Page 42

दस ु रीकडे भाताच्या तुसांची भट्टी पेटवून त्यावर उकळलेल्या आधण पाण्यात नूडल्स मोकळ्या करणे चालू होते. तांदळ ू कांडण्याची उखळ –मुसळ अनोखी होती. उखळीला बांधलेल्या आडव्या लाकडी पट्टीवर घरातली मुलं आळीपाळीने उभी राहत होती.त्यांच्या वजनाने उसळीचा दांडा मुसळीत पडत होता.मुलांची आई मुसळीपाशीच ठिय्या दे ऊन बसली होती.उखळीची हालचाल पाहून ती हातानेच तांदळाची भरड उखळीच्या दांड्याखाली सरकवत होती. हवेतल्या गजगजीची कोणालाच फिकीर नव्हती. तांदळाचं घट्ट पीठ झाल्यावर सोऱ्यावर लहान-मोठया भोकांच्या जाळ्या लावून पट्ट्याच्या नूडल्स पाडणे हे ही काम कष्टाचेच.पुढल्या गावातली बाई अंगणातच चूल थाटू न त्यावर २ तवे मांडून बसली होती.त्यावर वाटीने झराझर डोशाप्रमाणे तांदळाचे पातळ पीठ पसरवायचे. त्यावर अर्धा मिनिट झाकण उपड घालून ते वाफवायचे मग हळू वार हाताने तो अर्ध पारदर्शक गोल डोसा उचलून लाटण्याच्या स्टनडवर वाळत घालायचा.तिची मुलगी एखाद्या यंत्राप्रमाणे एकेक लाटण उचलून समोर उभ्या केलेल्या जाळीवर ते डोसे वाळत घालत्येय.लांबून पाहिले तर आपल्याकडले पापडच वाटावेत. ३-४ तास उन्हात वाळल्यावर हे कुरकुरीत राईसपेपर Pack करून विक्रीला पाठवायचे.आम्हापुढे पेश होणाऱ्या स्प्रिंगरोलचा जन्म इथला होता तर! पुढल्या घरात नारळाच्या किसात साखर व खाण्याचे रं ग घालून वाळवत ठे वले होते.”इथल्या मुलांमध्ये या कोकोनट केंडीज खूप लोकप्रिय आहे त.” तर दस ु रीकडे केळीचे काप वाळत पडले होते. बहुतेक घरात बायका व मुले अशा कामात मग्न होती.” घरातील पुरुष मंडळी मात्र जाळीच्या झुल्यावर झुलत डु लत झोपा काढण्यात नाहीतर कोंबड्या झुंजवून त्यावर सटटा लावण्यात मश्गुल असते. तरी बरे , सरकारने आता या झुंजीवर बंदी घातली आहे . नाही म्हणायला कधी मधी शेतकाम किवां वाणसामान करतात इथले बापे. “चिनचीनची टिपणी तुम्ही म्हणाल कष्टाची , अंगमेहनतीची कामे तर आपल्या गावातल्या बायका ही करतात त्यात काय विशेष ?” पण ख्मेर स्त्रियांचे दर् ु दै व इथे संपत नाही. “सोमाली माम” हीच्या पुस्तकात वाचल्या प्रमाणे उमलत्या कळ्यांचे निश्वास अर्थात अवघ्या तेरा चौदा वर्षांच्या मुलींनी चालवलेला वेश्याव्यवसाय अपघाताने मलाही पाहता आला आणि हृदय अक्षरशः हे लावून गेले. सियामरीपच्या पब स्ट्रीट व नाईट मार्के ट भागात जिथे तिथे दिसणाऱ्या फूट मसाजच्या पाट्या वाचून मी शेवटी कुतूहलाने एक माडी चढलो. मासामुळे दिवसभर अंगकोरची दे वळे पाहून थकलेल्या पायांवरही उतारा पडला असता. एका हॉलमध्ये झुळझुळीत पडद्यांची पार्टिशनस घालून बऱ्याच छोट्या खोल्या केल्या होत्या. प्रत्येक खोलीत गादी अंथरलेली. नुसते पाय चेपन ू घ्यायला पडदे कशाला लावायला हवेत या मनात आलेल्या प्रश्नावर विचार करत असतांना १३-१४ वर्षाच्या एका मुलीने मला झोपण्याची खुण केली. तिला ना इं ग्रजीचा गंध होता न मला तिची ख्मेर भाषा समजत होती. पाय चेपत असतांना तिने अचानक पुढे होऊन माझ्या छातीवर आपले डोके टे कवले. मी समजायचे ते समजलो आणि ताडकन उठलो. आता तिच्या डोळ्यात याचना दाटू न आली. मी काही न बोलता तिच्या हातावर १० डॉलर ठे वले व फुट मसाज न घेताच बाहे र निघून आलो. शेजारच्या दोन्ही बाजुंच्या पडदया आडू न होणारी कुजबुज , दाबलेले हसू आणि इतर आवाजांचा आता उलगडा झाला होता आणि त्या कुकर्मात निदान मी तरी सामील झालो नाही याचे हायसे वाटले.

श्री. अमोल उकिडवे

ईमेल: aukidave@hotmail.com

४2

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement