Marathi Mandal Korea Diwali ank 2012

Page 30

असाच एक प्रसंग माझ्या जवळच्या मैत्रीण व सीनिअर, “सेरोनाचा” घडला. आम्ही आमच्या प्रोफेसरच्या चांगल्यावाईट गुणांबद्दल बोलत होतो. सेरोना प्रोफेसरसोबत, ती अंडर-ग्रॅज्युएट स्टु डं ट कोर्स पासन ू काम करत होती. आता ती पीएचडीच्या शेवटच्या वर्षाला आहे . तिला वडील नाहीत आणि आई असन ू नसल्यासारखीच, त्यामुळे घरून काहीही पाठिं बा नव्हता. अतिशय कष्टाने तिने शिष्यवत् ृ ती मिळवली आणि अंडर-ग्रॅज्युएट कोर्स ला ऍडमिशन घेतली होती. बोलताबोलता तिने उल्लेख केला की “मी जवळजवळ ८ वर्षापासन ू प्रोफेसरसोबत आहे . आज मी विचार करते की जर प्रोफेसर माझ्या जीवनात आले नसते तर माझं जीवन किती कष्टदायक असतं. प्रोफेसर मला वडिलांसारखे आहे त, त्यांनीच माझ्या जीवनाला दिशा दिली.ती मला म्हणाली”, “ I put value in relationship”. खरं च हे माझ्यासाठी खपू महत्त्वाचं आणि थोडं सं चमत्कारिक वाक्यं होतं तिचं . मनात विचार आला की जसं व्यवसायामध्ये उत्पादन उत्कृष्ट होण्यासाठी आणि त्याचा ब्रँड बनवण्यासाठी उत्पादनाच्या निर्माण-कार्यापासन (Manufacturing) ू ते , मार्केटिंग, जाहिरात अश्या प्रत्येक पायरीला “value” ओतणे आवश्यक असते. आणि या “value” मुळेच ते उत्पादन उत्कृष्ट होते, आणि त्याचा ब्रँड बनतो. हे च आपण नातेसंबंधाबाबत लागू करू शकतो. बरे चदा लहान-सहान गोष्टींवरून गैरसमज, रागलोभामुळे नाती दुरावतात किंवा तुटतातही. जर आपण सेरोनासारखं नात्यांमध्ये “value” टाकली तर नातीसुद्धा एखाद्या ब्रँडसारखी

उत्कृ ष्ट होतील, यात काही शंकाच नाही,

पू र्व गं ध २ ० १ २ 27

आणखी एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे जेव्हा मी माझ्या दोन मुलांसोबत भारतात माझ्या आईवडीलांसोबत जवळजवळ ९ महिने होते तेव्हाचा. प्राण व समर्थ हि माझी जुळी मुलं. पण त्यांचा जन्म झाल्यावर सर्वां चाच गोंधळ उडाला, कारण जुळ्या मुलांच्या संगोपनाचा कोणालाही अनुभव नव्हता. घरात ४ माणसं असन ू ही मुलांना सांभाळायला आणखी माणसं हवीत असे वाटायचे. त्यावेळी, प्राण आणि समर्थ ४ महिन्यांचे होते. माझा आणि आई-बाबांचा वेळ या दोन मुलांना सांभाळण्यात कसा जायचा ते कळायचंच नाही. आमच्या ै ी एकाला आम्ही थोडासा तिघांपक मोकळा वेळ देत असू , मात्र इतरवेळी सक्तीने दोघांजवळ दोन बाळ असायचीच. प्राण आणि समर्थ ला सुद्धा आई-बाबांचा खपू लळा लागला होता. प्राण तर रांगत रांगत जाऊन माझ्या बाबांच्या पायाला धरून उभा राहायचा, तर समर्थ रांगत रांगत घरभर मला आणि आई-बाबांना शोधत फिरायचा. असे ९ महिने खपू मजेत गेले. आई-बाबा मुलांमध्ये भावनिकरीत्या गुंतले होते. विजय आम्हाला घ्यायला येणार होता. आम्ही तो येणार त्या दिवशी सकाळपासन ू च त्याची वाट पाहत होतो. प्राण समर्थ ला बघितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होते, त्याची आम्हाला खपू उत्सुकता होती. विजय संध्याकाळी घरी पोहचला. मला खपू आनंद झाला. मी आणि विजय मुलांमध्ये गर्क झालो. त्यावेळी माझे बाबांकडे मात्र लक्ष नव्हते. पण नंतर मात्र मला जाणवले की बाबा खपू शांत झाले होते.


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.