MarathiMandalKoreaDiwaliAnk2012

Page 1


शशिकांत जाधव

1 4 5 6

५. फे सबुकचा जनक कोण? ६. दक्षिण कोरिया आणि संशोधनाच्या संधी ७. संक्रमण ८. मराठी मंडळ कोरिया आणि मी ९. मला सतावणारी ती १०. कोरियातील गमतीजमती ११. लाभले आम्हांस भाग्य १२. माझं कोरिया १३. आशीर्वाद १४. रे शीमगाठी

रोहिदास आरोटे हरिशचंद्र जिरीमाळी

8 10

अमित भट चिराग व्यास गजानन आनंदाचे प्रशांत पुरकर प्रियरं जन पायगुडे सौ. शितल देशमुख विजय देशमुख प्रा. सौ. शीला जाधव

13 16 19 20 23 26 29 37

१५. साहेब १६. तझु ्याविना १७. सोनुल्या तझु ्याचसाठी १८. संगत १९. मी कुठे भारतीय आहे? २०. फक्त तझु ्यासाठी २१. काल रात्री

अमित भट गजानन आनंदाचे सौ. राजश्री गायकवाड सौ. शितल जाधव शिवाजी थोरात सौ. सोनिया देसाई विजय देशमुख

40 41 42 43 44 45 46

२२.मेथीचे पोळे २३. केळं - टोमॅटो टोस्ट सँडवीच २४. भोपळ्याचे घारगे २५. पालक, मकाई व क्रीमसहीत २६. थालीपीठ कलादालन २७. स्के च 28. स्त मृ ीचित्रे २०११-१२

सौ. तनुजा भट सौ. तनुजा भट सौ. शितल जाधव सौ. शितल जाधव सौ. पुष्पलता जिरीमाळी

47 49 51 53 55

शशिकांत जाधव

57 58

१. संपादकीय २. दिवाळी अंक समिती ३. श्रद्धांजली ४. ढाण्या वाघ

गद्य विभाग

काव्यानंद

पाककला

पू र्व गं ध २ ० १ २


दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, रोषणाई, उटणे, मंगल वातावरण, यासोबतच आठवतो तो दिवाळी अंक. दिवाळीच्या एक-दोन आठवडे आधी पासन ू अगदी डिसेंबर महिना संपेपर्यं त दिवाळी अंक प्रकाशित होतच असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात दिवाळी अंक क्वचितच इतर कोणत्या भाषेत प्रकाशीत होत असतील. दिवाळी अंकाची संकल्पना मराठी माणसाच्या मनांत इतकी रुजली आहे , की दिवाळी अंक कधीही वाचला तरी मन दिवाळीच्या वातावरणात फिरून येतं. मराठी माणस ू म्हटला की कोणालाही आठवतो तो गणेश-उत्सव आणि दर्जेदार साहित्य. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, तुकाराम महाराज अश्या संतपरं परे च्या माध्यमातन आणि त्यांच्या संतू वाड्मयातन ू मराठी मनावर भक्तीची अन मराठी भाषेची गोडी लावली गेली, ती पुढे अनेक साहित्यिकांनी अधिकच वाढवत नेली. पु. ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व. पु. काळे , गो.नि.दांडेकर, रणजीत देसाई, ब.मो. पुरंदरे अशी कितीतरी नावे आहे त, ज्यांनी मराठी साहित्याला घराघरात पोहचवले. आज मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे , अशी हाकाटी सुरू असताना, मराठी भाषेत उत्तमोत्तम साहित्य, त्यावर आधारीत चित्रपट निर्मा ण होत आहे त, इतकेच नव्हे तर केवळ हिंदी भाषेतच काम करणाऱ्या दिग्गजांनाही मराठी भाषा शिकावी आणि मराठी चित्रपटात काम करावेसे वाटते. ह्याच श्रेय मराठी साहित्य अधिकाधिक समद्ध ृ करणाऱ्या साहित्यिकांना जातं.

पू र्व गं ध २ ० १ २

परं तु उत्तम साहित्य लिहिणारी मंडळी बरीच असली तरी ते रसिकांपर्यं त पोहचवणे, हे व्यावहारिकदृष्ट्या अवघड काम झाले होते. आजच्या संगणकयुगात सुरुवातीला मराठी भाषेला फारसे महत्त्व दिले गेले नाही, किंबहु ना मराठीतन ू लिहिणे “युनिकोडिकरण” आणि विविध कळफलक (Keyboard Layout) यांमुळे अधिक क्लिष्ट झाले होते. परं तु मुळातच कष्टाळू आणि सतत साहित्याशी जोडल्या गेलेल्या मराठी माणसांनी हि अडचणसुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी केली आहे . विविध संकेतस्थळे व ब्लॉग्जच्या माध्यमातन नवनवीन साहित्य ू आज उपलब्ध होत आहे . तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करत गाजलेली पुस्तके इ-पुस्तकाच्या (E-books) माध्यमातन ू उपलब्ध करून दिली जात आहे त. आनंदाची बाब म्हणजे महिन्याकाठी हजाराहू न अधिक पुस्तके ऑनलाईन खरे दी, मुक्त स्रोत किंवा इ-पुस्तकांच्या माध्यमातन ू रसिकांपर्यं त पोहचत आहे त. तशी कोरियातील मराठी भाषिकांची संख्या इतर परदेशस्थ मराठी भाषिकांच्या तुलनेत कमी आहे आणि आहे त तेही बऱ्याचशा प्रमाणात भौगोलिकरीत्या विखुरलेले. त्यामुळे पर्ू वी जे काही आदानप्रदान व्हायचे ते एकमेकांच्या ओळखीने किंवा एखाद्या कार्य क्रमाच्या निमित्तानेच. अश्याच एका कार्य क्रमात ‘मराठी मंडळ कोरिया’ची मुहूर्त मेढ रोवली गेली. याहू ग्रुप ‘मराठी मंडळ कोरिया’ वर मराठी लोकं जमा होऊ लागले. बघता

1


बघता सुरुवातीला याहू -ग्रुप आणि नंतर फेसबुकच्या माध्यमातन ू मराठी माणसे जोडली जाऊ लागली. आजमितीस ३०० हू न अधिक मराठी मनं फेसबुकच्या माध्यमातन ू जोडली आहे त. मग काय, गणेशोत्सव, गुढीपाडवा, मकरसंक्रांत, असे सण एकत्रपणे साजरे होवू लागले. दोन मराठी माणसं भेटली की आधी पाय ओढतात, अशी एक वदंता आहे , पण इथे मराठी माणस ू दिसला की त्याला एखाद्या सणासाठी वा ‘गटग’साठी (GetTogether) हात ओढून नेऊ लागली. ओढणे महत्त्वाचे, मग पायाऐवजी हात का असेना. विनोदाचा भाग वगळला तर मराठी माणसं एकत्र येतात आणिएकापेक्षा एक सरस कार्य क्रम घेतात, हे आश्वासक चित्र मागील २ वर्षांपासन ू केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकांनाही दिसू लागलं आहे अन ते सुखावह आहे . संगीत, गायन, कला, नाट्य, नतृ ्य, विनोद, हा मराठी माणसाचा आवडता उद्योग. त्याची भरपाई सगळे विविध गटगच्या माध्यमातन ू भरून काढतच होते. पण साहित्यात आपलं योगदान नाही ही खंत मनाला सतावत होती. मराठी माणस ू अन साहित्याशी फारकत, शक्यच नाही! मराठी साहित्यात योगदान देण्यासाठी, कोरियातील मराठी मंडळीतरी कशी मागे राहतील? त्याअनुषंगाने २०११ च्या प्रथम गणेशोत्सवात दिवाळी अंक प्रकाशीत करायचे ठरले आणि मराठी मंडळ कोरियाचा ‘साहित्यशोभा’ हा पहिलावहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला.

पू र्व गं ध २ ० १ २ 2


अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे . भारतीय घटनेने प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे . परं तु काही नतद्रष्ट मंडळी अगदी फेसबुकसारख्या ‘सोशल साईट्स’वरही बंदी आणण्याची आणि मुक्त इंटरनेटला वेसण घालण्याची तयारी करत आहे त. मात्र, यावर्षीच्या संपादक मंडळाने भलेही लेखातील विचारांशी संपादक मंडळ सहमत असेल वा नसेलही, तरी ते विचार मांडण्याचा लेखकाचा अधिकार अबाधित राखण्याचा पायंडा पाडला आहे , हि आणखी एक अभिमानाची बाब म्हणावी लागेल. या पुढच्या दिवाळी अंकासाठी अधिकाधिक लेख यावेत आणि उत्तरोत्तर विचारांची देवाणघेवाण सतत सुरू राहावी, हीच सदिच्छा. आम्ही आपल्या बहु मलू ्य प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत आणि आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे .. संपादक मंडळ, साहित्य-शोभा दिवाळी अंक २०१२, परू ्व गंध विशेषांक दिनांक ३० डिसेंबर २०१२. वद्य द्वितिया, मार्गशीर्ष, शके १९३४

पू र्व गं ध २ ० १ २ 3


संपादक मंडळ अमित भट सौ. शितल जाधव शशिकांत जाधव विजय देशमुख मख ु पष्ठ ृ गिरीष अरबळे प्रसिद्धी सौ. पुष्पलता जिरीमाळी चिराग व्यास छायाचित्रे संकलन हरिशचंद्र जिरीमाळी प्रमोद शिंदे मद्रु ण सहाय्य संतोष साकेत प्रकाशन सोहळा व्यवस्था प्रशांत पुरकर

4

पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २

5


पू र्व गं ध २ ० १ २


हिंदुहृदयसम्राट माननीय स्व.बाळासाहे ब ठाकरे , एक असा अनभिषिक्त सम्राट, ज्यांनी प्रत्येक मराठी माणसाला मराठी अस्मितेचा बाणा दिला व अधिकाराची जाणीव करून दिली. अश्या महान व्यक्तिमत्वाने गेली पन्नास वर्षे मराठी माणसांना एकत्रित ठे वले. प्रत्येक मराठी माणसाला आपण मराठी असण्याचा अभिमान वाटेल असे बीज त्यांनी प्रत्येक सामान्य माणसात रुजवले. “माणसाने माणस ू जोडावा” हा एकच मंत्र बाळासाहे बांनी नेहमी जोपासला. त्यांच्या व्यक्तीमत्वातच एक करिष्मा होता. मातोश्री येथे उभे राहू न आपल्या दिमाखदार शैलीत फिरवलेला त्यांचा हाथ हा लोकांना आशीर्वा दासारखा होता . हिंदुहृदयसम्राट झाल्यावर देखील सर्वसामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ टिकून होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल भाव व्यक्त होताना एकच आठवते, “झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू परं त,ु या सम हाच “ काळाची पावले त्यांनी ओळखली होती पण त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. जनमानसाची नस त्यांना योग्य रित्या सापडली होती. त्यांच्या वादग्रस्त टीकेत पण एक शिस्त होती, मिश्कीलता होती .

बाळासाहे ब ठाकरे यांच्या मुखातन ू बाहे र पडलेला शब्द म्हणजे धनुष्यातन ू सुटलेल्या न परतणाऱ्या बाणाप्रमाणे होता.

पू र्व गं ध २ ० १ २ 6

त्यांची व्यक्ती-टीका सहजतेने रे खाटलेल्या व्यंगचित्रासारखी होती व ती कोणाबद्दलही करताना तितक्याच प्रखरतेने असायची! पण व्यक्तिगत संबंध तितक्याच काळजीने जोपासायचे. आपल्या ठाकरी शैलीने पाच दशकांहून अधिक काळ शिवाजी पार्कचे मैदान गाजविणाऱ्या व दसरा मेळाव्याला आपल्या कठोर वाणीने लाखोंना मंत्रमुग्ध करणाऱ्या या थोर,धडाकेबाज व्यक्तिमत्वास प्रणाम. आज बाळासाहे ब आपल्यातन ू निघन ू गेले असले तरी असे क्षणभर देखील कोणाला वाटत नाही. त्यांनी दिलेला मराठी अस्मितेचा वारसा प्रत्येकजण आपल्यात बाळगन ू आहे त .

“ श्वासाची माळ तटु ली,

ध्यासाची कधीच नाही” हे प्रत्येकजण जाणन ू आहे त ! येणाऱ्या पिढ्यांना आम्ही अभिमानाने सांगू आम्ही बाळासाहे ब ठाकरे नावाच्या झंझावाताला पाहिले आहे ! १७ नोव्हें बर, २०१२ रोजी ३.३० वाजता बाळासाहे बांनी मुंबईमध्ये ‘मातोश्री’ येथे अखेरचा श्वास घेतला व साक्षात महाराष्ट्राचा वाघ गेला.


महाराष्ट्र पोरका झाला. बाळासाहे ब ठाकरे नावाचे वादळ शिवतीर्था च्या कुशीत विसावले . तब्बल २० लाख लोकांचा जनसमुदाय ह्या पराक्रमी व्यक्तिमत्वाचे दर्शन घ्यायला शिवतीर्था वर येतो हा एक चमत्कार आहे . युगपुरूषाने मतृ ्वयू र विजय मिळवला हे च तो दर्शवतो. एक महाशक्ती अनंतात विलीन झाली. एकीकडे साहे बांनी उभारलेल्या मराठी अस्मितेचा विशाल गढ त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत होता तर दुसरीकडे , इतिहासातील पराक्रमाची आठवण देत ‘गढ आला पण सिंह गेला’ हा भाव लोकांचे अश्रू थांबवत नव्हता ! शिवतीर्था वर जमा झालेला अफाट जनसागर ह्याच गोष्टीची साक्ष देत होता की , “साहेब गेले नाहीत, जाणारही नाहीत ते आमच्या हृदयात शेवटपर्यंत जिवंत असणार आहेत.” मराठी मनाला एकत्र आणणारा, मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा राजा गेला. त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थ ना! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. श्री. बाळासाहे ब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पू र्व गं ध २ ० १ २ 7


बऱ्याचशा लोकांना हे कदाचित ठाऊक नसेल की सोशल वेबसाइट फेसबुक (Facebook) म्हणजे एफबीचा जनक एक भारतीय आहे . वाचन ू आश्चर्य वाटलं ना ? फेसबुकचे जनक ‘मार्क जुकरबर्ग ’ नसन ू अमेरिकेतील अनिवासी भारतीय ‘दिव्य नरें द्र’ आहे त. दिव्य यांची कल्पना चोरून मार्क ने फेसबुक बनवले आहे . भारतीय आणि जगातील अनेक युवक ‘फेसबुकशिवाय जीवन शनू ्य’ असा ग्रह करून बसल्यामुळे फेसबुक जगातील सर्वाधिक लोकप्रिय सामाजिक संकेतस्थळ बनले आहे . मार्क जुकेरबर्ग यांनी असा काही नावलौकिक मिळवला आहे की जो तो त्यांचेच गुणगान गाताना दिसत आहे . फेसबुक, मार्क ने त्याच्या कॉलेज जीवनात शोधले असे सांगितले जाते. त्यावर आधारीत चित्रपटसुद्धा तयार झाला. परं तु यामागील गुपित कळल्यावर आपणा सर्वां ना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आणि आनंदसुद्धा होईल की फेसबुकचे खरे जनक मार्क नसन ू अनिवासी भारतीय दिव्य नरें द्र आहे त. या व्यक्तिमत्त्वावर एक दृष्टिक्षेप. दिव्यनरें द्र यांचा जन्म १८ मार्च १९८२ साली न्यूयॉर्क मध्ये झाला. त्यांचे आईवडील बऱ्याच वर्षांपासन ू अमेरिकेत स्थायिक होते. वडील डॉक्टर असल्यामुळे मुलानेही डॉक्टर व्हावे ही त्यांची इच्छा होती. परं तु दिव्य यांचे स्वप्न काही वेगळे च होते. त्यांना एक यशस्वी उद्योगपती होऊन जगात नावलौकिक कमवायचा होता

पू र्व गं ध २ ० १ २

8

फे सबुकचा जन्म हार्व र्ड विद्यापीठात झाला होता. त्यावेळी हार्व र्डमध्ये ‘हार्व र्ड कनेक्शन’ नावाच्या संकेतस्थळाच्या उपक्रमावर दिव्य आणि त्यांचे सहकारी मित्र काम करत होते. त्यात ते यशस्वीपण झाले. बऱ्याच कालावधीनंतर मार्क यांनी या प्रोजेक्टवर सहयोगी म्हणन ू काम करायला सुरुवात केली. काम करता करता मार्क ने फेसबुक प्रोजेक्टचा बारकाईने अभ्यास केला आणि चाणाक्षपणे तो प्रोजेक्ट ‘फेसबुक’ या नावाने रजिस्टरसुद्धा केला.जेव्हा मार्क ने फेसबुकच्या नावाचा दुरुपयोग सुरू केला, तेव्हा दिव्य आणि त्यांच्या मित्रांनी याचा तीव्र विरोध केला. यावरून त्यांच्यात बाचाबाचीपण झाली होती. जेव्हा परिस्थिती हाताबाहे र जायला लागली तेव्हा हार्व र्डच्या संचालकांनी कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. जेव्हा फेसबुक माझे आहे अशी प्रसिद्धी मार्क ने सुरू केली, तेव्हा दिव्य आणि त्यांच्या मित्रांनी कोर्टात केस दाखल केली. फेसबुक माझी संकल्पना आहे , आणि त्यात मार्क कुठे ही नव्हता, असे दिव्य यांनी कोर्टात ठणकावन ू सांगितले. कोर्टाने संपर्ण ू आरोप-प्रत्यारोप ऐकून घेतले आणि निर्णय दिला की फेसबुकची संकल्पना दिव्य यांची आहे आणि ती चोरल्याबद्दल त्यांना नुकसानभरपाई म्हणन ू ६५० लक्ष अमेरिकन डॉलर द्यावे. परं तु दिव्य आणि त्यांच्या मित्रांचे म्हणणे होते की फेसबुकच्या सध्याच्या बाजारभावावरून हि नुकसानभरपाई ठरवावी. गोल्डमन स्नॅच यांनी फेसबुकची सध्याची किंमत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर वर्तवली आहे .


मार्क सोबतच्या कोर्टकचेऱ्यांनी दिव्य नाराज झाले, पण लौकरच त्यांनी स्वतःला सावरून ‘समझिरो’ या नवीन प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली. आज त्यांचा हाही प्रकल्प चांगलाच गाजला आहे . आपण स्वतःला काय समजता, फेसबुकचे जनक की समझीरोचे संस्थापक? असं विचारल्यावर दिव्य यांचं सरळ उत्तर येतं, “मी स्वतःला असा एक यशस्वी उद्योजक म्हणन ू बघणे पसंत करतो, ज्याने स्वत:सोबत समाजासाठी काहीतरी चांगले केले आहे ”. फेसबुकच्या प्रकरणातन ू मिळालेल्या धड्याबद्दल ते म्हणतात की त्यांनी शाळे तच वेब-प्रोग्रामिंग शिकायला हवं होतं. अर्थात असही नाही की लोकांना दिव्य यांच्याबद्दल माहितच नाही. नुकत्याच बनलेल्या ‘द सोशल नेटवर्क’ मध्ये त्यांचीही भमिक ा दाखवली गेली ू आहे . शेवटी त्यांच्याशिवाय फेसबुकची गोष्ट अधुरी आहे . ह्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी प्रथमतः घाबरलो होतो की मला खलनायक दाखवतात की काय, पण चित्रपट पाहू न माझा संभ्रम दूर झाला”. दिव्य, जीवनाच्या रहस्याबद्दल म्हणतात, “आपल्याला आपल्या चुकांतन ू शिकता आले पाहिजे आणि त्यांतन ू योग्य तो बोध घेऊन लगेच पुढचा प्रवास सुरू केला पाहिजे किंवा नवीन उपक्रमाचा श्रीगणेशा केला पाहिजे”.

पू र्व गं ध २ ० १ २ 9


दक्षिण कोरिया! काहीसा कानावर न पडणारा शब्द, हा देश आपल्या आशिया खंडातील अती- पर्ू वेकडील एक महत्वाचा देश म्हणन ू ओळखला जातो. साधारणत: हिंदुस्थानापासन ू सुमारे ६००० किलो मीटर अंतरावर कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिणेला हा देश वसलेला आहे . १५ ऑगस्ट १९४५ ला जपान पासन ू हा देश स्वतंत्र झाला. कोरियाची लोकसंख्या साधारणपणे ५ कोटीच्या घरात आहे त्यातील १ कोटीच्या आसपास जनता हि त्याच्या राजधानीच्या शहरात म्हणजेच सेउलमध्ये निवास करत आहे . कोरियाची राष्ट्रभाषा कोरियन आहे तिला कोरियामध्ये हंगल ू असे संबोधले जाते. कोरियातील हवामान समशीतोष्ण आहे . कोरियात ४ ऋतू आढळतात. त्यात प्रामुख्याने वसंत, उन्हाळा, पानझड आणि हिवाळा आहे त . हिवाळ्यातील तापमान -१० अंश सेल्सिअसपर्यं त असते तर उन्हाळ्यात +३५ अंश सेल्सिअसपर्यं त असते. कोरियाचे चलन हे वोन आहे . सध्या ११०० कोरियन वोन म्हणजे १ अमेरिकन डॉलर आहे . मागील २५ वर्षा त ह्या देशाने खपू च जलद गतीने प्रगती केलेली आहे . कोरियाच्या प्रगतीत जितका मोलाचा वाटा येथील व्यापारी आणि भांडवलदार मंडळींचा आहे तेवढाच येथील संशोधन करणाऱ्या संस्था आणि संशोधक यांचासुद्धा आहे .

कोरियातील शिक्षणपद्धती :

पू र्व गं ध २ ० १ २

कोरियात बालवाडी (किंडरगार्ड न) नंतर प्राथमिक शाळा सहा वर्ष , नंतर माध्यमिक शाळा ३ वर्ष , त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा ३ वर्ष , (६+३+३ अनुबंध) याप्रकारे आहे . उच्च माध्यमिक शिक्षणानंतर विद्यापीठातील सर्व शाखांसाठी ४ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असतो. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण हे विनामलू ्य आणि सर्वां ना बंधनकारक आहे . शाळा हि दोन सत्रांमध्ये असते स्प्रिंग आणि फॉल. उच्च शिक्षणासाठी कोरियात केंद्रिय प्रवेश परीक्षा घेतली जाते. कोरियातील नावाजलेल्या संशोधन संस्था आणि विद्यापीठे : कोरियात भारताप्रमाणेच काही सरकारी संस्था आहे त त्यामध्ये प्रामुख्याने (किस्त) KIST (Seoul ) KAIST (Daejon) आणि काही विद्यापीठे ह्या गणल्या जातात. “कैस्त” हि सध्या कोरियातील सर्व विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांकाची संशोधन संस्था आहे कोरियामध्ये बरे च सरकारी आणि खाजगी विद्यापीठे आहे त त्यातल्या काही संस्था जागतिक दर्ज्याच्या आहे त आणि या विद्यापीठांमध्ये विदेशी विद्यार्थ्यां ना काही प्रमाणात शिष्यवतृ ्या दिल्या जातात. काही विद्यापीठांमध्ये नावाजलेली विद्यापीठे म्हणजे SKY (स्काय), Seoul National University (SNU) (सेउल राष्ट्रीय विद्यापीठ), Korea

University (कोरिया

10


विद्यापीठ) Yonsei University (योन्से विद्यापीठ) तसेच नवीन गुणतालिकेनुसार Haanyang University (हनयांग विद्यापीठ), Sukmyung University (सुक्म्युंग विद्यापीठ) Sogang University (सोगांग विद्यापीठ) Pohang University of Science and Technology,POSTEC (पोहांग शास्त्रीय आणि तंत्रकीय विद्यापीठ, पोस्तेक) अशी बरे च नावाजलेली विद्यापीठे आहे त. भारतातन संशोधनासाठी ू येणाऱ्यांसाठी: सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधक आणि विद्यार्थ्यां चा कल कोरियाकडे वाढलेला आहे . त्यातील काही विद्यार्थी कोरियातच पोस्ट ग्रॅज्युएशन (पदव्युत्तर), पीएचडी (डॉक्टरेट) तसेच पोस्ट डॉक्टरेट करायला येतात. साधारणपणे सायन्स आणि इंजिनीअरिं गच्या विद्यार्थ्यां ना इथे चांगला वाव आहे . जर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या आवडीच्या विषयाचा किंवा आपल्या प्रमुख विषयाशी निगडित असलेले प्राध्यापक कोरियन विद्यापीठांच्या “वेब-साईट”(Website) ला भेट देउन शोधावे लागतात किंवा आपल्या विषयाशी निगडित रिसर्च आर्टिकल बघावे लागतात.त्यात त्यांचा पर्ण ू पत्ता, इमेल दिलेला असतो, त्यावर संपर्क करावा. काही वेळेस

पू र्व गं ध २ ० १ २ 11

विद्यापीठांची “वेब-साईट” (Website) कोरियन भाषेतच असते तेव्हा हे थोडे कठीण होते, पण बहु तेक नावाजलेली विद्यापीठे आणि इंग्रजी बोलणारे प्राध्यापक त्यांच्या स्वतःच्या “वेब-साईट” (Website) इंग्रजी आणि कोरियन भाषेत तयार करतात. आपण शोधलेल्या प्राध्यापकाला प्रथम आपली माहिती व सविस्तर इमेल करावा ऍडमिशन, ट्युशन फी आणि राहायचा खर्च यासाठी शिष्यवत् ृ ती अशी विनंती करावी. काही विद्यापीठांमध्ये त्यांच्या शिष्यवत् ृ ती असतात त्यासाठीसुद्धा आपल्याला आधी आपला ‘होस्ट-गाईड’ शोधावा लागतो. मग ते आपल्याला तिथे अर्ज करा असं सुचवतात. त्यानंतर प्रवेश मिळण्याकरीता महत्वाची कागदपत्रे पाठवावी लागतात, त्यामध्ये आपला पासपोर्ट, भारतातील निवास प्रमाण पत्र, आपल्या पालकांचे निवासपत्र, किंवा पासपोर्ट , बँक-स्टेटमेंट किंवा इकॉनॉमिक सपोर्ट लेटर किंवा स्कॉलरशिप लेटर, युनिव्हर्सिटी ट्रान्सस्क्रिप्ट, मार्क शीट, २ रे फरन्स लेटर, आणि एखादा प्रोजेक्ट केलेला असेल तर त्याची कागदपत्रे (Documents). फॉल सेमिस्टर चे प्रवेशअर्ज मे महिन्यात सुरु होतात तर स्प्रिंग साठीचे प्रवेशअर्ज हे नोव्हें बर महिन्यात सुरू होतात. प्रत्येक विद्यापीठाच्या नियमानुसार तारखा आणि लागणारी कागदपत्र बदलू शकतात. कोरियामध्ये बरे च महिला विद्यापीठे आहे त, त्यामध्ये फक्त महिला विद्यार्थी असतात, अश्या ठिकाणी महिलांना लवकर प्रवेश मिळू शकतो. उदाहरणादाखल , Ewha Womans University (इव्हा महिला विद्यापीठ).


खाली काही महत्वाच्या विद्यापीठांची नावे देत आहे , ज्या ठिकाणी आपल्याला संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधनाच्या संधी आहे त. http://www.postech.ac.kr/ http://www.yonsei.ac.kr/ http://www.ewha.ac.kr/ http://www.hanyang.ac.kr/ http://www.knu.ac.kr/ http://www.ajou.ac.kr/ http://www.chonbuk.ac.kr/ http://www.sogang.ac.kr/ http://www.skku.ac.kr/ http://www.sejong.ac.kr/ http://www.hallym.ac.kr/ http://www.yu.ac.kr/ http://www.ssu.ac.kr/ http://home.chonnam.ac.kr/ http://www.konkuk.ac.kr/ http://www.hufs.ac.kr/ http://www.dongguk.ac.kr/ http://www.kangwon.ac.kr/ http://www.cau.ac.kr/ http://inha.ac.kr/ http://www.cnu.ac.kr/ http://www.kaist.ac.kr/

पू र्व गं ध २ ० १ २ 12


लिखाणाचे प्रयोजन संपादकीय असो अथवा ऐतिहासिक असो, अथवा व्यक्तीचित्र वा अनुभव आधारीत असो, त्यामागील प्रेरणा हि एकच (समान)असते, ती म्हणजे ते लिखाण व विचार लोकांपर्यं त पोहचावे व त्यावर विचार व विवेचन व्हावे. अशाच एका प्रेरणेने भारीत होऊन हे लिखाण हाती घेतले. आपल्या मातीशी म्हणजे ज्या मातीत आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो त्याच्याशी आपले नाते निगडीत असते. तो सुगंध, म्हणजे त्या मातीचा दरवळ आपल्या नसानसात भिनलेला असतो. या आपल्या मनातील संस्कारांवर जेव्हा परदेशातील संस्कृतीचा, वातावरणाचा आघात होतो तेव्हा एक मोठा बदल घडतो तो आपल्या विचारसरणीत आणि राहणीमानात. आयुष्याची अधिक वर्षे भारतात म्हणजे आपल्या मातृभम ू ीत काढल्यानंतर नोकरीनिमित्त मध्यपर्वेल ू ा म्हणजे दुबईला स्थाईक होण्याचा योग आला. तेथील संस्कृती, आचारविचार व राहणीमान प्रथम प्रथम निराळे भासले. पण हळूहळू त्यात एकदम एकजीव झालो .पण त्याची कारणमीमांसा केली असता असे आढळले की आखाती देशात व मुख्यत्वे दुबई मधे भारतीय लोकांची संख्या भरपरू आहे . तसेच भारतीय लोकांचे समहू , उपहार गहृ े , व्यवसाय, आचारविचार यांची भरपरू रे लचेल आहे . तसेच भारतापासन ू हे देश जास्त दूर नसल्यामुळे लोकांचे आवागमनपण भरपरू असते. आपण आपल्या देशाच्या खपू लांब आहोत अशी एकटेपणाची भावना पण मनाला शिवत नाही.

पू र्व गं ध २ ० १ २ 13

दु बईमधील सहा-सात वर्षा चा कालावधी कसा गेला ते समजले पण नाही. नोकरी व्यवसायातील आकांक्षांना सीमा नसतात. म्हणतात ना sky is the limit, अशीच मनीषा बाळगन ू नवीन नोकरीचे अवसर (Job Opportunities) शोधत होतो आणि कर्मधर्म संयोगाने दक्षिण कोरियामध्ये नोकरीची संधी आली. ै ी सिंगापरू चे आतापर्यं त पर्ू वेकडील देशांपक उदाहरण डोळ्यासमोर होते. कारण तिकडे ही बरे च भारतीय स्थायिक आहे त. कोरियातील इन्चिओन हवाई-तळावर (Incheon Airport) पदार्पण केले व लीमोझीन करून हॉटेलमधील रिसेप्शनवर दाखील झालो. तिथन ू च “सांस्कृतिक धक्का” (Cultural Shock) ला सुरवात झाली. काहीही आकलन न होणारी भाषा, अन्नाची विभिन्नता, निराळे रीतिरिवाज, हे सर्व खपू च धक्कादायक होते माझ्यासाठी. कोरियन भाषेतन ू संपर्क साधता येत नसल्याने व इंग्रजी इकडे जास्त कोणास येत नसल्याने खपू च पंचाईत झाली. बाहे र फिरायला तरी कसे जाणार? ऑफिसमध्ये देखील तीच तऱ्हा. सगळ्या फाईल्स आणि डॉक़्युमेनटेशन कोरियन भाषेमध्ये असल्यामुळे काम तरी कसे चालू करावे हा प्रश्न पडला. इकडून राजीनामा देऊन निघन ू जावे असा विचार चमकून गेला. सर्व दुबईतील आणि भारतातील मित्रांनी दिलासायुक्त आधार देत हा आकस्मिक निर्णय घेऊ नये असे सांगितले. अर्थात सध्याच्या आर्थि क मंदीच्या वातावरणात असा निर्णय घेणे फार चुकीचे होते व अशक्यप्रायदेखील होते. या परिस्थितीला कसे सामोरे जावे असा विचार करू लागलो .


कु ठल्याही परिस्थितीत तोलायमान विचार (balancing thought) का करावा याचे उत्तर ह्यावेळी मला मिळाले. प्रथम मी फेसबुक (FaceBook) वर क्रियाशील (active) होण्याचे ठरवले. मराठी मंडळ, कोरिया(MMK) आणि ई ंडीयंस इन कोरिया (IIK) बद्दल माहिती मिळाली. मराठी मंडळ कोरियातील एक सभासद डॉ. हरिषचंद्र जिरीमाळी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी फार उत्तम व माहितीपर ू ्ण मार्ग दर्शन केले. त्यांनी मला घरी जेवावयास बोलावण्याचे निमित्त करून चार भारतीय (मराठी) लोकांच्या ओळखी घडवन ू आणल्या. तसेच मला Incheon Asian Festival मधे सहभागी करवन ू घेऊन माझा एकटेपणा देखील दूर केला. अनेक कुटुंबांशी आणि व्यक्तींशी ओळखी झाल्या, ज्या सध्या विविध हे तंन ू ी कोरियात स्थायिक झाल्या आहे त. वानगीदाखल काही नावे इकडे नमदू करावीशी वाटतात. डॉ. हरिशचंद्र जिरीमाळी, श्री प्रणव चौधरी, डॉ. विजय देशमुख, श्री शशिकांत जाधव, श्री प्रशांत पुरकर, श्री चिराग व्यास, डॉ. प्रमोद शिंदे, श्री गजानन आनंदाचे, हे आणि अश्या अनेक कितीतरी लोकांचा स्नेह मिळाला व मिळतो पण आहे . त्याच दरम्यान माझी पत्नी सौ. तनुजा भट हि पण कोरियात माझ्या बरोबर राहावयास आली आणि त्यामुळे माझे एकटेपण आणि जेवणाची समस्या पर ू ्ण तः संपली. आम्ही दोघेही आता कोरियात हळू हळू रुळू लागलो आहोत असे वाटते. माझ्या ह्या सर्व संक्षिप्त अनुभवांचे सिंहावलोकन केले असता, बऱ्याच

पू र्व गं ध २ ० १ २ 14


महाराष्ट्रातील शहरांमधन ू , खेड्यातन ू , गावातन ू व अनेक जिल्ह्यांमधन ू हि तरुणपिढी कोरियामध्ये उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी स्थायिक झाली आहे आणि हि प्रक्रिया अतटू पणे चालू आहे . हे सर्व मराठी आणि भारतीय एकमेकांशी फेसबुक (Facebook) या सामाजिक संगणकीय महाजालाद्वारे (Social Website) संपर्का त आहे त आणि कोरियातील विविध भारतीय कार्यक्रम आणि उत्सवांच्या आयोजनामध्ये सक्रिय आहे त. आपल्या नातेवाइकांपासन ू लांब आणि फार फार पर्ू वेकडे (Far-eastला) त्यांनी आपली संस्कृती, आचारविचार, देवाणघेवाण जपली आहे आणि ती देखील प्रतिकूल परिस्थितीत आणि आपले शिक्षण व व्यवसाय सांभाळीत. खरोखरच हि गोष्ट मला खपू कौतुकास्पद वाटते. तसेच मी भारतीय आणि मराठी असल्याचा अभिमान देखील वाटतो. इतिहासात शिवाजी महाराजांनी मराठे शाहीची आणि स्वराज्याची ज्योत पेटविली, ती पेशव्यांनी मशालीप्रमाणे पेटवन ू अटकेपार झेंडे रोवले (लाहोर पर्यं त). ती मराठे शाहीची मशाल आचार्य प्र.के.अत्रे, प्रभोधनकार ठाकरे आणि बाळासाहे ब ठाकरे यांनी आपल्या लेखणीच्या आणि वक्तृत्वाच्या माध्यमाने स्वतंत्र भारतातही ज्वलंत ठे वली. तोच आणि तोच वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रातील तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, उच्चशिक्षितांनी, आणि व्यावसाईकांनीदेखील या मराठे शाहीच्या मशालीची ज्योत कोरियामध्ये , पर्ू वेकडील सर्या ू च्या किरणांप्रमाणे उजळवली

आहे . आणि हा कोरियातील मराठीचा परू ्व गंध पश्चिमेपर्यं त म्हणजे सर्व जगात पसरवणे हे च आमचे स्वप्न आहे .

पू र्व गं ध २ ० १ २ 15


मला बऱ्याच दिवसांपर्ू वीचा एक प्रसंग आठवतोय. मी व माझा मित्र मसदू , सन २०११ च्या ऑगस्टमध्ये “सर्न ” (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लियर फिजिक्स), जिथे लार्ज हायड्रॉन कोलायडर कार्यान्वित आहे , तिथे काही प्रयोग करण्याकरिता ३ महिन्यांच्या कालावधीसाठी गेलो होतो. जिनेवा, स्विझर्लं डला पोहचल्यावर चेकआऊट करत असतांना, मी आपल्या आजबू ाजल ू ा भगवंतानं आपले मन रमावे म्हणन ू अनेक सुंदर अश्या गोष्टींची (मी कोणत्या सुंदर गोष्टींविषयी बोलतोय हे सुज्ञास सांगणे न लगे) निर्मिती केलेल्या मनोरम अश्या चालत्या बोलत्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघण्यात रमलेलो होतो, तेवढयात मागन ू कोणीतरी मराठीत बोलण्याचा आवाज कानावर पडला. समोर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांवरून नकळत नजर मागे फिरली व ते काय बोलताहे त याकडे कान लागले. आवाज ओळखीचा वाटू लागला अन् थोड्यावेळाने खात्री झाल्यावर मी त्या माणसाच्या पाठीवर थाप मारली. त्याने मागे वळून पाहिले पण त्याचे प्रश्नार्थक डोळे पाहू न मला ह्याची जाणीव झाली की बंडूने मला ओळखले नव्हते. मी त्यास त्याच्या लहानपणाच्या गोष्टी सांगू लागलो आणि त्याचा चेहरा प्रफुल्लित झाला आणि चिराग!!!!!! असे बंडू जोरात ओरडला व माझ्या मनात प्रेक्षणिय स्थळांबरोबर जे काही करावयाचा विचार होता, त्या क्रियेचे बंडोबाने सार्थक करून मला कडकडीत मिठी मारली आणि आमचा सुखसंवाद सुरू झाला. मला माझ्या बरोबर मसदू आहे याचेही भान नव्हते. पण थोड्यावेळाने

पू र्व गं ध २ ० १ २ 16

मसदू ने जमतील त्या खाणाखुणा करून निघायच्या सच ू ना केल्या आणि मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. हि कथा इथे सांगण्याचे कारण असे की आपली भाषा आणि आपले लोकं आपल्याला भेटली तर आपल्याला कसलेही भान राहत नाही आणि हा नियम प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला जगाच्या पाठीवर कुठे ही आणि कोणत्याही स्थानी सारखाच लागू होतो. कोरियात आल्यावरसुद्धा आपल्या मंडळींची काही वेगळी परिस्थिती होत नसते आणि मग सगळी मंडळी आपल्याला जमेल असं टोळकं शोधत फिरत असते. मात्र मराठी मंडळ कोरियाने ती उणीव आपल्यासाठी भरून काढली आणि लोकांना जाणीवच होऊ दिली नाही की आपण आपल्या कुटुंबपासन ू हजारो मैल दूर आहोत. मराठी मंडळ कोरियाचे रोप काही उत्साही मंडळींनी तीन वर्षां पर्ू वी लावले होते आणि आज त्याचा वटवक्ष ृ आपणास पाहावयास मिळतो आहे . हा वटवक्ष ृ आपणास पाहावयास मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे ह्यासाठी निःस्वार्थ वत् ृ तीने काम करून आपल्यातलेच काही मंडळी एकत्र करण्यासाठी झटणारे अविरत न थकता काम करणारे उत्साही हात. मी २०१० साली ऑगस्ट महिन्यात कोरियात दाखल झालो. मनाची स्थिती म्हणाल तर ती एखाद्या घरापासन ू भरकटलेल्या नवशिक्या पाखरासारखी झालेली. कोणत्याही गोष्टीत मन रमेना. मन रमवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी फेसबुकचा वापर करण्यास सुरुवात केली आणि काही महिन्यातच मित्रांची गणती हजारावर पोहचली, ज्यातली ५%


मंडळी कोरियातील रहिवासी होते आणि मग काय मराठी मंडळ कोरिया ह्या आपल्या मंडळाचा शोधसुद्धा फेसबुकद्वारेच लागला आणि लगेच मी ह्यात सहभागी झालो. मराठी मंडळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते, ते म्हणजे एक खोली आहे , त्यात २०२५ लोकं जमलेले आहे त आणि त्यांची चर्चा चालली आहे . एकाचेही दुसऱ्याशी एकमत होत नसते. प्रत्येकजण आपणच कसे बरोबर आहोत हे ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो पण सरतेशेवटी सगळ्यांच्या मनाप्रमाणे एक निर्णय होतो आणि सर्वजण ते काम करण्यास कुठल्याही हे व्यादाव्यांशिवाय तयार होतात व आपले सर्वस्व पणाला लावन ू आपल्याला दिलेली जबाबदारी कश्यारीतीने पार पाडता येईल याकडे ह्या मंडळींचे लक्ष लागते. आपल्या मराठी मंडळाची स्थिती यापेक्षा काही वेगळी नाहि. मात्र इथे एका खोलीत न बसता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपापल्याच घरात बसन ही मंडळी प्रत्येक ू कार्यक्रमाची संरचना करत असतात आणि तो कार्यक्रम पर्ण ू त्वास नेत असतात आणि ते हि निःस्वार्थ अश्या हे तन ू े. सगळी मंडळी एका छत्राखाली टिकवुन धरणे हे एखाद्या घरातील कर्त्या पुरुषासदेखील जमत नसते हो!, पण कोरियातील मराठी मंडळी मात्र ते जमवन ू आणतात याचे आपल्या सर्वां नाच कौतुक आहे . “मराठी मंडळ” म्हटले की सर्वां च्याच चेहऱ्यावर एक छानसे स्मित उमटते. आपल्या मंडळात दाखल होण्यासाठी एकच अट आहे

पू र्व गं ध २ ० १ २ 17


स्वप्नात पाहिलेले मराठी मंडळ कोरिया देऊ शकू. मी जे काही विचार मांडणार आहे ते मला वैयक्तिकरित्या काय वाटते तेच लिहीत आहे आणि म्हणन ू त्यावर बारकाईने विचार व्हावा असे मला वाटते. या लेखाद्वारे आपली मते मांडावयाची हि एक संधी म्हणा मी घेतोय. या विषयांवर पुढे चर्चा व्हावी अशी प्रांजळ अपेक्षा. कोणत्याही संस्थेस पुर्ण त्व येते, ते समर्थ कार्यकारिणी आणि सक्रीय कार्यकर्त्यां मुळे. आजमितीस ३०० हु न अधिक सभासद असलेल्या आपल्या सक्रिय कार्यकर्त्यां ना समर्थ आणि अधिकृत (Official) कार्यकारिणिची जोड देण्याची गरज आहे . त्यामुळे शक्य तितक्या लौकर कार्यकारीणी व्हावी, ही सदिच्छा. ममकोच्या (मराठी मंडळ कोरिया) कार्यकारिणिसोबत आणखी एक गोष्ट सातत्यानं गरजेची असते आणि ती म्हणजे अर्थ. पैशांशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि आपण सभासद स्वीकारताना त्याच्याकडून साधा एक कोरियन वोनसुद्धा घेत नाही, हे आपण सर्वां स माहिती आहे . “ममको” आर्थि करित्या जर सबळ करावयाचे असेल तर आपण यापुढे प्रत्येक सभासदाकडून वार्षिक वर्गणी गोळा केली तर त्याचा फायदा हा मंडळाच्या उज्ज्वल अश्या भवितव्यासाठीच होणार आहे . हे माझे मत आपण सर्वां स रुचेल असे मला वाटते. “ममकोने” वार्षिक चार कार्यक्रम साजरे करावेत, हे माझे पहिल्या पासन ू ठाम मत होते ते म्हणजे संक्रांत, पाडवा, गणपती आणि दिवाळी. हे कार्यक्रम जर आपण साजरे केले तर वर्षातन ू ४ वेळा आपल्याला नवीन लोक

जाणन ू घेण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळे ल ह्यात संशय नाही. सण साजरे केले म्हणजे एकत्रीकरण होते. या सणांच्या निमित्ताने एकत्रीकरण तर होईलच आणि लोकसंग्रहही वाढे ल.

पू र्व गं ध २ ० १ २ 18

आपल्या मंडळाची मासिक अशी बैठक व्हावी ही माझी सुप्त इच्छा आहे कारण त्यामुळे आपण एकसंध बांधलेले राहू , हे हि तितकेच खरे . प्रत्येकवेळी प्रत्येकास जमेलच असे नाही पण महिन्याच्या एका तारखेस (वा इतर एखाद्या दिवशी) आपण स्काइपच्या माध्यमातुन भेटलो तर एकमेकांचे हालहवाल आणि इतर गोष्टी जाणन ू घेता येतील. ममको ही केवळ एक संस्था अथवा मंडळ नसन ू ते आपले हक्काचे घर व्हावे असे जर का आपण सर्वां स वाटत असेल तर त्यासाठी एकजटू ीने प्रयत्न करून ते वाढीस कसे लागतील याकडे बारकाईने लक्ष देणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे असे मला वाटते.मराठी मंडळाचा हा बहरलेला वटवक्ष ृ उत्तरोत्तर असाच बहरत जावो आणि ह्या वटवक्षा ृ च्या पारं ब्यांस्वरुपी आपले कार्य कर्ते वाढीस लागोत, हीच भगवंताकडे प्रार्थना.


अगदी खरं सांगतोय, ती मला भरपरू सतावते. कधी अभ्यास करताना ,तर कधी कधी रात्रीच्या वेळी, अगदी माझ्या घरी येऊन ती मला आपलीशी करते. मागच्याच आठवड्यातील गोष्ट सांगतो. परीक्षा जवळ आली असल्यानं मी अभ्यास करत होतो. अगदी गढून गेलो होतो. माझी आई माझ्याबरोबरच बसन ू काहीतरी वाचत होती. माझ्याकडे आईचं अधन ू मधन ू लक्ष जात होत. आणि अचानक ती आली. मी तर त्यावेळी बर्फा सारखा गप्प बसन ू राहिलो. आता आईला कळलं तर माझं काय होणार? ह्या प्रश्नाने माझे डोकं भण-भणत होत. पण ती मात्र माझा नकळत ताबा घेत होती. कळत -नकळत मी हि तिच्याकडे ओढला गेलो आणि अभ्यासाची वाट लागली. झालं!, थोड्याच वेळात आई ंनी आम्हाला पकडलं. पुन्हा अभ्यास करताना तिला येऊ दिलंस तर माझ्याशी गाठ आहे असं बरं चस काहीतरी आई बोलन ू गेली. एकदा तर कमालच झाली. आमचे एक खडूस सर क्लास घेत होते. आमच्या ह्या सरांना ओरडायला अगदी एव्हडसं कारणही पुरत. त्यामुळे त्यांच्या क्लासला आम्ही गप्प बसलेलो असतो. पण त्या दिवशी तिने थोडा गोंधळच केला. अगदी क्लास संपत आला असताना भर वर्गात तिने प्रवेश केला. सरांची व माझ्या मित्रांची नजर चुकवत सरळ ती माझ्या शेजारी येऊन बसली. सरांचे शिकविण्यात लक्ष असेल असे वाटून मी तिच्याकडे वळलो तिची थोडीफार नजर माझ्या डोळ्यावर येते, इतक्यात सरांचा कठोर आवाज माझ्या कानावर पडला . मी ताडकन उभा राहिलो. प्रत्येकवेळी

पू र्व गं ध २ ० १ २ 19

बोलणी खायला लावणारी ती मात्र पळून गेली. आणि भर वर्गा त मला एकट्यालाच ओरड खावी लागली. अशी ती मला जेंव्हा हवीहवीशी वाटते, तेव्हा ती येते. वेगवेगळ्या स्वप्नांच्या दुनियेत सफर घडवते, आणि निघन ू जाते. तर कधीकधी नको त्या वेळी आणि नको त्या ठिकाणी येऊन माझी अशी हि दुर्द शा करते. अर्थात तुमचाही तिच्याशी या ना त्या कारणाने संबंध आलेला आहे . तुम्ही ओळखता का तिला? का मीच सांग!ू मग ऐका तर! मला सतावणारी ती कोण म्हणाल तर ती म्हणजे “निद्रादेवी” माझी झोप! मला सतावणारी ती, हि अशी.


दिनांक २२ ऑगस्ट २००७ रोजी आमचे अतीपर्ू वेकडील या देशात आगमन झाले. ऑगस्टमध्ये अजन ू काही बघच ू नये असल्या काही गोष्टी रस्त्यात फिरत असतानादेखिल आमचे लक्ष (थोडे फार का होईना) इकडच्या नीटनेटकेपणा कडे , स्वच्छतेकडे गेले. एवढ्या कमी वेळेत या लोकांनी साधलेली प्रगती पाहू न आम्ही फारच भारावन ू गेलो आणि येथील प्रत्येक गोष्ट बरोबर आहे आणि आपणही ती आत्मसात केलीच पाहिजे असे स्वतःला बजावन ू बजावन ू सांगू लागलो. हापिसात काम करताना पण याच मुळे हे लोक येवढ्या पुढे गेलेत या भावनेने आम्हीही रोज १३-१४ तास खुर्चीमध्ये राहू लागलो. काका (आमचा बॉस... ooopsss…) सांगेल ती परू ्व दिशा बनली (Naver हे आपल्या rediff/ yahoo सारखच Timepass आहे हे तो पर्यं त आम्हाला ठाऊक नव्हते.) असो, तर असेच एका बुधवारी अस्मादिक आपल्या एका भारतीय मित्रासोबत थांबले होते. रात्री ९.१५~९.३० ला पोटातले कावळे ओरडून सांगू लागलेत की बाबा आपले काका अन्न भक्षण करून आले आहे त आणि आता तुम्हीपण काहीतरी ढकला.कावळ्याच्या हाकेला प्रतिसाद देत आम्ही shutter बंद करणार तोच काकांना काहीतरी Very urgent/ within today काम आठवले. झाले, आम्ही पुन्हा तासभर खुर्ची उबवली. रात्री १०.२०-१०.२५ पर्यं त काम संपविले.

पू र्व गं ध २ ० १ २ 20

पोरं आता कोरियन कल्चर शिकली आहे त आणि कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणत नाहीत, रोजच्यासारखी हि खात्री झाल्यावर काकांना परत काही Very urgent/ within today आठवले नाही. आम्ही सबवे कडे प्रस्थान केले. (आमचा सवंगडी तोवर थांबला होता सोबत). स्टेशनवर आल्या आल्या जाणीव झाली की अस्मादिक सवयीला जागले आहे त आणि पैशाचे पाकीट (टी-मनी कार्ड सोबत) हापिसातच विसरले आहे त. सहज म्हणन ू मित्राकडे बघितले तर त्याने आठवण करून दिली “राजा मीपण सकाळी पाकीट घरीच विसरलो होतो आणि तच ू मला तिकिटाला पैसे दिले होतेस”. रात्रीचे १०.४५ होत आहे त. घरी जाऊन, स्वैपाक करणे, अन्न भक्षण, भांडी धुणे, कपडे इस्त्री करणे आणि दुसऱ्या दिवशी परत हापिसात सकाळी ८.३० ला हजर होणे या सगळ्याचा विचार करता आम्ही टॅक्सीने जायचे ठरविले. मित्र घरून पाकीट घेईल आणि टॅक्सीवाल्याला पैसे देऊन टाकू हा आमचा सोपा विचार होता. पहिल्या हाकेलाच एक टॅक्सी येऊन थांबली. आत जाऊन म्हटले यान्ग्प्युअन्ग स्टेशन. तर स्वारी आमच्याकडे पाहत बसली. बाबांनो खाली उतरा. तिकडे जायला बसने अडीच तास लागतात हे त्याने आम्हाला घड्याळात काटे फिरवन ू सांगितले.


आम्ही सर्द , हापिसातल्या एका कोरियन कलीगला कॉल केल्यावर यान्ग्प्युअन्ग म्हणन ू अजन ू एक गाव आहे , तुम्ही यान्ग्प्युअन्ग योक (Subway Station) सांगा हि मौलिक माहिती देऊन त्याने फोन कट केला. नको नको त्या वेळेला फोन करून आम्ही या सदगहृ स्ताला खपू छळले आहे असे त्यांच्या सध्याच्या वहिनीला आणि पुर्वाश्रमीच्या योजा चिन्गुला वाटले. (असो आपल्याला काय? अपना काम बनता, भाड मे जाये कोरियन जनता) सच ू नेप्रमाणे आम्ही पत्ता सांगितला व मार्गस्थ झालो. रस्त्यात मित्र आमचा खपू खश ू , पहिला पगार भारतात पाठवीला आणि खपू चांगला रे ट मिळाला म्हणन ू . घरी आल्यावर मित्र पैसे घ्यायला वर गेला अन् आम्ही टॅक्सीवाल्याशी “हन्गुल योजा” बद्दल काही माहिती मिळते का ते बघू लागलो. एव्हाना बिल झाले होते कोरियन वोन ४,८००/- आणि मित्राच्या पाकिटात इनमिन कोरियन वोन ४,०००/-, म्हणन ू त्याने ATM कार्ड पुढे केले पण मशीन ते काही रिड करे ना. झाले टॅक्सीवाला आता थोडं वैतागला. आणि जोरात कॅश मशीन, कॅश मशीन म्हणू लागला. कोरियात ATM मशीनला कॅश मशीन म्हणतात हि अजन ू एक मौलिक माहिती आम्हाला मिळाली. त्या वेळेस काही “स्मार्टफोन्स” नव्हते, म्हणन ू टॅक्सी वाल्यालाच स्वतः पेक्षा “स्मार्ट” समजन ू आम्ही तो सांगेल त्या कॅश मशीन ला गेलो.

बराच वेळ खटाटोप केल्यावर मित्र, सोबत ५-६ एटिएमच्या स्लिप्स घेऊन आला, मशीन चालत नाहीये अन् नुसत्याच स्लिप्स बाहे र येत आहे त असे तो म्हणाला. आत मात्र टॅक्सीवाला जाम वैतागला.

पू र्व गं ध २ ० १ २ 21

त्याची नजर खाऊ की गिळू अशीच काहीतरी, आता याला सांगणार तरी काय म्हणन ू आम्ही परत आमच्या वरच्या कोरियन चिन्गुला साद घातली. फोन आधी पासन ू च प्रिपेड, बरोबर वेळेवर दगा दिला, “Hello one more help, Actually cash machine is not working .....” म्हणे पर्यं त बंद झाला. आता टॅक्सी वाल्याला आमची दया आली. आणि त्याने परत फोन लावला (शेवटी गरज आता त्याला पण होती). टॅक्सी वाल्याने सगळ्या स्लिप्स त्याला वाचन ू दाखविल्यावर कळले की मित्राने आजच भारतात पैसे पाठविले असल्या कारणाने आजचे ट्रॅन्झॅक्शन पर्णं ू झालं आहे आणि नवे ट्रॅन्झॅक्शन रात्री १२.०० नंतरच होईल म्हणन ू . आता आमच्या पुढे एकच पर्या य शिल्लक होता तो म्हणजे हापिसात जाऊन स्वतःचे पाकीट घ्यायचे. (लग्ना अगोदर आमच्यापण पाकिटात पैसे असायचेत म्हटलं... उगीचच हसू नका), तर एकदा परत आमची वरात हापिसात निघाली, नशिबाने या वेळेस साथ दिली आणि आमच्या गसोड्यात चक्क आमचे नेम कार्ड सापडले, नाहीतर त्याला हापिसात कसे जाणार, असेही मोबाइलने दगा दिला होता.


हापिसात पोहचेपर्यं त एव्हाना रात्रीचे ११.३० झाले होते आणि काका बहु दा आमच्या मागे लगेचच निघाले होते. (उगीचच रात्री १.०० वाजता urgent teleconference होती म्हणन ू सांगतात नेहमी), असो! Security guard जो रोज सकाळी आम्हाला ‘जोना चिमीदा / जोना चिमिदा’ करतो तो हातात हिरव्या रं गाची Dukes सदृश एक बाटली घेऊन आला (नंतर कळले की ते कोरियाचे राष्ट्रीय पेय ‘सोजु’ होते म्हणन ू ) तर असे हे काका आज आम्हाला ओळखायला पण तयार नाहीत. परत एकदा कोरियन चिन्गुला साद घातली (या वेळेस रिसेप्शन डे स्क वरून) तर महाशय टॉयलेट मध्ये होते. तब्बल १२ मिनिटांनी त्याने फोन उचलल्यावर. पुकशि (पुरकरान्च्या प्रशांतचे कोरियन नाव) - आइ एम होम एन्ड इट्स मिडल ऑफ नाइट असे काहीतरी ऐकवले, अर्था त अस्मादिक असल्या टोमण्यानं बधत नाही हे आता त्याच्या लक्षात आलेच होते. सगळे रामायण त्याला कथन केल्यावर त्याने सेक्युरिटी काकांना काहीतरी समजविली आणि आमचा वर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. खाली येताच “लुक्खे साले पर्स मे पैसे तो हैना, कमीने तेरि वजह सें मै आज लेट हू ”, असे काहीतरी भारतीय मित्राच्या मुखातन बाहे र आले. ू तिकडे साफ दुर्लक्ष करत (अर्था तचआता पैसे होते खिशात) आम्ही टॅक्सी वाल्याला परत घरचा पत्ता सांगितला

पू र्व गं ध २ ० १ २ 22

(यान्ग्प्युअन्ग योक Subway Station). या वेळेला त्याची नजर ‘उगीचच मला काय अलिबागवाला समजलेत का’ अशी काहीतरी भासली, सरतेशेवटी पाकिटातले कोरियन वोन १२०,०००/त्याला मोजन ू दाखविल्यावर त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि आमची स्वारी घराकडे निघाली. घरी पोहचतो तर घड्याळात रात्रीचे १२.१५ आणि टॅक्सीचे बिल होते कोरियन वोन १२३,०००/-. मग काय, परत एकदा कॅश मशीन? नाही काय, मित्राकडचे कोरियन वोन ४,०००/- होते ना अजन ू .. सत्य घटनेवर आधारित. लेखक आपल्या विसरभोळे पणासाठी आणि कोठे ही वेळेवर न जाण्यासाठी प्रसिद्ध आहे त.


मला मराठी असल्याचा अभिमान अनेक कारणांसाठी आहे . पण शांतपणे विचार केला तर एकच कारण महत्त्वाचे वाटते... “भाषा”. मला वाटते बहु तेकांचे हे च कारण असावे. गदिमांनी स्वतःविषयी बोलताना लिहिले आहे ,

ज्ञांनीयाचा व तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे |

ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई पासन ू अगदी गदिमा, शांता शेळके आणि अरुणा ढे ऱ्यांन पर्यं त सर्वांचे माझ्यावर / आपल्यावर अनंत उपकार आहे त. मी शाळे त होतो तेव्हाचे दोन धडे मला आठवतात, मी शाळे त म्हणजे १८ शे... नाही १९ शे... असो फार जुनी गोष्ट आहे एवढे च.... तर दोन धडे मला आठवतात. अनिल अवचटांचा ‘लळा’ आणि माणिक गोडघाटे अर्था त ‘ग्रेस’चा ‘चिमण्या’. लळा मध्ये अवचटांनी कुत्र्याच्या पिल्लाला घराबाहे र काढले तर ग्रेसने चिमण्यांना. ते धडे वाचल्यावर त्या न कळणाऱ्या वयात ( आता कळते अशातला भाग नाही..) देखील मनात एक अस्वस्थता आली होती.. चलबिचल झाली होती. धड्याच्या शेवटी हळवा सुर लावलेले हे लेखक मला जवळचे वाटतात. हो, आपल्या देशात माकडाला सांभाळले नाही म्हणन ू मंदिर पाडणारे लोकं आहे त हो... अर्था त मंदिर पाडून किंवा बांधन ू जो धडा मिळणार नाही तो नुसते धडे वाचन ू मिळतो हो... थोरामोठ्यांच्या आयुष्यावरचे धडे वाचन ू फार काही मिळाले नसेल पण ‘अम्मा’ नावाचा मोलकरणी वरचा धडा खपू काही सांगन ू जातो.

पू र्व गं ध २ ० १ २

आपल्या लहानपणी परदेशात जायची प्रत्येकाची इच्छा असतेच की, पण ‘परू ्व रंग’ किंवा ‘अपरू ्वाई’ वाचन ू त्या स्वप्नांना दिशा मिळते. ययाती, राधेय, कौंतेय, कर्ण आपण इतिहास किंवा पुराण जाणन ू घेण्यासाठी नाही वाचत हो. शोण हा खं्ड वाचताना तर जागेचे केलेले वर्णन डोळ्यासमोर ती जागाच उभी करते. ‘ओअॅसिस’च्या शोधत फिरणारे फादर फ्रांसिस दिब्रेटो, ‘एक होता कार्व्हर’ सांगणाऱ्या वीणा गवाणकर, बोल्ड लिहिणाऱ्या विजय तेंडुलकरांचे ‘कोवळी उन्हे’ किंवा ‘सखाराम बाई ंडर’. समाजाचे भयाण रूप दाखवणारे लक्ष्मण गायकवाडांचे ‘उचल्या’. वपुंच्या सगळ्याच कथा... पण विशेषत: वदनी कवळ घेताना डोळ्यात पाणी आणणारा जे के मालवणकर. ग्रामीण बाज असलेले शंकर पाटील आणि काहीही न कळलेले जी ए कुलकर्णी. Towards the silver crest of Himalya चे लेखक जी के प्रधान मराठी पण मळ ू इंग्रजी मधल्या या पुस्तकाचे ‘साद देती हिमशिखरे ’ हे भाषांतर म्हणजे कथेतन व्यक्त केलेला अध्यात्म. ू पण खरं सांगू विचारांची स्पष्टता काय असते हे कळायचे असेल तर ‘आहे मनोहर तरी..’ वाचलेच पाहिजे. नुसत्या कविता घ्या, झर झर पाने अशी पालटायला लागतात.

ओळखलंत का सर मला. पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले डोळ्यामध्ये पाणी. 23


खळखळू द्यायाअदयसाखळ्याहातपायांत पोलादाची काय तमा मरणाच्या दारात. किंवा पद्मा गोळ्यांची,

मी एक पक्षिण आकाशवेडी. दुज्याचे मला भान नाही मुळी.

किंवा

हिरव्या पिवळ्या माळावरुन हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत रक्तामधल्या प्रश्नांसाठी पथृ ्वीकडून होकार घ्यावेत.

मला कधीकधी वाटते की या तथाकथित पहारे कऱ्यांनी या कविता वाचल्या नसतील का हो? पण नाही, त्यांनी वाचल्यात. आता त्या कवितांमधन ू काय अर्थ घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . त्यांनी एवढच घेतलं. “देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे”, मला वाटले की पहिल्या दोन ओळीच घेतल्या की काय..? पण तसं ही नाही. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आहे ना !..... ते सोयिस्कर रित्या बदलन ू घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे ‘हातच’ घ्यावे असा अर्थ केलाय. आता कळलं न चिन्ह कशी तयार होतात ते... आता गंमत बघा हं..! फूल घ्या !...गुलाब, जाई, जुई, काटेकोरांटी हातात धरता येतात. चाक, चरखा, हातांनी फिरवतात. घड्याळ तर हातावरच बांधतात. पर्यायच नाही.. आजकाल रे ल्वेपण घड्याळाच्या वेळेवर यायला लागल्यात, नाही असं नाही.

पू र्व गं ध २ ० १ २ 24

आता तुम्ही म्हणालच रे ल्वे इंजिन कुठे हाताने ढकलता येते ? अहो, पण त्यासाठी कोळसा आहे .तो तर हातांनीच ओढतात ना.? तुम्ही लोक उगाच नाही ते अर्थ घेऊ नका हं यातन ू !. मराठी भाषा आहे , वळवावी तशी वळते. असो, मी मघाशी पहारे करी म्हणालो ना, ते याचसाठी. ! आपली अवस्था कशी आहे ? सुरेश भट म्हणतात, “हे फक्त आले नवे पहारे करी, कैदखाना नवा कोठला यार हो ” कैदखाना आणि साहित्याच फार जवळचं नात आहे . मराठी साहित्याच हे नाते ओळखले जाते त्याचे नाव आहे , विनायक दामोदर सावरकर .


सावरकरांच्या या कार्या ची जाणीव देखील नसलेले हे तथाकथित काळे ‘मणी’ आज दुर्दैवाने ‘काळे पाणी’वर घाला घालतात. त्यांना या साहित्यासमोर उभे केले तर असे कोलमडून पडतील की सावरायचेसुद्धा सुचणार नाही. कोणत्या लल्लू पल्लूने कविता केली की आमची माध्यमे उदो उदो करतात आणि साहित्याच्या या अखंड धगधगत्या यज्ञात त्यांच्याच साहित्याची आहु ती दिली जाते. मला अभिमान आहे की सावरकरांनी, साने गुरुजींनी ज्या भाषेत लिहिले, ज्या भाषेत बाबा आमटे बोलले, त्या भाषेच्या सावलीत माझा जन्म झालाय. आणि त्याचं भाषेचे बाळकडू पिऊन मी संस्कारित झालो आहे . तो शेक्सपिअर का कोण होता तो, म्हणाला होता बघा, नावात काय आहे ? गुलाबाला गुलाब म्हणा नाही तर अजन ू काही म्हणा गंध तर दरवळणारच ना. थोडक्यात काय गुलाब म्हणा नाही तर अजन ू काही.... गंध तर तोच येणार. खरे आहे त्याचे पण आजकाल नावावरून खपू काही होते हो... बाबा आमट्यांचे नाव बाबा ऐवजी फादर ओम्मूटा वगैरे असते तर त्यांना नोबेल मिळालं असतं कदाचित, पण भारतरत्नपण नाही हो दिलं त्यांना. नावांच्या भाऊगर्दीत अडकलेली आमची मनं विषारी होऊन बसली आहे त. मन जहरी जहरी त्याले न्हाई रे तंतर अरे ईचू साप बरा त्याले उतारे मंतर

पू र्व गं ध २ ० १ २

अनिल अवचटांचे एक छान पुस्तक आहे , “कार्यरत”. अनेकजण ज्यांची 25

नावेदेखील आपल्याला माहीत नाहीत, अशांच्या सामाजिक कार्या विषयी त्यांनी लिहिले आहे किंवा अरुणा ढे र्‍यांचे ‘विस्त मृ ी चित्रे’ घ्या. चंदनासारखे झिजन ू हे लोक आपल्या नकळत जगतात आणि जातात, आपण मात्र घेऊन बसतो उरलेल्या लाकडाचा कोळसा.

गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी. असे म्हणत आकाश भेदून दूर निघन ू जातात. आपण मात्र ‘उं च माझा झोका’ बघत उगाच झुलत राहतो, आकाशाला हात लावण्याचे स्वप्न बघत. पण तरीही ज्याचे काम त्यानेच करावे. आपण रे डा असन ू ही वेद म्हणतो ते ज्ञानोबा आणि भाषेच्या कृपेमुळे. रे ड्याने रे डाच राहावे उगाच ‘ज्ञाना’ असल्याचा आव आणू नये. मी रे डा असन ू ही वेद जाणन ू घेण्याची योग्यता ज्या भाषेने मला दिली त्या भाषेला ‘अक्षरशः’ प्रणाम ! लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.


रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक लोक भेटतात, अनेक प्रसंग घडतात. सर्व च प्रसंग आणि व्यक्ती आठवतीलच असे नाही. पण काही प्रसंग किंवा वाक्य अगदी कायमचे मनात ठसतात आणि वेळोवेळी आठवतात. असेच माझ्या जीवनातील लक्षात राहिलेले काही प्रसंग. या सेमिस्टरला दर मंगळवारी दुपारी १ ते ४ असा तुझा क्लास आहे , अशी माहिती माझ्या लॅबमेटने मला दिली. दुपारी जेवण आणि घर आवरणे संपवन ू मी क्लासमध्ये प्रवेश केला. या प्रोफेसरचा मी प्रथमच क्लास घेतला होता. मी आत गेली तर एक सुंदर, सडपातळ, पण साधारण पन्नाशीची प्रौढ महिला प्रोफेसर “ओहे मी” दिसल्या. पहिल्या क्लासमध्ये नाव व देश वगैरे माझी जुजबी माहिती मी त्यांना सांगितली. ती आमची पहिली ओळख. क्लास संपल्यावर मी घरी जात असताना सहज मागे वळून बघितलं तर मला प्रोफेसर ओहे मी दिसल्या. माझ्याकडे पाहू न त्या ओळखीच्या हसल्या, मी पण थांबले. त्या बसस्टॉपकडे निघाल्या होत्या. आमचा दोघींचाही रस्ता एकच असल्यामुळे आम्ही सोबत चाल लागलो. त्यांनी माझी चौकशी केली. मी पण त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलुन त्यांना माझ्याविषयी सांगितले. त्या पहिल्याच भेटीत आमची मैत्री झाली असावी. त्यांना त्या दिवशी मी केवळ बसस्टॉपवरच सोडले नाही तर भारतीय पद्धतीनुसार त्या बसमध्ये बसन ू बस सुरू होईपर्यं त मी बसस्टॉपवर थांबली. त्या अगदी एकट्या राहत असल्यामुळे माझ्या या वागणुकीने त्या खपू भावुक झाल्या होत्या असं त्यांनी नंतर मला सांगितलं.

पू र्व गं ध २ ० १ २ 26

त्यानंतर आम्ही प्रत्येक मंगळवारी क्लास झाल्यावर भेटू लागलो. कधी आम्ही कॉफी घ्यायला जायचो आणि त्यासोबत मनमोकळे पणानं गप्पा मारायचो. एकदिवस मी त्यांना विचारलं, प्रोफेसर ओहेमी !, तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी ऐकता, माझे प्रॉब्लेम्स ऐकता, मदत करता, याच काय कारण आहे? त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, जेव्हा मी पीएचडी केली तेव्हा मी बऱ्याच भारतीय लेखकांची पुस्तके वाचली आहेत आणि जे काही ज्ञान मला मिळाले ते त्या पुस्तकांतन ू च. त्या पुढे बराच वेळ बोलत होत्या. त्या सर्व भारतीय लेखकांच्या अगदी ऋणी होत्या. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्या ऋणातन ू उतराई होण्यासाठी माझ्यासारख्या एका भारतीय मुलीला मदत करत होत्या. “मला देवाने संधी दिली की मीसुद्धा तुझी मदत करू शकते, आणि मला मिळालेल्या मदतीच्या ऋणातन ू उतराई होण्याचा प्रयत्न करू शकेन”. त्यांचं ते वाक्य ऐकून मला आश्चर्य वाटले. जिवंत माणसाने केलेली मदतसुद्धा आपण बरे चदा विसरतो आणि या प्रोफेसर केवळ भारतीय लेखकांच्या पुस्तकांची मदत झाली म्हणन ू ऋणी राहतात . देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ह्या ओळी मला अजन ू ही प्रोफेसर ओहेमींची आठवण आली की सोबतच आठवतात आणि मी पुन्हा स्वतःला आठवण करून देते की मलासुद्धा देणाऱ्याचे हात घ्यायचे आहेत.


असाच एक प्रसंग माझ्या जवळच्या मैत्रीण व सीनिअर, “सेरोनाचा” घडला. आम्ही आमच्या प्रोफेसरच्या चांगल्यावाईट गुणांबद्दल बोलत होतो. सेरोना प्रोफेसरसोबत, ती अंडर-ग्रॅज्युएट स्टु डं ट कोर्स पासन ू काम करत होती. आता ती पीएचडीच्या शेवटच्या वर्षाला आहे . तिला वडील नाहीत आणि आई असन ू नसल्यासारखीच, त्यामुळे घरून काहीही पाठिं बा नव्हता. अतिशय कष्टाने तिने शिष्यवत् ृ ती मिळवली आणि अंडर-ग्रॅज्युएट कोर्स ला ऍडमिशन घेतली होती. बोलताबोलता तिने उल्लेख केला की “मी जवळजवळ ८ वर्षापासन ू प्रोफेसरसोबत आहे . आज मी विचार करते की जर प्रोफेसर माझ्या जीवनात आले नसते तर माझं जीवन किती कष्टदायक असतं. प्रोफेसर मला वडिलांसारखे आहे त, त्यांनीच माझ्या जीवनाला दिशा दिली.ती मला म्हणाली”, “ I put value in relationship”. खरं च हे माझ्यासाठी खपू महत्त्वाचं आणि थोडं सं चमत्कारिक वाक्यं होतं तिचं . मनात विचार आला की जसं व्यवसायामध्ये उत्पादन उत्कृष्ट होण्यासाठी आणि त्याचा ब्रँड बनवण्यासाठी उत्पादनाच्या निर्माण-कार्यापासन (Manufacturing) ू ते , मार्केटिंग, जाहिरात अश्या प्रत्येक पायरीला “value” ओतणे आवश्यक असते. आणि या “value” मुळेच ते उत्पादन उत्कृष्ट होते, आणि त्याचा ब्रँड बनतो. हे च आपण नातेसंबंधाबाबत लागू करू शकतो. बरे चदा लहान-सहान गोष्टींवरून गैरसमज, रागलोभामुळे नाती दुरावतात किंवा तुटतातही. जर आपण सेरोनासारखं नात्यांमध्ये “value” टाकली तर नातीसुद्धा एखाद्या ब्रँडसारखी

उत्कृ ष्ट होतील, यात काही शंकाच नाही,

पू र्व गं ध २ ० १ २ 27

आणखी एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे जेव्हा मी माझ्या दोन मुलांसोबत भारतात माझ्या आईवडीलांसोबत जवळजवळ ९ महिने होते तेव्हाचा. प्राण व समर्थ हि माझी जुळी मुलं. पण त्यांचा जन्म झाल्यावर सर्वां चाच गोंधळ उडाला, कारण जुळ्या मुलांच्या संगोपनाचा कोणालाही अनुभव नव्हता. घरात ४ माणसं असन ू ही मुलांना सांभाळायला आणखी माणसं हवीत असे वाटायचे. त्यावेळी, प्राण आणि समर्थ ४ महिन्यांचे होते. माझा आणि आई-बाबांचा वेळ या दोन मुलांना सांभाळण्यात कसा जायचा ते कळायचंच नाही. आमच्या ै ी एकाला आम्ही थोडासा तिघांपक मोकळा वेळ देत असू , मात्र इतरवेळी सक्तीने दोघांजवळ दोन बाळ असायचीच. प्राण आणि समर्थ ला सुद्धा आई-बाबांचा खपू लळा लागला होता. प्राण तर रांगत रांगत जाऊन माझ्या बाबांच्या पायाला धरून उभा राहायचा, तर समर्थ रांगत रांगत घरभर मला आणि आई-बाबांना शोधत फिरायचा. असे ९ महिने खपू मजेत गेले. आई-बाबा मुलांमध्ये भावनिकरीत्या गुंतले होते. विजय आम्हाला घ्यायला येणार होता. आम्ही तो येणार त्या दिवशी सकाळपासन ू च त्याची वाट पाहत होतो. प्राण समर्थ ला बघितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होते, त्याची आम्हाला खपू उत्सुकता होती. विजय संध्याकाळी घरी पोहचला. मला खपू आनंद झाला. मी आणि विजय मुलांमध्ये गर्क झालो. त्यावेळी माझे बाबांकडे मात्र लक्ष नव्हते. पण नंतर मात्र मला जाणवले की बाबा खपू शांत झाले होते.


ते विजयशी सुद्धा फारसे बोलले नाही आणि स्वतःच्या खोलीत झोपायला गेले. मला कळले की बाबांना खपू वाईट वाटत होते की विजय आता प्राण आणि समर्थ ला घेऊन जाणार. प्राण व समर्थ आपल्यापासन ू दूर जाणार, ही गोष्ट साहजिक असली तरी ते आणि आई दोघेही दुःखी झाले होते. मुलांचा आणि त्यांचा वर्ष भराचा सहवास होता. त्यांना प्राण व समर्थ ला दूर करणे म्हणजे , जसं माझ्यापासन ू प्राण-समर्थ ला दूर करण्यासारखेच होते, इतके ते दोघांमध्ये गुंतले होते. मी हास्यविनोद करून आईबाबांना हसवण्याचा प्रयत्न करत होते. तेही त्यांचे दुःख लपवण्याचा असफल प्रयत्न करत होते. सामानाची पॅकिंग, जाण्याची तयारी यातच सगळे दिवस गडबडीत गेले. त्यामुळे बाबांशी शांतपणे माझे बोलणे झाले नाही. मलादेखील कोरियात दोन लहान मुलांना दिवसभर मी एकटी कशी सांभाळे न, कोणी मदतीला असणार नाही, याचा ताण होताच. भारतात ९ महिने इतके छान गेले होते, की मलाही कोरियाला जायचा कंटाळा आला होता. पण बाबांशी बोलणार तरी कसं. जायचा दिवस उजाडला, गाडी आली. मी गाडीत सामान टाकणे, मुलांना तयार करणे, अशी छोटीमोठी कामे करीत होते. मी निघण्यापर्ू वी देवाला नमस्कार केला, आईला नमस्कार केला आणि बाबांना नमस्कार करण्यासाठी वळले. त्यांना नमस्कार केला अन डोळ्यातन ू अश्रू वाहायला लागले. माझ्या तोंडून फक्त “बाबा.... “ हा एकच शब्द निघाला. “आपलं कर्तव्य कर. सर्वात महत्त्वाच ते कर्तव्य”, असं बाबा बोलले . त्यांचं ते एक

पू र्व गं ध २ ० १ २ 28

वाक्य माझ्या मनावर अगदी कोरलं गेलंय. मी कोरियाला आली, त्यानंतर जवळपास १५ महिने मुलांना सकाळी ९ ते रात्री ९ असं एकटीनं सांभाळलं. जेव्हा मला त्रास व्हायचा, प्रकृती ठीक नसायची, तेव्हा बाबांच वाक्य मनाला नवी उभारी द्यायचं. मला वाटते, प्रत्येकाच्याच आयुष्यात अडचणी येतात, त्यावेळी आपण आपलं कर्त व्य निरपेक्ष भावनेनं करत गेलो, तर अडचणी दूर होतात आणि पुढचा मार्ग दिसतो. महाभारताच्या रणांगणावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं वाक्य, आपल्या जीवनातही कोणीतरी कृष्ण बनन ू सांगतोच, फक्त ते ओळखणे आणि त्यावर मार्गक्रमण करणे, हे आपल्या हाती असतं.


घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागन ू आवाज आला, “या विजयराव, चहा घेऊ.” त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्ड रच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रं गाचा टी-शर्ट अन रं गीबेरंगी बर्मुडा घालन ू बहु दा माझीच वाट बघत बसले होते. खरं तर कॅप्टन मला नेहमी एकेरी हाक मारतात. पण कधी त्यांचा गप्पा मारायचा मड ू झाला की ते एकदम मला “विजयराव” किंवा “देशमुखसाहे ब” वगैरे संबोधायचे. त्यात गप्पा करणे म्हणजे कुठल्यातरी विषयावर चर्चा करणे, हे आता मला अनुभवावरून कळले होते. कॅप्टन शिर्के सैन्यातन ू स्वेच्छे ने निवत्त ृ झाले आणि मराठी मुलांना सैन्यात दाखल होण्यास मदत करण्यासाठी ‘सैनिक’ नावाची संस्था चालवत होते. त्यामाध्यमातुन अनेक मराठी मुलं सैन्यात दाखल झाली होती . त्यांनी मला बसायची खण ू केली अन नोकराला चहा आणायला सांगितला. अर्थात त्यासोबत तो पोहे , समोसे, कचोरी, गुलाबजामुन वगैरे आणणार आणि चहाच्या नावावर माझ डिनरच होणार हे मला अनुभवातन ू कळलं होतं.

तसंही आज फारसं काम नव्हतं त्यामुळे रिलॅक्स बसायचं अन गप्पा मारायच्या हे ठरवन ू टाकलं.

पू र्व गं ध २ ० १ २ 29

“काय विजयराव, काय म्हणते तुमची कंपनी?” “मजेत. मस्त चाललंय.” “मग आता पुढचा काय विचार आहे ?” कॅप्टन सहज बोलत आहे त, मला जरा आश्चर्य वाटले. कारण ते फारसं इकडचतिकडं च बोलत नसत . “हां, आता Expansion करण्याचा विचार आहे ”, मी माझं पुढचं स्वप्न सांगितलं. कॅप्टन मला त्यासाठी टिप्स देतील ह्याची मला पर्ण ू खात्री होती. “व्वा विजयराव! खरं च तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे ”, कॅप्टन, समोरचं संत्रं उचलन ू घेत म्हणाले. आता मात्र मला भिती वाटू लागली होती. कॅप्टन माझं कौतुक करत आहे , याचा अर्थ आजचं टार्गेट मीच तर नाही ना? “थॅक् ं यू कॅप्टन, तुमचे आशीर्वाद आहे त”, मी एकदम मनातलं बोलन ू गेलो. खरं च गेल्या ४-५ वर्षात कॅप्टनचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. “विजयराव, तुम्ही आधी इंजिनीअरिं ग केलंत आणि मग एमबीए बरोबर नं?” “हो” मला अजन ू ही कॅप्टन शिर्केंच्या विषयाचा अंदाज येत नव्हता. कदाचित ते शिक्षणावर बोलतील असं वाटत होतं. “आणि त्यासाठी अनेकांचे तुम्हाला आशीर्वाद मिळाले आहे त”. “हो, निश्चितच”. “घ्या, गुलाबजाम घ्या”, शिर्केंनी बाऊल पुढे केला. मी काट्याने एक गुलाबजाम


घेतला आणि तोंडात टाकला. “विजय, तुला माहिती आहे का, की मोठमोठी संस्थानं, राज्य, किंवा राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, वर्षा नुवर्षे नुसतीच टिकतात पण लोकप्रियतेच्या शिखरावर टिकून राहत नाहीत, किंवा अल्पजीवी ठरतात, त्याचं काय कारण आहे ?” गुलाबजाम माझ्या घशातच अडकला. माझ्या शिक्षणाचा अन पक्ष, राजे-संस्थानं वगैरे न टिकण्याचा काय संबंध? “किंवा असं म्हण की जितका एखादा पक्ष किंवा कंपनी एखादा व्यक्ती खपू लोकप्रिय करतो, त्याला अधिक उं चीवर नेणे किंवा किमान लोकप्रियता टिकवणे त्याच्या मुलाला किंवा मुलीला किंवा इतर कोणत्या वारसदाराला जमत नाही, याचं कारण काय असेल?” मी आता चाटच पडलो होतो. हे माझ्या कधी डोक्यातच आलं नाही. किंबहु ना असा मी कधी विचारच केला नव्हता. पण तरीही माझं शिक्षण आणि याचा काय संबंध? शिर्के उगाच काहीतरी हवापाण्याच्या गोष्टी करणारे नव्हते. “विजय, तुला काही कल्पना नाही?” “नाही, म्हणजे मला ह्याचा आणि माझ्या शिक्षणाचा संबंध काय, हे कळले नाही”. “जवळचा आहे ”, कॅप्टन मोघम म्हणाले. “कसा?” मी सरळ मुद्द्यालाच हात घातला. “रिलॅक्स! हळूहळू येईल लक्षात. पण त्याआधी वारसदाराचा मुद्दा”. “हा, म्हणजे इतिहासातील उदाहरणं बघितली तर १-२ सोडले, तर सगळे च

पू र्व गं ध २ ० १ २ 30


आणि त्याला कसं ट्रेनिंग द्यावं याचा एकतर विचारच करत नसावे किंवा केला तरी तसा विशेष वेळ देत नसावे”. “होऊ शकतं”, मी उगाच सावधगिरीने म्हणालो. खरं तर मला अद्यापही नेमकं शिर्केंना काय म्हणायचंय तेच कळत नव्हतं. ते बरे चदा ‘गनिमी कावा’ वापरायचे. म्हणजे एकदा का एखादा मुद्दा समोराच्याकडून स्पष्ट करून घेतला की ते पुढे तोच धागा वापरून समोरच्याला चर्चेत हरवायचे. त्यामुळे मी मोघम उत्तरं देत होत. हा ही एक गनिमी कावाच, त्यांच्याकडूनच शिकलेला. पण ते बहु दा त्यांच्या लक्षात आलं नसावं, ते पुढे बोलतच होते. “मला तरी वाटतं, की कधी कधी ही मोठी माणसं स्वतःचं करतृ त् ्व झाकले जाईल की काय, या भीतीने, अगदी पोटच्या मुलाला किंवा मुलीला पुढेच येऊ देत नाही.” “असं कसं होईल?” “म्हणजे आता बघ, बरीच राजकारणी मंडळी ‘नवीन रक्ताला वाव मिळाला पाहिजे’ असं म्हणतात, पण म्हणन ू कोणीच सक्रिय राजकारणातन ू निवत्त ृ होत नाही”. माझ्या डोळ्यांसमोरून अनेक उदाहरणं सरकून गेली. कॅप्टनचं मत अगदी बरोबर होतं. “त्यामुळे काय होतं की त्यांच्या मुलामुलींना करतृ त् ्व गाजवायला संधीच मिळत नाही, आणि जेव्हा मिळते, तेव्हा बरे चदा ते काहीतरी असं करतात ज्याने त्यांना आपण बापापेक्षा मोठे आहोत हे दाखवता येईल. अन इतके वर्ष मनात दाबन ू ठे वलेला राग/ चीड त्या निर्णयातन ू निघते. मग बाप तर बापच असतो, तो स्वतःचा

पू र्व गं ध २ ० १ २ 31

हे का सोडत नाही. तोही त्याच्याच मुला/ मुलीला दाबन ू कसं टाकता येईल याचाच विचार करतात, अन मग अशीही वेळ येते, की स्वतःच्याच बापाविरुद्ध मुलगा/ मुलगी उभी राहते. जुन्या काळात, लढाया झाल्या, राजकारणात पक्ष बदलतात”. “हा खरं य!”, माझ्या डोळ्यांसमोरून अगदी ‘सलिम-अकबर’ पासन ू आजच्या अनेक जोड्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. “मला मात्र एक गंमत वाटते.” “कसली?” “त्यामानाने भारताच्या जवळ असणाऱ्या बहमनी , तुर्की, मुघल सत्तेने भारतावर आक्रमण केले, बऱ्याच काळ राज्यही केले, पण जे ब्रिटिश करू शकले, ते इतर फारसे कोणी करू शकले नाही, अगदी मळ ू भारतीय राजेसुद्धा, १-२ अपवाद वगळता”. “खरं य, ब्रिटिशांनी एक प्रकारची सिस्टम वापरली”. “exactly!”, कॅप्टन एकदम खश ू झाले. “सिस्टम, ज्याच्या नावाने आपण रोज खडे फोडत असतो, मात्र जीच्यामुळे ब्रिटिश भारतात टिकू शकले. खरं च आश्चर्य आहे ना?” “म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की सिस्टम खपू महत्त्वाची आहे .” मी त्यांचा आजचा मुद्दा पकडला याचा मला आनंद वाटत होता. “अगदी”, कॅप्टनना मला मुद्दा लक्षात आलाय हे बघन ू आनंद झाला होता , तर मी आजचं ‘टार्गेट’ नाही याचा मला. “पण मग, माझं शिक्षण यात कुठे आलंय?” मी पुन्हा त्यांना आठवण करून दिली.


“त्याकडे येतो मी, but you need to wait for sometime”, माझ्या पोटात गोळा आला. आज सगळं खाल्लेलं पचणार नाही तर. “तर सिस्टम, आज अधिक जास्त महत्त्वाची झाली आहे , आणि आपण त्याच्या अगदी उलट वागतो”. “ते कसं काय? मी तर सिस्टम नेहमी फॉलो करतो”, मला मराठी शब्द सुचेना. “मला नाही वाटत” शिर्के आता जोशात आले होते. “असं कशावरून वाटते तुम्हाला?”, मी बाइक बाहे र बरोबर रस्त्याच्या बाजल ू ाच ठे वली आहे न, हे आठवलं. अगदी कोणीच रस्ता ओलांडणारं नसेल तरी नियम पाळणारे आणि सिग्नल हिरवा झाल्याशिवाय गाडी पुढे न जाणारे , कॅप्टन शिर्के पार शिस्तीत मुरलेले होते, हे मला चांगलंच ठाऊक होतं. “आता तुमची स्वत:ची कंपनी आहे ”. “हो आणि मी टॅक्सपण भरतो, वेळेवर”, मी उगाच घाई केली असं मला वाटलं पण माझ्या ओठातन ू शब्द निघन ू गेले. “त्याबद्दल मला खात्री आहे ”, उगाच त्यांनी मिशीवरून दोन बोटं फिरवली. “मग?” मी आता पुरता परे शान झालो होतो, कॅप्टनना नेमकं काय म्हणायचंय, हे अजन ू ही मला कळलं नव्हतं. किंवा ते कळूनही माझ्या ध्यानात येत नव्हतं. “तुम्ही आता आय. एस. ओ. (ISO Certification for Quality & Standards ) साठी सुद्धा प्रयत्न करत आहात ना?” “हो”, एखाद्या अपराध्याने बोलावं तसं मी म्हणालो. खरं तर मला नेमका मुद्दा काय ते न कळल्याचं ते दु:ख होतं. “मग त्यासाठी तुम्हाला कंपनीत

पू र्व गं ध २ ० १ २ 32

कोणत्या गोष्टी करायच्या हे चांगलंच माहिती असेल?” “अर्था त! मी त्यावर बरीच पुस्तके आणि मटेरिअल वाचलीत आणि एमबीएला मी शिकलोय”. अरे ! हा इथे संबंध आला तर माझ्या शिक्षणाचा.. मीच आश्चर्यचकीत झालो. “हू ं, मग काय शिकलात त्यांतन ू ?” “हा, म्हणजे कंपनीचं काम, त्याचं डॉक्युमेंटेशन, त्यासाठी कंपनीत उपलब्ध कराव्या लागणाऱ्या सुविधा, वगैरे..”. “बस्स? इतकंच शिकलात ?” “……………...” मला एकदम अपमानास्पद वाटलं की नेमकं शिर्केंना काय म्हणायचं आहे तेही मला कळू नये. “तुम्हाला कंपनीत प्रत्येकाने कोणतं काम कसं करावं, याचे मॅन्युअल, आणि आतापर्यं त काय केलंय त्याचे डॉक्युमेंट्स तयार करावे लागले असतील न?” “हो, तोही डॉक्युमेंट्सचा भाग आहे ”, मी उगाच चिडलो होतो. “मग त्यांतन ू काय शिकले तुम्ही?”, “म्हणजे ? तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे ? आयएसओ, राजकारणी, माझं शिक्षण, राजे-राजवाडे .... नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला?” मी सरळ विचारलं. त्यावर शिर्के मोठ्याने हसले. “अहो विजयराव, चिडू नका हो. मी तुम्हाला काय माहिती आहे ते बघत होतो. बरं जाऊ द्या. तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो. आम्हाला एकदा मछलीपट्टणमला नेलं होतं. तिथे मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं होतं. त्यावेळी त्या मॅनेजमेंट गुरुने बरं च काही सांगितलं होतं. त्याने नंतर आम्हाला एक प्रश्न विचारला, की उत्तम व्यवस्थापक कसा ओळखावा? तुला काय वाटते?”


“म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगता येतील, जसं...” “नाही, एका वाक्यात उत्तर हवंय” “हम्म, काय सांगितलं त्याने” मी अनुभवानुसार त्यांनाच उत्तर सांगायला म्हटलं. “तो म्हणाला, असा व्यक्ती जो अशी सिस्टम (System) तयार करतो, की तो व्यक्तिशः उपस्थित असो वा नसो, कामे तशीच होतात जशी व्हायला हवीत. जसं आर्मीत दिलेलं काम चोखपणे पार पाडली जातात, मग ते काम बघणारा कोणी असो किंवा नसो.” “व्वा! क्या बात है. पण कॅप्टन हे म्हणायला सोपं आहे , पण करायला फार कठीण आहे .” “हो, पण अशक्य नाही”. “हां पण काही गोष्टी असतात ज्या माझ्या कंपनीत मलाच कराव्या लागतात”. “तुला दत्ताजी माहिती आहे ? किंवा तानाजी?” “आता ते कुठून आले मध्येच.... कॅप्टन तुम्ही म्हणजे ना.....” “इतिहास आठवतो का, दत्ताजी शिंदे म्हण किंवा तानाजी मालुसरे .... ते पडल्यावर मराठी सैन्याने काय केले? पळापळ... बरोबर...”. “हो पण ... “ दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकाचवेळी शिर्के का बरं बोलत आहे ते कळे ना, पण त्यांनी मला थांबायची खण ू केली, काट्याने टरबुजाचा एक तुकडा घेतला. “म्हणजे समजा कोणी सरदार पडला तरी लढत राहण्याचं प्रशिक्षण किंवा तशी कार्य पद्धती विकसित केली गेली नव्हती, बरोबर?”

पू र्व गं ध २ ० १ २ 33

“हम्म... पण नंतर शेलारमामाने सगळे मावळे फिरवले अन लढाई जिंकलीच ना?” मी माझा मुद्दा रे टला. “हो, पण पुढे ती कार्य पद्धती झाली नाही ना. म्हणजे युद्धाचा कंट्रोल केवळ एकाच व्यक्तीकडे होता, अन तो पडला, की सैन्य पळून जात होतं. धनी पडला असं म्हणायची त्यावेळी पद्धत होती.” “हो पण अशावेळी लढाईचं सत्र ू दुसऱ्या कोणाकडे देणार ना? आणि लढण्यासाठी आणि कुटुंबासाठी पैसा देणारा धनीच गेल्यावर ते तरी काय करणार?” “बऱ्याचशा पक्षांच, कंपन्यांचं, असच होतं. धनी गेला की झालं. इतकंच काय, सचिन (तेंडुलकर) गेला की त्याच्या मागे पटापट बाद होणारे फलंदाज हे चित्र नवीन नाही”. “हो पण म्हणन ू प्रत्येकजण सचिन किंवा तानाजी होऊ शकत नाही ना?” मला आता चर्चेत मजा येऊ लागली होती. “हो. तुर्ता स सचिनला बाजल ू ा ठे व,ू पण तुला आठवतं, महाराजांनी अफझलखानाला भेटायला जाण्यापर्ू वी सगळ्यांना काय सांगितलं होतं?”, पुन्हा शिर्के इतिहासात शिरले होते. “हो, मी जिवंत येईन वा न येईन, पण ज्याला जी कामगिरी दिलीय, ती चोख बजावायची. त्यात अजिबात हलगर्जी नको”. हा प्रसंग अगदी आपल्यासमोर घडतोय असं वाटायला लागेल असं कॅप्टन शिर्केंनी मला कित्येकदा सांगितलं होतं. प्रत्येकवेळी अंगावर रोमांच उभे राहायचे. पण मला त्यांनी जास्त बोलू दिल नाही. “हे च .... ज्याला जी कामगिरी दिलीय, ती चोख पार पाडायची...मी असो वा नसो...... उत्तम व्यवस्थापक... कळलं”. आता मला


हळू हळू लक्षात येऊ लागलं होतं की शिर्केंचा आजचा विषय ‘उत्तम व्यवस्थापक’ आहे . व्वा ! आज मला मेजवानीच आहे , मी मनात खश ू झालो. “तुला माहिती आहे का, पहिला बाजीराव पेशवा, याचं युद्धतंत्र शिकण्यासाठी इंग्रजांनी काय केलं होतं? “ “काय?” “एका चित्रकाराला पाठवलं अन मराठी सैन्य प्रत्येक युद्धात कसं लढतं याचे चित्र काढायला लावले. त्यावरुन त्यांनी मराठ्यांची युद्ध कार्य पद्धती समजन ू घेतली. आणि हे च त्यांनी टिपू सुलतान आणि तत्कालिक चांगल्या चांगल्या राज्यकर्त्यां च्या बाबतीत केलं अन शेवटी सगळ्यांना हरवन ू या देशावर १५० वर्ष राज्य केलं. चांगली कार्य पद्धती महत्त्वाची असते.” “हो ना! म्हणन ू तर लोकं आजकाल सिस्टमला दोष देतात ना.” “ते ही चुकीचंच आहे ”. शिर्के एकदम सहज म्हणाले, मला वाटलं की त्यांनी माझं म्हणणं बरोबर ऐकलं नसावं मी पुन्हा एकदा माझं मत सांगितलं तर शिर्के म्हणाले, “विजयराव, अहो आपण सिस्टम आधी समजन ू घेतली पाहिजे. सिस्टम बनवणाऱ्यांनीसुद्धा विचार करूनच बनवली असेल ना? उगाच एक दोन उदाहरणातन ू आपण काहीतरी विचार करतो आणि मग सिस्टमला दोष देतो. असो, तो आपला आजचा विषय नाही. मला एक सांगा चांगली सिस्टम बनवण्यासाठी तुम्ही काय करता?” “काय कॅप्टन, मी काही आमदार किंवा खासदार थोडीच आहे , नियम अन कायदे

पू र्व गं ध २ ० १ २ 34

“हं ! पण मी त्याविषयी बोलतच नाही आहे . मी विचारतोय तुम्ही मिळवलेलं ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यं त पोहचवण्यासाठी तुम्ही स्वतःची कार्य पद्धती विकसित केलीय का?” “हा हा हा .... कॅप्टन, माझं अजन ू लग्नसुद्धा झालं नाही. पुढच्या पिढीला अजन ू वेळ आहे .” “हा हा हा ..... अरे माझं म्हणणं ती पिढी नाही. “ “मग?” मी जरा गोंधळलो. “तू इंजिनिअर झाला, नंतर एमबीए केलंस, त्या ज्ञानाचा वापर करून स्वत:ची कंपनी स्थापन केली, पण समाजाला त्याचा काय फायदा?” “माझ्या कंपनीत २६ लोकांचा स्टाफ आहे ”. “ते नोकरी करतात. तू त्यांच्याकडून काम करून घेतो आणि पगार देतो.” “मग तुम्हाला काय म्हणायचं आहे ?” “तू जे ज्ञान मिळवलं, त्यासाठी अनेक चांगल्या लोकांची मदत झाली असेलच”. “हो हो, ते तर आहे च.” “मग तू इतरांना मदत करणे अपेक्षित आहे , नाही का?” “हो ते मी करतोच आहे ”. “मला नाही वाटत की ते पुरेसं आहे ”. “म्हणजे?” “आजचं जीवन खपू वेगवान झालंय. कदाचित तुला ज्यावेळी मदत करायला वेळ असेल त्यावेळी ज्याला मदत हवी तो नेमका व्यस्त असेल”. “हम्म... पण त्यासाठी मी जबाबदार आहे का? ज्याला गरज असेल त्याने समोरच्याच्या वेळा पाळायला हव्या न?” “बस्स... इथेच गडबड आहे ”.”.....”.


“मदत करावी ती सर्वां ना, तू मदत करतो हे लोकांना कसे कळे ल? त्यांना नेमकी जी मदत हवीय, ती तू करू शकतो की नाही यासाठी त्यांनी हे लपाटे का मारावे?” “पण ....” मला काय बोलावे ते सुचले नाही. “यामुळे आपले भारतीय लोकं मागे राहतात, कारण जगभरात बरचसं ज्ञान इंग्रजीत अन आमची इंग्रजीची बोंब.” “मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे ?” “लिहा..... लिहिते व्हा” स्वतः कॅप्टन शिर्केंनी स्वतःची वेबसाइट डिझाइन केली होती आणि त्यावर ते मार्ग दर्शन करणारे लेख लिहायचे.” “पण लिहायला वेळ कुठे आहे ?” मी उगाच अडचण मांडली. “अरे वा, फेसबुकवर बरं च काही लिहिता, मग ब्लॉगवर लिहा की” कॅप्टनने पटकन माझी नस पकडली. “हो पण मराठीत लिहिणे...” मी उगाचच झंजट नको म्हणन ू कहिनाकाही कारण काढत होतो. “अहो गग ू ल महाराज आहे त की” कॅप्टनने मला एकदम क्लीन बोल्डच केलं. “हो पण मी एक साधा माणस ू , मी काय लिहिणार?” मी एक नवीन अडचण उपस्थित केली. “अहो तुमचे अनुभव लिहा की, कदाचित त्यांतन ू च तुम्हाला तुमच्या भविष्याच्या दिशा मिळतील आणि इतरांनाही फायदा होईल. “हो पण माझे अनुभव कोण वाचणार?” मी कसही करून हे टाळण्याचा प्रयत्न करत होतो. “का नाही वाचणार? अहो आजकाल

पू र्व गं ध २ ० १ २ 35

मराठीत तांत्रिक गोष्टी लिहिणारे बोटावर मोजण्याइतके आहे त, त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांचे मार्ग दर्श न फार आवश्यक झाले आहे .” “हा, पण तरीही, लिहिणे म्हणजे.....” “मग व्हिडिओ ब्लॉग करा, ते अधिक सोपं अन चांगलं. तुमच्याकडे तसंही चांगला वेबकॅम आहे च.” “पण मला अजन ू ही पटत नाहीय हे ”. “दुसऱ्याला मदत करणे पटत नाही?”. “नाही ते तर पटलंय मला, पण ब्लॉगच्या माध्यमातन ू खरं च फायदा होईल?” “त्याचा विचार तुम्ही करूच नका. तुम्ही तुमचं ज्ञान वाटायला सुरू करा, बघा आपोआप लोकच तुम्हाला सांगतील की तुम्ही प्रत्यक्ष हजर नसतानाही तुमचा त्यांना त्यांच्या जीवनात किती फायदा झाला ते. अहो लोकांना नवीन ज्ञान, तंत्रज्ञान हवंय पण मराठीतन ू , कारण २-३ तासाच्या गोष्टीसाठी इंग्रजी शिकणे म्हणजे द्राविडी प्राणायाम होईल. अजन ू ही लोकं कंप्युटर विकत घेणे टाळतात. कारण काय, तर बिघडला तर काय करायचं ह्याची प्राथमिक माहितीसुद्धा मराठीत नाही. मग काय, लुबाडणे सुरू होते. तुम्ही जर हि माहिती जरी दिली, किंवा साधे साधे सॉफ्टवेअरबद्दल मराठीत व्हिडिओ उपलब्ध केले तरी लोकं तुम्हाला धन्यवाद देतील. अर्थात तुम्ही मॅनेजमेंटबद्दलही सांगू शकता, इलेक्ट्रॉनिक्सबद्दल, तुमच्या आवडत्या विषयाबद्दल. फक्त तुमचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यं त पोचणे गरजेचे आहे .” “हम्म !” मी थोडा विचार करू लागलो. “अर्थात, असली मदत कदाचित तुम्हाला कोणी केली नसेल, केलेली मदत दुसऱ्या


स्वरूपात असेल, पण ती मदत नसती तर तुम्ही इथपर्यं त पोहचू शकले असते का? आज एकास एक नव्हे तर एकास अनेक प्रमाणात मदत हवीय. कोणास ठाऊक, तुमच्या एका व्हिडिओने एखाद्याचे आयुष्यच बदलन ू जाईल”. मला एकदम माझ्याच आयुष्यात मला मदत करणाऱ्यांचे चेहरे डोळ्यांसमोरून तरळून गेले. खरं च हे लोकं माझ्या आयुष्यात आले नसते तर? पण याचा आणि सुरुवातीला कॅप्टन म्हणाले होते त्या “वारसदाराचा” काय संबंध. “आपण स्वतःजवळचे ज्ञान पुढच्या पिढीला दिले असते आणि पुढच्या पिढीला स्वतःचे करतृ त् ्व गाजवण्याची संधी दिली असती, तर कित्येक साम्राज्य, पक्ष, सामाजिक संघटना, कंपन्या बुडण्यापासन ू वाचले असते. पण आपण दुसरी फळी निर्माणच होऊ दिली नाही आणि मग कित्येक वर्ष इंग्रजांशी महात्मा गांधी एकटेच लढत राहिले, पण राजकीय नेततृ ्वाच्या अनेक फळ्या तयार झाल्या नाही किंवा होऊ दिल्या नाही. अकबराने एकट्यानेच कित्येक वर्षे राज्य केले. स्वातंत्रोत्तर काळात कित्येक कंपन्या, साखर कारखाने, कापड गिरण्या आणि कापस ू कारखाने निर्माण झाले, अन मग नष्टही झाले. थोडक्यात ज्ञान पुढच्या पिढीला न मिळाल्याने किंवा ती मिळूनही संधी न दिल्याने आजही आपली सिस्टम व्यक्तीकेंद्रितच राहिली आहे . म्हणायला लोकशाही असली तरी, अजन ू ही आपल्याला ‘साहे ब नाही, उद्या या’ हे ऐकावं लागतं अन आपण ज्ञान नसल्यामुळे एकतर ‘उद्या’ च्या भरवशावर परततो, किंवा पैसे देऊन काम करवन ू

पू र्व गं ध २ ० १ २ 36

घेतो. आणि सिस्टमला शिव्या घालतो”. “बापरे , मीतर हा विचारच केला नव्हता”. “एकदा सुरुवात करा, आपोआप विचार सुचत जातील, लोकं जोडली जातील, मग सिस्टममध्येसुद्धा बदल घडे ल. त्यासाठी प्रत्येकवेळी रस्त्यावरच येण्याची गरज नाही”. कॅप्टन बाहे र मावळत्या सर् ू या कडे पाहत होते. “एकदा का तुम्हाला तुमच्यापेक्षाही सरस, उत्तम नेता, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापक बनवायची धन ू असेल, तर समाजात बदल घडायला फारसा वेळ लागणार नाही, म्हणन ू म्हणतो. लिहिते व्हा...” मला आज खरं च एक नवीन आविष्कार झाल्याचा आनंद होत होता. अगदीच काही-नाही तरी डिजीटल इलेक्टॉनिक्सचे माझे काही Award मिळालेले Presentations जरी मी ब्लॉगवर टाकले तरी अनेकांना त्याचा फायदा होईल, हे मला जाणवलं. उद्यापासन ू , नव्हे आजच, कॅप्टन शिर्केंच्या आशीर्वादाने, आशीर्वादरूपी ब्लॉगच्या माध्यमातन ू ज्ञान देण्यास सुरुवात करायची असे मी ठरवले अन शेवटचा एक गुलाबजाम घेऊन तोंड गोड केले.


विशेष लेख

आई तुझ्या आठवणी गाठी किती ग बांधल्या उभ्या जन्माच्या रे शीमगाठी कश्या अवचित सुटल्या एक मध्यमवयीन गहृ स्थ, त्यांच्या आईचे दु:खद निधन झालेलं. त्या ठिकाणी गेल्यावर पहायला मिळालं ते वेगळे च चित्र! बालपणीपासन ू आईच्या साऱ्या आठवणी एकवटून ते गहृ स्थ एखाद्या लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडत होते. मनात आलं, खरं च नातं मग ते कोणतंपण असो या रे शीमगाठी अशा बांधल्या गेल्या तर साऱ्याचं जीवन किती आनंदी सुखावह होईल! नाहीतर आजकालच्या या जगात वद् ृ धाश्रमांची संख्या वाढतच जाईल. परवा शेजारच्या देसाई वहिनी सांगत होत्या, त्यांच्या नात्यातील एक बाई खपू श्रीमंत होत्या.सारी इस्टेट विकली आणि मुलाकडे पुण्याला राहिला गेल्या. पण सुनेशी काही पटेना, आता मुलाने त्यांना वधृ ्दाश्रमात ठे वलं आहे . वार्ध क्याने आजारी पडल्या आहे त. त्यांच्याच मावसभावाने त्यांना फोन केला, “अरे तुझ्या आई फार अगतिक झाल्यात. आतातरी त्यांना घरी ने”, तर मुलाने फोनवरच उत्तर दिले, आईवडील तोंड शिवन ू येणार असतील तरच उपयोग होईल, नाहीतर माझ्या बायकोला काही बोललेले मला चालणार नाही! फार वाईट वाटले हे ऐकून. प्रत्यक्ष जन्मदात्यांबरोबर असे वागू शकतात मुले? लहानपणी नेत्रांचा दिवा आणि हाताचा पाळणा करून आईवडील मुलांना वाढवतात. ती चांगल्या नोकरीसाठी बाहे र पडली कि डोळे भरून आशीर्वाद देतात.

पू र्व गं ध २ ० १ २ 37

म्हणन ू का मुलांनी अशी आभाळं झेप घेतली कि घरट्याला विसरायचे? असेच एक गहृ स्थ परदेशात स्थाईक झाले आणि त्यांच्या वद्ध ृ पित्यांचे भारतात निधन झाले. मित्र मंडळींनी त्यांना फोन केला. तर त्या गहृ स्थांनी फोनवर उत्तर दिले…. “मी एवढा वेळ व पैसा खर्च करून भारतात यावे व त्यांच्या मत ृ शरीरावर अंत संस्कार करावेत असे मला वाटत नाही.तुम्हीच वडिलांच्या इच्छे नुसार अंत्यसंस्कार करावेत. मी खर्च पाठवन ू देईन.” भारतीय संस्कृ तीतील हीच का संस्कारांची परं परा! साने गुरुजींनी आईचे प्रेम त्यांच्या साऱ्या वाङमयातन ू भरभरून सांगितले. अश्या थोर संस्कृ तीचा वारसा सांगणारे आपण. नातं मग ते कोणते का असो, सुवर्ण मध्य गाठून टिकवता आले पाहिजे. पत्नीसाठी आईवडिलांना वद्धा ृ श्रमाची वाट दाखवणे काय किंवा आईवडिलांसाठी पत्नीचा अमानुष छळ करणे काय दोन्ही अतिरे कीच. माणस ू हा समाजप्रिय प्राणी आहे . घर, समाज, नातीगोती याशिवाय तो जगच ू शकत नाही. काही नाती रक्ताची असतात तर काही स्नेहसंबंधातन निर्माण ू झालेली असतात. त्याची जवळीकता मात्र ‘भावबंध’ या एकाच गोष्टीवर अवलंबन ू असते. आजी आजोबा, मामा मामी, नणंद भावजय , भाऊ बहिण, अशी कितीतरी नाती असतात. पर्ू वीच्याकाळी सासरे बुवांना मामंजी म्हटलं जाई. सुना मामंजीसमोर येत नसत. आता वैचारिक देवाणघेवाण करण्याइतकी जवळीकता निर्माण झाली आहे . सुनांनी ती टिकवली पाहिजे. आमच्या लहानपणी आजोळी गेले की मामी आईला दिवाणसाब म्हणत,


आम्हाला पाटावर बसवत, पायावर पाणी घालत, नमस्कार करत. भाचे लहान असले तरी नमस्कार करत. लहानपणी मोठी गंमत वाटत असे. थोरल्या जावेला बाईसाहे ब किंवा पुतण्यांना अहो-जावो बोलावणं यातन ू संस्कृतीचे दर्श न होत असे . प्रेम किती होतं हा विचार बाजल ू ा ठे वला तरी संस्कृतीचा भाग असल्यामुळे नाती टिकून राहत असत. अशी बरीच नाती हिशोबाच्या चौकटीत बसवली की नाती संपतात आणि ठरतो तो फक्त व्यवहार. आपणच का दर वर्षी भाऊबीज करायची ? असा पत्नीचा सल्ला पतीराजांनी मानला की भाऊ-बहिण हे नाते संपते. या जगात व्यवहार सांभाळायचे असले तरी ते कुठपर्यं त? याचे तारतम्य असायला हवे. या जगात आपण मोठे होतो तेच कोणाच्या न कोणाच्या आधाराने पण मोठे झाल्यावर हा आधारच विसरलो तर काय उपयोग? आपण ज्यांचामुळे मोठे झालो त्यांची किंमत पैशात ठे वण्यापेक्षा त्यांची प्रेमळ आठवण ठे वली, त्यांचा भावना जपल्या तर तेच मोलाचे असते. पैश्यात केले की आपलेपणा संपतो. इतिहासातील सुदाम्याचे पोहे खाणारा श्रीकृ ष्ण आपल्याला नाही का होता येणार? प्रत्येक वेळेसच दुसऱ्यांनी मला किती दिले याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मनाला ज्याच्यात समाधान वाटत ते केले तर इतरांची हिशोबी वत् ृ ती कमी होत जाते व बहु बंध दृढ होत जातात . अश्याच एका विद्यार्थिनीने आपल्या घरी वास्तुशांतीला येणाऱ्या बाई ंची चौकशी न करता उलट कार्यक्रमानंतर

पू र्व गं ध २ ० १ २ 38


कविता गुणगुणता आता पर्यं तचा सारा जीवनप्रवास डोळ्यांसमोरून निघन ू जातो आणि वाटत पैसा , सत्ता, प्रतिष्ठा, सारच खोटं आणि ओठावर शब्द येतात “जीव असे जीवात तोवरच पडती भेटीगाठी स्वर्था पायी अशा तटातट तोडू नका रे शीमगाठी”

पू र्व गं ध २ ० १ २ 39


पू र्व गं ध २ ० १ २


शिवशाहीचे स्वप्न मनोहर, शिवरायाला पडले जेव्हा हिंदुभम ू ीच्या महाराष्ट्रातुन, बाळासाहे ब घडले तेंव्हा ।।ध ृ ।। एक आसामी बहु आयामी, देतो आम्ही त्यास सलामी शिवशाहीची ज्योत पेटवी, परप्रांतीयांची गुलामी महाराष्ट्राच्या सीमा गिळूनि, भाषिक अडचण घडली जेव्हा हिंदुभम ू ीच्या महाराष्ट्रातुन, बाळासाहे ब घडले तेव्हा ।।१।। एक मनोहर मराठमोळी, शब्दांची पण तिखट गोळी कटू भाषेची झालर लेऊनि, चित्रामधुनी विनोद ओळी भुपत्रां ू चा घास गिळूनी, मराठी बाणा हरला जेव्हा हिंदुभम ीच्या महाराष्ट्रात ू ुन, बाळासाहे ब घडले तेव्हा ।।२।। हिमालयाच्या मदतीला, मर्द मराठा हो साथीला हिंदू-बांधवांची हि मनीषा, पुर्ण त्वाला केली सकला हिंदुपणाची धर्मभावना, गद्दारांनी भरली जेव्हा हिंदुभम ू ीच्या महाराष्ट्रातुन, बाळासाहे ब घडले तेव्हा ।।३।। शिवरायांचा अवतार, प्रचंड तांडव घोर प्रहार जनतेसाठी तरीही सर्वदा, प्रेमळरूपी त ू आधार मरहट्टयांच्या कर्तुत्वाची, अग्निपरीक्षा होईल जेव्हा हिंदुभम ू ीच्या महाराष्ट्रातुन, बाळासाहे ब घडतील तेव्हा ।।४।।

40

पू र्व गं ध २ ० १ २


सांगत होतो वेड्या मनाला, दोन जीवांच्या या हृदयाला प्रेम करू नकोत या प्रश्नाला, देत होतो उत्तर या जीवनाला ।। १ ।। जीवनात होता रम्य प्रकाश, साथ तुझा जेंव्हा होता पास नको वाटे तुझ्याविना कोणी, होत होता भास असा प्रत्येक क्षणी ।। २ ।। कसा दुरावा करुनी गेलीस, नको तितके बोलन ू गेलीस ठे उनी आठवणी तुझ्या जीवनाच्या, माझे स्वप्न तोडून गेलीस ।। ३ ।। म्हणन ू ठरविले मी या जगात, नाही प्रेम करीन दुसऱ्या कोणास रम्य होते ते जीवन असे म्हणन ू ी, विसरून जाईन सर्व काही क्षणात ।। ४ ।।

41

पू र्व गं ध २ ० १ २


सोनियांच्या पावलांनी, झाले तुझे आगमन. आनंदाला आले उधाण, सुखावलो आम्ही मनोमन. मिटले दोन जिवांमधील, होते नव्हते ते अंतर. प्राजक्ताच्या झाडावर, फुल उमलले लोभस संुदर. खेळ खेळता तुझ्यासवे, विसरून जातो माझे मीपण. भानावर येत मग वाटे, कशास झालो मोठे आपण. स्त्रीत्वावर चढविलास माझ्या, माततृ ्वाचा साज. काय शब्दात मांडू, मनातील ममता आज किती किती आशीर्वा द, देऊ तुला आजच्या दिनी लाभो यश आरोग्य संपती, हीच प्रार्थना ईश्वर चरणी.

42

पू र्व गं ध २ ० १ २


कपबशी कपबशी, जोडी छान जमली कशी आता आयुष्याची सोबत, कप कधीच सोडणार नाही संगत पण कालाय तस्मै नमः, सारे गेले बदलन ू जग, कपाचा झाला कॉफी मग बशीला त्याने दिला डच्चू , एकटाच ट्रेमधे बसू लागला बच्चू बशी मग बसली कुढत, एकटीच स्वयंपाकघरात रडत हळू हळू तिला उमगले, आतातर कलियुग आले म्हणाली कपा गेलास उडत, पिऊ दे चहा शौकिनांना कढत समजन ू सोने बावनकशी, तुझ्या संगतीला पडले फशी पण आता मी जाईन दिवाणखान्यात थेट, मनीप्लान्टच्या कंु डीखालची होईन प्लेट !

43

पू र्व गं ध २ ० १ २


मच्छर डबक्यावरच भंग ू भंग ू करतो, तसा मी पण रोज जातीतच लोळतो, माझीच जात, माझाच कळप, अर्र र्र मी जातीय आहे , मी कुठे भारतीय आहे ? ।। १ ।। कु णाचा राम राम, कुणाचा सलाम-वालेकुम, कुणाचा जयभीम, कुणाचा जय जिनेन्द्र, कुणाचा सत् श्री अकाल, अर्र र्र मी जातीय आहे , मी कुठे भारतीय आहे ? ।। २ ।। मी मराठी, तू बिहारी, मी बंगाली, तू मद्राशी, हटाव लुंगी बजाव पुंगी, अर्र र्र मी जातीय आहे , मी कुठे भारतीय आहे ? ।। ३ ।।

पू र्व गं ध

माझा राम, तुझा रहीम, माझा शिवाजी, तुझा भीम, ही जमीन माझी, तू उपरा आहे स, अर्र र्र मी जातीय आहे , मी कुठे भारतीय आहे ? ।। ४ ।। माझी विजयादशमी, तुझी ईद, माझी दिवाळी, तुझा ख्रिसमस, माझी बैसाखी, तुझा रमजान, अर्र र्र मी जातीय आहे , मी कुठे भारतीय आहे ? ।। ५ ।। माझा भगवा, तुझा निळा, माझा हिरवा, कुणाचा रं गीबेरंगी, ध्वज पण एक नाही इथे, अर्र र्र मी जातीय आहे , मी कुठे भारतीय आहे ? मी कुठे भारतीय आहे ? ।। ६ ।।

44

२ ० १ २


आज हि तो क्षण मला आठवतो, तुला प्रथम पहिले, आणी भारावन ू गेले, तुझ्या नजरे च चांदणं, डोळ्यात कस भरून राहिलं, बावरलेले तुझे डोळे काही सांगत होते मला, अव्यक्त भावनांना मनातच गुंतत ठे वत होतो, तुला पाहताक्षणी हे गुपित माझ्या मनाने हे रलं, व्यक्त झाल्या भावना, फुलन ू आली मने हृदयावर त्याच क्षणी नाव तुझे कोरले,

पू र्व गं ध

अजन ू ही आहे स तू निरागस, साधा, भोळा, तुझ्या वेदनांपायी अजन ू ी जीव तुटतो तसाच, तुझ्या प्रेमाच्या किरणात उमलणारी मी एक नाजक ू कळी, म्हणन ू च हे प्रेमाचे चार शब्द, फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी.

45

२ ० १ २


काल रात्री अचानक पाऊस पडून गेला अन तुझ्या भेटीची आठवण ताजी करुन गेला. के सांत अडकलेले पावसाचे थेंब झटकताना तुझं मान वळवन ू बघणं.... अन मग स्वत:शीच लाजन ू गालातल्या गालात हसणं… तुझ्या गालावर चिकटलेले ओले केस दूर करताना तुझ्या अंगावर उठलेला शहारा..... अन तुझ्या गालांनी घेतलेला गुलाबी रं गाचा सहारा… चिंब पावसात कुडकुडायचो मी थंडीने पण सहारा मिळायचा तेव्हा तुझ्या उबदार मिठीने तुझ्या ओल्या केसांत माझी बोटं जेव्हा फिरायची तुझी नजर आपसक ू च खाली वळायची काल रात्री अचानक पाऊस पडून गेला अन तुझ्या भेटीची आठवण ताजी करुन गेला. काल रात्री अचानक !

46

पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


ै माझी आई दर कृष्ण-जन्माष्टमीला ‘गुळ -पोहे ’ आणि ‘दही-पोहे ’ असा नेवद्य दाखवन ू प्रसाद करते व सर्वां ना वाटते . अशाच एका कृष्ण-जन्माष्टमीला आईने प्रसाद बनवला, पण तो थोडा जास्त झाला व उरला. घरातील लहान-थोर देखील उरलेले ‘गुळ -पोहे ’ आणि ‘दही-पोहे ’ खाण्यास कुर-कुर करू लागले. हा उरलेला प्रसाद ( सुदाम्याचे पोहे ) वाया जाऊ नयेत म्हणन ू आईला एक कल्पना सुचली आणि तिने ह्या पदार्था ची (मेथीचे पोळे ) पाक-कृती प्रत्यक्षात उतरवली . आपल्या माहिती साठी साहित्य व पाक-कृती खाली नमदू करत आहे . साहित्य : एक वाटी तांदूळ ३ चमचे मेथीचे दाणे १/२ वाटी पोहे एक वाटी गुळ १/२ वाटी दही पाऊण वाटी ओलं खोबर ( कोरियात सक ू ं वापरलं तरी चालेल ) साजक ू तपू मीठ चवीनुसार (१/२ चमचा ) कृ ती : १] तांदूळ आणि मेथीचे दाणे धुऊन पाण्यात साधारण ७ ते ८ तास भिजत घालावे . २] नंतर मिक्सर मध्ये थोडे बारीक वाटून घ्यावे . मिश्रण एकदम पातळ नसावे . ३] पोहे , खोबरे , गुळ (बारीक तुकडे करून घेणे) हे सर्व साहित्य वरील मिश्रणाबरोबर मिक्सर मध्ये थोडे बारीक वाटून घ्यावे. ४] वरील मिश्रणात मीठ व दही घालन ू ढवळून घ्यावे. हे तयार झालेले मिश्रण २ तास झाकून ठे वावे. ५] तव्यावर थोडे तपू (१/२ चमचा) घालन ू पसरून घेणे, वरील मिश्रणापैकी एक डाव मिश्रण तव्यावर घालन थोडे जाडसर पसरावे . हा पोळा २ ते ४ मिनटे भाजन ू ू झाल्यावर परतन ू दुसऱ्या बाजन ू े भाजण्यास घ्यावा. व सर्व बाजंन ू ी पुन्हा थोडे तपू सोडावे. थोडा लालसर भाजन खमं ग वास आल्यानं त र पोळा तव्यावरून उतरवन ू ू प्लेट मध्ये गरमागरम सर्व्ह करावा. पोळ्याबरोबर आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे तोंडी लावायला घ्यावे. थंडीच्या दिवसात हा पोळा आवर्जून खावा कारण पोळ्यामधील गळ ू हा पौष्टिक व उष्णतावर्धक असतो तसेच मेथी पोटातील विकारांवर उपयुक्त आहे .

47

पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध

टिप : आपापल्या चवीनुसार गुळाचे प्रमाण कमी अथवा अधिक घ्यावे. सौजन्य व मळ ू संकल्पना : श्रीमती विमल कबरे (माझी आई)

48

२ ० १ २


आपण विविध प्रकारचे सँडवीज खातो, उदा: वेज सँडवीज, चीझ सँडवीज, ग्रिल सँडवीज, चटणी सँडवीज, जाम सँडवीज इत्यादी. हा असाच एक पौष्टिक सँडवीज, ज्यामध्ये बहु गुणी केळ आणि “टँगी टोमॅटो” वापरला जातो. लहान मुलांना व मोठयांनादेखील ह्या टोस्ट सँडवीजची थोडी गोड, थोडी आंबट, थोडी तिखट व कुरकुरीत चव खपू आवडते. एकदा बनवन ू आणि खाऊन पहा आणि सांगा कशी चव लागते तुम्हाला? साहित्य व कृती खालील प्रमाणे आहे . साहित्य : (तीन टोस्ट सँडवीजसाठी) सहा ब्रेडचे स्लाइस सहा चमचे बटर दोन केळी (केळी छोटी असल्यास तीन घेणे ) दोन टोमॅटो अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर एक चमचा लसण ू चटणी तीन चमचे दाण्याचा कूट (शेंगदाणे भाजुन केलेला)

कृ ती : १] टोमॅटो चिरून त्यातील बिया काढून बारीक फोडी करून घेणे . २] केळ्याच्या बारीक फोडी करून घेणे . ३] केळी, टोमॅटो, तिखट, मीठ, साखर, लसण ू चटणी, दाण्याचा कूट हे सर्व एकत्र करून घेणे . ४] ब्रेड स्लाईसच्या एका बाजल ू ा बटर लावावे. बटर लावलेली बाजू तव्यावर ठे वावी व नंतर त्यावर वरील मिश्रण व्यवस्थित पसरावे . ५] त्यावर ब्रेडचा स्लाईस ठे ऊन वरून बटर लावावे. भाजताना किंचित दाब देऊन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन होईस्तोवर भाजावे. आणि झाले तुमचे टोस्ट सँडवीज खायला तय्यार 49

पू र्व गं ध

२ ० १ २


पू र्व गं ध

तळ टिप : १] लसण ू चटणी नसल्यास, दोन पाकळ्या लसण ू + दोन चमचे सुके खोबरे + १ चमचा लाल तिखट एकत्र मिक्सर मध्ये वाटून वापरावे. २] हे toast sandwich गरमच सर्व्ह करावे व गरमच खावे म्हणजे त्याची कुरकुरीत चव ( crispy taste ) छान लागते.

50

२ ० १ २


भोपळ्याचे घारगे हा खपू पर्ू वीचा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे . मल ू तः हि एक प्रकारची गोड पुरी ज्याचा मध्ये लाल भोपळा (म्हणजेच इंग्लिश मध्ये पम्पकिन ) हा महत्वाचा घटक वापरला जातो. पर्ू वी माझ्या शाळे च्या दिवसांमध्ये आई हा पदार्थ नेहमी बनवायची. पण हल्लीच्या काळामध्ये क्वचितच हा पदार्थ केलेला दिसन ू येतो आणखी कोरियामध्ये तर शक्यता कमीच. त्यामुळे आज मी संधी घेवन ू सर्वाना आठवण करू देऊ इच्छिते कि आपण हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ कोरियन हे ल्लोवॆन साठी, करण्यासाठी सोपा, प्रवासामध्ये घेवन ू जाण्यासाठी सोपा असा पदार्थ आपण ९-१० दिवस फ्रीज शिवाय सुद्धा टिकवन ू त्याचा आस्वाद घेऊ शकता. साहित्य :लाल भोपळ्याचा फोडी (साले काढून) - २ कप किसलेला गुळ - १ कप गव्हाचे पीठ - १ कप शुद्ध तपू -१ चमचा मीठ - एक चिमुट तळण्यासाठी तेल

पू र्व गं ध

कृ ती :१. भोपळ्याचा फोडी कुकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह-ओव्हन मध्ये शिजवन ू घ्याव्यात. २. फोडी गरम असतानाच त्या मध्ये गुळ घालावा आणि त्यामध्ये तपू घालन ू गॅसवर गरम करून एकजीव करावे. (फोडी व्यवस्थित शिजल्या असतील तर मिश्रण छान एकजीव होते). ३. मिश्रण पातळ झाले कि त्यात मावेल इतके गव्हाचे पीठ घालावे व चवी पुरते मीठ घालन ू मिश्रण थोडावेळ झाकून ठे वावे. ४. पुऱ्या एक एक करून लाटाव्यात किंवा मोठी जाडसर पोळी लाटून त्याच्या लहान पुऱ्या करून त्या गुलाबीसर रं गावर तळून काढाव्यात. मग झाले गोड-गोड घारगे तय्यार !

51

२ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २

टीप १. गुळामध्ये जीवन-सत्व, जसे लोह भरपरू प्रमाणामध्ये असते. २. इथे मी छोटा भोपळा वापरला आहे . भोपळ्याच्या बीयासुद्धा खपू पौष्टिक असतात.

52


कमीतकमी मसाले वापरून आरोग्यपर ू ्ण पाककृती. जरूर करून पहा! तुम्हा सर्वाना नक्की आवडे ल. साहित्य : १ पेंडी पालक (सिगुम्छीम) १ कप कॉर्न (मक्याचे) दाणे ( फ्रोझन स्वीट कॉर्न वापरले तरी चालतील) १ मोठा कांदा १ मोठा टोमॅटो २ हिरव्या मिरच्या चवीसाठी १/२ इंच आल्याचा तुकडा १/२ चमचा जिरे १/४ हळद पावडर ताजे क्रीम (Fresh Cream) आणी चीज जरुरीप्रमाणे चिमुटभर हिंग चवीपुरते मीठ आणि साखर फोडणीसाठी तेल कृ ती : १. पालक स्वछ धुवन ू उकडून घावा. मक्याचे दाणे सुद्धा थोडे मीठ टाकून उकडून घ्यावेत. २. कांदा आणि हिरव्या मिरच्या व आले-लसण ू मीक्सरमधन ू बारीक करून घ्यावा . टोमॅटोची पेस्ट वेगळी मीक्सरमधन ू काढावी. ३. कढईमध्ये तेल गरम करून हिंग-जीऱ्याची फोडणी द्यावी आणि १५-२० सेकंदानी कांदामिरचीची पेस्ट घालन ू कांदा तांबस ू लाल होईतोपर्यं त हलवत राहावे.लगेच टोमॅटोची पेस्ट घालन ू तेल सुटे पर्यं त शिजवुन घ्यावे. ४. नंतर थोडी हळद पावडर घालन ू थोडे परतावे व धने-जिरे पड ू आणि बारीक केलेला पालक घालन ू चवीपुरते मीठ साखर घालवे. एक उकळी आणन ू त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे घालन ू तयार झालेले मिश्रण ५ मिनिटे बारीक गॅस वरती शिजू द्यावे. ५. त्यानंतर गॅस बंद करून त्या मध्ये वरून क्रीम आणि चीज घालन ू चपाती किंवा भाता बरोबर खाण्यास द्यावे. 53

पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २ टीप:1) पालकचा रं ग हा दाट हिरवाच राहण्यासाठी पालक शिजवताना त्यामध्ये े र टाका. थोडे मीठ किंवा वेनग 54


पू र्व गं ध २ ० १ २

55


पू र्व गं ध २ ० १ २

56


शशिकांत जाधव

57


पू र्व गं ध

२ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध

२ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २


पू र्व गं ध २ ० १ २



Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.