तूळ राशीत असून रात्री १२ नंतर पुर्व क्षितिजावर आगमन करे ल.

त्या दिवशी अर्थातच पौर्णिमा असलयामुळे चंद्र हा संध्याकाळी पुर्व क्षितिजावर पूर्णबिंब रूपात असेलच. आता ह्याच प्रमाणे पंचांगतील पुढील पंधरावडा मांडून पहा.

पृथ्वी सदृश चंद्र , बुध, शुक्र, रवि,मंगळ, गुरू आणि शनि ह्या क्रमाने वाढत्या गतीने फिरतात. त्यामुळे एक चंद्र आणि दस ु रा बुध ह्यांच्या उगवण्याच्या वेळात फरक पडला आहे . इतर ग्रह हे जवळ पास पहिल्या पंधरवड्याच्याच स्थानात आहे त म्हणजेच त्यांच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या वेळा मध्ये फारसा काही फरक पडला नाही.

आता हे च आपण पंचांगाच्या उजव्या बाजू च्या कोष्टका मधे बघू शकतो व आणखी प्रिसाइस वेळा व पोज़िशन काढू शकतो.

उजव्या पानावरचे खालच्या बाजूचे मोठे कोष्टक पहा. त्यामध्ये रवि पासून प्लूटो पर्यंत प्रत्येक ग्रहाची त्या त्या दिवसाची Exact पोज़िशन ही पूर्ण राशी, अंश, कला, व विकला इतकी अचूक दिलेली आहे .

उदाहरणार्थ : १६ जानेवारी ला रवि च्या पुढे ०९/०१/४२/३५ असे लिहिलेले आहे . ह्याचा अर्थ रवि हा ९ राशी पूर्णकरून दहाव्या म्हणजेच मकर राशी मध्ये ०१ अंश , ४२ कला (मिनिटे ),३५ विकला (सेकंद) एवढ्या अंतरा वर आहे . इथे मिनिटे व सेकंद हे वेळे चे नसून १ राशी मध्ये ३० अंश (डिग्री) व १ अंश चे ६० समानभाग म्हणजे ६० कला (मिनिटे ) व १ कले चे ६० समानभाग म्हणजे ६० विकला (सेकंद) असा आहे . यातील कला व विकला हे केवळ डोळ्यांच्या निरीक्षणा मधे कळू न येत नाहीत इतके सूक्ष्म आहे त. तेव्हा राशी आणि अंश कळले तरी पुरते.

३४


ह्या प्रमाणे आपल्याला कोणत्या ही दिवसाची कोणत्या ही ग्रहाची आकाशातील पोझिशन कळू शकते.

नक्षत्र व राशींच्या आकार व त्यातील निरनिराळ्या तार्यांबद्दल मात्र एखादे पुस्तक वाचून शिवाय एखाद्या जाणकाराकडू न माहिती करून घ्यावी.

पंचांग हे आयनिक वृत्ता वरील व राशी नक्षत्रे,ग्रह यांचाच अभ्यास करते. त्यामुळे उर्वरित आकाशातील तारका समुह व इतर गोष्टी पाहण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण इतर तारका समुह, नक्षत्रे व राशी आपल्या जागा व आकार लाखो वर्षे बदलत नाहीत. एकदा पूर्ण आकाशाचा नकाशा माहीत झाला की निरीक्षण करणे एकदम सोप्पे जाते. निरीक्षकाच्या सदृश फक्त वेळ बदलते.

आता थोडे आकाश दर्शना साठी च्या लक्षात ठे वण्याच्या बाबी.

पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाशात रात्रभर असल्याने बाकी आकाशा वर चंद्र प्रकाशाचा परिणाम होऊन इतर ग्रह व तारे नीट दिसत नाहीत. व सूर्य हा चंद्राच्या समोर असल्यामुळे चंद्र पृष्टभागही नीट दिसत नाही. दप ु ारी बारा पेक्षा संध्याकाळी व सकाळी निसर्ग जास्त छान दिसतो कारण की उजेड तिरपा पडलेला असतो. चंद्र पाहण्यासाठी शुक्ल किवा शुद्धपक्षातील चतुर्थी ते अष्टमी हा काळ चांगला असतो जेव्हा पृथ्वी सदृश चंद्रावर प्रकाश हा काटकोनात असल्या मुळे त्या ठिकाणच्या डोंगर दऱ्या, विवरे इत्यादी गोष्टी छान पाहता येतात. तसेच चंद्र हा रात्री १०-११ वाजता मावळल्या मुळे बाकीचे ग्रह तारे स्पष्ट दिसतात. आकाश पाहण्यासाठी शहरापासून लांब जिथे लाइट पोल्यूशन किंवा सिटी ग्लो दिसणार नाही अश्या भरपूर अंधार आणि क्षितिज मोकळे असेलेल्या सुरक्षित जागी पहावे. महाराष्ट्रातील डोंगरीकिल्ले हे सर्वात छान. तसेच आकाश पाहण्या च्या जागी अंधार असावा व काही वाचायचे असल्यास टॉर्च वर लाल जिलेटिन पेपर लावून पहावे. पूर्ण अंधार असलेल्या जागेतन ू हजारो तारे दिसू शकतात.

आयनिक वृत ् (Ecliptic) म्हणजे ज्या मार्गाने पृथ्वी सुर्या भोवती फिरते तो म्हणजेच, उलट अर्थाने सूर्याचा पृथ्वी भोवती फिरण्याचा भासमान मार्ग.

पूर्व क्षितिज ते पश्चिम क्षितिज हा १८० अंश एरिया असतो. (शाळे तील कम्पास बॉक्स मधील अर्धवर्तुळाकृ ती कोन मापक आठवा.)

डोळ्यासमोर लांब हात करून आकाशाकडे बोटाच्या दिशेने (नेमधरल्या प्रमाणे) पाहिल्यास बोटाच्या टोकाने जेवढी जागा झाकली जाते व दिसत नाही ती सुमारे १अंश असते.

डोक्यावर असताना पूर्ण चंद्रबिंबाचा व सूर्याचा ऑपरन्ट (Apparent) आकार हा फक्त १/२ अंश असतो.

तसेच पंजाच्या ४ बोटांनी झाकला जाणारा भाग हा सुमारे ५ अंश असतो.

युरेनस, नेपचून, प्लूटो हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. युरेनस हा नुसत्या डोळ्याने एखाद्या बारीक व मंद ताराया सारखा दिसतो. आकाश निरीक्षणासाठी एखादी द्विनेत्रि (बाइनाक्युलर) किंवा छोटी दर्बि ु ण असल्यास बरे च अविष्कार पाहता येतात. परं तु त्या विकत घेण्यापुर्वी, आधी कुठे व काय पाहायची ह्याची माहिती व अभ्यास करून नुसते आकाश पाहण्याचा सराव करावा.

आपल्या हिं द ू महिन्यांची नावे ही सुध्दा नक्षत्रांवरूनच ठे वलेली आहे त. एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असेल ते त्या महिन्याचे नाव असते. उदा : चित्रा नक्षत्रात ज्या पौर्णिमेला चंद्र असतो तो चैत्र महिना.

विशाखा नक्षत्रात ज्या पोर्णिमेला चंद्र असतो तो वैशाख महिना , इत्यादी....

आपणा सर्वाना अशीच आकाश निरीक्षणाची गोडी लागो ही इच्छा व्यक्त करून हा लेख संपवतो.

असे आपल्याला रोजचे आकाश पण आपण तिकडे फारसे लक्ष दे त नाही. परं तु आकाशाची चांगली ओळख असल्यास आपल्याला ती अनेक ठिकाणी उपयोगी पडते. आकाशाची ही ओळख ट्रेकर्स ते जहाजचालक यांना संकटकाळी नक्कीच मार्गदर्शक ठरते. कधी रात्री निवांत एकटे बसलात तर ग्रह तार्यांचा वेध घेत सहज एकटे पणावर मात कराल.

बहारीन महाराष्ट्र मंडळा ला माझ्या अनेक शुभेच्छा.

३५

श्री. अविनाश फडणीस


।। स्वागत नववधूचे ।। क्षण हा मांगल्याचा , चित्ती मावे ना हर्ष । लाभोत तुम्हां उभयतां , सर्वांचे शुभाशीष ।। सुनबाई तुझ्या जीवनात , आज नवल वर्तले । तुझ्या सौभाग्याने तुला , नवे ‹माहे र› मिळाले ।। सर्वांच्या साक्षीने झाला , क्षण भाग्यवंत । तुझ्या संतोषाला आता , नाही पार नाही अंत ।। हर्ष मावेना ऊरात , झरे पापण्यांमधून । करते स्वागत तुझे , यावे माहे री नवीन ।। हाती घेऊन गं आरती , उभी दारात ‹माउली›। यावे कुशीत ‹आई›च्या , फक्त सातच पाऊली ।। सौ. रसिका दीपक जोशी.

ओळख कधी कधी जुने रस्ते पुन्हा नवे नवे वाटतात कधी कधी ओळखीचे लोक अगदी अनोळखी सारखे वागतात ...!!!! नेहमीच मग ह्याच रस्त्यात नवीन नवीन ओळखी ही होतात आणि मग पुन्हा अनोळखी वाटणारे लोक पुन्हा ओळखीचे वाटतात... !!! श्री. मुकंु द आनंद ढाके

३६


GENERAL TRADING EST.

Rigzone Engineering International has been actively involved in the industrial scenario of the Middle East for many years now. We are supplying products, customized solutions, and specialized services for the complete reliability, condition monitoring needs of oil refineries, petrochemical plants, chemical plants, desalination plants, power plants etc.

Our reliability & maintenance division are catering in to the following products and services •

Specialized services in Vibration Analysis on centrifugal and reciprocating machines like turbines, pumps , compressors.

Field Balancing as per ISO standards (Single/Dual Plane),

Laser Alignment Services

Thermal imaging services , surveys

Motor current analysis

Ultrasonic inspection services for rotating equipments and electrical applications

Online vibration analysis , protection , monitoring and performance evaluation of reciprocating compressors and pumps

ISO certified engineers for vibration analysis and in-situ balancing

On call services for troubleshooting and vibration analysis on critical machinery

Start up and commissioning of machines, Long term sub- contract for condition monitoring reliability studies.

Advanced diagnostics, engineering and commissioning of online vibration monitoring and protection systems.

Laser Shaft Alignment, Geometrical alignments, flatness, straightness, turbine alignments, machine tool applications etc

Modal analysis , Sound intensity , Sound Power, Strain gauge applications ,Structural analysis for high rise buildings, bridges and critical equipments and many more.

For More Information Contact: P.O. Box.10277, Dammam- 31433 Tel: 00966 13 830 5773 - Fax: 00966 13 830 5448 E-mail: info@rigzonegroup.com


बहारीन मधील बहर पाहून आम्ही लुब्ध झालो होतो. वाळवंटात सुद्धा इतकी हिरवळ असते, तीही ‘सर्व प्रकारची’, ह्यावर विश्वास बसत नव्हता. मित्रा बरोबर खूप गप्पागोष्टी केल्या नंतर, रीतीरिवाजानुसार, मित्राला म्हणालो ‘कधीतरी प्लानिंग करा सौदीला येण्याचे’. त्यावर तो उत्तरला ‘दे व-माणसांच्या राज्यात येणं जरा अवघडच आहे !’. मला या विधानाचा नंतर उलगडा झाला. हो सौदी अरे बिया हि ‘दे वभूमी’, अल्लाची भूमी आहे आणि विसा – प्रवेशपत्र मिळणं जरा त्रासदायक असतं. महाराष्ट्र मंडळ, बहारीन यांच्या पत्रिकेकरिता काही लिहा अशी जेंव्हा विनंती मित्राने केली तेव्हां नोव्हें बर २०१० मधील स्मृती खडबडू न जाग्या झाल्या. खरे तर ३ वर्षांनंतर त्या आठवणी बोथट व्हायला हव्या होत्या, पण तसं नाही झालं. ‘ पहिलटकरीणीला ‘जसे डोहाळे लागतात तसे मला लागले होते, बहारीन बघण्याचे. दे व भूमीत असूनही बहारीन आम्हांला स्वर्गासारखा वाटत होतं, त्याची ओढ लागली होती. मी ऑगस्ट २०१० ला पहिल्यांदा सौदीत आलो. वाळवंट बघण्याची तृषा आठवडाभरातच संपली. पुढचे २/३ आठवडे दिव्यांचा लखलखाट बघण्यात गेला. आणि नंतर महिना होण्याच्या आत वाळवंटाचे चटके बसण्यास सुरवात झाली. घराच्या बाहे र पणती लावता येत नाही म्हणे. मी माझ्या नावाची पाटी इं ग्रजी आणि अरे बिक भाषेत लावली तर माझा मित्र म्हणतो ‘मानकर पाटी नका लाऊ, मुतावा येतो चौकशीला !’. ( मंडळी गेली ३ वर्षे पाटी तिथेच आहे आणि बहुदा कोणी ढु ं कूनही पाहिले नाही.) सगळ्यात कळस म्हणजे जेव्हां मला समजलं कि जर सौदीत अपघात झाला आणि तुमच्या हातून माणूस मेला, तर म्हणे ४/५ मिलिअन रियाल द्यावे लागतात. ( खूप आकडे मोड केल्यानंतर समजलं की ही रक्कम ६ कोटी रुपये होते ??!! ). उं ट जरी तुमच्या हातून ‘यमसदनी ‘ गेला तरी ........... हे च. तेंव्हापासून ‘वाहन चालवणे‘ या क्रियेचा मी मोठा धसकाच घेतला होता. सुरवातीला एकतर्फी मोठमोठ्या रस्त्यांवरून मी माझा मोठा वारू ( गाडी / कार हो ) ५० च्या गतीने चालवत असे. ( किती अन्याय त्या रस्त्यांवर. हळू -हळू भीड चेपत गेली आणि २०११ मध्ये ‘जेद्धा ते अल-खोबार’ हा १४५० किलोमीटरचा प्रवास मी माझ्या गाडीने ‘कोठे ही न थांबता’ १३ तासांमध्ये पूर्ण केला.) याउपर, एका गोष्टीने मी आणखीच दख ु ीः कष्टी झालो. इथे सिनेमा नाही, नाटक तर दरू च राहिले ... करमणुकीचे एकही साधन नाही. मी खूप दारू पीत नसलो तरी ती उपलब्ध नसली की त्रास होतो. आणखी एक गंमत – अबाया. काळे डगले घातलेल्या बाया. सौदीत येण्यापूर्वी एकाने माझ्या सामान्य विज्ञानात भर घातली होती – म्हणे अरब बायका फार सुंदर दिसतात. इथे तर सगळ्या ‘ झाकलेल्या ‘. हा काळा गाऊन घालून संपूर्ण आयुष्य काढायचं ही कल्पनाच मला रुचत नव्हती. (अजूनही नाही !) इथल्या लेडीज स्ट्रीट वर गेलं की ‘सर्व बुरखाधारी ‘. नख सुद्धा दिसत नाही. नंतर असं लक्षात आलं की इथे बायकांकडे कोणी बघतच नाही. ( एकदा काय झालं, एका धर्म रक्षणासाठी सदै व सज्ज अशा धर्मगुरूने, मुताव्याने, एका सौदी बाईलाच फटकारले. ‘ तुझ्या बोटाची नखं दिसत आहे त तर तू हात झाकून घे. नेलपौलीश लावणं आपल्या धर्माला मंजरू .......... ‘. ती बाई पण हुशार, म्हणाली ‘तू माझ्याकडे बघितलंच का? आपल्या धर्मात परस्त्रीकडे बघायची परवानगी नाही !’. वाद विकोपाला गेला होता ) मला खरे तर हा विरोधाभास वाटत होता. दे वभूमी म्हणजे सर्व काही पाहिजे अशी माझी समजूत होती. सगळीकडे धुंदी. अप्सरा इकडे तिकडे मुक्तपणे फिरत आहे त. मद्य सर्वांसाठी खुले आहे . सर्व कलांना बहर आलेला आहे , नाटक, संगीत, गाणं बजावणे इत्यादी. असं दृष्य कोठे च नाही. वातावरणात खुलेपणा नाहीच. सगळीकडे भीतीच भीती. ह्या अनुभवातून जातांना बहारीन बेटाविषयी माहिती लोक पुरवत होते. बहारीनचा विषय आला की वाटायचे ‘ there is light at the end of tunnel. God is not so unkind to humans ’. ह्या सेतू पलीकडे बहुदा स्वर्गमय वातावरण असावं. म्हणे वातावरण एकदमच मोकळं . कोणी न पुसे कुणाला. धुंदीच धुंदी. अप्सरा इकडे तिकडे मुक्तपणे फिरत आहे त, मद्य उपलब्ध आहे , सिनेमा आहे इत्यादी. थोडक्यात कायम ‘बहर’लेला हा दे श आहे . सौदीच्या आधी येथे तेल सापडले आहे आणि अमेरिकनांची खास मर्जी येथील राजाने संपादन केली आहे . सौदी भाषेत सांगायचं तर बहारीन एक ‘कम्पौंड’ Compound आहे . ( ‘कम्पौंड’ – हा अमेरिकन्स यांनी लावलेला शोध

३८


आहे . सौदीच्या कडक नियमांचा भंग न करता अमेरिकन style मध्ये राहायचं असेल तर चारही बाजुंनी भिंती असलेल्या भूप्रदेशाला ‘कम्पौंड’ म्हणतात. येथे सौदीचे नियम लागू नसतात. प्रत्येक शहरात ‘कम्पौंड’ ची सोय आहे . अश्या ठिकाणी राहण्यास भाडे जास्त मोजावे लागते ) बहारीनच्या ‘ चतुःसीमा ’ भिंतीनी वेढलेल्या नसून त्या निसर्ग निर्मित समुद्राने वेढलेल्या आहे . दे व भूमीत काय चाललं आहे याचं यांना काही दे णं नाही. घेणं मात्र आहे म्हणतात. स्वकीय व परकीय यांपासून धोका निर्माण झाला की दे व भूमितले लोक लगेच सरं क्षणासाठी कुमक पाठवतात. आहे कि नाही गंमत. तेथे महाराष्ट्र मंडळ आहे आणि तेथे सत्यनारायणाची पूजा बिनधास्तपणे करता येते. हरे कृष्ण मंदिर, शिव मंदिर .... अरे जणूकाही भारतातच आहोत. मला बहारिनी expatriates – मला म्हणायचं ‘ अनिवासी भारतीयांचा ‘ हे वा वाटत होता. ‘ स्वदे शात राहून परदे शी वेतन ’ ........काय मज्जा असेल ....... म्हणून मला डोहाळे लागले होते. बहारीनला जायचे, बहारीन बघायचे. नोव्हें बरमध्ये मी आणि उल्का गल्ली बोळ फिरलो. याची दे हा याची डोळा स्वर्ग पाहिला. खूप फोटो काढले. अगदी ‘ जुनं झाड सुध्दा, विहिरी जवळचं ’ ते सुद्धा मित्रांनी दाखवलं. ‘ बहारीनची पहिली छाप ‘ बघायची असेल तर या लिंक वर दोनदा क्लिक करा ..................... ‘ सौदी या दे शातील चालीरितींच्या पार्श्वभूमीवर हा दे श खरच पुढे आहे . मज्जा आली. मनामा येथील ओईल पेंटींग्ज आवडली. महाराष्ट मंडळातील गणपती महोत्सव आवडला. मुख्य म्हणजे सर्व ‘ महा-राष्ट्री ’ कित्येक वर्षापासून एकत्र काम करत आहे हे पाहून आनंद झाला. १५ वर्षांपासून आफ्रिकेत / अरब दे शात फिरतोय, पण बहारीन सारखं मंडळ नाही बघितलं. श्वास घ्यायला आवडला, मंडळात असतांना. लोकं आवडली. पण नंतर, नंतर बहारीनची नवलाई ओसरली. बहारीनचं ‘ छोटे पण ’ जाणवलं . बहारीन सौदीपेक्षा महाग वाटू लागलं. येणं कमी झालं. सौदितल्या ‘ सलाहाच्या ’ वेळा सांभाळणं क्रमप्राप्त झालं. किंबहुना आमच्या दै नंदिनी मध्ये ‘सलाह’ दाखल आली. दे व भूमीतली ‘ स्वस्ताई ’ हीच खरी गंमत, ‘बाकी सब झूट‘ है , असं मनाला समजावलं. दे व भूमितला ‘ कमीपणा ‘ अंगवळणी पडला. हल्ली खोबारच्या कारनिशवर गेलो कि कायम ‘बहर’लेली आकाशरे षा बघतो. समुद्राच्या पलीकडील तो सुंदर झगझगाट सुंदर दिसतो. आणि मी मनात म्हणतो ‘ लंकेत सोन्याच्या विटा, आपल्याला काय उपयोग ?’. पण हल्ली सौदीत पण बदल येऊ पाहतोय. हा बदल स्त्रियांकरिता अनुकूल आहे . अर्थात बुरखा कायम ठे ऊनच. हल्ली ‘बायकांसाठी’ कामं राखून ठे वण्यात येत आहे . त्यांनी कार्यालयीन कामे करावी अशी ‘ खुद्द सरकारची ‘ इच्छा आहे . काही स्त्रियांनी तर ‘ मोटार गाडी चालवण्याची ‘ परवानगी मागितली व रस्त्यावरून अवैधानिकरित्या चालवली सुद्धा. आज सौदीत या विषयावर गदारोळ माजलेला आहे पण ‘ उद्या ’ नक्कीच त्यांना परवानगी मिळे ल असे वाटते. ‘ चूल आणि मुल आणि नवरा ‘ यांच्या चौकटीतून ‘ बाई ‘ बाहे र पडे ल असे वाटते. चांगला बदल आहे हा कारण अजूनही मी ‘ आयुष्यभर झाकलेली बाई ‘ अशी मी कल्पनाच करू शकत नाही. असा बदल झाला कि सौदीचे ‘ बहार इन ‘ व्हायला वेळ लागणार नाही. श्री. प्रविण मानकर.

३९


“अन्नपूर्णा” ते “अन्न हे पूर्ण ब्रम्ह” आणि “अन्नदाता सुखी भव”

नमस्कार मित्रहो

सलाम बाहरे न २०१४ “स्त्री विशेषांक” च्या निमित्ताने शीर्षक विषया वर माझे मनोगत आपल्या सारख्या सुज्ञ व सुजाण वाचकां समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदे वो भव, अतिथिदे वो भव” हे सुभाषित आपण अगदी लहानपणा पासून ऐकत आणि बोलत आलो आहोत. त्या मध्ये “मातृ” म्हणजे माता, आई हिचे स्थान सर्वप्रथम आहे . पुरुषाचा जन्म झाल्या पासून त्याच्या आयुष्यात स्त्रीची अनेक रूपे त्याला साथ दे त असतात ज्यामधे आई, बहिण, आजी, काकू, आत्या, मावशी, मामी, गुरुजन (शाळे मधील शिक्षिका) मैत्रीण, मुलगी आणि सर्वात महत्वाची त्याची जीवनसाथी पत्नी म्हणजे बायको. अश्या अनेक स्त्रीनात्यांची गुंफण त्याच्या जीवनात असते. माणूस कितीही मोठा, कर्तुत्ववान झाला तरी त्याचे जीवन हे वर उल्लेख केल्या प्रमाणे त्याच्या जीवनातील अनेक स्त्रियांच्या सहवासाने आणि प्रेमाने घडलेले आणि परिपूर्ण झालेले असते. स्त्रीला सनातन हिं द ू धर्मा मधे “दे वी” चा दर्जा दिला आहे आणि तिची अनेक रूपे आहे त, जशी की “या दे वी सर्व भूतेषु “श्रद्धा” रूपेण संस्थितः (आणि ह्याच प्रमाणे “शक्ती”, “लक्ष्मी”, “दया”, “क्षमा”, “शांती” रूपेण संस्थितः) अशी किती तरी स्त्रीची रूपे आपण बघतो. त्याचप्रमाणे स्त्रीचे एक महत्वाचे रूप म्हणजे “अन्नपूर्णा” हे होय. जन्म झाल्या पासून मरे पर्यंत आपले भरण पोषण ज्या अन्नामुळे होत असते ते नेहमी एका अन्नपूर्णा स्त्रीनेच बनवलेले असते. त्यामधे तिचे निरालस प्रेम असते. आपण बाहे र कितीही महागातले, चांगलचुंगल खाल्ले तरी आई, पत्नी आणि वरील कोणत्याही नात्यांमधील इतर स्त्रियांच्या हातच्या स्वयंपाकाची चव त्याला येउच शकत नाही. आईच्या हातच्या जेवणाची सर इतर कुठल्याही जेवणास येऊ शकत नाही आणि म्हणूनच तर आपण सर्वजण तिच्या हातचे जेवण्या साठी सदै व आतुर झालेले असतो. काही स्त्रियांना ईश्वरी वरदान असते म्हणा किंवा त्यांच्या हाताला अशी एक विशिष्ठ चव असते की त्यांच्या हातच्या जेवणाची बरोबरी इतर कशाशी ही होऊ शकत नाही. अशाच स्त्रीयांना आपण “अन्नपूर्णा” असे म्हणतो. तर अशा सर्व अन्नपुर्णच ां ा मोठा अपमान म्हणजे त्यांनी केलेल्या अन्नाला नावे ठे वणे, अन्नावर राग काढणे, आणि अन्न वाया घालवणे. आज समाजा मधे लहानांपासून थोरांपर्यंत घर, समारं भ, उपहार गृहे, दे वालये अशा कितीतरी ठिकाणी बिनदिक्कत पणे अन्नाचा एवढा अपव्यय होताना दिसतो कि मन व्यथित होते. आपल्या नात्यांमधील स्त्रियाच आपल्याला संस्कार द्यायला कमी पडल्या की काय असा प्रश्न पडतो. एकीकडे दषु ्काळ, उपासमारी, कुपोषणा मुळे कित्येक लोकांचे जीव जात आहे त तर दस ु रीकडे मोठ्या प्रमाणावर अन्नपाणी, फळे , भाज्या, धान्य वाया जाते आहे . माझी सर्वांनाच कळकळीची विनंती आहे की आपण स्वतःहून अन्न वाया घालवणे तर जाणीवपूर्वक टाळावेच, परं तु आपल्या मुलांना आणि इतरांना दे खील तशी शिकवण आणि संस्कार द्यावेत की जेणेकरून अन्नाचा अपव्यय टाळता येऊ शकेल. अन्नपाणी आणि इतर वस्तू ह्यांची नासधूस करण्यात फक्त अन्नपूर्णेचाच अपमान होत नाही तर त्याच बरोबर आपले गरीब, कष्टाळू शेतकरी, इतर श्रमिक बांधव ह्यांचा दे खील अपमान होतो. म्हणूनच आपण स्वतःहून, मुले आणि इतरांना आधुनिक काळाला साजेश्या खालील श्लोकाचे महत्व पटवून दे ऊन तो आचरणात आणावा असे वाटते. “वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभच ू े l सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे l कृ षीवल कृ षीकर्मी राबती दिनरात l श्रमिक श्रम करोनि वस्तू ह्या निर्मितात l करून स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल l उदर भरण आहे चित्त ठे वा विशाल l मुखी घास घेता करावा विचार l कशासाठी मी अन्न हे सेवणार l घडो माझिया हातोनि दे शसेवा l म्हणोनि मिळावी मला शक्ती दे वा” l ll जय जय रघुवीर समर्थ ll ll अन्नदाता, महद्त्राता, पाककर्ता सुखी भव ll प्रस्तुत लेखा मधे काही चूका आढळल्यास किंवा अभिप्राय अथवा सूचना असल्यास मला अवश्य कळवावे हि नम्र विनंती. धन्यवाद. श्री. शरद मधुकर कुलकर्णी ईमेल: sharadkul@hotmail.com

४०


ख्मेर स्त्री जीवन

स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे , न्यायमूर्ती रानडे या सारख्या युग पुरुषांमळ ु े आज भारतीय स्त्री बऱ्यापैकी मुक्त व प्रगत जीवन जगत आहे .ही जाणीव अधिक दृढ झाली ते कंबोडीयातलं स्त्रीजीवन पाहिल्यावर.बातमबाग शहराच्या बाईकसफरीवर आम्ही निघालो होतो. आमचा स्थानिक गाईड चिनचिन याने पागोडा स्टाईल च्या एका दे वळापाशी आमच्या गाड्या थांबवल्या. तिथे एक ख्मेर महिला चुलीतून भाजलेले बांबूचे तुकडे बाहे र काढत होती. तिची मुलगी शेजारी बसून हातभर लांबीचे ते तुकडे उलगडू न बांबूच्या पाकळ्या उलगडत होती. चिनचिने त्यातला एक अर्धवट उमललेला तुकडा आमच्या समोर धरला. त्या पोकळ बांबच ू ्या नळकांड्यात चिकटा भात ठासून भरला होता. त्यात राजमा सारख्या स्थानिक बिया व बेदाणे घातले होते. कोळशाच्या शेगडीवर आतल्या आतखरपूस भाजलागेल्याने त्याला वेगळा गंध लाभला होता. आम्ही बिचकतच चिमुट भर भात तोंडात टाकला त्याची गोडू स – खारी चव सर्वाना इतकी आवडलीकी हा हा म्हणता नळकांडे रिकामे झाले. प्रत्येकी २५०० रियाल म्हणजे ३५ रुपये ला विकला जाणारा हा राईस केक इथल्या कष्टकरी समाजाची न्याहारी असतो. या गावातल्या बायका भल्या पहाटे उठू न तो घरी शिजवून तिथे विकायला आणतात तेव्हा कोठे त्या पैशावर त्यांचे घर चालते. त्या पुढचे गाव नदीकाठी असल्याने मासे मुबलक. म्हणूनच एकीकडे माश्याची साफ केलेली डोकी उन्हात वाळत घातली होती तर दस ु रीकडे त्यांचे लाल भडक मांस ! उरलेल्या शेपट्या, काटे / क्ल्यांची रवानगी मोठ्या हं ड्यात झाली होती. त्यात वारे माप मीठ घालून त्यांची टिकाऊ पेस्ट बनवणे चालू होते. तर दस ु रीकडे लांबट , चपटे स्मोक फिश वाळवून त्यांचे गठ्ठे बांधणे सुरु होते नी कुठे माशांचे लोणचे घालून किलो किलो च्या बरण्यात भरले जात होते. सगळ्या हवेत माश्याचा उग्र दर्प !आमचे हात नाकावर पण चिनचिनला या वासाची सवयच नाही तर तो आवडतो दे खील.” या मौसमात प्रत्येक घरात २० एक किलो माशांची पेस्ट बनवली जाते.पेस्ट जितकी जुनी तिचा गंध तितका उग्र ! पुढे वर्षभरात नुसता डबा उघडला तरी अख्ख्या गावाला समजत की आज या घरात स्पेशल मेजवानी आहे . माशाचे डोळे काय चविष्ट लागतात.माशांचे सूप नाहीतर बार्बेक्यू नि कालवण व भात हे रोजचच जेवण झालं.”चिनचिनच्या तोंडाला माहिती दे त असतांनाच पाणी सूटू लागलं.पुढलं गाव तांदळ ु ाचे नूडल्स व स्प्रिंगरोल्सला लागणारे तांदळ ू पिठीचे कागद बनविण्यासाठी प्रसिद्ध होते.इथे भिजवलेले तांदळ ू लाकडी उखळात कांडण,त्याच्या पिठाच्या चकलीच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या उपकरणात घालून नूडल्स पाडल्या जात होत्या.

४१


दस ु रीकडे भाताच्या तुसांची भट्टी पेटवून त्यावर उकळलेल्या आधण पाण्यात नूडल्स मोकळ्या करणे चालू होते. तांदळ ू कांडण्याची उखळ –मुसळ अनोखी होती. उखळीला बांधलेल्या आडव्या लाकडी पट्टीवर घरातली मुलं आळीपाळीने उभी राहत होती.त्यांच्या वजनाने उसळीचा दांडा मुसळीत पडत होता.मुलांची आई मुसळीपाशीच ठिय्या दे ऊन बसली होती.उखळीची हालचाल पाहून ती हातानेच तांदळाची भरड उखळीच्या दांड्याखाली सरकवत होती. हवेतल्या गजगजीची कोणालाच फिकीर नव्हती. तांदळाचं घट्ट पीठ झाल्यावर सोऱ्यावर लहान-मोठया भोकांच्या जाळ्या लावून पट्ट्याच्या नूडल्स पाडणे हे ही काम कष्टाचेच.पुढल्या गावातली बाई अंगणातच चूल थाटू न त्यावर २ तवे मांडून बसली होती.त्यावर वाटीने झराझर डोशाप्रमाणे तांदळाचे पातळ पीठ पसरवायचे. त्यावर अर्धा मिनिट झाकण उपड घालून ते वाफवायचे मग हळू वार हाताने तो अर्ध पारदर्शक गोल डोसा उचलून लाटण्याच्या स्टनडवर वाळत घालायचा.तिची मुलगी एखाद्या यंत्राप्रमाणे एकेक लाटण उचलून समोर उभ्या केलेल्या जाळीवर ते डोसे वाळत घालत्येय.लांबून पाहिले तर आपल्याकडले पापडच वाटावेत. ३-४ तास उन्हात वाळल्यावर हे कुरकुरीत राईसपेपर Pack करून विक्रीला पाठवायचे.आम्हापुढे पेश होणाऱ्या स्प्रिंगरोलचा जन्म इथला होता तर! पुढल्या घरात नारळाच्या किसात साखर व खाण्याचे रं ग घालून वाळवत ठे वले होते.”इथल्या मुलांमध्ये या कोकोनट केंडीज खूप लोकप्रिय आहे त.” तर दस ु रीकडे केळीचे काप वाळत पडले होते. बहुतेक घरात बायका व मुले अशा कामात मग्न होती.” घरातील पुरुष मंडळी मात्र जाळीच्या झुल्यावर झुलत डु लत झोपा काढण्यात नाहीतर कोंबड्या झुंजवून त्यावर सटटा लावण्यात मश्गुल असते. तरी बरे , सरकारने आता या झुंजीवर बंदी घातली आहे . नाही म्हणायला कधी मधी शेतकाम किवां वाणसामान करतात इथले बापे. “चिनचीनची टिपणी तुम्ही म्हणाल कष्टाची , अंगमेहनतीची कामे तर आपल्या गावातल्या बायका ही करतात त्यात काय विशेष ?” पण ख्मेर स्त्रियांचे दर् ु दै व इथे संपत नाही. “सोमाली माम” हीच्या पुस्तकात वाचल्या प्रमाणे उमलत्या कळ्यांचे निश्वास अर्थात अवघ्या तेरा चौदा वर्षांच्या मुलींनी चालवलेला वेश्याव्यवसाय अपघाताने मलाही पाहता आला आणि हृदय अक्षरशः हे लावून गेले. सियामरीपच्या पब स्ट्रीट व नाईट मार्के ट भागात जिथे तिथे दिसणाऱ्या फूट मसाजच्या पाट्या वाचून मी शेवटी कुतूहलाने एक माडी चढलो. मासामुळे दिवसभर अंगकोरची दे वळे पाहून थकलेल्या पायांवरही उतारा पडला असता. एका हॉलमध्ये झुळझुळीत पडद्यांची पार्टिशनस घालून बऱ्याच छोट्या खोल्या केल्या होत्या. प्रत्येक खोलीत गादी अंथरलेली. नुसते पाय चेपन ू घ्यायला पडदे कशाला लावायला हवेत या मनात आलेल्या प्रश्नावर विचार करत असतांना १३-१४ वर्षाच्या एका मुलीने मला झोपण्याची खुण केली. तिला ना इं ग्रजीचा गंध होता न मला तिची ख्मेर भाषा समजत होती. पाय चेपत असतांना तिने अचानक पुढे होऊन माझ्या छातीवर आपले डोके टे कवले. मी समजायचे ते समजलो आणि ताडकन उठलो. आता तिच्या डोळ्यात याचना दाटू न आली. मी काही न बोलता तिच्या हातावर १० डॉलर ठे वले व फुट मसाज न घेताच बाहे र निघून आलो. शेजारच्या दोन्ही बाजुंच्या पडदया आडू न होणारी कुजबुज , दाबलेले हसू आणि इतर आवाजांचा आता उलगडा झाला होता आणि त्या कुकर्मात निदान मी तरी सामील झालो नाही याचे हायसे वाटले.

श्री. अमोल उकिडवे

ईमेल: aukidave@hotmail.com

४2


टोस्टमास्टर्स मधील अनुभव गप्पा मारणे हा सर्व बायकांचा आवडीचा विषय.आम्ही बायका तासंतास कोणत्याही विषयावर बोलू शकतो. गप्पांमध्ये रं गलो की आम्हाला वेळेचे भानच रहात नाही.खर की नाही? परं तु जेव्हा आपल्याला एखाद्या विषयावर मुद्दे सूद बोलायचे असेल व ते सुध्दा अगदी कमी ठरविक वेळेमध्ये किंवा एखाद्या समारं भामध्ये अचानकपणे आपल्याला सर्वांसमोर बोलण्याचा प्रसंग आला तर आपल्यापैकी किती जणींना टी कला अवगत आहे ?हा विचार माझ्या मुलीचे भरतनाट्यम arangetram केले तेव्हा माझ्या मनात आला. मुलीची आई म्हणून मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितले होते. मला फक्त दोन मिनिटांमध्ये तिच्या सात वर्षांचा भरतनाट्यम मधील प्रवासाबद्दल बोलायचे होते.व ते सुध्दा english भाषेमध्ये.सर्व काही अचानकपणे घडले.डोक्यामध्ये हजार घटना आठवत होत्या,बरे च प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. परं तु दोन मिनिटांमध्ये नेमके काय बोलावे व ते सुद्धा अचानकपणे..... मला दोन वाक्य दे खील सुसंगतपणे बोलण्यासाठी सुचली नाहीत व माझ्यासमोर आलेली एक चांगली संधी हुकली. ही बोच माझ्या मनात घर करून राहिली.त्याच दरम्यान माझ्या मुली gavel club (विद्यार्थ्यांसाठी असलेली public speaking चे वर्ग) ला जात होत्या. त्यांच्या निमित्ताने मी दे खील एक दोन session attend केली होती. सुरवातीला public speaking बद्दल माझा समज होता की ही कला मुलांना त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी गरजेची आहे तसेच professional व्यक्तिना किंवा teachers ना मह्त्वाची आहे .परं तु माझ्यासारख्या गृहिणींना दे खील toastmasters ची आवश्यकता आहे व toastmasters मधून बरे च काही शिकता येईल हया जाणिवेची तीव्रता aarangetram हया कार्यक्रमाने करून दिली. आजच्या युगामध्ये effective convincing संभाषण कला ही कौटु ं बिक, सामाजिक गरज आहे .स्त्री हा कुटु ं बाचा आधारस्तंभ आहे . ती कुटु ं बातील व्यक्तींना जोडणारा दवा ु आहे .कुटु ं बातील वेगवेगळ्या भूमिका बजावतांना आपल्या भावनांवर ताबा ठे वून सतत दस ु ऱ्यांना प्रेम,माया दे ण्यासाठी लागणारे संभाषण चातुर्य तसेच समाजात वावरत असतांना वेगवेगळ्या स्तरातील व भाषेतील लोकांशी संवाद साधण्यासाठी लागणारे भाषेवरील प्रभुत्व व आत्मविश्वास ही आजच्या स्त्रीची गरज आहे . Dr.Ralph Smedly ह्यांनी १९२७ सालापासून अमेरिकेत चालू केलेली toastmasters international ही कार्यकरणी जगभर प्रसिद्ध आहे . एवढ्या वर्षापासून चालत आलेली ही चळवळ अजूनही लोकप्रिय असण्याची काय कारणे आहे त ते आता आपण बघूया toastmasters ही कार्यकरणी अशी आहे की येथे गुरु-शिष्य हे नाते नसून सर्वच एकमेकांचे हितचिंतक असतात. येथे सर्वजण एकमेकांच्या चुका सुधारत व एकमेकांना सहाय्य करत शिकत असतात.जेव्हा तुम्ही speech सर्वांसमोर present करतात तेव्हा तुमच्या speech चे evaluation केले जाते. speech evaluation म्हणजे speech crafting वा speech presentation हया दोन्ही बद्दल केलेले विश्लेषण. हे विश्लेषण ऐकतांना तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडते तसेच उपदे शाचे गोड डोस दे खील मिळतात. हया सर्व प्रक्रियेमळ ु े चार लोकांसमोर आपले विचार मांडण्याचा आत्मविश्वास वाढतो.तसेच आपल्यातील कमी समजल्यामुळे आपण स्वत:ला कोठे आणि कसे सुधरवायला हवे हे दे खील समजते. हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्यामुळे आपण बोलताना चुकलो किंवा चूकीचे बोललो तरीसुद्धा लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलण्याची भीड चेपते.तसेच ठराविक वेळात एखाद्या विषयावर बोलण्यासाठी गोळा करावी लागणारी माहिती (research work) तसेच आपल्या आयुष्यातील त्या संदर्भातील प्रसंग, मोठया व्यक्तींनी सांगितलेले quote मिळवणे ही सर्व process speech-craft करण्यासाठी करावी लागते हा माझ्या दृष्टीने अभ्यासाचा भाग आहे . ज्यामुळे नविन नविन माहिती मिळवण्याची आपली आस वाढते. आपले english भाषेतील प्रभुत्व वाढते. नविन शब्द प्रयोगांचा कोष वाढतो. सगळ्यात शेवटचे व महत्वाचे आपण तयार केलेले speech जेव्हा आपण सर्वांसमोर उभे राहून बोलतो तेव्हा मिळणारा आनंद हा अवर्णनीय आहे . त्यातून मिळणारा confidence हे बाहे रच्या जगात वावरतांना नक्कीच उपयोगात येतो. दस ु ऱ्यांची speeches नीट लक्ष दे ऊन ऐकल्यामुळे आपली एकाग्रता, memory, विश्लेषण करण्याची शक्ती वाढते. हया सर्वांचा उपयोग आपल्याला कुटु ं बातील, समाजातील लोकांशी व्यवहार करतांना होतो.

मैत्रिणींनो, आपण सतत काही नविन शिकण्याच्या प्रयत्नांमध्ये असतो त्र हया नविन वर्षांमध्ये toastmasters हया प्रक्रियेचा हिस्सा बनून public speaking ही कला जोपासण्याचा वा आपल्यात लपलेल्या हुशारीला चालना दे ण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे .

४४

सौ. शिल्पा धुमे


प्रश्न असा आहे की प्रश्न चिन्ह कोठे घालावं ?

कारण प्रश्नचिन्ह कोठे घालावं हा जिचा तिचा प्रश्न आहे .

पण अजून एक प्रश्न आहे ..…हा प्रश्न आहे , सावित्री ह्यांचा…. म्हणजे "सावित्री कोणती?" हा.

कालानुसार ह्यावर तीन उत्तरे आली. पुराणातील सावित्री…...समाजसुधारिका सावित्रीबाई….…आणि आमच्या भवानीशंकर सह-निवासातील प्रसिध्द रणरागिणी, सौ. सावित्री भडकमकर. ह्यापैकी, पहिल्या दोन सावित्रींबद्दल… आणि विशेषतः त्यांच्या लेकींबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसल्याने, अस्मादिकांनी, ज्ञात असलेल्या, रणरागिणी सावित्री आणि त्यांच्या लेकी, म्हणजे कुमारी सई आणि कुमारी जुई ह्यावर लेख लिहिण्याचे प्रयोजन केले. आमच्या सह-निवासाची, म्हणजे सोसायटीची तशी बरीच नावे आहे त. कागदोपत्री, भवानीशंकर सहनिवास असले तरी भेळपुरी सोसायटी (तमाम जाती-जमातींच्या सहवासामुळे), पतंगी सोसायटी (पतंगबाजीच्या कौशल्यामुळे) आणि भांडकुदळ सोसायटी (सुज्ञास अधिक सांगणे न-लगे!). अश्या ह्या भांडकुदळ सोसायटीतील मेरुमणी म्हणजेच भडकमकरांच्या सावित्रीबाई आणि त्यांच्या वर उल्लेखिलेल्या लेकी.

सौ. सावित्री भडकमकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या चि.सौ.कां. सावित्री जमदग्नी. मुक्काम पोस्ट मालेगाव. अश्या ह्या चि.सौ.कां. सावित्री जेव्हा सौ. सावित्री होऊन आमच्या सोसायटीमध्ये आल्या तेव्हा सर्व नव्या नवरींप्रमाणे शालीन – सोज्ज्वळ अश्याच भासल्या. परं त,ु लग्नाच्या दस ु र्या दिवशीच सकाळी सकाळी त्यांनी जो रणरागीणीचा अवतार धारण केला तो आजपर्यंत कायम आहे . स्वतःची हळद उतरायच्या आतच ह्या सावित्रीबाईंनी जी दधवा ल्या भय्याची मस्ती उतरवली आहे त्याला तोड नाही. माताचरण गुप्ता म्हणजे आमचा ु दधवा ला भय्या. त्या सकाळपासून आतापर्यंत सावित्रीबाईंचे नाव जरी घेतले तरी थरथर कापतो. दधात ील ु ु पाण्याचे प्रमाण हे पावसाळ्यात वाढते हे आपण सर्व जाणतोच. परं त,ु त्याच पाण्याच्या प्रमाणावरून सावित्रीबाईंनी पहिल्याच दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी आणले. सकाळी सकाळी त्यांनी जो भैय्याला धारे वर धरलाय त्याला तोड नाही. त्या पावसाच्या दिवसात भय्याला घामाच्या धारा लागतील असा त्याला फैलावर घेतला त्याला आमच्या सावित्रीबाईंनी. आणि त्या दिवसापासून आमच्या सर्व सोसायटीमध्ये गुप्ता महाशयांकडू न जणू आटीव दधा ु चा रतीब सुरु झाला.

पहिल्याच दिवशी सकाळी सहा ते रात्री दहा ह्या सोळा तासांत सावित्रीबाईंनी सोसायटीत येणाऱ्या बारा बलुतेदारांचा आणि इतरही चार पाच जणांचा, अगदी तासाला एक, ह्या हिशोबाने फडशा पाडला. दधवा ला, ु पाववाला, मीठवाला, पीठवाला,… फुलवाला, फळवाला, लाडू वाला आणि झाडू वाला असे अनेक "वाले” बाईंच्या वाद्कौशल्यामुळे (नागरीभाषेत... भांडण्यामुळे) धारातीर्थी पडले.

तर अश्या ह्या सावित्रीदे वींच्या दोन लेकी कुमारी सई आणि कुमारी जुई वाद्कौशल्यात आपल्या मातेच्याही दोन पावले पुढे गेल्या. ह्या दोघींचे कर्तुत्व आमच्या सोसायटीपुरते मर्यादित न राहता पंचक्रोशीत विस्तारित गेले. आमच्या विभागातले भाजीवाले, फळवाले अश्या फुटकळ विक्रे त्यांपासून ते कपडे वाले, साडीवाले असे प्रस्थापित दका तसेच, बस-चालक, बसु नदार दे खील ह्या दोघींच्या वाद्कौशल्यमुले त्यांना शरण आले. वाहक, तिकीटतपासनीस, पोस्टमन, तारवाले इत्यादी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचीसुद्धा ह्या दोघींनी गय केली नाही. ह्या दोघींचा अल्प-परिचय पुढील प्रमाणे (परिचय करून दे ण्याचे प्रयोजन लेखाच्या अंती लक्षात येईलच):

कुमारी सई भडकमकर: जन्म २९ फेब्रुवारी…अमावस्येचा…. लहानपणापासूनच कुमारी सईला भांडणाची मनापासून आवड होती असे सोसायटीतील सिनिअर मंडळी अजूनही (खाजगीत) सांगतात. बालपणीच्या बाहुला-बाहुलीच्या लग्नापासून ते परवा झालेल्या आपल्या भावाच्या लग्नापर्यंतची सर्व लग्ने सईने अक्षरशः गाजवून सोडलेली आहे त. वर-पक्ष असो वा वधू-पक्ष, लग्ने खरी गाजविली ती सईनेच. आमरस-पुरीच्या जेवणामध्ये बासुंदी का नाही म्हणून तर बासुंदी-पुरीच्या जेवणामध्ये जिलेबी का नाही ह्या वर टोकाचा वाद घालण्याचे तिचे कौशल्य सर्व मंगलकार्यालयामध्ये प्रसिद्ध आहे . अगदी शाळे च्या बसमध्ये «मीच पहिली चढणार» ह्या पासून ते «मीच का पहिली चढणार?» अश्या दोन्ही बाजूने वाद घालण्याचे प्रचंड कौशल्य आणि उत्साह ह्या लहानगीमध्ये जन्मजात होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या उक्तीने बर्याच चाणाक्ष लोकांनी कुमारी सईला हे रून, आपल्या आईच्या ही दोन पावले पुढे जाणार, अशी अचूक भविष्यवाणी करून ठे वली होती. तिच्या वाद्कौशल्याने प्रभावित होवून तिच्या शाळे त इयत्ता चौथीतच हायस्कूलच्या वाद-विवाद मंडळाचे अध्यक्षा केले. अगदी पुढे कॉलेजमध्येसध ु ्दा तिला पहिल्या वर्षीच Debating Society ची प्रमुख केले. आणि सचिन प्रमाणेच तिने आपल्या hobby ला आपले करिअर बनवायचे ठरविले. त्याचे पुढचे पाऊल म्हणून, कुमारी सईने कायद्याचा अभ्यास सुरु केला. आणि

४५


काही महिन्यातच कालची कुमारी सई आजची एक प्रसिद्ध वकील झाली आहे . आणि आता काय ? …. तिच्या समोर उभे रहायची कोणाची टाप आहे ? तिच्या विद्वत्तेची जाणीव तिच्या एका नजरे तन ू च होते असे आमच्या भागातील (एके काळचे मवाली आणि आताचे) समाज-सेवक सांगतात. तिची खालील तीन रं गीत फॉर्मची थिअरी आमच्या भागात प्रचंड प्रसिद्ध झाली. शिटी मारणे, धक्का मारणे, कॉमेंट करणे ह्या आणि अश्या किरकोळ गुन्ह्यांसाठी फॉर्म क्रमांक एक. पिवळ्या रं गाचा हा फॉर्म कोणत्याही स्त्रीने भरला की कुमारी सई शिटी मारणार्याला अर्ध्या दिवसात गजाआड करणार ही काळ्या दगडावरची रे घ.

तांबड्या रं गाचा फॉर्म क्रमांक दोन कोणत्याही स्त्रीच्या हातात दिसला की तिच्यावर शारीरिक (किंवा मानसिक) अत्याचार करणार्याला कमीत कमी एक महिना वकिलीणबाई जेलची चक्की पिसायला लावणार हे सर्वांना माहित आहे . …अगदी नवरा असला तरीही. आणि लाल फॉर्म म्हणजे अत्याचार करणार्याचे जणू मृत्युपत्रच. अत्याचार करणारा जर नवरा असेल तर advocate सई कमीत कमी एक कोटीची पोटगी मिळवून दे णारच असा विश्वास प्रत्येक स्त्रीला वाटतो. आणि नवरा नसेल तर …. तर नुसती कल्पनाच केलेली बरी (अजून तरी असा एकही लाल फॉर्म भरला गेलेला नाहीये). सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्याचार करणाऱ्यामध्ये स्त्री असेल (म्हणजे सासूबाई किंवा नणंदबाई) तर शिक्षा दग ु नी. (खरे तर, पुरुषांपेक्षा स्त्रियाच स्त्रियांवर अत्याचार जास्त करतात असे तमाम पुरुष जातीचे मत येथे विचारात घेण्यासारखे आहे .) कुमारी जुई भडकमकर: ‹दे र आये दरु ु स्त आये› ह्या म्हणीचे प्रत्यंतर कुमारी जुई मुळे सोसायटी मध्ये सर्वांना आले. इयत्ता तिसरी पर्यंत काहीशी अबोल असल्याने बाळ जुईबद्दल सावित्रीमातेच्या मनात भीतीची पाल चुकचुकायची. आपली मुलगी मुकी तर नाही ना ? तिची बोलतीच कोणी बंद केली नाहीना ? असे वाईट वाईट विचार ह्या जन्मदात्रीच्या मनात येत असत. परं त,ु चौथीच्या परीक्षेच्या वेळी कुमारी जुईने उत्तरपत्रिकेवरून वाद घालून आपल्या आईचा वारसा पुढे चालविण्यास आपण समर्थ आहोत हे दाखवून दिले. आणि त्या दिवसापासून ते आतापर्यंत एकही दिवस आपल्या आईच्या मनात परत असे वाईट विचार येवू दिले नाहीत. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठे वत, जेथे शक्य असेल तेथे वाद घालत आणि शक्य नसेल तेथे आदळ-आपट करत आपुल्या माय-भगिनींची परं परा कायम ठे वली.

नटण्या मुरडण्याची थोडीफार आवड असलेल्या कुमारी जुईला त्या पेक्षाही जास्त आवड कराटे खेळण्याची आहे हे आमच्या भागातील सडक छाप सख्या हरींना (नागरी भाषेत रस्त्यावरील मजनूंना) लवकरच कळले. तिची खोडी काढणाऱ्या पहिल्याच मजनूचा (म्हणजे बाजूच्या सौराष्ट्र सोसायटीतील कुमार पंकज शहाचा) उजवा हात आपल्या कराटे च्या फटक्याने आयुष्यभरासाठी निकामा केला आमच्या जुईबाईंनी. पंकज शहाचा आयुष्यभरासाठी शहे नशहा केला कराटे च्या एका फटक्यात. आणि त्यानंतर जुईलाच नाही तर विभागातील कोणत्याच मुलीला अश्या मजनूंचा कधीच त्रास झाला नाही. ह्या पराक्रमामुळे काहींनी जुईचे नामकरण जुई-ताय असे केले गेले (जसा मुन्ना भाय तशीच जुई-ताय) तर काहींनी ब्रूस-ली ची छोटी बहीण म्हणून जुई-ली असे केले.

तर अश्या ह्या दोघी सावित्रीच्या लेकी दिसामासांनी वाढतच होत्या. त्यांची कीर्ती चहूकडे पसरू लागली. आणि त्याचबरोबर विभागातल्या इतर बायकाही मानसिक दृष्ट्या कणखर झाल्या. ह्या दोघींचा आदर्श सर्व समाजातल्या मुलींनी ठे वला. आणि त्यामुळे विभागातील सर्व गुंड- मवाल्याना आपोआप अनैच्छिक सेवानिवत्ती ृ (non-voluntary retirement) घ्यावी लागली. पारं पारिक भांडणात नळावरची, पिठाच्या चक्कीवरची, साड्यांच्या दका ु नातील, बसच्या रांगेतील, रे ल्वेच्या स्टेशन वरची आणि धान्याच्या रे शनवरची ह्या दोघींची भांडणे गाजतच होती. परं त,ु आधुनिक काळातील फेसबुकवरची, ट्विटरवरची, Whaassup च्या ग्रुपमधली आणि Twitter वरची भांडणे दोघींनी अजरामर केली. विसाव्या शतकातील आद्य-क्रांतीकारिणी असा पुरस्कार द्यायचा झाला तर तो ह्यांनाच द्यावा असे इं टरनेटवरील बर्याच नेट-करांना वाटतें. E-mail किंवा G-mail पेक्षाही ‹फीमेल› नेटवर्क ची ताकद जास्त आहे हे ह्या दोघी स-प्रमाण सिद्ध करतात. सोसायटीच्या पटांगणापासून सुरु झालेले ह्या दोघींचे भांडण कौशल्य लवकरच वैश्विक होणार असल्याचे संकेत आम्हास तेव्हाच मिळू लागले होते. ‹अवघे विश्वचि माझे घर› किंवा ‹वसुधैव कुटु ं बकम› ह्या वृत्तीने जवळ जवळ येत असलेल्या जगाचे अंगण ह्या दोघींना खुणावू लागले होते. आपल्या कर्तुत्वास यथायोग्य वाव मिळावा आणि आपले कौशल्य आंतर-राष्ट्रीय पातळीवर सिद्ध करण्याची संधी मिळावी असा विचार ह्या दोघींच्याही मनात घोळू लागला. आणि……आणि काय……? दशदिशांतन ू आशीर्वाद आले……तथास्तु…।… तथास्तु।…तथास्तु। अश्या ह्या सावित्रीच्या दोन लेकी लवकरच विवाहबध्द होऊन आखाती दे शातील बहरीन मध्ये कायमचे वास्तव्य करण्यास येत आहे त असे कळते. आणि म्हणूनच हा सूचनावजा लेखाचा प्रयत्न "सावित्रीच्या लेकी……किती(?) सुरक्षित !!!” श्री. पराग नाडकर्णी (parry707@gmail.com)

४६


आपल्या संस्कृतीने स्त्रीला सतत दब ु ळे करण्याचा हा प्रयत्न तर नव्हे ना? अशी शंका येते. पण-------- वेदकाळापासूनचा विचार करता भारतात स्त्रीला शिक्षण वर्ज्य नव्हते असेच दिसून येते. एकेकाळी गार्गीमैत्रयी सारख्या विदष ु ी वेदविद्याविभूषित होत्या. परं तु मधल्या हजारो वर्षांत असे काही घडले की, स्त्रीला ‹चूल व मुल› एवढ्याच मर्यादे त जखडू न ठे ऊन अबला बनविले. स्त्री म्हणजे भोग वस्तू, परावलंबी, पुरुषाच्या मदतीशिवाय असहाय्य अशा प्रकारचे जीवन कंठण्यास भाग पाडले आणि ‹यत्र नार्यस्तु पूज्यन्ते› ऐवजी ‹न स्त्री स्वातंत्र्यमर्हति› असा आचार बहुतांश सुरु झाला. दस ु रे कारण म्हणजे भारतावर होणाऱ्या परकीय स्वाऱ्या. त्यामुळे पुरुषवर्ग आक्रमणांना तोंड दे ण्यास घराबाहे र मग्न अन स्त्री वर्गावर सर्व कौटु ं बिक जवाबदारी! तथापि स्त्रियांची अवस्था सुधारल्या खेरीज समाज जीवन गतिशील होणार नाही या जाणिवेतन ू प्रामुख्याने पुरुषांच्या अनुकंपेतन ू जन्माला आलेल्या स्त्री दास्यविमोचनाच्या चळवळीचा १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात उदय झाला. भारतात मुंबई, पुणे वगैरे विविध ठिकाणी स्त्री शिक्षणाचे वारे घुमू लागले. स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या न्यायमूर्ती महादे व गोविंद रानडे , श्री गोपाळराव जोशी, महर्षि कर्वे, ज्योतिबा फुले यांच्या सारख्या समाजसुधारकांनी कर्मठ समाजाचा विरोध सहन करून चळवळीला धार आणली आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे , काशीबाई कानिटकर , डॉ. आनंदीबाई जोशी यांचे इतर स्त्रियांना आकर्षण वाटू लागले. स्त्रीची जागा फक्त उं बरठ्याच्या आत असते असा समज खोटा पडला. स्त्रीने तिचे कार्यकर्तुत्व विस्तारित करण्यास उद्युक्त झाले पाहिजे. हे ध्येय ठे ऊन महात्मा फुले यांनी १८४८ च्या सुमारास भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. "एक स्त्री शिक्षित झाली तर पूर्ण कुटु ं ब शिक्षित होते" याची सुरुवात आपल्या घरापासून केली. स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षित केले. सावित्रीबाईंनी सनातन लोकांकडू न झालेला विरोध, कुत्सित टीका, अपमानास्पद वागणूक या सर्वाना धैर्याने तोंड दिले. कर्मठ, क्रू र, रूढी परं परा यांना कणखरपणे आळा घातला. ‹सत्यशोधक› समाजाची धुरा वाहिली. सावित्रीबाईंचे शैक्षणिक व सामाजिक असे कार्य चौफेर होते. ताराबाई शिंदे यांनीही त्यांना ह्या कार्यात साथ दिली. समाजातील ज्यांना पुनर्विवाह करण्यास बंदी होती अशा विधवा स्त्रियांसाठी आश्रमाची स्थापना करून त्यांना शिक्षण दे ण्याची व्यवस्था केली. स्त्री पुरुष समानता असा निबंध लिहून समाजाच्या डोळ्यात अंजन घातले. या सर्व कार्यात उच्य विद्याविभूषित पंडिता रमाबाई यांचे सहकार्य वाखाणण्याजोगे होते. आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी असलेल्या आणि स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या रमाबाई रानडे हे एक असे व्यक्तिमत्व होते. (कालखंड १८६२- १९२४) घरातील इतर स्त्रियांच्या विरोधाला न जुमानता न्यायमूर्ती रानड्यांनी स्वतः रमाबाईंना मराठी आणि मराठी बरोबर इं ग्रजीची ही गोडी लावली. त्या अस्खलित इं ग्रजी बोलू लागल्या. त्यांनी १९०४, १९०८, १९१२ व १९२० मध्ये भारतीय महिला परिषदे चे अध्यक्ष पद भुषवन ू महिलांना मार्गदर्शन केले. बॉम्बे सेवा सदन, पुना सेवा सदनचे ही अध्यक्ष पद भुषविले. महिलांना नर्सिंगचे शिक्षण दिले. स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दे ऊन समान न्यायहक्क मिळवून दे ण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अविरत झटल्या. पण त्यांनी त्यांच्या कष्टांचा किवा अवहे लनेचा त्यांच्या भाषणात कधी उल्लेख केला नाही हे उल्लेखनीय आहे . "स्वातंत्र्यपूर्व काळात पाठींबा दे ण्यात तसेच स्त्रियांचे धजावलेली अनेक व्यक्तिमत्वे राम मोहन रॉय, महर्षि कर्वे

शिक्षणाची मुहूरम ्त ेढ रोवली गेली." १९ व्या शतकात स्त्री- वादी चळवळीला शिक्षण ही काळाची गरज आहे हा दरू दृष्टी विचार बाळगून प्रत्यक्ष कार्य करण्यात ह्या काळात पुढे आली. त्यात स्वामी विवेकानंद, गोपाळ गणेश आगरकर, राजा ह्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. रमाबाईंच्या समकालीन स्त्रीशिक्षणाचा, विधवा

४७


स्त्रियांच्या उन्नतीचा वसा घेतलेले आणखी एक थोर समाज सेवक म. धोंडो केशव कर्वे ह्यांनी १८९९ मध्ये अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. पुण्याजवळ हिं गणे येथे १९०७ मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्यालय स्थापन केले. तेथे महिलांसाठी बालसंगोपन, शरीरस्वास्थ्य, आरोग्य आणि रोजच्या व्यवहारातील आवश्यक गोष्टी शिकवण्यास प्रारं भ केला. १९१६ मध्ये महिलांसाठी ‹श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या ह्या कार्याचा गौरव अल्बर्ट आईनस्टाईन, मादाम मॉटे सरी, रविंद्रनाथ टागोर ह्यांच्यासारख्या विद्वज्नांनी केला. भारत सरकारने धोंडो केशव कर्वे ह्यांना १९५५ मध्ये ‹पद्मविभूषण› तर १९५८ मध्ये वयाच्या १०० वर्षी ‹भारतरत्न› ह्या पदव्या दे ऊन सन्मान केला. «संस्कृता स्त्री पराशक्ती» या महर्षि कर्वे ह्यांच्या बोध वाक्यातून आपणास स्त्री शिक्षणाचे महत्व जाणवते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना अल्पयुष्यामुळे स्त्री शिक्षणाच्या प्रसारामध्ये जरी योगदान दे ता आले नाही, तरी त्या काळात अल्पवयात वैद्यकीय शिक्षण परदे शात जाऊन पूर्ण केले आणि स्त्रियांसमोर उत्कट आदर्श निर्माण केला. ताराबाई मोडकचा काळ म्हणजे १८९२ ते १९७३. प्रथम त्या राजकोट येथील स्त्रियांच्या कॉलेज मध्ये प्राचार्या होत्या. शिक्षणाच्या प्रचाराचा ध्यास घेऊन ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे बालवाडी स्थापन केली. त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यबद्दल त्यांना १९६२ मध्ये ‹पद्मभूषण› हि पदवी मिळाली. त्यांच्या तालमीत वाढलेल्या श्रीमती अनुताई वाघ यांनी कोसबाडसारख्या आदिवासी वस्तीत शाळा चालू करून आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचले. स्त्रीशिक्षणाचा विचार थोडा बाजूला ठे ऊन खेड्यापाड्यातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी (कालखंड १८८७ ते १९५९) ‹रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचा ऋणनिर्देश करणे आवश्यक आहे . अगदी अलीकडच्या काळात सन १९७० नंतर राजा दांडेकर व त्यांची पत्नी रे णू दांडेकर ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ चिखल गावी शिक्षणाची मुहूरम ्त ेढ रोवली. अत्यंत हालअपेष्टांना तोंड दे ऊन लोकांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम निर्माण केले. शिक्षण हे शहरी भागापुरते मर्यादित न राहता, शिक्षणाचा प्रसार खेड्यापाड्यात, तळागाळापर्यंत होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने ‹ महिला साक्षरता अभियान› सुरु केले आहे . ह्याचा इष्ट परिणाम पुढील काळात अनुभवास येइलच. आज जे शिक्षण आपल्याला सहज मिळू लागले आहे त्या साठी गेल्या २०० वर्षात ज्या अनेक स्त्रियांनी आणि महर्षि कर्वे, ज्योतिबा फुले या सारख्या समाज सुधारकांनी अथक मेहेनत व कष्ट करून स्त्रीशिक्षणाचा पाया रचला त्यांचे स्मरण केले पाहिजे. समाजसुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमळ ु े आजच्या स्त्रीच्या उपजत बुद्धिमत्तेला वाव मिळू न अनेक व्दारे ` शिक्षणसाठी खुली झाली आहे त. स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपल्याला उत्तुंग भरारी मारताना दिसत आहे . इं दिरा गांधी, गोल्डा मायर, मार्गारे ट थॅचर या सारख्या दे शात सर्वोच्य स्थानी विराजमान झाल्या. कल्पना चावला प्रत्यक्ष भरारी मारून आली. हे लन केलरने आपल्या अपंगत्वावर मात करून जीवन कसे जगावे ह्याचा आदर्श समाजा समोर ठे वला. १९७५ हे स्त्री मुक्ती वर्ष म्हणून सर्व जगाने साजरे केले. स्त्री शिक्षणाचा सर्व विधायक बाजूंचा परामर्श घेत असताना त्यांची काही नकरात्मक फलितेही दिसू लागली आहे त. आर्थिकदृष्टीने स्त्री स्वावलंबी झाल्याने आत्मकेंद्रीवृत्ती वाढू लागली आहे . विवाह विच्चेदांचे वाढते प्रमाण, एकटे पण आणि त्यातून येणारे नैराश्यांसारखे दषु ्परिणामही दिसू लागले आहे त. कृ तज्ञता, निष्ठा कलात्मकता व नैतिकता हि मुल्ये कालविसंगत होऊ लागली आहे त. स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या समाजसुधारक स्त्री- पुरुषांच्या उद्दिष्टांची शोकांतिका होऊ नये हे आपण स्त्रियांनी सतत ध्यानात ठे वले पाहिजे. असे असले तरीही आपण आपल्या परीने या मोहिमेत सहभागी होऊन अल्पसा हातभार लावणे गरजेचे आहे . त्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या समाजातील स्त्रियांना शिक्षणासाठी उद्द्युक्त करणे आपले आद्य कर्तव्य आहे . आपल्या घरी कामाला येणाऱ्या मुलीना, स्त्रियांना निरपेक्ष बुद्धीने वाचायला आणि कमीत कमी स्वाक्षरी करायला शिकविणे गरजेचे आहे . शुभं भवतु शुभस्य शीघ्रम!!!!!! सौ. मृण्मयी बापट

४८


नातं कोण(?)च

मनुष्य आपल्या मनातले विचार किंवा भावना विविध रुपात व्यक्त करतो. ते समोरच्याला कळे लच असे नाही. प्रत्येकाची आपली वेगळी बोलण्याची पद्धत असते. त्याच्या बोलण्याला विशेष महत्व आहे . बोलण्यावरून मनुष्याचा व्यवहार ओळखला जातो आणि व्यवहार त्या मनुष्याचे चरित्र दर्शवितो. हे जरी खरे असले तरी शब्दांची “किमया” काही निराळीच “sorry” किती चांगला शब्द आहे . जो माणसाच्या चुका लपवायला मदत करतो. ज्या प्रमाणे जीवनाच्या वाटे वर संकटे ही येत असतात त्याचप्रमाणे शब्दांच्या वाटे वरही संकटे आहे च. शब्दांचा “मायाजाळ” असाच असतो. समोरच्याला शब्दांचा अर्थ कळला तर ठीक नाहीतर फजितीच. आपण वापरलेले शब्द हृदयावर तलवारीप्रमाणे घाव करतात. तलवारीचे घाव भरू शकतात, पण शब्दातून, बोलण्यातून दिलेले घाव भरू शकत नाही. शब्दशक्ती ही विचित्र असते. जी माणसाला भुरळ पाडते. काही व्यक्ती विनोदाव्दारे आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. पण समोरच्याला त्याच्या विनोदी शाब्दिक शब्दाची परिभाषा कळत नाही आणि शब्दाचा अर्थ-निरर्थक ठरतो व फार पंचाईत होते. बोलताना शब्दात फेरबदल झाला तर समोरचा व्यक्ती त्याचा काय अर्थ काढे ल हे आपल्याला माहित नसतं म्हणूच एखादे वेळी गैरसमज होतो. त्यामुळे काही नाती जवळ येतात तर काही नाती दरु ावण्याच्या मार्गावर असतात. पुढे तुम्ही वाचाल तर कळे लच. नाते हे झाडाच्या आळ्या सारखे असते. त्याला जर प्रेमाचा ओलावा नसेल तर त्या नात्याचा काय उपयोग? नवरा बायकोच नातं ही असच असतं. नवरा बायकोच्या नात्याला प्रेमरूपी सिंचन दे णारं असच एक दांपत्य. संध्याकाळची वेळ हातात चहाचा कप घेऊन बागेत गप्पा मारत चहा संपवायचा हा ह्यांच्या रोजच्या दिनचर्येतला एक भाग. एखादा विषय घेऊन त्या विषयावर गप्पा मारत चहाचा आस्वाद घेणारे हे नवरा बायको आणि त्यांची दोन “अपत्ये”. आजच ह्यांचा विषय होता “संशय”. जबरदस्त विषय त्यामुळे गप्पा बराचवेळ पर्यंत रं गत आल्या. इतक्या रं गात आल्या कि “संशय” ह्या विषयाने नवरा बायकोत वाद निर्माण केला. सरतेशेवटी बायकोला ते उमगलं करिता «क्षमस्व» कबुली जवाब. कुठे तरी हा वाद थांबवावा म्हणून बायकोने पुढाकार घेतला चहाचे कप घेऊन ती उठू न निघण्याच्या मार्गाला लागली. तेवढ्यात तिला नवऱ्याने शब्दांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याच्या त्या प्रयत्नाने दोघांचा वाद न राहता कलह निर्माण झाला. आणि वाद वाढतच गेला. नवरा: मला न “तुझं नाव फार आवडत.” बायको: हो का ? नवरा: अगदी मनापासून. बायको: मग मनातच असू दे उगीचचं वारं वार बाहे र पडायला नको.(वाढलेल्या स्वरात) नवरा: मग मला सांग तुझं नाव मला का आवडतं? बायको: कुणास ठाऊक? आवडत की उगीचच चेष्टा. नवरा: आवडतच मुळी! अगदी तुझ्या गळयाशप्पथ बायको: माझ्याच गळ्याची का ? तुमच्या गळ्याची का नाही? तुम्हाला माझ नाव आवडतच नाही मुळी! म्हणून माझ्या गळ्याची शप्पथ. आवडलं असत ना तर तुम्ही तुमच्या गळ्याची शप्पथ घेतली असती. बसलात ना चूप? म्हणे तुझ्या गळ्याची शप्पथ. बोला बोलती का बंद झाली? खरं बोलतेय ना मी? नवरा: अग तू बोलू दे शील तर मी बोलेन ना.

४९


बायको: मग बोला ना, कुणी अडवलंय? नवरा: आता मी काही बोलतच नाही सरळ म्हणतोच तुला «मी तुझा कोण?» बायको: हा प्रश्न कि संशय? नवरा: तसं वगैरे काही नाही हं बायको: मग हा संशयास्पद प्रश्न कशाला? कोण म्हणजे काय? पती, पतीराज आहात माझे. नवरा: माहित आहे «पती» काय म्हणतेस.

मी म्हणतोय «मी तुझा कोण?”

बायको: अहो तेच सांगतेय « तुम्हाला नवरा म्हणते ते कळले नाही का? अहो धनी, हव असल्यास इं ग्रजीत husband आहात माझे. नवरा: मला ते कळू न चुकलंय तरी सुद्धा मला तुला म्हणायचं आहे “ मी तुझा कोण?» बायको: (वाढलेल्या स्वरात) कळल पण म्हणता आणि वर मलाच विचारताय “मी तुझा कोण?” (बायकोचा स्वर अधिकच चढला) चार चौघात चारशे ते पाचशे लोकांच्या साक्षीने तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं अक्षता डोक्यावर पडल्यात इष्ट मित्र मंडळींच्या आशीर्वादाने आपलं डोक्याला डोकं लावलं. भटजीने मंगलाष्टके म्हणलीत पारं पारिक रित्या आपल्याला नवरा बायको बंधनात बांधलं. बायको म्हणून तुम्ही माझा स्वीकार केलात. त्याच बायकोचा तुम्ही नवरा आता आणि डोकं फोडू न सांगायला हवा का? नवरा: नको तुझ्या डोक्याला मार लागेल. शरीरातला रक्ताचं तेवढं प्रमाण कमी होईल आणि उघड्या डोळ्यांनी मला ते बघवला जाणार नाही. बायको: बघवल जाणार नाही ना मग आता डोळे बंद करा आणि कामाला लागा आणि हो «कोणाचा» तेवढा नाद सोडा. नवरा: कामाला तर मी लागणारच आहे पण डोळे बंद करून नाही “डोळे उघडू न!” डोळे बंद करून मी रात्रीच तेवढं काम करू शकतो. बायको : "बडबड काय करताय ! फाजीलपणा सोडा” नवरा: भलतंच काही समजू नकोस मनात विचार चालू असतो रात्री त्यामुळे डोळे बंद होतात आणि चांगल काही लिहिल जात. माझ्या “लिखाणाबद्दल बोलतोय मी.” बायको : तुमची ना कमालच आहे . नवरा : कमालीचाच आहे मी म्हणूनच म्हणतोय तुला “मी तुझा कोण?” बायको: हातातले कप टे बलावर ठे वले आणि खुर्चीवर बसून आणि डोळे बंद करून दबल्या स्वरात बडबडली “अहो ! तुम्हाला काय वेड लागलंय का? नवरा: नाही बुवा ! सध्या तरी नाही तू माझ्यावर अशीच रागवत राहिलीस तर लागण्यची तेवढी शक्यता आहे . बायको : मग असे वेड लागल्यासारखे का करत आहात. नवरा: छे ! छे ! तू समजतेस तसे काही नाही. “मी वेड्या सारखं करतोय असे तुला का वाटत?” बायको : वाटायला नको “कोणाचा” पाढा घेऊन बसलात आणि वर मलाच विचारता “अहो ! जरा का ?” नवरा: “का ? कशासाठी?” बायको : आपल्याला ना डॉक्टर कडे जायचे आहे . नवरा : तुझ्याकरिता माझी सोबत हवी आहे का ?

५०

तयार होता


बायको : माझ्या करिता नाही तुमच्याकरिता! नवरा: मला काय झालाय बुवा ? मी तर मस्त जबरदस्त आहे . बायको : तरीपण तुम्हाला एकदा दाखून घ्यावं असं मला वाटायला लागलय! नवरा: डॉक्टरांनी मला बघितल्यावर काय करणार आहे त ते ? चित्रकार तर नाहीत ना ते ? बायको : कुणी सांगितलं ते चित्रकार आहे त म्हणून? नवरा: डॉक्टरांना तू ओळखतेस तुझ्या बालपणीचा मित्र .

म्हणून कल्पना असणार तुला !

बायको: ओळखत असली म्हणून काय झालं त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. म्हणे "चित्रकार नाहीत ना?” नवरा : डॉक्टरी व्यतिरिक्त चित्रकारी करतात की काय ? चित्रकला महाविद्यालयात additional course केला असावा. आणि मॉडे ल म्हणून यदाकदाचित माझी निवड असला काही प्रकार तर नाही ना. बायको: चित्रकार जरी असले ना डॉक्टर तरी असल मॉडे ल त्यांना नकोच. नवरा: का? काय कमी आहे माझ्यात! कॉलेजच्या वेळेला कितीतरी मुली माझ्या पाठीमागे असायच्या. बायको: अहो ! शेवटपर्यंत तुमच्या पाठीमागेच राहिल्या. एकिचीहि हिमत झाली नसावी पुढे यायला संकट कोण ओढवून घेणार त्यांना खात्री होती!» तेवढीच मात्र हिम्मत मी केली आणि फसले! नवरा: खोट

बोलू नकोस तू हिम्मत वगैरे काही नाही केलीस.

हसलीस आणि माझ्या प्रेमात पडलीस.

बायको : पुरे झाल आता कौतुक तयार व्हा आणि चला! नवरा : पण आपल्याला जायचे तरी कुठे आहे ? बायको : डॉक्टरकडे ! नवरा: तुझ्यासाठी कि माझ्यासाठी ? बायको: हे आपण डॉक्टरवर सोपवू. नवरा: अग ए ! मी काय म्हणतोय “मी तुझा कोण?” बायको: डॉक्टर कडे गेल्यावर ते कळणारच आहे .

मग आता तयार व्हा.

नवरा: विनाकारण पैसे खर्च करून डॉक्टरकडे जाण्यात काय अर्थ आहे . बायको: अहो पण व्यर्थ ही नाही.

तुम्हाला तेवढं दाखवायला हव.

नवरा: जावच लागेल का ? नाही गेल तर चालणार नाही पण कशासाठी ? बायको: अहो ! अस का करत आहत.

दोन मुलांचे बाप आहात तुम्ही!

नवरा: मला यात संशय नाही तुला काही संशय आहे का ? बायको: कसला मेला आजच विषय घेतला “संशय” कुणास ठाऊक. नवरा: मला ठाऊक आहे न गप्पा मारण्याकरिता हा विषय घेतला म्हणून तर आपण दोघे इतका वेळ बोलत आहोत. तू रागात येत आहे स आणि मी लाडात. बायको: अहो ! तुम्ही लाडात येत आहात कि वेड्यात येत आहात "मला कळतंय न ते!” वेड लागलेल्याला लाडात आला अस म्हणतात. या गोष्टीची कल्पना नव्हती मला. नवरा: अग बाई ! माझे आई तु समजतेस तसे काही नाही.

५१


बायको: आतापर्यंत मला ना नुसत वाटतच होतं पण आता आता तर खात्रीच झाली आहे . «बायको आहे मी तुमची!» मग मला असे आई, बाई, ताई का म्हणताय? तुम्हाला सांगते «आपल्याला कुठला भयंकर मोठा आजार व्हायचा असेल ना तर सुरवातीला त्याची काही लक्षणं जाणवतात. ती लक्षणं मला आता तुमच्याबद्दल दिसत आहे त. वेडेपणा हा सुद्धा एक मोठा आजारच आहे की. म्हणूनच म्हणतेय तुम्ही तयार व्हा! डॉक्टर कडे निघूया आपण. नवरा: एवढ्या मोठ्या आजाराची कल्पना दे खील नव्हती. आज कळल्यावर वाटू लागलय. तुझ्यापेक्षा मी कितीतरी मागे आहे . सामान्य ज्ञानात मात्र तुला पैकीच्यापैकी मार्क्स मिळत असणार त्यावेळेला. अस वाटायला हरकत नाही. तुझ हे सामान्य ज्ञान पाहून मला पुन्हा तुला म्हणावस वाटत “मी तुझा कोण ?” बायको: जळले मेले सर्व पुरुष सारखेच. कुठला, तो ही माणूसच.

आपण म्हणाव “माझा नवरा तेवढा सज्जन, दे वमाणूस”, पण दे व

नवरा: “अगं!” म्हणून तर “लग्न केल ना तु माझ्याशी!” बायको: म्हणे स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधल्या जातात. “ह्यांच्याशी माझी गाठ बांधते वेळी”.

आई जगदं बे! कुठली वेळ होती कुणास ठाऊक

नवरा: अचानकपणे तुझा दे वा वरती राग का? “राग येण्या एवढे तरी काय घडलंय”. बायको: असं विचारायला तुम्हाला कसं काही हो वाटत नाही. “मी कधी कुठे जात नाही, कुणी माझ्या मनातही नाही. घरात तुमचा संसार सांभाळत पडली राहते तरी तुम्ही म्हणताय, “मी तुझा कोण?”. असला प्रश्न, “दे वा!” वाटलं नव्हत, असं प्रसंग येईल “आयुष्याचा रथ ओढत असतांना!” नवरा: महाभारतात अर्जुन युद्धाच्या वेळी रथात बसलेला. त्यावेळी कृ ष्ण त्याचा सारथी. “आपल्या आयुष्याच्या रथात सारथी कोण?” “तु” की मी”. कळल तर बरं होईल, आपली तेवढी पोस्ट सांभाळता येईल मला. बायको: हो! अगदी बरोबर बोललात. पोस्ट तेवढी चांगल्या प्रकारे सांभाळता येते. म्हणूनच नवरा या नात्यानि असला प्रश्न. म्हणे “मी कोण?” नवरा: “अगं!” मी कोण असं विचारत नाहीये तुला, मी म्हणतोय “मी तुझा कोण?” बायको: काय हो! “मी वेडी आहे असं वाटतं तुम्हाला?”. समजावयाच सोडू न आगीत तेल ओतताय.

“इथे काळजात आग लागलीय माझ्या!”

मला

नवरा: तुला सांगतो, तेलाचे भाव फार वाढलेत, असं विनाकारण ओतायला परवडत नाही. राहिला प्रश्न तुझ्या वेडेपणाचा, इच्छा असतांना सुध्दा असलं धाडस करणार नाही. बायको: “कशाला इच्छा मारताय!” “मी तुझा कोण?” प्रश्न विचारायला बरं धाडस केलंय, आज बोलूनच टाका. जे काही तुमच्या मनात असेल न ते बहे ल पडू च दे . सर्वकाही ऐकायला समर्थ आहे मी. तसंही, आयुष्याचा रथ ओढत असतांना सदै व सुखाची सावली सोबत नसतेच त्यात दःु खरुपी सूर्य कधीतरी तेज पसरवीत असतो. मला वाटते, “माझ्या आयुष्यात त्या दःु खरुपी सूर्यानं तेज पसरवायला सुरवात केली.” कधी विचार दे खील केला नव्हता हो, तुम्ही माझा इतका अंत पाहाल ते. (नाकाला पदर लावून सुक्या स्वरात) नवरा: मी कुठे अंत बघतोय, “मी तर फक्त म्हणतोय. बायको: काही एक म्हणू नका. जरा वेळ गप्प बसा. लग्नाच्या आधी आणि आतापर्यंत कित चांगले होतात हो. कधी मला माझ्या माहे रपणाची आठवण येऊ दिली नाही. पान आज असं अचानक काय झालयं कुणास ठाऊक. “दे वा!” काही चुकलंय का माझं? नवरा: दे वाकडे काय “क्षमायाचना’ करतेस?“ दिवस राहा.

“माहे रची आठवण आलीय का तुला?“

५२

जाऊन ये चार पाच


बायको: सत्य ओठावर आलंच शेवटी. मोकळे .

मी माहे री जावं असंच वाटतय ना तुम्हाला, म्हणजे मजा मारायला

नवरा: जाऊन परत येण्या बद्दल म्हणतोय मी. कायमची माहे री जाण्या बद्दल नाही. लग्नाच्या आधी तू माझी वाट बघत उभी असायची चौपाटीवर “जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते“ म्हणत. मुंबई चौपाटीवर उभी राहायची. हातात चूरमुऱ्याचे लाडू घेऊन, जे तुझ्या आईने माझ्यासाठी प्रेमाने बनविलेले. खूप छान लाडू कारे हो ती. प्रत्येक भेटीत अगदी नित्य नियमाने सांगायचीस. तू भेटायला आलीस की माझ्याही ओठी तेच. “चूरमुऱ्याच्या लाडवांच तेवढ कौतुक”. त्यावेळी माझी प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकून घ्यायचीस. माझ्या प्रत्येक गोष्टीला तुझा प्रतिसाद दे णारी तु आणि आज “अशी का चिडतेस!” काही कळत नाही, “बुवा”! बायको: “सारं काही कळतंय हो!“ पन वळत नाहीये. कधी नव्हे ते मी तुमच्याकडे हट्ट केला. तुम्हाला सुद्धा हौस नाहीच. “कौतुकानं कधी बाहे र घेऊन गेलात का?“ लग्न करून आले आणि तुमच्या संसारात रममाण झाले. सदै व सुखी संसाराची याचना करीत असते. आयुष्याचा रथ सुरळीत चालावा म्हणून माझी धडपड, तरी दे खील “मी तुझा कोण?“ “छी:”! ऐकून घ्यायलाच नको आता. नवरा: “तुझ्या मनात आज कितीतरी विचारांची कबड्डी सुरे आह“ असले विचार का “बुवा“! बायको: प्रश्न तुम्हीच करताय आणि वर मलाच विचारताय, “डोक ठिकाणावर आहे न तुमचं? नवरा: म्हणजे का? ठिकाणावरच आहे . पूर्वी किती आग्रह करायचो तुला बाहे र फिरायला म्हणून घेऊन जाण्याकरीता. त्यावेळेला तूच म्हणायचीस ना “तुझी सोबत असतांना मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त जवळ राहा मी दस ु रं काही मागत नाही“. शिवाय म्हणायचीस ना, “मला तुझं आवडलं असं अचानक येणं मला न सांगता मला घेऊन जाणं“ त्यावेळेला मी विचार करायचो, खरच किती समाधानी आहे स. किती विचारी आहे स. माझ्या सहवासातच तुला सार काही भ्रमण केल्यासारखं वाटतंय आणि आज माझ्यावरती चक्क आरोप. काही कळत नाही तुझं मला. म्हणतात न, “स्त्रियांना ओळखणं म्हणजे कठीणच“. बायको: हो. स्त्रियांना ओळखणं तेवढ कठीण पान “नवऱ्याला“, “पुरुषांना” ओळखायला आम्हा बायकांना वेळ लागत नाही!? सांगून ठे वते “म्हणे मी तुझा कोण?“ नवरा: सांग, काय सांगायचं तुला मी शांतपणे ऐकून घ्यायला तयार आहे . मला.

तुझ्यासारखं कुठे चिडता येतंय

बायको: चिडायला नको. लग्नाच्या आधी साहित्यिक भाषेतल्या चार ओळी ऐकवल्या होत्या. वाटलं तुम्हाला त्या कळल्या असाव्यात. पण आता मला समजून आलं त्या ओळींचा तुम्ही काय अर्थ समजून घेतलात. अहो! तुमची सोबत असेल तर आयुष्यात कितीही दःु ख जरी आले ना तर त्या दःु खरूपी सूर्याला तडा दे ऊन जीवन जगण्याच सामर्थ्य तुम्ही मला द्या. सुखात जसे माझ्या सोबत आहात तसेच दःु खातही सोबत राहा. जवळ राहाणे म्हणजे सतत माझ्या आजूबाजूला राहाणे नव्हे. चारोळ्या म्हणतात ओळींना घेऊन जाणं म्हणजे कुण्या सिनेमाला किंवा चौपाटीवर घेऊन जाणं नव्हे. त्याचा अर्थ म्हणजे माझ्या आयुष्यात तुम्ही असे अचानक आलात आणि मी केंव्हा तुमची झाले हे मला कळलं दे खील नाही. नवरा: “अस्स!“ तर, तू त्या चारोळ्या म्हणत होतीस त्या ओळींचा अर्थ मला आज कळलाय. उगीचच त्यावेळी मनोमनी खुश होत होतो की “तु किती समजदार आहे स!”. पान मला एक कळत नाहीये, अचानकपणे यायला मी काय “यम” आहे ? बायको: सध्यातरी “यमाच्याच” भूमिकेत आहात! इथे प्राण जायची वेळ आलीय, मला वाटलं त्यावेळी तुम्हाला त्या ओळी उमगल्या असाव्यात, पण माझं नशीबच फुटकं. नवरा: आता ओळींचा आणि नशीबाचा काय संबंध. उगीचच त्या चार ओळींसोबत नशीबाचं कंप्यारीझन (comparison) करू नकोस. तुअल तर ठाऊक आहे च, कॉलेजच्या वेळेला पोरी माझ्यामागे. तुझं नशीब जोरदार म्हणून तू मला पसंत केलस. आपलं लग्न झालं आणि नशीबाला चार चांद लागले. त्या चांदचीच शपथ घेऊन म्हणतोय, “मी तुझा कोण!”

५३


बायको: (चिडू न) पोरांना आवाज दे ते. बाबांची तब्येत ठीक नाही.

मुलगा बाहे र येतो.

“हे बघा”, आम्ही दोघेही डॉक्टरांकडे जुब येतोय.

मुलगा: “बाबा! काय झालं तुम्हाला?” नवरा: “काहीं नाही रे ”!

आईला हौस झालीय मला डॉक्टरांकडे घेऊन जायला!

मुलगा: “आई!” “बाबा तर मला बरे दिसताहे त”. बायको: “हे बघ!” नसत्या चांभार चौकश्या करत बसू नकोस. फक्त ते दिसताहे त पण त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. आज त्यांनी नवीन पाढा पाठ केलाय! “कोण” चा, म्हणूनच डॉक्टरांकडे जाऊन पाढा तपासायला सांगते. मुलगा: मग आई, “तू आमच्या सरांकडे का जात नाही?” बायको: “गप्प बैस! कारत्या, आधीच माझं डोकं संतापलय

आणि आता “तू” अजिबात प्रश्न नकोत.

मुलगा: बाबा! “आईला काय झालंय चिडायला”? नवरा: “मी तुझा कोण” असं तुझ्या आईला म्हटलं म्हणून ती चिडली माझ्यावरती. मुलगा: बाबा, यात चिडण्या सारखं नवरा: तेच सांगतोय तुझ्या आईला.

तरी काय आहे ? आता तू मला सांग C-O-N-E काय होणार?

मुलगा: बाबा CONE कोन होणार. नवरा: आता मला सांग Triangle म्हणजे काय? मुलगा: Triangle म्हणजे त्रिकोण. बायको: अहो! मलाही माहितेय, cone कोन, triangle त्रिकोण, पण ह्याचा काय संबंध आहे तुमच्या “कोण” या प्रश्नाशी? नवरा: मी तुला प्रश्न केलाच नाही. बायको: गेल्या तासाभरात वेड्यासारखे मला एकच एक प्रश्न करताय “मी तुझा कोण?”, “मी तुझा कोण?” आता पोरासमोर बदलताय. नवरा: मी बदलत नाही. आताही तुला म्हणतोय “मी तुझा कोन”. “अगं!” मी तुला म्हणतो, “तुझं नाव मला फार आवडतं म्हणून”. “भूमिती” हे नाव मला तुझं खूप आवडतंय. त्यातल्या त्यात गणित माझ्या आवडीचा विषय. “मी तुझा कोन!” “तू माझी त्रिकोण”, प्रश्नातला “कोण” नव्हे! बायको: (कपाळावर हात ठे वत) धन्य आहात! माझ्या डोक्यात संशयाच भूत भरवून चांगलीच कळ काढलीत. नवरा: मी तुला फक्त म्हणत आलोय “मी तुझा कोन” आणि तू त्याला प्रश्न समजून माझ्याशी वाद घालत बसलीस. बायको: “सॉरी हं !” उगीचच चिडले तुमच्यावर.

“तुम्ही म्हणजे ना ग्रेट आहात!”

नवरा: गेल्या तासाभरात मी तुला प्रश्न केलाच नाही, फक्त म्हणत आलोय “मी तुझा कोन”. तूच चिडू न उत्तरं द्यायची. मुलगा: “तुम्ही दोघेही डॉक्टरांकडे जायला निघताय ना ?” बायको: नाही रे बाबा!

आता डॉक्टरांकडे जायलाच नको.

मुलगा: “का?” बायको: तुझ्या बाबांचा “कोन” चा पाढा समजलाय मला.

५४

आई जगदं बे! एका चांगल्या मुहूर्तावर ह्यांच्याशी


माझी गाठ बांधली असावी.

तुला दं डवत घालते.

नवरा: “स्त्रिया म्हणजे दल बदलणार शस्त्र” “दलबदलू”. छोटू :

वाचलं होतं, ताज्या अनुभवावरून विश्वास बसला.

“आई ग!” circle म्हणजे वर्तुळ, triangle म्हणजे त्रिकोण, तर cone म्हणजे काय होईल?

बायको: अरे बाबा! c-o-n-e “कोन” होईल. छोटू :

“कोन” म्हणजे काय?

बायको: मी त्रिकोण आणि बाबा कोन. छोटू :

“मला नाही समजलं!”

मुलगा: “अरे ”! “आई ना!” त्यांच्या नात्याबद्दल सांगतेय तुला! छोटू :

“म्हणजे हो बाबा?

नवरा: गेल्या तासाभरात जे मी तुझ्या आईला सांगण्याचा प्रयत्न करीत असतांना मला वेड्यात काढणारी तुझी आहे , “तुला समजावतेय समजून घे!” सौ. ज्योती अविनाश माहुले

Subjects Offered: ► Carnatic Classical & Light

► Bharatnatyam/Semi Classical Dance

► Hindustani Classical & Light

► Folk Dance

► Keyboard

► Kathak

► Guitar

► Classic Cinematic

► Violin

► Painting, Sketching, Colouring

► Tabla

५५


नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो,

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

कधी ठणाणा वाजणारा आगीचा बंब असतो.

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

जगातला कुठलाच माणूस त्याच्याइतका जवळ नसतो!

कधी तो मंद झिरोचा बल्ब असतो तर

घराचे नाक असतो मुलांचा पिता असतो,

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

सतत संघर्ष करणारा जिंदादील असतो,

माझ्यापेक्षा इतरांसाठी किती बरं ईझी असतो.!

थोडासा सर्कीट असतो बाकी मात्र रॉक असतो.

बघेल तेव्हा फोनवर बिझी असतो.

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

काही विचारलं तर नुसता गुरगरत रहातो,

विशाल वटवृक्षाची छाया असतो,

त्याचा एक पाय घरात तर दस ु रा बाहे र असतो.

घराचा भक्कम आधार असतो,

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो .

डोळ्यातल्या जरबेने घर राखत असतो,

समजायला भयंकर अवघड असतो,

उसळणारी वादळे झेलत ठामपणे उभा असतो.

तो घरात असतो तेव्हा नुसता वैताग आणतो,

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

आवरलेल्या घरात पसारा मांडून बसतो.

जीवाचा तुकडा असतो,जगण्यातला आनंद असतो,

बाई निघून जाते तेव्हा आंघोळीला जातो,

त्याच्या प्रेमाच्या छायेत आम्ही सुखनैव असतो.

आखलेल्या कामाचा विचका करून टाकतो.

कसाही असला तरी त्याला पर्याय नसतो.

त्याचा माझा खटका उडतो,सरळ बाहे र निघून जातो

नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो.

पसरलेल्या घरात आवरायला मला ठे वून जातो. नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

थयथयाट करणारा जमदग्नीचा अवतार असतो नवरा म्हणजे नवरा म्हणजे नवरा असतो

समस्त नवरे मंडळीना अर्पण.. संकलन: सौ.रसिका दीपक जोशी

कधी तो माझ्यासाठी मजनू बनतो

कुशीत त्याच्या शरदाचे चांदणे बरसतो,

माझ्यासारखी मीच मला साक्षात्कार होतो जेव्हा तो माझे मनमुराद कौतुक करतो!

५६


"येत्र नार्यस्तु पूज्यन्ते , रमन्ते तत्र दे वतः" या सुभाषिता मधून स्त्री जातीचा गौरव केला आहे . वेदकाळापासून स्त्रीचे माहात्म्य सर्वांना पटलेले आहे . स्त्री आणि पुरुष ह्यांना रथाच्या दोन चाकांची उपमा दिली गेली असली तरी माझ्या मते स्त्री हि संसाररूपी रथाची सारथी आहे . वेळ-काळ परिस्थिती पाहून रथ कोणत्या दिशेला वळवायचा हे तिच्या हाती आहे आणि हे कौशल्य स्त्रीला निसर्गदत्त दे णगी म्हणून लाभले आहे . फक्त ह्या कौशल्याचा वापर करताना काही गोष्टी ध्यानात ठे वणे आवश्यक आहे . ‹झाकली मूठ सव्वा लाखाची› ह्या उक्तीप्रमाणे मी म्हणेन स्त्रीच्या बंद मुठीत संसार स्वास्थाचे (सुखाचे) रहस्य दडलेले आहे . स्त्रीचे अंतःकरण अतिशय मृद ू मुलायम नि संवेदनक्षम असते. तिचे हृद्य सदै व भावना विवशतेन सद्गत होते. अश्या ह्या स्त्रीला मुलांबद्दल, पतीबद्दल घरातील वडिलधा-यांबद्दल अपार नितांत प्रेम असते. घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर असतो. परिवारासाठी त्याग करण्याची वृत्ती असते. याला काही अपवाद असतात. पण आपल्या मुलांबाळांवरील प्रेमाच्या आहारी न जाता डोळस असावे. नाहीतर डोळ्यावर पट्टी बांधन ू स्वतःही दृष्टिहीन आयुष्य जगली. परिणाम काय झाला? मुलांकडे दोघांचेही दर्ल ु क्ष्य झाले व सारे कौरव पुत्र दर्ज ु न, दर्गु ु णी व व्यसनी निघाले. असे आंधळे प्रेम काय उपयोगाचे! सध्याच्या बदलत्या काळात पैसा हे च सर्वस्व झाल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे प्रेम, नैतिकता या सारख्या शाश्वत गोष्टींचे मुल्य घसरत चालले आहे . भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाल्याचे आढळू न येत आहे . तेव्हा आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायला हवेत. संस्कार म्हणजे गुणाचा गुणाकार आणि दर्गु ु णाचा भागाकार. असे हे संस्कार पुस्तक घेऊन शिकवत येत नाहीत. तर ते आपल्या वागण्यातून, बोलण्यातून कृ तीतून, वर्तनातून मुलांच्यावर होत असतात. त्यासाठी स्त्रीने आपल्या मनावर संयम ठे वला पाहिजे. स्वतःला काही बंधने घातली पहिजेत. खर तर मुलांना घडविणे एक खडतर व्रत आहे . मुलांवर संस्कार करताना त्यांना प्रेम, त्याग आदी गोष्टींचे महत्व सांगायला हवे. दोन मुलांमध्ये मातेचा दज ु ाभाव नसावा. आता आधुनिक स्त्रीचे जीवन बदलले आहे "चूल आणि मुल" एवढ्या मर्यादे त राहिले नाही. तर तिला अर्थाजनासाठी बाहे र पडावे लागते. तसेच शिक्षण, व्यवसाय, कला यातील भयानक (जीवघेण्या) स्पर्धेला तोंड द्यावे लागते. नोकरी, घर, मुलाबाळांचे शिक्षण म्हणजे तिची तारे वरची कसरत. परिवराप्रमाणे नातेसंबंध, मित्रमैत्रिणी, शेजारी- पाजारी संबंध जपायचे असतात. हि कसरत यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या १) जिभेवर साखर ठे वणे २) डोक्यावर बर्फ ३) पायाला चाक (चक्र) लावणे. हे सगळे करीत असताना आपल्या मूल्यांना, तत्वांना धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. स्वतःचे परिवारातील अस्तित्व टिकवणे गरजेचे. अशी हि वाटचाल करताना आजूबाजूच्या लोकांकडू न चुका झाल्या तरी त्यांना समजावून घेतले पाहिजे. त्यासाठी ‹होणार सून मी ह्या घरची› मधील जान्हवी सारखे मन मोठे करावे लागेल. नाहीतर दस ु ऱ्यांच्या चुकांबद्दल आपण न्यायाधीशाची भूमिका घ्यायची व त्यांच्या चुकांना न्याय दे ऊन शिक्षा करून मोकळे व्हायचे. स्त्रिया आपल्या चुकां बाबतीत मात्र वकील असतात. आपण चुकलोच नाही अशी आपली बाजू मांडतात. दस ु ऱ्यांच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे व स्वतःच्या चुकांबद्दल स्वतःला अपराधी, दोषी समजण्यातच शहाणपण असते. संसारात तिची काही वेळा अर्जुनासारखी अवस्था होते. “To be or not tobe" ह्या दष्ट ु चक्रात तिला वावरावे लागते. त्यावेळी तिने अंतर्मुख व्हायला हवे. अशा आव्हानात्मक प्रसंगात स्त्रीला पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते. अतिविचार करूनही चालत नाही. अतिविचाराने कामातील सहजता हरवते. “Much thinking blunts the action" निर्णय लवकर न घेतल्याने अपयश पदरी येते. पश्याताप करायची वेळ येते. व.पु. आपल्या एका पुस्तकात म्हणतात "प्रत्येक माणूस हा एक महाभारत आहे ." तर मी म्हणेन "प्रत्येक स्त्री हे एक कोड आहे , अन एक स्त्री एकदाच हे आणखी एक कोड"

५७


संसारात स्त्रीच्या जीवनात अनेक बदल (भूमिका) घडत असतात हे सर्व बदल नेहेमीच निर्णायक व खडतर असतात. स्त्रीजवळ आपल्या कामाबद्दल श्रद्धा हवी, विश्वास हवा, सद्सद्विवेकबुद्धी हवी म्हणजे परिवारातील मार्ग सुकर होतो. असे असले तरी स्त्रीवर कुटु ं बातूनच अन्याय होतात. बरे चदा असेही आढळू न येते कि स्त्रीवर अन्याय करणारे दस ु रे तिसरे कोणी नसून एक स्त्रीच असते. स्त्री पारं पारिक विचार अंधश्रद्धा ह्यांच्या जोखडातून मुक्त न झाल्याने समाज तिच्यावर अन्याय करण्यास धजावतो का? स्त्रियांच्या बाबतीत तर वस्तुस्थिती अशी आहे कि, ती रूढी अंधश्रद्धा ह्यांना लवकर बळी पडते. त्यावेळेला ‹अंधश्रद्धा निर्मुलन› ह्या सारख्या प्रयत्नातून हे अन्याय निश्चित कमी होतील असे वाटते. आणि पाळण्याच्या दोरी प्रमाणे परिवाराच्या सुखाची दोरी तिच्याच हाती असल्याच साक्षात्कार होईल. स्त्रीने आपली बलस्थाने, मर्मस्थाने लक्षात घेऊन ती विचाराने, संयम, सद्विवेकबुद्धीने अन निरपेक्षतेने वागली तर"परिवार का सुख, नारी के हाथ में" अन परिवार कि ख़ुशी, नारी तेरे साथ मे हि घोषणा सार्थ होईल.

सौ. मनीषा बापट

आयुष्य नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दस ु रं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायच नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं.....

५८


महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, बाहरीन तर्फे हार्दिक शुभेच्छा


MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement