Page 46

काही महिन्यातच कालची कुमारी सई आजची एक प्रसिद्ध वकील झाली आहे . आणि आता काय ? …. तिच्या समोर उभे रहायची कोणाची टाप आहे ? तिच्या विद्वत्तेची जाणीव तिच्या एका नजरे तन ू च होते असे आमच्या भागातील (एके काळचे मवाली आणि आताचे) समाज-सेवक सांगतात. तिची खालील तीन रं गीत फॉर्मची थिअरी आमच्या भागात प्रचंड प्रसिद्ध झाली. शिटी मारणे, धक्का मारणे, कॉमेंट करणे ह्या आणि अश्या किरकोळ गुन्ह्यांसाठी फॉर्म क्रमांक एक. पिवळ्या रं गाचा हा फॉर्म कोणत्याही स्त्रीने भरला की कुमारी सई शिटी मारणार्याला अर्ध्या दिवसात गजाआड करणार ही काळ्या दगडावरची रे घ.

तांबड्या रं गाचा फॉर्म क्रमांक दोन कोणत्याही स्त्रीच्या हातात दिसला की तिच्यावर शारीरिक (किंवा मानसिक) अत्याचार करणार्याला कमीत कमी एक महिना वकिलीणबाई जेलची चक्की पिसायला लावणार हे सर्वांना माहित आहे . …अगदी नवरा असला तरीही. आणि लाल फॉर्म म्हणजे अत्याचार करणार्याचे जणू मृत्युपत्रच. अत्याचार करणारा जर नवरा असेल तर advocate सई कमीत कमी एक कोटीची पोटगी मिळवून दे णारच असा विश्वास प्रत्येक स्त्रीला वाटतो. आणि नवरा नसेल तर …. तर नुसती कल्पनाच केलेली बरी (अजून तरी असा एकही लाल फॉर्म भरला गेलेला नाहीये). सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्याचार करणाऱ्यामध्ये स्त्री असेल (म्हणजे सासूबाई किंवा नणंदबाई) तर शिक्षा दग ु नी. (खरे तर, पुरुषांपेक्षा स्त्रियाच स्त्रियांवर अत्याचार जास्त करतात असे तमाम पुरुष जातीचे मत येथे विचारात घेण्यासारखे आहे .) कुमारी जुई भडकमकर: ‹दे र आये दरु ु स्त आये› ह्या म्हणीचे प्रत्यंतर कुमारी जुई मुळे सोसायटी मध्ये सर्वांना आले. इयत्ता तिसरी पर्यंत काहीशी अबोल असल्याने बाळ जुईबद्दल सावित्रीमातेच्या मनात भीतीची पाल चुकचुकायची. आपली मुलगी मुकी तर नाही ना ? तिची बोलतीच कोणी बंद केली नाहीना ? असे वाईट वाईट विचार ह्या जन्मदात्रीच्या मनात येत असत. परं त,ु चौथीच्या परीक्षेच्या वेळी कुमारी जुईने उत्तरपत्रिकेवरून वाद घालून आपल्या आईचा वारसा पुढे चालविण्यास आपण समर्थ आहोत हे दाखवून दिले. आणि त्या दिवसापासून ते आतापर्यंत एकही दिवस आपल्या आईच्या मनात परत असे वाईट विचार येवू दिले नाहीत. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठे वत, जेथे शक्य असेल तेथे वाद घालत आणि शक्य नसेल तेथे आदळ-आपट करत आपुल्या माय-भगिनींची परं परा कायम ठे वली.

नटण्या मुरडण्याची थोडीफार आवड असलेल्या कुमारी जुईला त्या पेक्षाही जास्त आवड कराटे खेळण्याची आहे हे आमच्या भागातील सडक छाप सख्या हरींना (नागरी भाषेत रस्त्यावरील मजनूंना) लवकरच कळले. तिची खोडी काढणाऱ्या पहिल्याच मजनूचा (म्हणजे बाजूच्या सौराष्ट्र सोसायटीतील कुमार पंकज शहाचा) उजवा हात आपल्या कराटे च्या फटक्याने आयुष्यभरासाठी निकामा केला आमच्या जुईबाईंनी. पंकज शहाचा आयुष्यभरासाठी शहे नशहा केला कराटे च्या एका फटक्यात. आणि त्यानंतर जुईलाच नाही तर विभागातील कोणत्याच मुलीला अश्या मजनूंचा कधीच त्रास झाला नाही. ह्या पराक्रमामुळे काहींनी जुईचे नामकरण जुई-ताय असे केले गेले (जसा मुन्ना भाय तशीच जुई-ताय) तर काहींनी ब्रूस-ली ची छोटी बहीण म्हणून जुई-ली असे केले.

तर अश्या ह्या दोघी सावित्रीच्या लेकी दिसामासांनी वाढतच होत्या. त्यांची कीर्ती चहूकडे पसरू लागली. आणि त्याचबरोबर विभागातल्या इतर बायकाही मानसिक दृष्ट्या कणखर झाल्या. ह्या दोघींचा आदर्श सर्व समाजातल्या मुलींनी ठे वला. आणि त्यामुळे विभागातील सर्व गुंड- मवाल्याना आपोआप अनैच्छिक सेवानिवत्ती ृ (non-voluntary retirement) घ्यावी लागली. पारं पारिक भांडणात नळावरची, पिठाच्या चक्कीवरची, साड्यांच्या दका ु नातील, बसच्या रांगेतील, रे ल्वेच्या स्टेशन वरची आणि धान्याच्या रे शनवरची ह्या दोघींची भांडणे गाजतच होती. परं त,ु आधुनिक काळातील फेसबुकवरची, ट्विटरवरची, Whaassup च्या ग्रुपमधली आणि Twitter वरची भांडणे दोघींनी अजरामर केली. विसाव्या शतकातील आद्य-क्रांतीकारिणी असा पुरस्कार द्यायचा झाला तर तो ह्यांनाच द्यावा असे इं टरनेटवरील बर्याच नेट-करांना वाटतें. E-mail किंवा G-mail पेक्षाही ‹फीमेल› नेटवर्क ची ताकद जास्त आहे हे ह्या दोघी स-प्रमाण सिद्ध करतात. सोसायटीच्या पटांगणापासून सुरु झालेले ह्या दोघींचे भांडण कौशल्य लवकरच वैश्विक होणार असल्याचे संकेत आम्हास तेव्हाच मिळू लागले होते. ‹अवघे विश्वचि माझे घर› किंवा ‹वसुधैव कुटु ं बकम› ह्या वृत्तीने जवळ जवळ येत असलेल्या जगाचे अंगण ह्या दोघींना खुणावू लागले होते. आपल्या कर्तुत्वास यथायोग्य वाव मिळावा आणि आपले कौशल्य आंतर-राष्ट्रीय पातळीवर सिद्ध करण्याची संधी मिळावी असा विचार ह्या दोघींच्याही मनात घोळू लागला. आणि……आणि काय……? दशदिशांतन ू आशीर्वाद आले……तथास्तु…।… तथास्तु।…तथास्तु। अश्या ह्या सावित्रीच्या दोन लेकी लवकरच विवाहबध्द होऊन आखाती दे शातील बहरीन मध्ये कायमचे वास्तव्य करण्यास येत आहे त असे कळते. आणि म्हणूनच हा सूचनावजा लेखाचा प्रयत्न "सावित्रीच्या लेकी……किती(?) सुरक्षित !!!” श्री. पराग नाडकर्णी (parry707@gmail.com)

४६

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement