Page 1

^maVr` ~ZmdQ>rMm • टाटा ग्परु चाamoभारतीय n{hbm ~mo "Q>mQ>m ~«°~mo' बनावटीचा पहिला रोबो _moO_mn CnH$aUo... • यंत्रमानवी स्वयंचलन AmìhmZmË_H$ टेEH$ क्नोव्हिजनचे (इचलकरंjoजÌी)! अनभु व {S´>qbJ Am{U JZ • ‘एस’चा नवीन सबस्पिं डल {S´ > q bJ_Yrb \$aH$ लाईव्ह टल सी.एन.सी. लेथ

अंक नाह ी

ठी

रीस ा

पुणे, वर्ष १ नमुना अंक जानेवारी २०१७ पाने ४४

नम न विक् ु ा

nwUo, df© 1 & Z_wZm A§H$ 1 & Am°ŠQ>m|~a 2016 & nmZo 80

धातुकाम / 1


2 / धातुकाम


प्रकाशकाचे मनोगत

'धा

तुकाम' मराठी मासिकाचा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. भारतात यांत्रिक उत्पादन क्षेत्रात वेगाने बदल अपेक्षित आहेत आणि पुढील काही वर्षात भारत या क्षेत्रात मोठी झेप घेईल, अशी जगभर हवा आहे. या संधीचा पुरेपूर फायदा उठवायचा असेल तर यंत्रशाळा व्यवहाराशी संबधि ं त सर्वांची कुशलता पातळी वाढवणे महत्त्वाचे आहे आणि ही गोष्ट केवळ प्रशिक्षणानेच साध्य होऊ शकते. आजतरी, आपल्या देशात या प्रशिक्षणासाठी इंग्रजी भाषेचाच वापर करावा लागतो. परंतू या क्षेत्रातील 'जमिनी'वरचा (शॉप फ्लोअरवरचा) बहु सखं ्य कामगारवर्ग इंग्रजी जाणत नाही किंवा त्याला ती भाषा नावापुरतीच येत.े या वर्गाचा उत्पादनव्यवहारात सुजाण, सक्रीय सहभाग असल्याशिवाय आपली कारखानदारीची उत्पादकता वाढणे ही कठीण गोष्ट आहे. सामान्य माणसाला तंत्रकुशल बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये तंत्रविषयक पुस्तके आणि मासिके प्रकाशित होणे महत्त्वाचे आहे. आजचा कामगार बहु तांशी लहान गावांमधून येतो आणि तो बहु दा स्थानिक भाषेतनू आठवी किंवा दहावीपर्यंत शिकले ला असतो. त्याला यंत्र-साक्षर बनविण्यासाठी प्रादेशिक भाषेत प्रशिक्षण देणारी पुस्तके देणे ही प्राथमिक गरज आहे. त्याचप्रमाणे एकदा शिकले ले ज्ञान ताजे ठे वण्यासाठी आणि सतत येत राहणाऱ्या नव्या तंत्रांची माहिती मिळवण्यासाठी मासिकांचे महत्त्व आहे. पुस्तकांचे आणि मासिकांचे आपापले महत्त्व आहे. पुस्तके साधारणपणे एकदाच वाचली जातात. त्यानंतर ती जरूर पडल्यास

संदर्भासाठी उघडली जातात. मासिके दर महिन्याला येत राहतात. सहजपणे का होईना, ती अनेकांकडू न चाळली जातात. काही वेगळे दृष्टीसमोर आले तर त्याची सहकाऱ्यांबरोबर चर्चाही होते. कुणाला कुतूहल वाटले तर तो या विषयावरची इतर माहिती शोधून वाचतो. अशा तऱ्हेने नव्या माहितीच्या प्रसाराचे मोठे काम मासिकांमुळे होऊ शकते. मराठी भाषेत तंत्रविषयक ले खनाची परंपरा नाही. त्यामुळे 'उद्यम प्रकाशना'चे भाषाधोरण ठरवताना अनेक वादविवाद झाले . वर्क शॉपमधील कामासाठी बोलताना आपण सर्रास इंग्रजी शब्द वापरतो. जसे बोलतो तसेच लिहायचे असे ठरवल्यास फारच धेडगुजरी लिखाण तयार होते. त्याउलट, प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द तयार करून लिहायचे म्हटले , तर क्लिष्ट, अनोळखी भाषा तयार होते. तेव्हा दोन्हींचा सुवर्णमध्य काढू न काम करावे लागते. कामगार प्रशिक्षणासाठी लिहिले ल्या पुस्तकात शक्यतो इंग्रजी शब्द टाळायचे आणि मासिकातील लिखाणात इंग्रजी शब्दांचा अतिरेक टाळू न मराठी बोलीभाषा वापरायची, असा आमचा प्रयत्न राहील. मासिकात वापरले ल्या भाषेसब ं ध ं ी आणि मराठी प्रतिशब्दांबद्दल वाचकांच्या चर्चेसाठी दर महिन्याला एक पान राखून ठे वण्याचा आमचा विचार आहे. या पहिल्या अंकात वापरले ल्या भाषेसब ं ध ं ी आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रकाशन क्षेत्रातील हे आमचे पहिले च पाऊल आहे. मासिकाच्या एकंदर स्वरुपाबद्दलची आपली मते आम्हाला जरूर कळवा. उत्तरोत्तर सुधारणा करण्यासाठी आम्हाला त्याचा निश्चित उपयोग होईल.

• मािसक प्रकाशन क्षेत्रातील हे आमचे पहिले च पाऊल आहे. तेव्हा पहिला अंक प्रत्यक्ष बाहेर पडण्याआधी एक नमुना अंक काढावा आिण जाणकारांकडू न अंकाच्या एकं दर स्वरुपाबद्दल सूचना मिळवाव्या, असा उद्देश ठे वून आम्ही हा अंक तयार के ला आहे. धातुकामच्या पहिल्या अंकासाठी तयार के ले लाच काही मजकूर, आम्ही या नमुना अंकासाठी वापरला आहे. • नमुना अंक ४० पानांचा आहे. पण धातुकामचे नेहमीचे अंक कमीतकमी ८० पानांचे असतील. • मािसकांचा संसार जाहिरातींशिवाय चालू शकत नाही. विशेषकरून व्यवसायविषयक मासिकांना जाहिरातींशिवाय रूप येत नाही. तेव्हा नव्या मासिकाच्या रंगरुपाची जाहिरातदारांना कल्पना देण्यासाठीही नमुना अंकाची आम्हाला मदत होणार आहे. • हा अंक निवडक व्यक्तींना आणि जाहिरातदारांना विनामूल्य पाठवित आहोत.

धातक ु ाम / 3


आडव्या आिण उभ्या मशी�नंग स�टरसाठ�

हत्यार बदल उपकरणे (अॉटोमॅ�टक टू ल च�जर) हत्यार बदल उपकरणे (ATC) बनवणार� ‘�ग�त’ ह� भारतातील एकमेव कंपनी आहे . या कंपनीचे एट�सीचे 70 ट�े उत्पादन जगभरात �नयार्त होते.जमर्नी, इटल�, स्पेन, िस्वत्झल� ड, िसंगापूर, चीन अशा �व�वध दे शात �ग�त एट�सी �नयार्त होतात.

#19 & 20, (Plot No. 467 - 469), IV Phase, 12th Cross, Peenya Industrial Area, Bangalore - 560 058. INDIA.

2836-1543 Fax : (+91-80) 2836-1549.E-mail : info@pragatiautomation.com URL : http://www.pragati-automation.com 4 / Tel. धात:ुक(+91-80) ाम


सपं ादकीय सा

ठ वर्षांपूर्वी भारत, चीन, तैवान आणि कोरिया या चार आशिया खंडातील राष्ट्रांमध्ये एकाच सुमारास मशिन टू ल कारखानदारीला सुरुवात झाली. साठ वर्षांपूर्वी आपल्या बरोबरीचे असले ले चीन, तैवान, कोरिया आज आपल्याला मागे टाकू न कु ठच्याकुठे पुढे निघूून गेले आहेत. गेल्या वर्षीच्या जगातील मशिन टू ल उत्पादनाच्या आकडेवारीप्रमाणे, जगातील ४० टक्के मशिन टू ल्स या तीन देशांत बनली. (चीन २८%, तैवान ५% आणि दक्षिण कोरिया ६%) या तुलनेत जागतिक उत्पादनात भारताचा वाटा के वळ ०.९% होता. हीच परिस्थिती इतर अनेक उत्पादन क्षेत्रात आहे. परिणामी, चीन, तैवान, कोरियातला सामान्य माणूस उत्साही आणि समृद्ध आयुष्य जगतो, मात्र आपल्याकडील सामान्यांचे कष्टाचे जिणे हे चालू च राहते. मागील पन्नास वर्षांपासून अंकनियंत्रित (सीएनसी) यंत्रांचा जमाना सुरू झाले ला आहे. पन्नास वर्षांनतं रही ही यंत्रे बनविण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीपैकी कास्ट आयर्न आणि स्टील सोडू न कोणतीच गोष्ट भारतात बनत नाही. सीएनसी सिस्टिम, स्पिंडल ड्राइव्ह, सर्वो ड्राइव्ह, बॉल स्क्रू, स्पिंडल बेअरिंग्ज इत्यादींपैकी काहीही आपल्याकडे बनत नाही. या सर्व गोष्टी चीन आणि तैवानमध्ये कित्येक वर्षांपासून बनत आहेत. यासाठी थोडेसे वरच्या पातळीचे तंत्रज्ञान लागते. असा कोणताही यंत्रघटक आपल्याकडे बनत नाही. येत्या एक-दोन वर्षांत ही परिस्थिती बदले ल अशी चिन्हे आहेत. तसे खरोखरच होईल अशी आशा करुया. मशिन टू ल्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल येथे योग्य किं मतीत मिळतो. येथील मनुष्यबळाचा खर्च तैवान, कोरियाच्या तुलनेत खूपच कमी आहे. इंजिनिअर्स मिळण्यात अडचण नाही, मॅनेजमेंट गुरू तर पावलोपावली भेटतात. अशा प्रकारे या क्षेत्रात मानाचे स्थान मिळविण्यासाठी लागणारी सर्व सामुग्री आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात मात्र आपली कामगिरी नगण्य आहे. अंतर्मुख होऊन याची कारणे शोधण्याची नितांत गरज आहे.

आज कधी नव्हे एवढी या क्षेत्रात झेप घेण्यासाठी भारताला अनुकूल परिस्थिती आहे. चीन, तैवान, कोरिया हे देश दिवसेंदिवस श्रीमतं होत असल्याने तेथील कामगारांचे पगार वाढत आहेत आणि एकं दरच उत्पादनखर्च वाढत आहेत. भारतातील उत्पादनखर्च मात्र जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे म्हटले जाते. मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया'नेही थोडी हवा तयार झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, 'पुढची पाच वर्षे तरी भारताची आहेत' असा समज तैवानमधील कं पन्यांमध्ये आहे. तैवानी पाठिं ब्यावर कोइम्बतूर आणि राजकोटला दोन कारखाने सुरू झाले आहेत. पुढील वर्षभरात आणखी नवीन कारखाने देशात उभे राहण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास एका दृष्टीने आपल्या स्थानिक कारखानदारीची, परदेशी व्यवस्थापनाच्या नव्या कारखान्यांशी स्पर्धा देण्याच्या ताकदीची ती परीक्षाच ठरेल! मागील चार वर्षांत भारतीय मशिन टू ल व्यवसायाची वाढच झाली नाही. यावर्षी अचानक सर्वांना भरपूर मागणी आल्याने, पुढील पाच वर्षे तेजीची राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे लोक उत्साहात आहेत. या परिस्थितीचा, उत्साही मनस्थितीचा उपयोग करून काही नव्या वाटे वर आपला उद्योग नेता येईल काय? मागील चार वर्षांसारखी मरगळ पुन्हा येऊ नये यासाठी कसे प्रयत्न करावे? जाणकार वाचकांची या विषयावरील मते ‘वाचकांच्या पत्रव्यवहारा’त देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मशिन टू ल उद्योगाची एकं दर गुणवत्ता पातळी सुधारायची असेल तर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रादेशिक भाषांतून तंत्रशिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे, असे आम्हाला वाटते. याच दृष्टिकोनातून आम्ही 'उद्यम प्रकाशना'च्या कामाला सुरुवात के ले ली आहे. अशोक साठे

मुख्य संपादक

धातुकाम / 5


A Zw H«$ _ {U H$m स्वयंचलन: विकासाचा आश्वासक मार्ग

निलेश कुलकर्णी ...........................................09

रोबो - आता सर्वांसाठी

अमित भिंगुर्डे ..............................................15

छोट्या आकाराच्या भागांचा पुरवठा करणारे स्वयंचलन

मोनीश शेटे..................................................21

‘एस डिझायनर्स’चा ‘सब िस्पंडल’ सीएनसी लेथ

अशोक साठे .............................................25

बॉल स्क्रू - सल ु भ आणि अचूक यांत्रिक हालचालीचा पाया

व्ही. व्ही. मजु मु दार ........................................30

भाषा पे चर्चा   Ama EZ Am` g§X^© H«$.   _w»` g§nmXH$ … AemoH$ gmR>o

...............................................................36

उत्पादने

  g§nmXH$ … XrnH$ XodYa

...............................................................39

  ghmæ`H$ g§nmXH$ … àem§V Omoer, सई वाबळे

लेखनासाठी आवाहन

  _wÐH$ … प्रतिरूप मद्रु ण   aMZm Am{U _m§S>Ur … प्रभाकर भोसले, विशाल जाधव   `§Ì {MÌo … YraO bmohma, {demb OmYd   àH$me{MÌo (ñd`§MbZ boI) … _mohZ amZSo>   तांत्रिक सहाय्य : विनीत साठे, संजीव लाड   कार्या लयीन सहाय्य : जयश्री मगुं ी

6 / धातुकाम

...............................................................40

जाहिरातींसाठी आवाहन

...............................................................4२ ‘धातुकाम’, प्रकाशक भारत जोशी यांनी उद्यम प्रकाशन प्रा.लि. यांचेसाठी प्रतिरूप मुद्रण, प्लॉट नं. १२, लेन नं. ५, रामटेकडी इंडस्ट्रीअल इस्टेट, हडपसर, पुणे-४११०२८ येथे छापून, उद्यम प्रकाशन, आनंदघन, तिसरा मजला, प्लॉट नं. ४/११३, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ४११०५२ येथे प्रसिद्ध के ले. प्रकाशकांच्या लेखी अनुमतीशिवाय संपूर्ण अथवा अंशतः पुनःप्रकाशनास पूर्ण तः बंदी आहे. सर्वाधिकार सुरक्षित.


वेचक स्वयंचलन: विकासाचा आश्वासक मार्ग उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर उत्पादकतेचा विचार के ल्याशिवाय पर्या य नाही आणि उत्पादकतेसाठी स्वयंचलन गरजेचे आहे.

रोबो - आता सर्वांसाठी

लेखक परिचय निलेश कुलकर्णी

अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर FIE सारख्या प्रगतीशील समूहासोबत त्यांनी कामाला सरुु वात के ली. काळाची पावले ओळखून काम करण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीच्या ‘टेक्नोव्हिजन’ची धरु ा सध्या ते सांभाळत आहेत.

अमित भिंगर्ु डे

‘TAL’ने भारतीयांसाठी भारतीयांनी तयार के लेला भारतीय बनावटीचा पहिला रोबो, ‘टाटा ब्रॅबो’ नक ु ताच बाजारात येत आहे.

१९९१ साली अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन अमित भिंगुर्डे टाटा कं पनीत रुजू झाले. सर्वसामान्य उद्योजकाच्या आवाक्यातील रोबो तयार करण्याचा ध्यास घेऊन २०१४ पासून ते ‘TAL’चे ‘सीओओ’ म्हणून कार्यरत आहेत.

छोट् या आकाराच्या भागांचा पुरवठा करणारे स्वयंचलन

मोनीश शेटे

लहान किवा छोट् या आकाराच्या भागांची हाताळणी करण्याच्या प्रक्रियेचे स्वयंचलन करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ओरिएन्टेशन. म्हणजे प्रत्येक भाग एका विशिष्ठ दिशेने/पद्धतीनेच पढु ील प्रक्रियेसाठी पढु े सरकवला जाणे.

व्हायब्रेटरी फिडर्समध्ये २८ वर्षांपेक्षा जास्त अनभु व असलेले मोनीश शेटे हे एल्सिंट कं पनीचे मखु ्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) आहेत. त्यांनी राबवलेल्या योजना, कामातील सातत्य आणि नाविन्यता यांमळ ु े आज जवळजवळ ३० हून अधिक देशांमध्ये एल्सिंटची उत्पादने निर्या त होत आहेत.

‘एस’चा ‘सब िस्पंडल’ सीएनसी लेथ

अशोक साठे

बॉल स्क्रू - सल ु भ आणि अचूक यांत्रिक हालचालीचा पाया

व्ही.व्ही.मज ु ुमदार

पारंपरिक पद्धती आणि टर्नमिल पद्धती यांचा उत्पादन खर्चासंबधं ी घेतलेला तल ु नात्मक आढावा.

९० चे दशक, भारतासारख्या विकसनशील देशात जिथे बॉल स्क्रू या तंत्रज्ञानाची ओळख नक ु तीच भारतीयांना होत होती अशा वेळी, १९८४ साली ‘इंस्टिट् यटु ऑफ अॅप्लाईड रिसर्च’ (IAR) या बॉल स्क्रू बनवणाऱ्या उद्योगाची सरुु वात झाली.

‘मशिन टूल डिझाईन’मधील ऋषितलु ्य व्यक्तिमत्व असलेले अशोक साठे हे बंगळुरू येथील ‘प्रगति ऑटोमेशन’चे चेअरमन तसेच ‘एस’ (ACE) मायक्रोमॅटिक ग्परु चे एक वरिष्ठ संस्थापक सदस्य आहेत. भारताच्या एकूण मशिन टूल उत्पादनामध्ये या ग्परु चा वाटा २५% आहे. १९६२-१९६८ या कालावधीमध्ये स्वित्झर्लंड येथील ‘शॉबलिन’ या कं पनीमध्ये उमेदवारी करत असताना व्ही.व्ही.मज ु मु दार यांनी बॉल स्क्रू निर्मितीच्या सर्व प्रक्रियांचा संपूर्ण अनभु व घेतल्यानंतर, भारतात अशा प्रकारच्या बॉल स्क्रूचे उत्पादन घेण्याचा निर्धार के ला. भारतात तयार न होणारी उत्पादने भारतात तयार करणे हाच यामागील उद्देश होता. याच विचारातून ‘इंस्टीट् यटु ऑफ अॅप्लाईड रिसर्च’ चा (IAR) जन्म झाला.

धातक ु ाम / 7


8 / धातुकाम


निलेश कुलकर्णी

स्वयचं लन : विकासाचा आश्वासक मार्ग

जच्या युगातील 'स्वयंचलन' हा यांत्रिकीकरणाचा उच्च बिंदू समजला जातो व त्याचे 'दुसऱ्या औदयोगिक क्रांतीची वाटचाल' असे यथार्थ वर्णन केले जाते. स्वयंचलनाच्या साध्या व जास्त प्रचलित तंत्रात वेगवेगळ्या उत्पादनक्रियांची सांगड घालू न त्या एकामागून एक, आपोआप घडू न येतील असे करणे, हा स्वयंचलनाचा एक प्रकार आहे. त्याला एकात्मीकरण किंवा प्रगत यांत्रिकीकरण असे म्हणतात. औद्योगिक क्षेत्रात हाच प्रकार प्रामुख्याने आढळतो. उदा. मालाची चढउतार, त्याची

वाहतूक व कच्चा माल योग्य यंत्रात भरण्याची क्रिया इत्यादींमधील स्वयंचलनामुळे श्रम व वेळ वाचतात. उत्पादकता अनेक पटींनी वाढत असल्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी तसेच आर्थिक विकास वाढविण्यासाठी स्वयंचलनाचा वापर अटळ ठरतो. टे क्नोव्हिजन दुचाकीसाठी लागणारे पार्टस् बनविण्याचे काम करते. याच संदर्भातील एक पार्ट बनविण्यासाठी, पूर्वी कंपनीमध्ये ३ सी.एन.सी. मशिनचा एक गट/सेल होता.

यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा वेळ (सायकल टाईम) खूप कमी असल्यामुळे प्रत्येक मशिनवर एक यंत्रचालक (ऑपरेटर) लागायचा. म्हणजे प्रत्येक गटात प्रत्येक पाळीला (शिफ्ट) ३ माणसे लागायची, म्हणजे ९ माणसे प्रत्येक गटाला. असे कंपनीकडे ३ गट आहेत. म्हणजेच ३ गटांसाठी पूर्वी २७ यंत्रचालक होते. अशा प्रकारच्या स्वयंचलनामध्ये एकाच प्रकारचे अनेक जॉब होत असल्याने कार्यक्षमता (एफिशियन्सी) किमान ९०%

धातुकाम / 9


मिळणे अपेक्षित होते, पण ती ६५-७०% मिळायची. ही कार्यक्षमता सायकल टाईमप्रमाणे मूल्यांकित केली जायची. या जुन्या पद्धतीमध्ये (आकृती क्र.२) अनेक प्रकारच्या मर्यादा होत्या. जसे की, प्रक्रिया करण्याचा काळ अगदीच कमी असल्यामुळे, ऑपरेटरला खूप वेळा मॅन्युअली जॉब लोडिंग अनलोडिंग करावे लागायचे आणि त्यामुळे थकवा (ऑपरेटर फटिग) जास्त येत होता. त्याचा ऑपरेटरच्या कार्यक्षमतेवर परिणाम व्हायचा. परिणामी सायकल टाईमच्या हिशेबाने अपेक्षित उत्पादन मिळायचे नाही. मॅन्युअल काम असल्यामुळे ऑपरेटरला येणारा थकवा, तयार होणारा कचरा स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ, हत्यार बदलण्याचा वेळ आणि मॅन्युअल लोडिंग

अनलोडिंगमध्ये कमी-जास्त होणारा वेळ, तसेच सुधारणेसाठी ऑपरेटरकडू न काही प्रमाणात होणारा विरोध इत्यादी कारणांमुळे उत्पादन मिळण्यावर मर्यादा यायच्या. ऑपरेटर सोडू न जाणे, नवीन ऑपरेटरला पुन्हा प्रशिक्षण देण,े नवीन ऑपरेटर स्थिरस्थावर होणे इत्यादी गोष्टींमुळेसुध्दा खूप वेळ जायचा. परिणामी उत्पादन घटण्याचे प्रमाण मोठे होते. दरवर्षी ऑपरेटरचा पगार वाढत जायचा, मात्र त्याप्रमाणात उत्पादकता वाढायची नाही. परिणामी उत्पादनाचा एकूण खर्च वाढायचा. त्यामुळे स्वस्त उत्पादन निर्माण करणे खूप अवघड आणि गुंतागुंतीचे होते. या समस्यांचा विचार केल्यानंतर लक्षात आले की, उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर उत्पादकतेचा विचार केल्याशिवाय

पर्याय नाही आणि उत्पादकतेसाठी स्वयंचलन गरजेचे आहे. कंपनीने स्वयंचलनासाठी बऱ्याच गोष्टींचा विचार केला. उदाहरणार्थ, स्वयंचलनाची किंमत, स्वयंचलनाची उत्पादकता, स्वयंचलनाचा वेग, स्वयंचलनाचा लवचिकपणा - जॉब बदलला तर स्वयंचलन थांबू नये. आहे त्या स्वयंचलित यंत्रणव े र तो व्यवस्थित चालावा. सुट्या भागांसाठी तसेच सर्व्हिससाठी उपलब्धता (बॅक अप) आणि तयार होणाऱ्या प्रत्येक नगाची किंमत या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर कंपनीने जॉब लोडिंग आणि अनलोडिंगसाठी यंत्रमानव (रोबो) वापरून स्वयंचलन (ऑटोमेशन) करण्याचा निर्णय घेतला.

सीएनसी मशिन-२ ऑपरेशन २०

M/C १ मध्ये ऑपरेशन १०

यंत्रचालक १

सीएनसी मशिन-3 ऑपरेशन २०

सीएनसी मशिन-१ ऑपरेशन १०

कच्चा माल M/C १ जवळ

मशिनच्या चकमध्ये जॉब मॅन्युअली लोड अनलोड के ला जायचा १ कच्चा माल २ तयार माल

M/C २ मध्ये ऑपरेशन २०

M/C ३ मध्ये ऑपरेशन २०

तयार भाग

तयार भाग

• मालाची हाताळणी - सर्व हातानेच • प्रत्येक यंत्रावरील कामगार कच्चा / अर्धा तयार भाग यंत्रामध्ये बसवून काम करत असत आकृती क्र.२ - जॉब मॅन्युअली अनलोड करण्यासाठी वापरली जाणारी पूर्वीची पध्दत

आकृती क्र.१ - पूर्वीचा सेल ले आऊट

सीएनसी मशिन-२ ऑपरेशन २०

कच्चा माल M/C १ जवळ

सीएनसी मशिन-3 ऑपरेशन २०

सीएनसी मशिन-१ ऑपरेशन १०

M/C १ मध्ये ऑपरेशन १०

२ १ कच्चा माल २ तयार माल

तीन यंत्रे आणि रोबो यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारा यंत्रचालक आकृती क्र.३ - नवीन रोबोटिक सेलचा (यंत्रमानव हात) सेल ले आऊट

10 / धातुकाम

M/C २ मध्ये ऑपरेशन २०

M/C ३ मध्ये ऑपरेशन २०

तयार भाग

तयार भाग

कन्व्हेयरच्या सहाय्याने एकाच ट्रेमध्ये तयार माल जमा होतो आकृती क्र.४ - जॉब लोड-अनलोड करण्यासाठी वापरली जाणारी नवीन स्वयंचलन पध्दत


सध्या आपल्यावर बाहेरच्या तंत्रज्ञानाचा खूप पगडा आहे. त्यामळ ु े आपल्या येथील लोक नवीन आविष्काराचा विचार करत नाहीत. त्यामळ ु े स्वतः नवनवीन प्रयोग के ले पाहिजेत, नवनवीन गोष्टी घडविल्या पाहिजेत, की ज्या आपल्याला किं बहुना भारताला अजून स्वयंपूर्ण बनवतील.

या नवीन पध्दतीमध्ये कंपनीने मशिनमध्ये जॉब आपोआप लोड अनलोड करण्यासाठी एकच यंत्रमानव हाताचा वापर केला. म्हणजेच एक यंत्रमानव, तीन यंत्रे हाताळू लागला. थोडक्यात ९ माणसांचे काम एक यंत्रमानव करू लागला. सुरुवातीला जेव्हा 'टे क्नोव्हिजन'ने ऑटोमेशनचा निर्णय घेतला, तेव्हा या क्षेत्रात सर्वच नवीन होते. सर्वात प्रथम कंपनीने पहिला यंत्रमानव हात (रोबो आर्म) विकत घेतला. तेव्हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोहोंचा एकत्रित खर्च साधारण २६ लाख रुपये झाला. (यंत्रमानव हातासाठी २० लाख रुपये + हार्डवेअर आणि मशिन जोडणीसाठी ६ लाख रुपये) पहिल्या सेलच्या उभारणीच्यावेळी (इंस्टॉले शन) बाहेरची एक एजन्सी नेमली. त्या एजन्सीकडू न प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी होत असताना कंपनीच्या २ अभियंत्यांचा त्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग होता. यामुळे त्यांना इले क्ट्रॉनिक्स, इले क्ट्रिकल, सॉफ्टवेअर आणि एकत्रीकरणाच्या प्रक्रियेमधील पुरेसे ज्ञान प्राप्त झाले . त्यातूनच लोक शिकत गेले आणि मग कंपनीने स्वतःच उत्पादन प्रक्रिया स्वयंचलित करणारे बदल (ऑटोमेशन) सुरू केले .

यंत्रमानवी हात - रोबोटिक आर्म पहिल्या सेलच्या उभारणीच्या वेळी मिळाले ल्या ज्ञानाच्या आधारे, कंपनीने पुढील २ सेल उभारले . म्हणजे कंपनीने फक्त यंत्रमानव हात विकत घेतले आणि पुढील

दुचाकीच्या दट्ट्याचा भाग तयार करण्यातील स्वयंचलन

इले क्ट्रिकल्स, इले क्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर यांसारख्या गोष्टी आणि त्यांचे एकत्रिकरण कंपनीच्या स्वत:च्या अभियंत्यांनी केले . यामुळे कंपनीचा काही खर्च वाचला. कंपनीने पुढचा प्रकल्प २२.५ लाख रुपयांत पूर्ण केला. (२० लाख रुपये यंत्रमानव हात + हार्डवेअर आणि मशिन जोडणीसाठी २.५ लाख रुपये) हे रोबोटिक ऑटोमेशन कंपनीला पूर्णपणे नवीन असल्याने उत्पादनात सातत्य येण्यासाठी साधारण २ महिने गेले. उभारणीच्यावेळी काही गोष्टी करायच्या राहू न गेल्यामुळे सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या. प्रणालीच्या रचनेमध्ये काही संकल्पनात्मक चुका राहिल्या होत्या. यंत्रमानव हाताचे काम सुरू झाल्यानंतरच कंपनीला त्या समजू शकल्या. त्यामुळे कंपनीला त्यांचे डिझाइन दुरुस्त करावे लागले . साधारण २ महिन्यांनी यांत्रिक हाताने काम करणारा गट पूर्ण कार्यक्षमतेसह काम करू लागला.

सरु ु वातीच्या काही अडचणी कंपनीसाठी रोबोटिक ऑटोमेशन हे पूर्णतः नवीन असल्यामुळे आले ल्या अडचणींवर मात करून कंपनीने स्वयंचलन चालू च ठे वले . स्वयंचलनाच्या पहिल्या २ महिन्यांमध्ये कंपनीला दोन अनपेक्षित अनुभव आले . रोबोटिक ऑटोमेशनमध्ये मुख्यतः सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रणालीमध्ये अनेक इंटरलॉंक्स (एकमेकांवर अवलं बून असले ल्या क्रिया) असतात. सुरक्षिततेच्या परिणामांच्या बाबतीत तुम्ही आधीपासूनच

फोर्जिंग प्रेस

जॉब प्रेसकडे पाठविणारा सेन्सर जॉबची स्थिती पाहणारा सेन्सर बाहेर पडले ला जॉब नोंदणारा सेन्सर बाउल फिडर

धातुकाम / 11


12 / धातुकाम


फायदे

अशा प्रकारच्या स्वयंचलनामळ ु े कं पनीला नक्कीच फायदा झाला. • उत्पादकता २५% ने वाढली. • उत्पादन खर्च १३% ने कमी झाला. • एका सेलवरती ९ ऐवजी ३ ऑपरेटर लागले, म्हणजे ६ ऑपरेटर कमी झाले. • तांत्रिक कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढण्यास मदत झाली. तसेच रोबोटिक्ससारख्या प्रगत तंत्रज्ञानाशी ओळख झाली.

सतर्क राहणे आवश्यक असते. एकदा यंत्रमानव हात काम करत असताना सी.एन.सी. मशिनला धडकला आणि मशिनची मोडतोड झाली. मात्र कंपनीने त्यांच्या ऑपरेटरच्या सुरक्षिततेची काळजी आधीपासूनच घेतली असल्याने ऑपरेटरला काही झाले नाही. यांसारख्या आले ल्या अनुभवांमुळे पुढील सेलच्या उभारणीच्यावेळी कंपनीने योग्य ती काळजी घेतली. (पहिल्या सेलमधील चुकांच्या दुरुस्त्या केल्या) त्यामुळे पहिल्या २ महिन्यांमधील त्या अनुभवानंतर पुढील २ वर्षांहून जास्त कालावधीमध्ये कोणताही अपघात घडला नाही. वीज गेल्यानंतर पुन्हा रोबो सुरू होऊन उत्पादन पुन्हा सुरू करणे हे खूप अवघड काम आहे हेही लक्षात आले . वीज गेल्यानंतर काम जिथे थांबले होते तिथूनच, वीज आल्यानंतर काम सुरू होण्याची तरतूद यंत्रमानव हातामध्ये असते. पण ती प्रणाली हाताळणाऱ्या ऑपरेटरला त्याची चांगली जाण असणे गरजेचे आहे. सुरुवातीला स्वयंचलनामध्ये टू लची झीज, काही मोडतोडी किंवा छिलके टू लभोवती गुंडाळले जाणे अशा काही अडचणी आल्या. पण कंपनीने 'कायझन' तंत्र वापरून हत्यारे, हत्यारांची भूमिती, कर्तनाचे घटक, योग्य प्रोग्रॅमिंग यांच्याशी संबधि ं त काही सुधारणा केल्या, ज्यामुळे छिलके/काप (चिप्स) कुरळ्या तारांच्या स्वरूपात तयार होणे थांबले . ते लहान लहान तुकड्यांमध्ये तयार व्हायला लागले व ते कन्व्हेयरच्या सहाय्याने मशिनबाहेर पडू लागले . कटिं ग टू ल यंत्रावर

अशा प्रकारे बसवले होते की, जेणक े रून छिलके/काप यंत्राभोवती पसरू नयेत व कन्व्हेयरमध्ये जाईपर्यंत त्यांची कमीत कमी नासाडी व्हावी. पण तरीही, यात काही गडबड झाली तर ती निस्तरण्यासाठी एक ऑपरेटर सतत ३ मशिन आणि १ यंत्रमानव हात यांच्यावर लक्ष ठे वनू असतो. जर काही चुकीचे घडत असल्याचे निदर्शनास आले , तर तो लगेच सेल थांबवून ती गोष्ट दुरुस्त करून घेतो. यंत्रमानव हात उभारल्यानंतर कंपनीची त्या सेलवरची क्षमता ६५.७०% वरून ९५% पर्यंत वाढली. कारण थकवा भत्ता (फटिग अलाउन्स), लोडिंग अनलोडिंगमधला वेळेचा फरक इत्यादी खर्च शून्य झाले आणि एकसारखे उत्पादन मिळू लागले . ३ महिन्यांच्या निरीक्षणानंतर लक्षात आले की, जॉबचा उत्पादन खर्च १३% ने कमी झाला.

लघु व मध्यम उद्योग समूहांसाठी स्वयंचलन हे तसे खर्चिक आहे. त्यामुळे तिथे ऑटोमेशनचा अवलं ब करण्याआधी काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, कंपनीचे मूल्यांकन करून गुंतवणुकीचा विचार करून अंशतः ऑटोमेशन करायचे आहे की पूर्णतः, हे ठरवणे महत्त्वाचे आहे. कोणताही उद्योगसमूह जर रोबोटिक स्वयंचलन उभारत असेल तर त्यांनी सर्वप्रथम ऑपरेटरच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. स्वयंचलनामध्ये हलक्या दर्जाचे घटक/सुटे भाग वापरू नयेत, कारण दीर्घकाळासाठी ते महाग ठरतात. ज्याठिकाणी स्वयंचलनाची उभारणी केली आहे, त्याठिकाणी योग्य प्रकारचे कुंपण/अटकाव तयार करण्यात यावा. जर ऑपरेटर त्या स्वयंचलन क्षेत्रात

धातुकाम / 13


प्रवेश करणार असेल, तर त्याच्या सुरक्षतेची योग्य काळजी घेतली जावी. उदाहरणार्थ, जर कुंपणाचे दार उघडले असेल, तर पूर्ण स्वयंचलन प्रणाली आपोआप थांबेल. जर एखादा ऑपरेटर स्वयंचलन क्षेत्रात असेल आणि दुसऱ्या ऑपरेटरने स्वयंचलन सुरू करण्याचे बटन दाबले तरी स्वयंचलन सुरू होणार नाही. याची खबरदारी कंपनीने घेतली पाहिजे. कारण जर ते सुरू झाले तर त्याच्यामुळे ऑपरेटरला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. ज्याठिकाणी खरेच गरज असेल (उदाहरणार्थ, उत्पादकतेच्या वाढीची गरज, आवश्यक सुरक्षितता) अशाच ठिकाणी रोबोटिक स्वयंचलनाची उभारणी करावी. तसेच प्रत्येक नगाच्या खर्चाचा विचार केला जावा. अशा प्रकारच्या स्वयंचलनामध्ये सुरुवातीची गुंतवणूक ही फार जास्त असते. याच सर्व गोष्टींचा विचार करून, योग्य ती खबरदारी घेऊन मागील ६ ते ७ वर्षांपासून 'टे क्नोव्हिजन' स्वतःच त्यांच्याकडे गरजेचे असणारे स्वयंचलन (ऑटोमेशन) करत आहे. कंपनीने केले ली सर्वच कामे सारखीच यशस्वी आहेत. त्यातही ग्राइंडिंग यंत्रावर केले ले प्रयोग खूपच कमी खर्चाचे आणि

यशस्वी ठरले ले आहेत. येणाऱ्या २ वर्षांमध्ये ग्राइंडिंग ऑपरेशन्स आणि पॅकेजिंगच्या प्रक्रियेमध्येही स्वयंचलन उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. सध्या आपल्यावर बाहेरच्या तंत्रज्ञानाचा खूप पगडा असल्यामुळे आपल्याकडील लोक नवीन आविष्काराचा विचार करत नाहीत. त्यामुळे स्वतः नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. नवनवीन गोष्टी घडविल्या पाहिजेत, की ज्या आपल्याला किंबहु ना भारताला अजून स्वयंपूर्ण बनवतील. हल्ली प्रत्येक ठिकाणी असेही ऐकायला मिळते की 'स्किल्ड ले बर'/कुशल कामगार मिळत नाहीत, मात्र 'टे क्नोव्हिजन'ने त्यावरही मात केली. लोकांना आपण कुठल्या प्रकारचे काम देतो, किती पगार देतो या सर्वांपेक्षा त्या व्यक्तीला त्या कामामधून समाधान मिळणे महत्त्वाचे आहे. ती व्यक्ती जे काम करते, त्या कामाची पूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीकडे असल्याने आपसूकच प्रत्येकाच्या मनात आपापल्या मशिनबद्दल एक प्रकारची आपुलकी निर्माण होते. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या क्षमतेच्या शंभर टक्के वापर करून काम करते. यामुळेच कंपनीच्या कामाची पद्धत, व्यवस्था, स्वयंचलन या सर्व

प्रक्रियेमध्ये आपोआप व्यक्ती कुशल बनत गेला. तसेच मालक आणि कामगार यांमधील नाते नेहमी टिकवून ठे वल्याने कंपनीचा एम्प्लॉयी टर्नओव्हर (कर्मचारी आवकजावक) फारच कमी आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये कंपनीच्या मानव संसाधन विभागाने घेतले ली मेहनत महत्त्वाची ठरते. त्यांचे कर्मचाऱ्यांकडे व्यवस्थित लक्ष असते. कंपनीकडू न कामगारांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ट्रेनिंग सेशन्स होत राहतात. वेगवगळे पुरस्कार कंपनी त्यांना देत असते. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी कंपनी त्यांना बाहेर जायला उत्तेजन देत.े यातून जबाबदारीची जाणीव होऊन, कंपनीबद्दलची बांधिलकी वाढीस लागते.

{Zboe Hw$bH$Uu nskulkarni@technovisionindia.co.in

High Precision Clamping Heads & Chucks for Metal Cutting Machines Benefits: High Precision - Overall system precision < 10μ De-Skilled - Freedom from Soft Jaw Boring Quick Change-Over - Less than 15 sec for collet change Flexing range - ± 0.4 mm. Compensates for Oversize/Undersize Holding Dia Complete size range - 42, 65, 100 Higher Gripping force compared to Jaw Chucks Parallel Clamping - Gives best Geometrical accuracy

Precise + Flexible + Hassle free Pull-back / Dead-length Chuck Change-Over Devices

Clamping Heads Expansion Mandrels & Sleeves

& Designed

tured in India Manufac

Works: Shed No. 3, Survey No. 30/5A, Samruddhi Industrial Estate, Dhayari, Pune 411041, Maharashtra, INDIA. Email: adeptprosign@gmail.com

14 / धातुकाम


अमित भिंगर्ु डे शब्दांकन - प्रशांत जोशी

रोबो : आता सर्वांसाठी

अक्ष ४

अक्ष ३ शब्द ऐकल्याबरोबर मोठमोठ्या कंपन्यातील मोठ्या असेम्ब्ली 'रोबो-लाईन,हा त्यावर कमीतकमी मनुष्यबळ वापरून होत असले ली कामे

अक्ष ५ अक्ष २

अक्ष १

यंत्रमानवी हाताचे संकल्पना चित्र

हे चित्र समोर येत,े तसेच हे कामे करणारे परदेशातून आयात केले ले यंत्रमानवही समोर येतात. भारतातील उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, टाटा उद्योगसमूहातील 'TAL'ने भारतीय बनावटीचा रोबो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मागील दोन वर्षे 'TAL'च्या संघानी अथक प्रयत्न करून काही प्रायोगिक तत्वावरील रोबो तयार केले आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या कसून चाचण्या चालू आहेत. त्यासंबध ं ी बोलताना अमित भिंगुर्डे म्हणाले , 'सध्या आम्ही यंत्रमानवी हात (रोबोटिक आर्म) तयार करीत आहोत. त्याला 'ब्रॅबो' असे नाव दिले आहे. रोबोटिक आर्मच्या हालचाली समजण्यासाठी आपण मानवी हाताचे उदाहरण बघू. आपण हाताने जेव्हा एखादी वस्तू हलवतो तेव्हा शरीरातले पाच अवयव काम करतात. कंबर, खांदा, कोपर, मनगट आणि बोटे . या रोबोमध्ये ५ जॉइंट आणि अक्ष (अॅक्सिस) आहेत. प्रत्येक अवयवासाठी एक अक्ष (मनगटाच्या हालचालीसाठी दोन) आणि बोटांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जॉबच्या हाताळणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रिपर्स असतात. अक्षाच्या हालचालींसाठी मोटरचा वापर होतो. दोन जॉईंट् स जोडण्यासाठी अॅल्युमिनिअमचे कास्टिंग्ज वापरले आहेत आणि जॉईंटमधील

धातुकाम / 15


टाटा ब्रॅबोची संकल्पना जितकी वेगळी आहे, तितकीच ती नवीनही आहे. त्यामळ ु े रोबोटिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या उमद्या - होतकरू, नवीन काहीतरी करणाऱ्या युवा इंजिनिअर्सच्या टीमला यात सहभागी करण्यात आले. तेवीस - चोवीस वयोगटातील सर्व मल ु े-मल ु ी आयआयटी तसेच इतर अभियांत्रिकी महाविद्यालयामधून नक ु तेच बाहेर पडलेले इंजिनिअर्स आहेत. ज्यामध्ये ५० टक्के मल ु ींचा सहभाग आहे.

व्हिजन रोबो

या रोबोमधील कॅ मेरे समोर आले ल्या वस्तूचा रंग चित्रित करून त्याला जोडले ल्या संवेदकांमार्फ त (सेन्सर) संबंधित मोटरकडे योग्य तो संदेश पाठवतात आणि अपेक्षित हालचाल घडते. मोटर्सची रोटरी मोशन संबधि ं त अक्षापर्यंत नेण्यासाठी बेल्ट्स वापरले आहेत. प्रत्येक अक्षाच्या हालचालीसाठी एक मोटर आहे. या मोटर्स आपल्याला हव्या त्या डिग्रीला, हव्या त्या स्पीडला फिरवता येतात. प्रत्येक जॉईंट वेगवेगळा हलवणे हा एक भाग झाला. पाचही जॉईंट् स एकत्रितपणे जेव्हा काम करतात तेव्हा आपल्याला हवी ती हालचाल मिळते. या पाचही मोटर्स कशा फिरल्या पाहिजेत ते रोबोचा मेंदू म्हणजे कंट्रोलर ठरवतो. आर्म कुठे आहे, तो कुठे असला पाहिजे ते सर्व सेन्स करायला आतमध्ये सेन्सर्स आहेत. पाचही मोटर्सना एकाचवेळी कंट्रोलरकडू न सिग्नल्स जात असतात. एक ठराविक हालचाल (उदाहरणार्थ. एखादी वस्तू एका ठिकाणाहू न उचलू न दुसऱ्या ठिकाणी ठे वणे)

16 / धातुकाम

करण्यासाठी पाचही जॉईंटचा एकत्रित विचार करून, प्रत्येक जॉईंट त्याच्या अक्षाभोवती किती डिग्री फिरला तर अपेक्षित हालचाल होईल हे सर्व कंट्रोलरमध्ये प्रोग्रॅमिंग केले ले असते. त्याला फक्त हव्या त्या व्हॅल्यूज दिल्या की, आपोआप प्रत्येक जॉईंट सरळ रेषते पुढे मागे होतो किंवा हव्या त्या अंशात जातो किंवा वर्तुळाकार फिरू शकतो.' 'सध्या वापरात असले ले रोबो अवाढव्य असल्याने त्यांच्या किंमतीदेखील जास्त आहेत. म्हणूनच रोबोंच्या बाबतीत 'TAL'ने मोठ्या रोबोंचा (१०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त) विचार न करता, लहान लहान रोबोंचा विचार केला. त्याचा फायदा कमी वजनाचे काम करणाऱ्या लघु-मध्यम उद्योग समूहांनाही होईल.

या रोबोचा वापर मूलत: उत्पादकता तसेच उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठीच होत असतो. एक ऑपरेटर जास्त त्रास न होता १० किलो वजनापर्यंतच्या मालाची हाताळणी करू शकतो. जिथे बहु तांशी जॉबची हाताळणी हाताने होते, तिथे १० किलोच्या आतीलच जॉब असतात. सध्या अशा उद्योजकांना उपयोगी पडतील असे १० किलो किंवा कमी पे लोडची कामे करणारे रोबो बनविण्याचे ठरवले आहे.' २०१४ मध्ये अशा प्रकारचे रोबो विकसित करण्यास सुरुवात झाली. रोबोचे प्रकार हे तो हाताळत असले ल्या वजनावर, तो काम करू शकणाऱ्या अक्षांवर तसेच त्याला देण्यात येणाऱ्या सांध्यावर अवलं बून असतात. कामातील अचूकतेसाठी रोबो हा ४-५ अक्षीय असायला हवा. मुळात ४ अक्षीय


सीलं ट भरणारा रोबो

जोडांमधील खाचा बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे सीलं ट अचूक ठिकाणी आणि आवश्यक तेवढेच भरण्याचे काम हा रोबो करतो.

रोबो हे बऱ्याच ठिकाणी एका ठराविक कामासाठी वापरले जातात. पण 'टाल'ने ५ अक्षीय रोबोला प्राधान्य दिले . जेणक े रून एका कामानंतर दुसऱ्या कामासाठीही हा रोबो वापरण्यात येऊ शकतो. यामधील फक्त

करताना भिंगुर्डे म्हणाले , 'सुरुवातीला डोळ्यासमोर काही बेंचमार्क्स ठे वनू रोबोचे डिझाईन विकसित केले गेले. त्याचा कंट्रोलरदेखील (नियंत्रक - मेंद)ू भारतातच तयार केला गेला. सुरुवातीला

CENTRIFUGAL OIL CLEANER

Bhagyashree Accessories Pvt. Ltd. Pune 411041 Phone: 020-64700167 Email: inquiry@baplpune.in

तीनच भाग बाहेरून आयात केले गेले. स्टेपर मोटर्स, काही बेल्ट्स आणि पीसीबी युक्त ओ.एस. (ऑपरेटिंग सिस्टीम), बाकी सर्व भाग भारतातच तयार करण्यात आले . रोबो तयार करण्याची प्रक्रिया विशद

OIL FILTRATION EQUIPMENT FOR ONLINE & OFFLINE APPLICATION

1 Automotive - Truck, bus, etc 2 Mining -Dumper, Dozer, etc

8 Furnace oil Filtration 9 Bio-Diesel Filtration

3 Construction - Concrete mixer, compressor, etc

10 Quenching Oil Filtration

4 Earth Moving Equipments - Excavators, Loaders

11 Thermic fluid Filtration

5 DG Sets - All engines

12 Lube Oil Filtration

6 Marine - All engines

13 Neat-cutting oil Filtration

7 Industrial heavy application engines

14 Transformer/Transmission Oil Filtration 15 Gear Oil Filtration

Benefit: For fine filtration upto 5 micron without the use of any filter media. It is like one time investment. CONTACT: KRISHNA - 8308839648 NEW INTRODUCTION: COOLANT FILTRATION PORTABLE MACHINE SCCM12

OEM SUPPLY:Cummins India Ltd,Mahindra & Mahindra,Thermax Ltd,Kirloskar Oil Engines Ltd,Greaves Cotton,BEML.

धातुकाम / 17


कं पनीत घेण्यात आलेल्या चाचण्यांनस ु ार आमच्या यंत्रमानवाची वारंवारिता २०० मायक्रॉनमध्ये आहे. ही स्थानीय अचूकता मिळविण्यासाठी जॉबच्या आकारानस ु ार योग्य अशा पकडीची रचना करावी लागते. यातील स्टेपर मोटर ३६०° मध्ये १००० पल्सेस देणाऱ्या एनकोडर्ससह बसविण्यात आल्यामळ ु े स्थानीय अचूकतेमध्ये अपेक्षित परिणाम देतात. यापेक्षा जास्त चांगली अचूकता पाहिजे असेल तर विशेष व्यवस्था के ली जाते. यात ग्रिपरमध्ये लोके टिंग पिन बसवून, ती लोके टिंग फिक्स्चर किं वा चकच्या डॉवेल होलमध्ये एंगज े करून अचूकता साधली जाते.

कंट्रोलरचे काम बाहेरच्या एका कंपनीला दिले होते. रोबोचे हात तयार झाले होते, मात्र कंट्रोलर अजून तयार व्हायचा होता. शेवटी तो कंट्रोलर आला. त्यामध्ये खूप उणिवा असल्याचे जाणवले . हा कंट्रोलर वापरून रोबोचा ग्रिपर संपूर्ण वर्तुळाकार हालचाल करू शकत नव्हता. तो कंट्रोलर इतर भागांसोबत संवाद साधू शकत नव्हता. त्यामुळे मग 'TAL'ने स्वतःच कंट्रोलर बनविण्याचा विचार केला. यासाठी रोबोच्या इतर भागांशी जुळवून घेणारे (काँफ्रिगर केले ले) पीसीबी (काही स्पेशल कंपोनंट्सयुक्त) बाहेरून मागवले . त्यावर आम्ही स्वतःचे असे संस्कार केले . स्वतःचे कोडिंग केले . (आता या प्रकारचा पीसीबी बनवण्याचाही आमचा विचार आहे.) त्यानुसार कंट्रोलर बनवले गेले. सध्या इंग्लिशमध्ये आज्ञा स्वीकारणारा कंट्रोलर बनवला गेला आहे. पुढे तो इतर प्रादेशिक भाषांमध्येही (मराठी, तमिळ, हिंदी इत्यादी) आज्ञा घेईल असा बनविला जाणार आहे.

18 / धातुकाम

वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रिपर्सचे डिझाईनिंग काही सॉफ्टवेअर्ससह टाटामध्येच करण्यात आले . टाटा एले क्सीने या रोबोचे स्टायलिं ग आणि डिझायनिंग केले , तर त्याचे एसएमसी कव्हर टॅ कोने तयार केले . इतर सुटे भाग पुरवणारे व्हेंडर शोधून त्यांना तयार करावे लागले '. आले ल्या अडचणींबद्दल भिंगुर्डे सांगतात, 'बऱ्याच ठिकाणी सहसा १०० किंवा त्यापेक्षा जास्त किलोसाठी रोबो वापरतात. मात्र आम्हाला १० आणि त्यापेक्षा कमी किलोसाठीचे रोबो बनवायचे होते. हे कंपनीसाठी फार मोठे आव्हान होते. त्यासाठी आम्ही प्रत्येक अक्षाच्या हालचालीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या सर्वो मोटरऐवजी स्टेपर मोटर वापरण्याचा निर्णय घेतला. कारमध्ये ज्या प्रकारचे बेल्ट वापरले जातात, त्या प्रकारचे बेल्ट मोटरपासून संबधि ं त अक्षापर्यंत मोशन (पॉवर ट्रान्स्मिशनसाठी) जाण्यासाठी वापरले .

त्यामुळे मधली गिअर ट्रान्स्मिशनची संपूर्ण प्रक्रिया टाळली गेली. त्यामुळे अजून कमी खर्चात हे काम होऊ शकले . सुरुवातीला हव्या त्या अचूकतेचे मशिन कंपोनंट विकसित करण्यात अडचणी आल्या. त्यासाठी लागणारे कटर विकसित करायला अडचणी आल्या. कास्टिंग विकसित करणेही एक मोठे आव्हान होते, मात्र त्यावर मात करून दोन वर्षाच्या कालावधीत हा रोबो बाजारात आणला गेला. ज्यासाठी आत्तापर्यंत एकंदरीत १० कोटीपर्यंत खर्च आला'. ब्रॅबो रोबो सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये वापरता येतो. प्रामुख्याने ऑटोमोबाईल, ऑटो अॅन्सिलरी, इले क्ट्रॉनिक, लॉजिस्टिक, फार्मास्युटीकल्स, फू ड आणि पॅकेजिंग, प्लॅस्टिक इंडस्ट्री इत्यादी ठिकाणी या रोबोचा वापर करण्यात येतो. हा रोबो वेल्डिंग, हॅण्डलिं ग, मशिन टें डिंग, असेम्ब्लिं ग, मोल्डिंग, व्हिजन आणि इन्स्पेक्शनमध्ये उपयोगात आणता येतो. 'मुळात आम्हाला


रोबो एक ऑपरेटर म्हणून काम करायला हवा आहे, जिथे अचूकतेपेक्षा वारंवारिता जास्त महत्त्वाची आहे. हा रोबो अपेक्षित अचूकतेची सर्वोच्च वारंवारिता असले ले उत्पादन देईल.' मशिन टें डिंग (सी.एन.सी. मशिनवर काम होत असताना जॉब मशिनवर ठे वला जातो. नंतर मशिनचा दरवाजा बंद होतो. आतील काम झाल्यावर दरवाजा उघडतो आणि आतील जॉब बाहेर काढला जातो. ही सर्व क्रिया रोबो मशिनच्या कार्यप्रणालीशी संलग्न होवून कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करतो.) प्रेस टें डिंगमध्ये अशा प्रकारच्या रोबोचे फार महत्त्व आहे. कारण ऑपरेटरकडू न अशा प्रकारची कामे करताना अपघात होण्याची शक्यता असते. जर तो कंपोनंट व्यवस्थित ठे वला गेला नाही तर तो खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रोबो मशिनसोबत काँफ्रिगर करून त्याच्याकडू न अशी कामे करून घेणे योग्य ठरते. लघुउद्योग समूहांकडू न दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ ५ हजार उत्पादने उत्पादित केली जातात. यासाठी अशा प्रकारच्या रोबोंची गरज भासू शकेल. म्हणूनच 'TAL' मॅन्युफॅक्चरिंगला सूक्ष्म, लघु

व मध्यम उद्योगसमूहांना परवडतील असे ३ लाख रुपयांपासून (२ किलो) ६ लाख रुपयांपर्यंतचे (१० किलोसाठी) रोबो उपलब्ध करून द्यायचे आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगसमूहांमध्ये साधारण ९ लाख कोटी रुपयांची उलाढाल होत असते. येत्या काही वर्षांत हीच उलाढाल दुप्पट होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 'स्वयंचलन' फार महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळेच 'TAL' मॅन्युफॅक्चरिंग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगसमूहांना स्वयंचलन या प्रकारामध्ये शिरकाव करण्याची संधी या रोबोंद्वारे उपलब्ध करून देत आहे. सध्या आम्ही रोबोची 'लाईफ सायकल' तपासत आहोत. म्हणजे तीन महिने, २४x७ एका ठराविक कामावर, एखादया सेट करून ठे वले ल्या प्रॉग्रॅमनुसार हे रोबो काम करत राहतात. आम्ही काही रोबो तर टाटामधीलच उत्पादन प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले आहेत. उदा. गिअर पंपसाठी, टाटा ग्रीन बॅटरीजमध्ये, काही फिलिं ग अॅप्लिकेशनमध्ये अशा वेगवेगळ्या कामासाठीचे रोबो आम्ही 'TAL'मध्ये डेमो म्हणूनही लोकांना दाखवण्यासाठी उपलब्ध करणार आहोत. जेणक े रून वेगवेगळ्या कामांवर अशा

प्रकारचे रोबो कसे काम करतील हे ग्राहकांना प्रत्यक्ष पाहता येईल. (उदाहरणार्थ, प्रेस टें डिग). भारतात बरीचशी इंजिनिअरींग कॉले जेस आहेत, जिथे आता बीई रोबोटिक्स आणि ऑटोमेशन असा एक विषय नव्याने तयार होत आहे. त्यापैकी काही इंजिनिअरींग कॉले जसाठी 'TAL' हे रोबोटिक अभ्यासक्रम बनवण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी मदत करते. अभ्यासक्रमातच हे विषय असल्याने मुलांना फिल्डवर काम करताना फार कमी अडचणी येतात. सध्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तंत्राला जास्त मागणी आहे. इंटरनॅशनल फे डरेशन ऑफ रोबोटिक्सप्रमाणे पाहिले तर या मार्केटची जगात १५ टक्क्यापर्यंत वाढ आहे. भारतात हीच वाढ २० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या कोरीया, जर्मनी, अमेरिका आणि चीन या देशांत औद्योगिक रोबोचा वापर अधिक केला जातो. भारतात मात्र सध्या याचा वापर कमी असला तरी येणाऱ्या काळात रोबोच्या वापरात नक्कीच वाढ होईल असा अंदाज आहे.

अमित भिंगर्ु डे

amit.bhingurde@tal.co.in

धातुकाम / 19


20 / धातुकाम


मोनीश शेटे

छोट्या आकाराच्या भागांचा परु वठा करणारे स्वयचं लन कं पन घट वापरून हाताळणी करता येणारे काही भाग खालीलप्रमाणे

व्हायब्रेटरी बाऊल फिडर

स्वयंचलनाची गरज का भासते ? पूर्वीपासून असा गैरसमज होता की, भारतातील उद्योगांना स्वयंचलनाची गरज नाही. कारण भारतात इतर देशांच्या मानाने खूपच कमी खर्चात कामगार मिळतात आणि जास्त बेरोजगारी असल्यामुळे कामगार मिळायला काहीच अडचण येत नाही. पण आता हा समज अगदी चुकीचा असल्याचे सिध्‍द झाले आहे. स्वयंचलनाकडे जाण्याचे मुख्य कारण हे आहे की, भारतात कमी खर्चात कामगार मिळत असले तरी त्यांची उत्पादकताही खूपच कमी असते. कोणत्याही कारखान्याची उत्पादकता ही त्या कारखान्याची कार्यक्षमता ठरवते. या

कार्यक्षमतेच्या उपयुक्त वापरातूनच मूल्यवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) होत असते. सध्याच्या स्पर्धेच्या जगात वस्तूंची किंमत आणि उत्पादनाचा खर्च कमीतकमी करण्याचा प्रयत्न कायम केला जात असतो. त्यामुळे उत्पादनातील प्रत्येक प्रक्रिया योग्य पध्‍दतीने ठरवून अधिकाधिक किफायतशीरपणे चालवली तरच उत्पादकता वाढविता येते आणि उत्पादन किफायतशीर होते. एखादा उत्पादक स्वयंचलनाच्या मार्गाने गेला नाही तर त्याचा स्पर्धक स्वयंचलन करून त्याला मागे टाकेल हे नक्की. म्हणून प्रत्येक प्रक्रियेत स्वयंचलन करणे आवश्यक झाले आहे. त्यात असेही होऊ शकते की एखादी

• दंडगोलाकार भाग (सिलिन्ड्रिकल पार्टस) • रोलर्स, सयु ा (निडल्स), बॅटरीचे भाग • वैद्यकीय संचातील तसेच ठिबक सिंचनासाठी वापरले जाणारे काही छोटे प्‍लॅस्टिकचे भाग • खाण्याच्या गोळ्या • स्विच गिअरचे भाग, घड् याळाचे भाग, कुलपु ांचे भाग • इलेक्ट्रिकल फिटिंग्जचे भाग आणि छोटे छोटे इलेक्‍ट्रॉनिक भाग इत्यादी.

धातुकाम / 21


प्रक्रिया तोचतोचपणा आल्यामुळे कंटाळवाणी होते. दररोज रात्रंदिवस तेचतेच काम करावे लागले की उत्पादकता कमी होते. त्यामुळे कार्यक्षमता (एफिशियन्सी) तर कमी होतेच पण उत्पादनाचा दर्जा घसरायला लागतो म्हणून स्वयंचलन करणे जरुरीचे होते. म्हणूनच दर्जा आणि उत्पादनातील सातत्य राखण्यासाठी स्वयंचलन आवश्यक ठरते. लहान किवा छोट्या आकाराच्या भागांची हाताळणी करण्याच्या प्रक्रियेचे स्वयंचलन करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ओरिएन्टेशन. प्रत्येक भाग एका विशिष्ठ दिशेन/े पद्धतीनेच पुढील प्रक्रियेसाठी पुढे सरकवला जाणे. त्यामुळे हे काम करण्यासाठी कंपन घट असल्याशिवाय लहान भागांच्या उत्पादन प्रक्रियेचे पूर्ण स्वयंचलन शक्य नसते. ही छोट्या आकाराची यंत्रे,

लहान भागांना पुढील प्रक्रियेसाठी पुढे-पुढे सरकवतानाच, त्या प्रक्रियेला आवश्यक अशा एका ठराविक पद्धतीने मांडतात. हे कंपन घट प्रत्यावर्ती प्रवाहावर (ए.सी.करंट) चालतात. हे कंपन घट विद्युत चुंबकीय वेटोळयांचे बनविले ले असतात. त्यांच्यामधून विद्युत प्रवाह जात असताना ही वेटोळी एकदा चुंबकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात आणि एकदा चुंबकाना दूर ढकलतात. या सतत चालू असणाऱ्या क्रियेमुळे कंपने निर्माण होतात. त्या चुंबकांवर ठे वले ल्या उसळी पट्टीमुळे (स्प्रिंग प्लेट) ही कंपने त्या कंपन घटाच्या वरच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. या वरच्या पृष्ठभागावर पोलाद किंवा अॅल्युमिनियम धातूचा घट (बाऊल) बसविले ला असतो. ज्या उत्पादन प्रक्रियेत छोट्या आकाराचे

भाग हाताळावे लागतात. अशा सर्व कारखान्यात अशा प्रकारचे कंपन घट वेगवेगळ्या प्रकारची कामे करून महत्त्वाची कामगिरी बजावतात. हे कंपन घट अतिशय जास्त वेगाने म्हणजे जवळजवळ १० मीटर प्रती मिनिट म्हणजेच सुमारे दर मिनिटाला २० ते १ हजार भाग या वेगाने काम करतात. हा वेग अर्थातच त्या भागाचे आकारमान, लांबी, रुं दी, उं ची आणि तो भाग कोणत्या पद्धतीने पुढे पाठवायचा आहे, त्यानुसार ठरतो. या कंपन-घट फिडरचा आणखी एक फायदा म्हणजे याचा वेग पाहिजे तसा बदलता येतो. तसेच सेन्सर्स वापरून कंपन घटाचा वेग पुढील काम होणाऱ्या यंत्राच्या वेगाशी जुळविता येतो. या पध्‍दतीने बेअरिंग रेसेस, बेअरिंग रोलर्स, वाहनांमधील छोटे भाग, इंजिनाचे भाग, प्लास्टिकचे कॅप किंवा बाटल्या, स्क्रू, बोल्ट, नट, वॉशर्स यासारखे अनेक छोटे छोटे भाग, हवे तसे ओरिएन्टेशन करून यंत्राला पुरविता येतात.

भागाचे ओरिएन्टेशन करण्याची पद्धत कंपन घटामध्ये निर्माण झाले ल्या कंपनांमुळे घटामधले भाग वरच्या दिशेने सरकू लागतात. त्याच्या सरकण्याच्या मार्गाला एक विशिष्ठ दिशा दिली आणि मार्गात योग्य त्या ठिकाणी दिशा वळवणारे अडसर बसविले की कंपन घटात घातले ल्या भागांची स्थिती (पोझिशन) आणि हालचालींची दिशा (मूव्हमेंट) पाहिजे तशी बदलता येत.े त्यांची पाहिजे त्या पद्धतीने मांडणी करता येत.े या घटात छोटे भाग कसेही भरले (घातले ) तरी त्यांना बाहेर काढताना हव्या त्या पद्धतीची मांडणी असले ल्या अवस्थेतच बाहेर काढता येते हा कंपन घटाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. कंपन घटात कंपनामुळे भाग कसे हालतील आणि त्‍यांचा हालचालीचा मार्ग कसा असावा, हे त्या भागाच्या गुरुत्वमध्याचा अभ्यास करून आणि अनुभवाने ठरविता येत.े भागाचे ओरिएन्टेशन करणे ही काळी विद्या (ब्लॅक आर्ट) आहे, असेही म्हटले जाते. त्याचे एक शास्त्र आहे जे अनुभवातूनच शिकता येत.े

रोटरी फीडर

रोटरी फिडर

22 / धातुकाम

छोटे -छोटे भाग पुढे सरकविण्यासाठी कंपन घटांना चक्रगती (रोटरी) किंवा केंद्रोत्सारी फीडर्सचा पर्याय असतो. अनेकवेळा असे म्हटले जाते की, विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून कंपन घट फिडर्स वापरात असूनही त्यांना कोणताही पर्याय सापडले ला नाही. पण मोटारीने फिरवले जाणारे चक्रगती/केंद्रोत्सारी फिडर्स हा नक्कीच एक पर्याय म्हणून वापरला जातो. अशा


कं पन घट फिडर्स आणि चक्रगती/कें द्रोत्सारी फिडर्स यांचा वापर पुढील ठिकाणी करण्यात येतो. • लहान-लहान भाग ओरिएन्टेशन करून पढु ील प्रकारच्या यंत्रामध्ये घालण्यासाठी (परु वठा करण्यासाठी) • सेंटरलेस ग्राई ंडिंग मशिन्स • डयपु ्लेक्स ग्राई ंडिंग मशिन्स • ऑटोमॅट्स • सी.एन.सी मशिन्स

कानाचे प्लग मोजणारा फिडर

केंद्रोत्सारी फिडर्सचे कंपन घट फिडर्सच्या तुलनेत बरेच फायदे असतात. केंद्रोत्सारी फिडर्सचा जास्त वेग किवा सरकवेग हा सगळ्यात मोठा फायदा आहे. हे चक्रगती/ केंद्रोत्सारी फिडर्स तुलनेने खूप जास्त वेगाने चालतात. ते ५० मीटर प्रतिमिनिट इतक्या सरकवेगाने चालू शकतात, तर उच्च गतीच्या कंपन घट फीडर्सचा सरकवेग जास्तीत जास्त १० मीटर प्रतिमिनिट इतका असतो. शिवाय त्यांच्यात कोणतीही कंपने नसतात. फक्त यांत्रिक (मेकॅनिकल) भाग असतात. त्यामुळे ज्या लोकांना कंपन घट फिडर्सविषयी शंका असतात त्यांना केंद्रोत्सारी फिडर्स जास्त भरवशाचे वाटतात. (एल्सिंट ऑटोमेशनसारखे उत्पादक चांगले चालणारे

बाऊल फिडरच्या आतील रचना

कंपन घट फिडर्स बनवून देतात.) चक्रगती/ केंद्रोत्सारी फिडर्समधली मुख्य अडचण म्हणजे त्‍यांच्‍यात लहान भागांची हालचाल खूप जलद गतीने होत असल्यामुळे आणि त्‍या भागांना कोणतीही कंपने नसल्यामुळे त्यांचे हवे तसे ओरिएन्टेशन करणे अवघड जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा केंद्रोत्सारी फिडर्समध्ये हवेच्या पिचकाऱ्या (जेट्स) वापरून लहान भागांचे एका दिशेने ओरिएन्टेशन करावे लागते. त्या तुलनेत कंपन घट फिडर्समध्ये क्वचितच हवेच्या पिचकाऱ्या (जेट्स) वापराव्या लागतात. त्यामुळे कंपनघट फिडर्सच्यापेक्षा केंद्रोत्सारी फिडर्स वापरताना जास्त खर्च येतो. केंद्रोत्सारी फिडर्स वापरताना येणारी दुसरी

बाऊल फिडर चालवणारी चुंबकीय यंत्रणा

धातक ु ाम / 23


अडचण म्हणजे फिरणाऱ्या चकतीमुळे निर्माण होणाऱ्या धन (पॉझिटीव्ह) दाबामुळे लहान भाग एकमेकांवर आदळतात. फिडर्सच्या बाहेरच्या भिंतींवरसुध्‍दा आदळतात. त्यामुळे त्या भागांचे नुकसान होऊ शकते. पण केंद्रोत्सारी फिडरची रचना (डिझाईन) योग्य प्रकारे केली तर हे टाळता येऊ शकते. याउलट कंपन घट फिडर्समध्‍ये लहान भागांचे कधीच नुकसान होत नाही. त्‍यामुळे नाजूक किंवा ठिसूळ असले ले लहान भाग यांच्‍यासाठी कंपन-घट फिडर्स वापरले जातात. चक्रगती/केंद्रोत्सारी फिडर्स वापरताना येणारी आणखी एक अडचण म्हणजे त्यातील लहान भाग एकमेकांत अडकून (अडथळा होऊन) त्यांची हालचाल रोखली जाऊ नये, यासाठी त्यामध्ये एका वेळी घालणाऱ्या भागांची संख्या मर्यादित असते. म्हणून बऱ्याच वेळा एक पूरक नरसाळे (स्टॉक हॉपर) वापरून लहान भागांचा केंद्रोत्‍सारी फिडर्समधला पुरवठा सतत चालू ठे वावा लागतो. त्‍यामुळे केंद्रोत्सारी फिडर्सची किंमत अजून वाढते. ज्यांचे ओरिएन्टेशन करावयाचे असते असे बाटल्यांची झाकणे, दंडगोलाकार रोलर्स नीडल (सुई सारखे)

रोलर्स, चपटे किवा दंडगोलाकार ड्रिपर्स, बेअरिंगच्या रेसेस किंवा बेअरिंग्जच्या गोल कड्या (रिंग्ज) यासारखे अनेक लहान भाग केंद्रोत्सारी फिडरमध्ये घालू न त्यांचे ओरिएन्टेशन करता येत.े तसेच अतिशय अचूकरीत्या ओरिएन्टेशन करण्याची गरज असणाऱ्या लहान भागांनासुध्‍दा केंद्रोत्सारी फिडर्स वापरून ओरिएन्टेशन करता येत.े पण जर एखाद्या लहान भागाला केंद्रोत्सारी फिडर वापरून ओरिएन्टेशन करता येत नसेल तर मात्र त्यासाठी कंपन घट फिडरचाच वापर करावा लागतो. जिथे काही प्रमाणात किंवा संपूर्णपणे स्वयंचलित जोडणी (असेम्ब्ली) करायची असते त्याठिकाणी लहान लहान भाग एका विशिष्ठ दिशेने ओरिएन्टेशन करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी कंपन घट फिडर्सचा वापर केला जातो. बऱ्याचशा वैद्यकीय उपकरणांची जोडणी करताना त्या उपकरणातील लहान भागांना मानवी हातांचा स्पर्श करण्यास मनाई केले ली असते. त्यामुळे ते लहान भाग कंपन घट फिडर्सचा वापर करून पुढे सरकवले (फिडिंग) जातात.

कं पन घटाचा वापर १. मोजणी (काऊंटिंग) करण्यासाठी अनेक वेळा लहान भागांची मोजणी

करायची असते. कंपन घट फिडर्सजवळ सेन्सर्स आणि इतर यंत्रणा लावून त्या लहान भागांची मोजणी अगदी सहज आणि कमी खर्चात करण्यासाठी कंपन घट फिडर्स वापरले जातात.

आवरण घालण्यासाठी (पॅकिंग)

लहान भागांना पॅक करताना (आवरण घालताना) त्यांना एका दिशेने ओरिएन्टेशन करून पुढे सरकवावे लागते. त्यासाठी कंपन घट फिडर्सचा वापर केला जातो.

वेगवेगळ्या भागांचे वर्गीकरण (सॉर्टिंग) करण्यासाठी एकत्र मिसळले ल्या भागांचे वर्गीकरण करण्यासाठी किंवा आकारमानानुसार वर्गीकरण/तपासणी करण्यासाठी कंपन घट फिडर्स वापरले जातात.

_moZre eoQ>o

sales@elscintautomation.com

METROLOGY Accuracy has no boundaries

®

SPECIALIST IN MULTIGAUGING AND AIRGAUGING

Office : C - 30, Utkarsh nagar, Hadapsar, Pune - 411028. Tel - 020-26991028, 26998043 Email - metrologypn@vsnl.net Factory : At Post - Boribhadak, Tal. - Daund, Dist. - Pune. Tel - 0211922224

24 / धातुकाम


एस डिझायनर्सचा अशोक साठे

‘टर्न-मिल, सब-स्पडिं ल’ लेथ LT2XL MS

बस्पिंडल यंत्रामध्ये टे लस्टाॅकची जागा ही दुसऱ्या स्पिंडलच्या हेडस्टाॅकने घेतले ली असते. हा हेडस्टॉक स्वत:च्या स्वतंत्र सरकमार्गावर अक्षीय दिशेने मागेपुढे सरकू शकतो. प्रोग्रॅमच्या आज्ञेनस ु ार हा हेडस्टॉक पुढे सरकून मुख्य स्पिंडलवर पकडले ली वस्तू उचलू न सबस्पिंडलवर पकडू न घेतो. त्यानंतर टरेटवरची हत्यारे वस्तूच्या दुसऱ्या बाजूवर काम करू शकतात. अशा तऱ्हेने यंत्रावर एकदा जॉब लोड केला की, दोन्ही बाजू एकामागून एक मशिन होऊ शकतात.

साध्या सीएनसी ले थचा वापर आपल्याकडे सुरू होऊन बरीच वर्षे झाली. आजही लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या प्रकारचे ले थच मोठ्या प्रमाणात वापरले जातात. प्रगत देशांमधे मात्र साध्या टर्निंग ले थची मागणी कमी होते आहे. त्याऐवजी विविध प्रकारच्या 'टर्न मिल' सेंटर्सचा जमाना आला आहे. या यंत्रांची रचना ही मूलत: साध्या सीएनसी ले थसारखीच असते; मात्र ले थच्या टरेटवर स्थिर हत्याराबरोबर 'चलित' (ड्रिव्हन) हत्यारे वापरण्याचीही सोय असते. त्यामुळे ले थवर टर्निंगसोबत मिलिं ग, ड्रिलिं ग, टॅ पिंग इत्यादी यंत्रणक्रियादेखील करता येतात. यामुळे एकाच 'सेटअप'मध्ये अनेक कामे करता येतात. चार ठिकाणी कार्यवस्तू न फिरवता काम संपवता येत.े टर्नमिल ले थची रचना प्रगत होत जाऊन, आता मुख्य स्पिंडलच्या जोडीला उपस्पिंडल (टे लस्टाॅकच्या जागी आणखी एक स्पिंडल), एका 'चलित' हत्यार टरेटच्या जोडीला आणखी एक अथवा दोन तसेच टरेट्स, इत्यादी सोयी असले ली प्रगत यंत्रे बाजारात आली आहेत. या यंत्रांची रचना क्लिष्ट वाटली आणि किंमत महाग वाटली, तरी ती अनेक कामे एका वेळी करू शकतात. अंतिमत: त्यावर तयार झाले ला यंत्रभाग स्वस्त पडू शकतो.

धातुकाम / 25


पुढची बाजू मागची बाजू उत्पादन खर्च तपासणीसाठी घेतलला े यंत्रभाग

‘कॅम गिअर ८०’

‘प्रगति’चे ‘चलित हत्यार’ टरेट SMT80/12 बंगलोरच्या 'प्रगति' कंपनीने 'चलित टू ल टरेट'ची नवी मालिका (SMT 63, 80, 100) विकसित केली आहे. हे नवे उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी त्याचे प्रत्यक्ष वापराने परीक्षण करणे जरुरीचे होते. यासाठी प्रगतिने 'एस डिझायनर्स' या कंपनीकडे 'LT2XL MS' या 'सब स्पिंडल' रचना असले ल्या १२ ले थची ऑर्डर दिली. या ले थवर प्रगतीचे SMT 80/12 हे नव्याने विकसित केले ले 'चलित' हत्यार टरेट बसवले आहेत. असा पहिला ले थ मे, २०१५ मध्ये पुरवला गेला आणि ऑक्टोबर, २०१६ मध्ये ९ ले थ २ पाळ्यात काम करीत आहेत. आजपर्यंत ले थ आणि टरेट दोन्हींची कामगिरी उत्तम आहे.

उत्पादन खर्च तुलना ‘LT 2’ या ले थपेक्षा ‘LT 2 XL MS’ या ले थची किंमत तिप्पट आहे. तेव्हा महागाचा आधुनिक ले थ वापरल्याने एखादा यंत्रभाग बनवण्याच्या खर्चात काय फरक पडतो, याचा 'प्रगति'ने आढावा घेतला. यासाठी ‘कॅम गिअर ८०’ हा यंत्रभाग अभ्यासाला घेण्यात आला. यावर टर्निंग, ड्रिलिं ग, टॅ पिंग, कॅम मिलिं ग अशी बरीच कामे करावी लागतात. एका वेळी २०० ते ५०० नगाची बॅच कामासाठी घेतली जाते. पूर्वीची कार्यपद्धती या कामासाठी फोर्जिंगपासून सुरुवात होते. फोर्ज केले ला कच्चा माल भरड कातून (सगळीकडे १ मिमी माया) 'प्रगति'च्या स्टोअरमध्ये येतो. यानंतर गिअर कापण्यासाठी बाहेर पाठवण्यापर्यंत पूर्वीच्या पद्धतीत कामाचे ६ टप्पे लागायचे. १ सीएनसी कातन - पहिली बाजू २ सीएनसी कातन - दुसरी बाजू ३ VMCवर ड्रिल, टॅ प, रीम ४ बाजूचे ड्रिल - रेडियल ड्रिलवर ५ सीएनसी कातन - बर काढणे ६ कॅम मिलिं ग - VMC, उभे रोटरी टे बल

‘स्फूर्ती’चे हत्यार धारक चलित हत्यार टरेटवर विविध प्रकारचे हत्यार धारक लागतात. सामान्य टर्निंग, मिलिं ग, ड्रिलिं गसाठी हत्यार धारक उपलब्ध असले , तरी अनेक वेळा विशेष रचनेचे धारक बनवून घ्यावे लागतात. पूर्वी सगळे हत्यार धारक आयातच करावे लागत. त्यांची किंमतही जबरदस्त असायची. आता हे भारतातही बनतात आणि निर्यातही होतात. वाजवी किंमतीतही मिळतात. विशेष रचना हवी असेल तर तसेही बनवून मिळतात, मात्र त्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो.

26 / धातुकाम

याचा अर्थ कॅम गिअरची कार्यवस्तू एका मशिनवरून पुढच्या मशिनवर सहा वेळा फिरवावी लागायची. पुढचे मशिन मोकळे नसल्यास रांगेमध्ये वाट बघावी लागायची. परिणामी एकंदर कामाला किती वेळ लागेल याचा अंदाज बांधणे कठीण जायचे. नवी ('टर्न-मिल सब-स्पिन्डल’) कार्यपद्धती नव्या टर्न मिल पद्धतीत वरील यादीतील सर्व कामे एकाच टप्प्यात, एकाच टर्न मिल मशिनवर संपतात. पूर्वी ६ मशिनवर होणारे काम आता एकाच मशिनवर पूर्ण होते. १ ACE LT 2 XL MS - दोन्ही बाजू सीएनसी कातन; ड्रिल, टॅ प, रीम; कॅम मिलिं ग २ गिअर कटिं ग - गिअर हॉबिंग मशिन


तुलनेसाठी वापरले ली कार्यपद्धती तुलना करण्यासाठी ५०० नगांची एक बॅच जुन्या पद्धतीने प्रोसेस केली. प्रत्येक पायरीवर प्रतिपाळी किती उत्पादन मिळाले याची नोंद ठे वली. प्रत्येक यंत्राचा बाजारभावाप्रमाणे दर विचारात घेतला आणि त्या यंत्रणक्रियेचा खर्च ठरवला. त्याचवेळी टर्नमिल मशिनवर दुसरी एक बॅच प्रोसेस केली आणि त्या क्रियेचाही खर्च काढला. तक्ता 1. पूर्वीची पध्दत. क्र.

येणारा माल भरड कातले ले फोर्जिंग

प्रक्रिया

यंत्रसाधन

तासाचा दर रुपये

पाळीचा दर रुपये

पाळीउत्पादन नग

प्रति नग खर्च रुपये

500 नगांसाठी पाळ्यांची संख्या 8

1

टर्निंग 1

CNC ले थ

210

1680

61

28

2

टर्निंग 2

CNC ले थ

210

1680

82

20

6

3

ड्रिल, टप,रीम

VMC

350

2800

36

78

14

4

बाजूचे छिद्र

रेडीयल ड्रिल

50

400

210

2

2

5

बर काढणे

सीएनसी ले थ

210

1680

370

5

1

6

कॅम मिल

VMC,रोटरी टे बल

400

3200

60

53

8

एकूण रु. 186

एकूण पाळ्या 39 कामाचे दिवस 20

जुन्या पध्दतीने वरील सहा प्रक्रिया करून 500 नग बनवल्यावर प्रति नग उत्पादन खर्च : तक्ता 2. नवी पध्दत. टर्न मिल सबस्पिंडल लेथ

जाणारा माल पुढची प्रक्रिया : गिअर कटिं ग

क्र.

प्रक्रिया

1

टर्न, मिल, ड्रिल

यंत्रसाधन ACE LT2XL

सबस्पिंडल ले थ

तासाचा दर रुपये

पाळीचा दर रुपये

पाळीउत्पादन नग

प्रति नग खर्च रुपये

500 नगांसाठी पाळ्यांची संख्या

550

4400

37

119

14

नव्या पद्धतीने वरील सहा क्रिया एकाच सबस्पिंडल टर्नमिल यंत्रावर करून 500 नग बनवल्यास प्रति नग उत्पादन खर्च कमी होतो. कामाचे दिवसही खूपच कमी होतात.

एकूण रु. 119

कामाचे दिवस 7

निष्कर्ष १. यंत्रभाग उत्पादन खर्च १८६ रुपयांवरून ११९ रुपयांवर आला. साध्या सीएनसी यंत्रांपेक्षा ‘टर्न मिल सबस्पिंडल’ ले थ तिप्पट महाग असला तरी उत्पादन खर्च ४० टक्के कमी झाला. २. सहा यंत्रसाधनांऐवजी एकाच यंत्राने काम होत असल्याने वर्क शॉपची महागाची जागा वाचते. ३. यंत्रे कमी झाल्याने मनुष्यबळदेखील कमी लागते. ४. सहा यंत्रांवर एकामागून एक काम फिरवताना वेळेचे गणित चुकण्याची शक्यता असते. या उलट टर्न मिल यंत्रावर एकदा बॅच सुरू झाली म्हणजे काम के व्हा संपेल याचा चांगला अंदाज बांधता येतो. ५.‘कच्चा माल’ ते ‘तयार माल’ या प्रक्रियेसाठी खूपच कमी दिवस लागतात. त्यामुळे इंव्हेटरी कमी राहू शकते.

टर्न मिल पद्धतीने कामासंबंधी निरीक्षणे पूर्वनियोजन. टर्नमिल यंत्रांचा वापर करण्यासाठी कागदावर पूर्व नियोजन करून, कामासाठी लागणारी हत्यारे आणि हत्यार धारक यांची तयारी ठे वावी लागते. अनेकदा विशेष रचनेचे ‘चलित’ हत्यार धारक लागतात. ते मिळवण्यासाठी महिनेही लागू शकतात. सुदैवाने आता आपल्याकडे असे स्थिर आणि चलित, दोन्ही प्रकारचे हत्यारधारक बनू लागले आहेत. त्यामुळे किंमत कमी झाली आहे आणि वेळही कमी लागतो. • मशिनवर एकच टरेट आहे आणि त्यावर १२ स्थानांची हत्यारचकती आहे. ही हत्यारे वापरून दोन स्पिंडलवर काम करायचे आहे. तेव्हा टू लिंग ठरवताना बरेच डोके वापरावे लागते. एकाच ले थवर दोन, तीन अथवा चार टरेट असले ली मॉडेल्स असतात. तिथे जास्त हत्यारे वापरता येतात आणि एका वेळी दोन्ही स्पिंडलवर काम चालू शकते. सध्या तरी अशी यंत्रे आपल्याकडे बनत नाहीत, मात्र मागणी असल्यास ती बनवली जाऊ शकतात. • आजच्या बाजारात मानाने उभे राहण्यासाठी चीन, तैवान, कोरिया इत्यादी आशिया खंडातील देशांशी स्पर्धा करावीच लागते. चांगला माल मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात निर्माण केल्याशिवाय आपण या स्पर्धेत टिकू शकत नाही. यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री वापरल्याशिवाय उपाय नाही. 'टर्न मिल’सारखी यंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरण्याची वेळ आता आले ली आहे. त्या दृष्टीने 'एस डिझायनर्स'चे हे नवे उत्पादन स्वागतार्ह आहे.

धातुकाम / 27


सबस्पिंडल ले थ आणि रोबो

सबस्पिंडल ले थ वापरणे हे एक प्रकारे तीन-चार यंत्रांचे एकत्र काम करणारे स्वयंचलन (ऑटोमेशन) आहे. असे दोन ले थ आणि रोबो याची ‘स्वयंचलन सेल’ (रोबोटिक सेल) ही स्वयंचलनाची पुढची पायरी होऊ शकते. ‘प्रगति’ने प्रायोगिक पद्धतीवर मागील काही महिने अशी सेल चालू केली आहे. आताच याचे फायदे दिसू लागले आहेत. रोबोटिक सेल वापरायची म्हणजे आपोआपच जास्त नियोजन आणि जास्त शिस्तशीर काम लागते. लागणारा कच्चा माल आणि हत्यारे वेळेवर तयार ठे वावी लागतात. रोबोमुळे कार्यवस्तू मशिनवर चढविण्याचे आणि उतरविण्याचे कामही ठराविक वेळेत पूर्ण होते. परिणामी कॅम गिअरचे उत्पादन प्रती पाळी, प्रती ले थ ३७ नगांवरून ४१ नगांवर गेले आहे. बोथट हत्यारे वेळेवर बदलण्यासाठी ले थकडू न सूचना मिळवणे, ‘प्रिसेट’ हत्यारे वापरणे, अधिक दाबाचे शीतक वापरणे इत्यादी सोयी होत जातील तसतसा उत्पादनवेग आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.

अशोक साठे

sathe@pragatiautomation.com

Specialist in Design and Manufacturing of various •

Sealant dispensing machines • Assembly automation • Off line automation Fabex Engineers

25/5A, Nanded Village, Sinhgad Road, Pune 411041. Tel 20-65242444. fabexpune41@gmail.com www.fabexengineers.com

28 / धातुकाम


OJ^amVrb ¶§ÌgmYZ H$maImZXmam§Mm gmWrXma

STP 80/12 सव� टरेट, VDI चकती

grEZgr boWgmR>r Qy>b Q>aoQ²>g Am{U ‘erqZJ g|Q>a gmR>r "Am°Q>mo‘o{Q>H$ Qy>b M|Og©' (EQ>rgr) ~ZdUmè¶m àJVrZo AmO ‘erZQy>b joÌmV ñdV…Mo ñWmZ {Z‘m©U Ho$bo Amho. àगVrMo nÞmg hOmamda Q>aoQ>, Am{U drg hOmamda EQ>rgr AmO OJ^amV H$m‘ H$aV AmhoV. Am‘Mo 50Q>¸o$ CËnmXZ {Z¶m©V hmoVo; Am{U ˶mVrb à‘wI {hñgm n[ü‘ ¶wamon‘Yrb àJV Xoem§‘Yo OmVmo.

SMT 80/12 च�लत हत्यार एक मोटर टरेट SMT

004

ATC 5030V उभ्या मशी�नंग स�टर साठ�

ATC 4040H आडव्या मशी�नंग स�टर साठ� Pragati Automation Pvt. Ltd. #19 & 20, (Plot No. 467 - 469), IV Phase, 12th Cross, Peenya Industrial Area, Bangalore - 560 058. INDIA. Tel. : (+91-80) 2836-1543 Fax : (+91-80) 2836-1549. E-mail : info@pragatiautomation.com URL : http://www.pragati-automation.com

धातुकाम / 29


बॉल स्क्रू व्ही.व्ही.मज ु ुमदार

सलु भ आणि अचूक यांत्रिक हालचालीचा पाया

९० स्क्रू

स्क्रू

बॉल

नट

चित्र क्र. १ बॉल स्क्रू आणि लीड स्क्रू

नट

चे दशक, भारतासारख्या विकसनशील देशात जिथे बॉल स्क्रू या तंत्रज्ञानाची ओळख नुकतीच भारतीयांना होत होती, अशा वेळी, १९८४ साली 'इंस्टिट्युट ऑफ अॅप्लाईड रिसर्च' (IAR) या बॉल स्क्रू बनवणाऱ्या उद्योगाची सुरुवात झाली. बॉल स्क्रू म्हणजे, चक्रीय हालचाल (रोटरी मुव्हमेंट) एकरेषीय हालचालींमध्ये (लिनीअर मूव्हमेंट) रुपांतरीत करताना घर्षणाचा परिणाम कमीतकमी करणारे यांत्रिकी उपकरण होय. जिथे अचूक तसेच सूक्ष्म हालचालींची गरज असते. अशा ठिकाणी म्हणजेच यंत्र साधनांमध्ये, वैद्यकीय उपकरणांमध्ये, मोजणी करणाऱ्या यंत्रांमध्ये, विमाने आणि क्षेपणास्त्रे तसेच यंत्रमानव (रोबो) यांमध्ये हालचालीसाठी लागणारे बल (फोर्स) कमी करण्यासाठी बॉल स्क्रूचा उपयोग होतो. नेहमी वापरला जाणारा लीड स्क्रू आणि

30 / धातुकाम


नट

वंगणासाठी ठे वले ली फट

स्क्रू चित्र क्र. २ - लीड स्क्रू - आट्यांची रचना

नट

बॉल स्पेसर

झिज स्क्रू चित्र क्र. ३ (अ) बॉल स्क्रू - आट्यांची रचना

नट

स्क्रू

सील चित्र क्र. ३ (ब) बॅकलॅ श काढण्यासाठीची योजना

त्याचा नट याचे चौकोनी (स्क्वेअर) आकाराचे आटे एकमेकांच्या थेट संपर्कात असल्यामुळे त्याची हालचाल होताना जास्त बल लागते. लीड स्क्रूमध्ये नट आणि स्क्रूच्या आट्यांमध्ये स्लायडिंग घर्षण (फ्रिक्शन) परिणाम करते, तर बॉल स्क्रूमध्ये रोलिं ग घर्षण काम करते. लीड स्क्रूमधील घर्षण, संपर्कात येणारा पृष्ठभाग जास्त असल्याने बॉल स्क्रूमधील घर्षणापेक्षा जास्त असते. (चित्र क्र. १) त्यामुळे लीड स्क्रू वापरून काम करताना तुलनेने जास्त शक्ती लागते. त्यामुळे त्यांचा आकारही मोठा लागतो. उदा. एखाद्या यंत्राचा लीड स्क्रू जर ३२ x ५ आकाराचा असेल, तर तेच काम १६ x ५ चा बॉल स्क्रू करू शकतो. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे लीड स्क्रूमधील नटचा धातू त्याच्या बेअरिंग गुणवत्तेला महत्त्व देऊन ठरविले ला असतो. (उदा. फॉस्फर ब्राँझ, अॅल्युमिनिअम ब्राँझ इ.) त्यामुळे स्क्रू आणि नट यांच्या कठीणपणात (हार्डनेस) फरक असतो. तसेच नट आणि स्क्रूच्या आट्यांमध्ये वंगण जाण्यासाठी सूक्ष्म फट

असते. घर्षणामुळे नट झिजतो आणि त्याची पूड जेव्हा वंगण तेलात मिसळते तेव्हा ती अॅब्रेझिव्ह म्हणून काम करते. यामुळे नट झिजत जातो आणि आट्यांमधील फट वाढत जाते. त्यातून बॅकलॅ श वाढत जातो. बॉल स्क्रूमधील नट, स्क्रू आणि बॉल यांच्या कठीणपणात अत्यल्प फरक असतो. नट आणि स्क्रू ६० +२ Rc चे असतात, तर बॉल ६० +/-२ Rcचे असतात. त्यामुळे झीज अत्यल्प होते. बॉल स्क्रूच्या रचनेमध्ये आपल्याला स्क्रू आणि नट असे दोन मुख्य भाग दिसतात. चित्र क्र. १ मध्ये आपल्याला IAR मध्ये तयार झाले ला बॉल स्क्रू दिसतो. याच्या नटमधील अंतर्गत आटे आणि स्क्रूवरील आटे गॉथिक कमान आकाराचे असतात. यातील नटमधील अचूक आकाराच्या बॉलमुळे आणि दोघांचहे ी आटे एकमेकांच्या थेट संपर्कात न येता दोघांमधील फिरणाऱ्या बॉलच्या संपर्कात असल्यामुळे, हालचाल

होताना अत्यंत कमी घर्षण (फ्रिक्शन) होते आणि हालचालीसाठी लागणारे बल, लीड स्क्रूच्या तुलनेत अतिशय कमी लागते. तसेच बॉल स्क्रू बनविताना योग्य ती काळजी घेतल्याने नटमध्ये हालचालीच्यावेळी शून्य बॅकलॅ श मिळतो. यासाठी स्क्रू ज्या भाराकरता (लोड) काम करणार आहे त्याचा विचार करून, स्क्रूचा आटा किती वाकेल/ आकार बदले ल (डीफॉर्म) याचे गणित करून, त्याप्रमाणे स्क्रूवरील दोन नटमधील अंतर ठरविले जाते. उदा. (चित्र क्र. ३ अ आणि ३ ब) जर स्क्रू एका दिशेने फिरताना १० मायक्रॉनने आटा वाकत असेल तर विरुद्ध दिशेने फिरतानाही तो १० मायक्रॉनने वाकेल. त्यामुळे जर दोन नटमधील स्पेसर १० मिमीचा असेल तर तो १०.०२ मिमीचा करून या डीफॉर्मेशनची काळजी घेतली जाते आणि बॅकलॅ श न्यूनतम केला जातो. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म हालचालसुद्धा अचूकतेने करता येत.े यातील नटमधील डिफ्लेक्टरची रचना चित्र क्र. ४ अ आणि ब मध्ये दाखवली आहे. नटमध्ये स्क्रू फिरताना आतील बॉल

धातुकाम / 31


डिफ्ले क्टर

चित्र क्र.४ अ चित्र क्र.४ ब

फिरत असतानाच पुढे-पुढे सरकत असतात. त्यांना पुन्हा योग्य आट्यात सुलभपणे ढकलण्याचे काम डिफ्लेक्टर करतो. याची भौमितिक रचना अतिशय आव्हानात्मक असते. 'इंस्टिट्युट ऑफ अॅप्लाईड रिसर्च', रोल्ड बॉल स्क्रू बनवत नाही तर सी ५ (C 5) आणि सी ३ (C 3) अशा दोन ग्रेडचे बॉल स्क्रू बनवते. तसेच जर्मनीमधील एका कंपनीकडू न मोठ्या लांबीचे तयार स्क्रू घेऊन ते हव्या त्या लांबीला कापून विकते. मात्र यासाठी लागणारे 'नट' हे १००% 'इंस्टिट्युट ऑफ अॅप्लाईड रिसर्च' स्वतः तयार करते. (बॉल स्क्रूचा नट बनवणे हे जास्त अवघड आहे.) यासाठी लागणाऱ्या डिफ्लेक्टरवरती आम्ही खास स्वतःचे असे संशोधन करून ते तंत्रज्ञान विकसित केले आहे. 'आयएआर'ने 'सायक्लॉयडल' स्वरूपाची भूमिती वापरून डिफ्लेक्टर करायला सुरवात केली. बॉल

32 / धातुकाम

डिफ्लेक्टरमध्ये एका बाजूने प्रवेश करतो आणि उलट्या बाजूने स्क्रूच्या ओ.डी.च्या खालू न परत जातो. फिरताना त्याने स्क्रूच्या ओ.डी.ला स्पर्श न करता पुढे गेले पाहिजे. हा भाग असा पाहिजे की कमीत कमी प्रतिकार (रेझिस्टंस) झाला पाहिजे. इथे सरकण्याला विरोध झाला, तर बॉल अडखळत अडखळत जाईल. हे होऊ नये म्हणून याचा पाथ आम्ही सायक्लॉयडलमध्ये दिला. ज्यामुळे बॉल डिफ्लेक्ट व्हायला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. ही संशोधनाची प्रक्रिया १९८४ ते १९९४ म्हणजे जवळजवळ १० वर्षे चालली. १९९४ नंतर मात्र या उद्योगाने वेग धरला, ज्याचा लघु व मध्यम उद्योग समूहांना बराच फायदा झाला. कारण आम्ही जेव्हा बॉल स्क्रूचे उत्पादन सुरू केले त्यावेळी ज्यांना बॉल स्क्रू मिळायला विलं ब होतो किंवा ज्यांना बॉल स्क्रू बदलण्यासाठी मोठ्या

डिफ्ले क्टर

कंपनीकडू न एकच बॉल स्क्रू मिळवायला फार अडचणी येतात, अशा लोकांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर पुढे जाऊन जिथे युरोपसारख्या देशांत बॉल स्क्रू दुरुस्त केले जात नाहीत, तिथे आम्ही बॉल स्क्रू दुरुस्त करून देण्याचेही काम सुरू केले . पहिल्यांदा युरोपात सुरू झाले ले हे उत्पादन ८० च्या दशकात भारतात आले . अगदीच नवीन असले ले हे उत्पादन आणि त्यातल्या गोष्टी आत्मसात करायला नक्कीच थोडा वेळ लागला. मात्र त्यासाठी लागणारी क्षमता, कौशल्ये होतीच. यासाठी मला 'शॉबलिन'मधील नोकरीच्या अनुभवाचा फायदा झाला. अशा प्रकारचे बॉल स्क्रू तयार करताना माझी कारकीर्द घडली होती. त्यात मी आतील तसेच बाहेरील थ्रेड ग्राईंडिंग मशिन्सचा अभ्यास करून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. त्याचसोबत मापशास्त्र (मेट्रॉलॉजी) आणि धातुशास्त्राचाही (मेटॅलर्जी) अभ्यास केला. स्फे रीसिटी


मोजणे इत्यादी अनेक गोष्टी शिकल्या. सोबत मशिन टू लवरही भर होताच. पुढे या सर्व शिक्षणाचा फायदा मी माझ्या स्वतःच्या टीमला तयार करण्यासाठी केला.

बॉल स्क्रूचे प्रकार

बॉल स्क्रू प्रकारांमध्ये एम १२ पासून (M 12) खालच्या व्यासाच्या स्क्रूला मिनिएचर बॉल स्क्रू म्हणतात. तर एम १६ पासून (M 16) पुढचे हे नॉर्मल बॉल स्क्रू असतात. एम १२ च्या अलीकडचे जे पिच असतात ते १२x२, १२x२.५ (१२x५ नसतो) तर एम १६च्या पुढचे १६x५, २०x५, २५x५, २५x१० असे वेगवेगळे प्रकार असतात. स्क्रूचा व्यास ३२ मिमी झाला, की बॉलचा आकार वाढतो. तो वाढत वाढत ८० ला गेला की, बॉलचा आकारदेखील आणखी वाढतो. जशी बॉलचा आकार वाढतो तसा त्याचा पिचदेखील वाढत जातो. 'इंस्टिट्युट ऑफ अॅप्लाईड रिसर्च' हे कमीत कमी १ मिमी, तर जास्तीत जास्त २० मिमी पिच बनवते. बॉल स्क्रूच्या रचनेमध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत, त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे बॉलचा दर्जा आणि त्याचा मापदंड म्हणजे त्याची गोलाकारता (स्फे रीसिटी). बॉलची स्फे रीसिटी हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बॉलची गोलाकारता मोजण्याचे एकक (साय) आहे. तो मोजण्यासाठी बॉल एका अचूक इले क्ट्रॉन माईकवर ठे वला जातो. त्याचे तीन अक्षातील मोजमाप घेतले जाते. यात पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा

फार महत्त्वाचा असतो. हे मोजण्यासाठी आजकाल मशिनदेखील उपलब्ध आहेत. आपल्या इथेही (भारतात) बॉल्स तयार करणारे लोक आहेत, मात्र जर त्यांच्याकडे ग्रेड ३ बॉल मागितला तर देऊ शकत नाहीत, कारण त्याची स्फे रीसिटी महत्त्वाची असते. यामध्ये कोणत्याही दोन बॉलमधील फरक हा ०.१ मायक्रॉनपेक्षा जास्त असता कामा नये. अशा प्रकारे इतके अचूक बॉल तयार करणे हे थोडे अवघड काम आहे. त्यासाठी हायटे क मशिनची आवश्यकता असते. (Anti Friction Bearing Manufacturers Association यांनी या मोजमापासंदर्भातील काही नियम घालू न दिले आहेत). त्यामुळे आम्ही अशा प्रकारचे चांगल्या प्रतीचे बॉल्स परदेशातून आयात करतो. (कारण भारतामध्ये अचूक बॉल्स तयार करण्याची यंत्रणा नाही.) बॉल स्क्रू दुरूस्त करताना, त्याच्या नटमधील प्रत्येक बॉल बारकाईने तपासावा लागतो. एखाद्या ठिकाणी गरजेपेक्षा 0.५ मायक्रॉनने जास्त आकाराचा बॉल बसवला गेला तरी सर्व लोड त्याच बॉलवर येतो आणि पुन्हा तो स्क्रू नादुरुस्त होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दुरुस्ती करताना बॉलच्या ठरले ल्या मापापेक्षा ५ मायक्रॉन कमी आणि ५ मायक्रॉन जास्त असे वेगवेगळ्या मापाचे बॉल ठे वावे लागतात (उदाहरणार्थ, नॉमिनल ३.१७५ आकाराचे बॉल ठे वायचे असतील तर फक्त एक बॉल घेऊन चालत नाही, तर +/- ५ मायक्रॉनच्या फरकातील

बॉलही ठे वावे लागतात.)

बॉल स्क्रूमध्ये तयार होणारे दोष

बॉल स्क्रूमध्ये, जिथे वापर जास्त आहे त्याठिकाणी लीड स्क्रूची झीज होणे आणि स्क्रूच्या शेवटच्या भागात झीज न झाले ला मूळ आकार (ओरीजनल फॉर्म) असणे, बॉल्सची झीज होणे, त्याची गोलाई (स्फे रीसिटी) कमी होणे ज्यामुळे त्याच्यावर असमतोल टॉर्क कार्यरत होणे अशा प्रकारचे दोष निर्माण होतात. यावर आले ल्या बॉल स्क्रूची तपशीवार तपासणी करून योग्य ते उपाय शोधले जातात. जसे की नट व्यवस्थित करणे, तो जिथे खराब झाले ला आहे तिथे तो स्वच्छ करणे. जिथे झीज झाले ली आहे तिथे अचूक असा कोणता बॉल लागणार आहे हे पाहणे इत्यादी. उदाहरणार्थ, २ मीटर लांबीच्या स्क्रूमधील मधल्या १ मीटरची झीज झाली आहे आणि नट मात्र ओव्हरसाईझ झाला आहे, तर अशावेळी फक्त बॉल ओव्हरसाईझ करून चालत नाही किंवा फक्त स्वच्छ करून चालत नाही, तर योग्य डिफ्लेक्टरचा वापर करणेही गरजेचे असते. (किंवा डिफ्लेक्टर दुरुस्त करणे गरजेचे असते). या प्रक्रियेत नट, बॉल आणि स्क्रू यांचे रिग्राईंडिंग न करता, त्यांना पूर्णपणे स्वच्छ करणे व योग्य आकाराचा बॉल वापरणे गरजेचे असते. युरोपात २०° तापमानाला बॉल स्क्रू बनवायचे आणि भारतात ते ३५° तापमानाला चालायचे. मात्र काही वर्षांनी 'इंस्टिट्युट ऑफ अॅप्लाईड रिसर्च'ने भारतात ज्या

धातुकाम / 33


34 / धातुकाम


चित्र क्र ५ - आय.ए.आर.ची बॉल स्क्रू तपासणी खोली

तापमानाला मशिन चालते त्याच तापमानाला बॉल स्क्रू बनवायचा विचार पुढे आणला. तापमानाबरोबरच ज्या ठिकाणी या स्क्रूची जोडणी आणि तपासणी होते अशा दोन्ही ठिकाणी स्वच्छतेला अतिशय महत्त्व आहे. पूर्णपणे धूळविरहीत जागेतच ही कामे करावी लागतात. आय.ए.आर.मध्ये आम्ही या दोन्ही खोल्या विशेष स्वच्छतेच्या ठे वले ल्या आहेत. चित्र क्र.५ मध्ये दिसणारी आय.ए.आर.ची तपासणी खोली याचीच साक्ष देत.े मागील दहा-पंधरा वर्षांत आपल्याकडे बॉल स्क्रूची मागणी वाढली आहे. ही मागणी बाहेरील देशातून माल मागवून भागवली जाते. मात्र स्वतः उत्पादन वाढवून व्यवसाय वाढवावा असे मला कधीच वाटले नाही, कारण व्यवसायाला सुरुवात करतानाच संशोधनात्मक संस्था सुरू करणे हाच माझा मुख्य उद्देश होता. या अंतर्गत पदव्युत्तर पदवीसाठी (मास्टर्स डिग्री) असणाऱ्या

प्रकल्पासंदर्भातील अनेक गोष्टी विकसित केल्या गेल्या. मला फक्त बॉल स्क्रू तयार करायचे नव्हते तर विद्यार्थ्यांच्यासोबत ते तंत्रज्ञान विकसित करून ते वाढवायचे होते. म्हणूनच आज आमच्या संस्थेतनू ६०-६५ अभियंता मुले-मुली पुढचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यातील अनेक परदेशातही गेले. या संस्थेमार्फ त आम्ही सौर उर्जेवर चालणारीही काही उपकरणे तयार केली आहेत. तसेच आम्ही स्किड रोलर्स (४० टनासाठी) तयार करून त्यांचा साठा करून ठे वला असून मागणीनुसार तो विकला जातो.

पुढे जाणे या समस्येवर मात करण्यासाठी आम्हीच अथक प्रयत्न करून, त्याची भूमिती विकसित केली. तसेच सर्व्हिससाठी जे बॉल स्क्रू यायचे ते वाकले ले असायचे. असे बॉल स्क्रू मायक्रॉनमध्ये टॉलरन्स ठे ऊन सरळ करणे हेदेखील एक मोठे आव्हान होते. अशा सर्व आव्हानांवर मात करून बॉल स्क्रूसारख्या उच्च तांत्रिक व्यवसायामध्ये आम्ही आमचा ठसा उमटवला. कुणाला बॉल स्क्रूचा कारखाना काढायचा असेल तर रॉयल्टी बेसिसवर त्यांना सल्ला देण्यासाठी आम्ही आनंदाने तयार आहोत.

या मधील आव्हाने बॉल स्क्रू तयार करताना योग्य त्या आकाराचे बिनचूक बॉल मिळवणे हेच फार मोठे आव्हान होते. कोणत्याही अडचणीशिवाय डिफ्लेक्टरमधून बॉल

व्ही.व्ही.मज ु ुमदार pramu_42@yahoo.com

धातुकाम / 35


भाषा पे चर्चा लेख क्र. १

द्यम प्रकाशनने भारतीय भाषांमध्ये तांत्रिक विषयांवरील मासिके, पुस्तके तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वप्रथम 'भाषे'चा प्रश्न चर्चेला आला.

असे लिखाण कोण वाचणार? मराठीत तांत्रिक लिखाणाची परंपराच नाही. मराठीत त्यासाठी शब्द नवे करावे लागतील, ते संस्कृ त नाहीतर इंग्रजी शब्दांवर बेतावे लागतील. म्हणजे भाषा क्लिष्टच होईल. त्याऐवजी सरळसरळ प्रचलित इंग्रजी शब्द वापरावे, म्हणजे लोकांना समजायला सोपे जाईल. हा एक विचार झाला. हा इंग्रजीतून व्यवहार करण्याची सवय असले ल्या, मोठ्या शहरातील नव्या (आणि जुन्याही) पिढीचा विचार झाला. आज आपल्याकडील कारखानदारीत काम करणारा बहु सखं ्य कर्मचारीवर्ग इंग्रजी जाणत नाही, अथवा त्याला इंग्रजीचे केवळ जुजबी ज्ञान असते. तेव्हा पदोपदी अपरिचित इंग्रजी शब्द वापरले ले मराठी लिखाण त्याला क्लिष्टच वाटणार यात शंका नाही. बोली भाषेतल्या शब्दांवर नवे सोपे तंत्रविषयक शब्द बेतणे अशक्य नाही. सुतारकामासंबध ं ीत बरेच शब्द मराठीत आहेत. रंधा, पटाशी, गिरमिट, करवत, भुसा, छिलका, तासणे, कातणे वगैरे. (हे शब्द आता इतिहासात जाणार अशीच शक्यता आहे!) अशा शब्दांवर आधारित धातुकामविषयक नवे शब्द तयार करता आल्यास ते सहज वापरात येऊ शकतील, हा दुसरा विचार झाला. हा मराठीतून शाळा शिकले ल्या लहान गावातून येणाऱ्या नव्या कर्मचारी वर्गासाठी विचार झाला. मराठीतून व्यावसायिक पद्धतीने तंत्रविषयक लिखाण करण्याची सुरुवात आता होते आहे. यंत्रशाळे शी संबधि ं त विषयांवर लिखाण करण्यासाठी अनेक ले खक पुढे येत आहेत. तंत्रविषयक इंग्रजी शब्दांना सर्वमान्य प्रतिशब्द न मिळाल्यास स्वत:चा नवा शब्द तयार करून पुढे जात आहेत. ही गोष्ट योग्यच आहे, पण त्यामुळे एकाच इंग्रजी शब्दाला अनेक मराठी प्रतिशब्द (चांगले अथवा वाईट) तयार होतात, किंवा इंग्रजी शब्दच मराठीत उचलले जातात. शिवाय या विविध शब्दांविषयी दहा जाणकार लोकांची मते ऐकून एका शब्दाची निवड करण्याची काहीच यंत्रणा नाही. ही परिस्थिती प्रमाणित तंत्रविषयक भाषा निर्माण होण्यासाठी पोषक नाही. अशी भाषा तयार झाल्याशिवाय मराठीत दैनदि ं न वापरासाठी तंत्रविषयक साहित्य तयार होणे कठीण आहे. या विषयावर उद्यमच्या संपादकवर्गात भरपूर वादविवाद झाले आहेत. त्यापायी, ले ख तयार करण्याचे काम अजिबात वेग घेईनासे झाले . आता तात्पुरता निर्णय झाला आहे. 'कामगार प्रशिक्षणासाठी' बनवले ल्या ले खनात कमीतकमी इंग्रजी शब्द वापरावेत. 'धातुकाम' मराठी मासिकात मात्र वर्क शॉपमधे वापरली जाणारी बोली भाषा वापरावी; परंतू त्याठिकाणीही इंग्रजीचा स्वैर उपयोग टाळावा, असे जरी असले , तरी वाचकांच्या प्रतिक्रियाच या प्रश्नाच्या उत्तरासाठी निर्णायक ठरणार आहेत. यासाठीच 'भाषा पे चर्चा' हे सदर आम्ही चालू करत आहोत. अशी प्रमाण भाषा लोकांच्या सहभागाने तयार करण्याच्या कामासाठी 'भाषा पे चर्चा' या सदराचा उपयोग होऊ शकेल असे आम्हाला वाटते. या मासिकात वापरले ल्या मराठी भाषेसब ं ध ं ी आपली मते/सूचना जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्याचप्रमाणे, कामगार प्रशिक्षणासाठी आम्ही तयार करीत असले ल्या आगामी पुस्तकातील एक उतारा पुढे देत आहोत. या ठिकाणी आम्ही इंग्रजी शब्दांचा वापर शक्यतो टाळला आहे. हे ले खन कसे असावे, याविषयी आपल्या कल्पना जरूर कळवाव्या. शक्य झाल्यास आपल्या पद्धतीने पुनर्लेखन करून ले ख पाठवावा. पुढील पानावर 'ले थ'चे चित्र आणि त्याच्या निरनिराळ्या भागांची इंग्रजी नावे, आमच्या ले खकांनी वापरले ले मराठी प्रतिशब्द दिले ले आहेत. दोन मराठी प्रतिशब्दातील आपली निवड आणि दोनही शब्द पसंत नसल्यास आपल्या पसंतीचा तिसराच नवा शब्द ई-मेलने (office@udyamprakashan.com), वॉट् स अॅपने ( क्र. ७७५५९४४५९८) अथवा आपण आमच्या वेबसाईटवर (www.udyamprakashan.com) जाऊनही आपली मते आम्हाला कळवू शकता. आम्हाला मिळाले ल्या प्रतिक्रियांबद्दलची माहिती आम्ही पुढील अंकात याच सदरात देऊ.

36 / धातुकाम


आमच्या आगामी पुस्तकातील काही भाग कातनयंत्र (ले थ) कोणतेही यंत्र चालवण्यापूर्वी त्याची रचना आणि वापरण्याची पद्धत समजावून घेणे जरुरीचे आहे. कातकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ले थ या यंत्राची रचना चित्र क्र. १ मध्ये दाखवली आहे. ले थची रचना ले थचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे 'मुख्य पेटी' (हेडस्टॉक). 'मुख्य पेटी'त स्पिंडल बसवले ला असतो. स्पिंडलचा वेग बदलता येण्यासाठी लागणारी गिअर रचनादेखील याच पेटीत सामावले ली असते. विजेच्या मोटरच्या सहाय्याने, गिअर साखळीमार्गे स्पिंडलला गती मिळते. स्पिंडलच्या तोंडाला बसवले ल्या 'चक'च्या सहाय्याने कार्यवस्तू पकडू न फिरवता येत.े अशा प्रकारे, कार्यवस्तुला योग्य त्या कर्तनवेगाने फिरवण्याची सोय मुख्य पेटीमुळे मिळते. कातकामासाठी कार्यवस्तूला 'कर्तनवेग' द्यावा लागतो. त्याचप्रमाणे कर्तन हत्याराला 'सरकवेग' द्यावा लागतो.

१४. मुख्य स्विच ११. लीव्हर

१३. हत्यार बैठक १२. काटसरकण १६. ४. चक वरची सरकण

३. स्पिंडल

२१. सेंटर

१७. पुच्छपेटी

२. मुख्य पेटी १८. हस्तचक्र

८. बदल चक्र

२०. सरकमार्ग

५. सरक चक्रपेटी

७. लीड स्क्रू ६. सरकदांडा

१९. हत्यार सरकण

९. यंत्र मंचक

१५. एप्रन १. ले थ

१०. विद्युत मोटर

इंग्रजी व पर्यायी मराठी शब्दांचा तक्ता पर्यायी मराठी शब्द

अ.क्र.

इंग्रजी शब्द

उच्चार

LATHE

लेथ

कातकाम यंत्र

कातनयंत्र

HEAD STOCK

हेड स्टॉक

मुख्य पेटी

चालन पेटी

SPINDLE

स्पिंडल

आस

चाती

CHUCK

चक

चक

पकड साधन

FEED GEAR BOX

फीड गिअर बॉक्स

सरक-चक्र पेटी

FEED ROD

फीड रॉड

सरक दांडा

LEAD SCREW

लीड स्क्रू

लीड स्क्रू

CHANGE GEARS

चेंज गिअर्स

बदलचक्र

संक्रमण चक्र

MACHINE BED

मशिन बेड

यंत्र मंचक

यंत्र पाटा

१०

ELECTRIC MOTOR

इले क्ट्रीक मोटर

विद्युत मोटर

विद्युत चलित्र

११

LEVER

लिव्हर

दांडा

१२

CROSS SLIDE

क्रॉस स्लाईड

काट सरकण

१३

TOOL POST

टू ल पोस्ट

हत्यार बैठक

हत्यारधानी

१४

MAIN SWITCH

मेन स्वीच

मुख्य स्वीच

मुख्य खटका

१५

APRON

एप्रन

कवच

१६

COMPOUND SLIDE

कंपाऊंड स्लाईड

संयुक्त सरकण

१७

TAIL STOCK

टे ल स्टॉक

पुच्छपेटी

१८

HAND WHEEL

हँड व्हील

हस्तचक्र

१९

TOOL SLIDE

टू ल स्लाईड

हत्यार सरकण

२०

GUIDE WAYS

गाईड वेज्

मार्गदर्शी पथ

सरकमार्ग

२१

CENTER

सेंटर

केंद्रक

केंद्र

सुचवले ला शब्द

चाल दांडा

वरची सरकण

वापरात असले ल्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिले ले आहेत. त्यांचा परिभाषेत वापर करावा ही अपेक्षा आहे. यावर आपले विचार कळवावे. यापैकी जो शब्द आपणास योग्य वाटतो तो शेवटच्या "सुचवले ला शब्द" या रकान्यात टाकावा किंवा नवीन शब्द सुचत असल्यास तो द्यावा.

धातुकाम / 37


002

HTP

BTP

सीएनसी लेथवर वापरण्यासाठ� �व�वध �कारचे

टू ल टरेट

SMT

. . . . . . .

BTP. वीज - यां��क� (इलेक्�ो-मेकॅ�नकल) टरेट HTP. है �ो�लक टरेट STP. सव� टरेट SMT. एक मोटर च�लत हत्यार टरेट (अक्षीय/आर�य) DTT. दोन मोटर च�लत हत्यार टरेट VTP, हे वी �ुट� चौरस टरेट SQTP. इकोनो�मकल चौरस टरेट

DTT

VTP SQTP

#19 & 20, (Plot No. 467 - 469), IV Phase, 12th Cross, Peenya Industrial Area, Bangalore - 560 058. INDIA. Tel. : (+91-80) 2836-1543 Fax : (+91-80) 2836-1549.E-mail : info@pragatiautomation.com URL : http://www.pragati-automation.com

38 / धातुकाम


उत्पादने

स्पिन रिव्हेटिं ग मशिन

ऑलमॅटीक ग्रिप उच्च वेग, अचूकता आणि सातत्य देण्यासाठी ऑर्बिटल बेंच स्पिन रिव्हेटिं ग मशिनची रचना अतिशय काटे कोरपणे केले ली असते. त्याच मशिनवर वेगवेगळी हत्यारे (टू ल्स) वापरून फ्लेअर, फ्लॅंज, जॉईन आणि स्वेजिंग करण्यासाठी रिव्हेटिं ग फोर्स, टाईम, स्ट्रोक आणि स्पीड बदलता येतात.

ऑरबिटल सिस्टिम्स www.orbitalsystems.net

वापरण्यासाठी उपयुक्त. • अॅडजेस्ट करता येण्याजोगे केंद्र, ज्यामुळे घटक (वर्क पीस) हे सेट केले ल्या सीमेच्या आतच राहतात. • आडवी जोडणी - उभ्या सी.एन.सी. मिलिं ग मशिनसाठी योग्य.

• ओबडधोबड कास्टिंग तसेच सेमीफिनिशिंग या दोहोंसाठीही उपयुक्त. • पूर्णतः बंदिस्त आणि देखभालीची आवश्यकता नसणारे उच्च दाब (हाय प्रेशर) स्पिंडल.

• मशिनच्या आटोपशीर रचनेमुळे पाच अक्षीय मशिनिंग सेंटर्सवर अहिरे मशीन टू ल्स www.amtplindia.com

सहा स्थानके (स्टेशन्स) असलेला सी.एन.सी. टरेट लेथ

डिस्क ब्रश होल्डर्स • इमेक्सू कंपनीने फ्लो-थ्रू टे क्नॉलॉजी हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर केले आहे. वेट डीबरिंगच्या कामासाठी आदर्श आणि त्यांच्या ब्रशची उपयुक्तता वाढवणारे हे उत्पादन आहे.

'अभिजात'चा सहा स्थानकांचा टरेट ले थ 'बार वर्क ' तसेच 'न्यूमटॅ ीक चक वर्क ' अशा दोन्ही कामांसाठी उपयुक्त आहे. आधी टर्निंग केले ल्या फोर्जिंग किंवा कास्टिंग ब्लँकवर सहा स्थानके टरेट असले ल्या या मशिनवर टर्निंग, ड्रिलिं ग, थ्रेडिंग ही सर्व कामे एका सेट-अपमध्येच करता येतात.

वैशिष्ट्ये • उष्णता निर्मितीचे प्रमाण कमी होते. • प्लॅस्टीकचे असल्यामुळे वजनाने हलके होल्डर्स इमेक्सू ग्रुप www.imexsu.eu

स्विंग सिलिं डर - ओव्हरलोड (अतिभार) संरक्षणासह

वर्णन - हे ओढणारे (पूल) प्रकारचे सिलिं डर असतात. स्विंग स्ट्रोकमध्ये पिस्टन (दट्ट्या) इंटर्नल कॅममुळे ९० अंशातून फिरतो. त्यापाठोपाठ क्लँपिंग स्ट्रोक केला जातो.

वापर - क्लँपिंग आणि डीक्लँपिंगमध्ये क्लँपिंग स्ट्रॅप ९० अंशातून फिरतो. 'स्विंग' होत असल्यामुळे 'कार्यवस्तू' सहजतेने 'लोड' आणि 'अनलोड' करता येत.े

हाय पॉवर क्लॅ म्प्स प्रा.लि hypowerclamps.com

अभिजात इक्पिमेंट्स www.abhijatequipments.com

सिंक्रोनस स्लीव्ह तपासणी यंत्र

विशिष्ठ हेतस ू ाठी केले ली यंत्रणा - सिंक्रोनस स्लीव्ह निरीक्षण यंत्राचे कार्य - १०० % दर्जाच्या चाचणीसाठी प्रोफाईल पाहणी इनफिड कन्व्हेअरवरून गिअर कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण करणाऱ्या

स्टेशनकडे पाठविले जातात वरून एक कॅमेरा, खालू न एक कॅमेरा प्रतिमा टिपतो. खालचा आणि वरचा कॅमेरा निरीक्षणाखालील भागाची ५० मिलीसेकंद पाहणी करतो. काढले ल्या प्रतिमांची आधी निश्चित केले ल्या स्पेसीफिकेशन डेटाबरोबर तुलना करून निर्णय घेतला जातो.

तेज कं ट् रोल प्रा.लि.,ठाणे www.tejcontrol.com

धातुकाम / 39


लेखनासाठी आवाहन धा

तुकाम मासिक हे इंजिनिअरिंग वर्क शॉपशी संबधि ं त काम करणाऱ्या सर्वांसाठी आहे. मालकापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत - प्रत्येकाला यातून काही ना काही वाचण्यासारखे मिळावे असा आमचा प्रयत्न राहील. यासाठी आजच्या पिढीतून स्वतःच्या अनुभवावर आधारित ले ख मिळावेत असा आमचा प्रयत्न राहील. आज महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने इंजिनिअरिंग वर्क शॉप्स आहेत. यातील अनेक ठिकाणी नव्या कल्पना लढवल्या जात असतात. नवी तंत्रे नव्याच तऱ्हेने वापरली जात असतात. आहे त्या यंत्रसामुग्रीतून अधिक चांगले उत्पादन मिळवण्याची धडपड सगळीकडेच असते. अशा कल्पना, अशी तंत्रे लोकांना सांगावीशी वाटली तर धातुकामचे व्यासपीठ उपलब्ध आहे. वर्क शॉपमधे काम करताना काही विशेष उत्पादनतंत्रे वापरली, काही कल्पना वापरून उत्पादनखर्च कमी केला, काही नियोजन करून आहे त्या सामुग्रीतून जास्त उत्पादन घेतले , तर अशा तऱ्हेचा इतरांना सांगण्यासाठी तुमच्याजवळ काही अनुभव असेल, तर तो लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला आवडेल.

ले खासंबंधात काही सूचना

• ले खाचे स्वरूप पाठ्यपुस्तकातील ले खासारखे नसावे, तर ते प्रत्यक्ष अनुभवावर आधारित, वाचकांशी संवाद साधणारे असावे. ले खाबरोबर स्पष्टतेसाठी चित्रे आणि फोटो असल्यास उत्तम. पूर्वी प्रसिध्द झाले ली चित्रे आणि फोटो वापरता येणार नाहीत.

• ले खन विषयाला धरून असावे. अलं कारिक फापटपसारा, व्यक्तिगत स्तुतिसुमने टाळावी. • ले खात चुका राहू नयेत यासाठी आणि ले ख 'धातुकाम'च्या ले खनधोरणाशी सुसगं त असावा या दृष्टीकोनातून, छापण्यासाठी आले ल्या प्रत्येक ले खावर 'धातुकाम' संपादकीय संस्कार करेल. काही मोठे बदल करावे लागले तर मूळ ले खकाची परवानगी अवश्य घेतली जाईल.

• पाठवले ला ले ख हे खास 'धातुकाम'साठी केले ले ले खन असावे आणि ते पूर्वी कुठे ही प्रकाशित झाले ले नसावे.

धातुकाम मासिकात लिखाण करण्यासाठी आम्ही ले खकांच्या शोधात आहोत. आपल्या ले खनविषयाची कल्पना देणारे पत्र/इमेल लिहू न आमच्याशी संपर्क साधा. त्यातून चांगल्या ले खाची बीजे दिसली तर आमचा संपादक वर्ग आपल्याशी जरूर पत्र व्यवहार करेल. स्वीकृत ले खनासाठी यथायोग्य मानधनही दिले जाईल.

संपर्क

उद्यम प्रकाशन आनंदघन, ३रा मजला, प्लॉट नं. ४/११३ नटराज सोसायटी, कर्वेनगर पुणे - ४११०५२ मोबा. नं - ७७५५९४४५९८ मेल आयडी - office@udyamprakashan.co

40 / धातुकाम


धातुकाम / 41


DHATUKAM (METAL WORKING) MARATHI MONTHLY FOR METALWORKING INDUSTRY

जाहिरातींसाठी आवाहन

Appeal for Advertisements

‘धातुकाम’ या नव्या मासिकाच्या स्वरूपाची कल्पना देण्यासाठी आम्ही हा ४० पानांचा नमुना अंक काढला आहे. मार्चनंतर रीतसर दरमहा अंक प्रकाशित होतील ते कमीतकमी ८० पानांचे असतील.

This sample issue of DHATUKAM will give you an idea of the style and content of this new Marathi magazine on Metal Working. This sample issue has 40 pages. Regular monthly issues will be of minimum 80 pages. First issue will come out in month of March 2017.

यांत्रिक उत्पादन क्षेत्राशी संबधि ं त सर्व विषय या मासिकात हाताळले जातील. अशा प्रकारचे भारतीय भाषेतील तंत्रविषयक मासिक हे या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वसामान्यांमधे विषयांची जाण आणि आवड वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल. सुजाण कर्मचारी वर्ग असेल, तर कारखान्यांमधील कामाचा दर्जा आपोआपच उं चावेल आणि यातूनच नवा आत्मविश्वास असले ली कारखानदारी तयार होईल, अशी आमची धारणा आहे. हे मासिक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम उद्योगांतील यांत्रिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे सर्वेक्षण आम्ही सुरू केले ले आहे, त्यातून आतापर्यंत १२००० तपासून घेतले ल्या पत्त्यांची यादी आमच्याकडे तयार झाली आहे. हा आकडा लवकरच १५००० पर्यंत जाईल असा आमचा विश्वास आहे. मासिकांच्या पहिल्या तीन अंकांच्या १२००० ते १५००० प्रती काढू न त्या वरील यादीतील पत्त्यांवर आम्ही विनामूल्य पाठवणार आहोत. आणि अंक आवडल्यास त्यांनी वर्गणीदार व्हावे असे आवाहन करणार आहोत. धातुकाम मासिकाला जाहिराती देऊन आमच्या या उपक्रमाला मदत करावी असे आवाहन आम्ही करत आहोत. तुमची जाहिरात कमीतकमी १२००० टार्गेट कारखानदारांपर्यंत पोचेल अशी आम्ही खात्री देतो. त्याचबरोबर एका चांगल्या कामाला मदत केल्याचे श्रेयही तुम्हाला लाभेल. जाहिरातींचे दरपत्रक आणि इतर तपशील पुढील पानावर दिले आहेत. आपण १, ३, ६ अथवा १२ अंकांकरता आपली जाहिरात देऊ शकता. शक्य असेल त्यांनी ३ अथवा १२ अंकासाठी जाहिरात नोंदवून आमच्या कामाला मदत करावी, अशी आम्ही विनंती करतो.

42 / धातुकाम

We propose to handle all subjects related to working of engineering workshops. All issues concerning today’s industry will find a place in this magazine. This type of technical magazine in Indian language will help in spreading the engineering culture to the masses, and will ultimately help in building a new confident India. We wish to take our magazine to maximum possible readers. For this purpose we have commissioned a survey of engineering industry in Maharashtra, and so far we have 1200 verified addresses. We expect this figure to reach up to 15000. We propose to print 12000 to 15000 copies of the first 3 issues of the magazine, and send them free of cost to above addresses. We will request them to subscribe in case they like the magazine. We request you to help us by giving advertisements to the magazine. Your ad will reach to a minimum of 12000 target customers. And you will have the satisfaction of supporting a good cause. Advertisement rate table is given on the next page. You can release your ads for 1, 3, 6 or 12 consecutive issues. If possible, please support our work by releasing your ad for 3 or 12 issues.


Advertisement Details

Magazine Details Name of Magazine

DHATUKAM

ADVERTISEMENT DETAILS -RATE CARD IN IS PER ISSUE

Size of magazine

190mm x 260 mm

4 COLOUR STANDARD ADVERTISEMENT

Printing area

160mm x 230mm

SPACE

1X

3X

6X

9X

12X

With Bleed

190mm x 260mm

DOUBLE SPREAD

90000

88200

86400

84600

81000

(+3mm Bleed)

FULL PAGE

50000

49000

48000

47000

45000

Total pages

80 - 100

3/4 PAGE

40000

39200

38400

37600

36000

Distribution

Min.12,000 Copies

2/3 PAGE

37000

36260

35520

34780

33300

Frequency

12 Per Year

ISLAND UNIT

35000

34300

33600

32900

31500

Binding

Perfect Binding

1/2 PAGE VERTICAL

32000

31360

30720

30080

28800

Advt. resolution

Min.300 DPI

1/2 PAGE HORIZONTAL

32000

31360

30720

30080

28800

Media

Cover -170 gsm Matt, Other Pages-70 gsm

3/8 PAGE

25000

24500

24000

23500

22500

1/4 PAGE VERTICAL

18000

17640

17280

16920

16200

Printing

4 Colour

1/4 PAGE HORIZONTAL

18000

17640

17280

16920

16200

1/12 PAGE PRDUCT INFO

3000

2960

2920

2880

2800

1/16 PAGE-CLASSIFIED

2000

1960

1920

1880

1800

FRONT COVER INSIDE

65000

63700

62400

61100

58500

BACK COVER INSIDE

65000

63700

62400

61100

58500

BACK COVER

70000

68600

67200

65800

63000

SPECIAL INSERTION

TO BE DECIDED ON CASE TO CASE BASIS

Final Trim (380 mm × 260 mm) Live area (366 mm × 246 mm)

Double spread

77 mm × 230 mm

160 mm × 112 mm

1/2 page vertical

1/2 page horizontal

Full Size w/Bleed 196 mm × 266 mm Live area 176 mm × 246 mm

160 mm × 169 mm

117 mm × 230 mm

117 mm × 169 mm

Final Trim 190 mm × 260 mm

Full Page

77 mm × 169 mm

3/8 page

3/4 page

77 mm × 112 mm

1/4 page vertical

160 mm × 74 mm

1/4 page horizontal

2/3 page

Island Unit

77 mm × 74 mm

77 mm × 29 mm

1/12 page prduct info

1/16 page Classified

BORDERS: Three-Eighth, Quarter and Eighth page ads must have a border on all sides.

धातुकाम / 43


44 / धातुकाम

धातुकाम नमुना अंक