Page 58

संसारात स्त्रीच्या जीवनात अनेक बदल (भूमिका) घडत असतात हे सर्व बदल नेहेमीच निर्णायक व खडतर असतात. स्त्रीजवळ आपल्या कामाबद्दल श्रद्धा हवी, विश्वास हवा, सद्सद्विवेकबुद्धी हवी म्हणजे परिवारातील मार्ग सुकर होतो. असे असले तरी स्त्रीवर कुटु ं बातूनच अन्याय होतात. बरे चदा असेही आढळू न येते कि स्त्रीवर अन्याय करणारे दस ु रे तिसरे कोणी नसून एक स्त्रीच असते. स्त्री पारं पारिक विचार अंधश्रद्धा ह्यांच्या जोखडातून मुक्त न झाल्याने समाज तिच्यावर अन्याय करण्यास धजावतो का? स्त्रियांच्या बाबतीत तर वस्तुस्थिती अशी आहे कि, ती रूढी अंधश्रद्धा ह्यांना लवकर बळी पडते. त्यावेळेला ‹अंधश्रद्धा निर्मुलन› ह्या सारख्या प्रयत्नातून हे अन्याय निश्चित कमी होतील असे वाटते. आणि पाळण्याच्या दोरी प्रमाणे परिवाराच्या सुखाची दोरी तिच्याच हाती असल्याच साक्षात्कार होईल. स्त्रीने आपली बलस्थाने, मर्मस्थाने लक्षात घेऊन ती विचाराने, संयम, सद्विवेकबुद्धीने अन निरपेक्षतेने वागली तर"परिवार का सुख, नारी के हाथ में" अन परिवार कि ख़ुशी, नारी तेरे साथ मे हि घोषणा सार्थ होईल.

सौ. मनीषा बापट

आयुष्य नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दस ु रं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायच नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं.....

५८

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement