Page 41

ख्मेर स्त्री जीवन

स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे , न्यायमूर्ती रानडे या सारख्या युग पुरुषांमळ ु े आज भारतीय स्त्री बऱ्यापैकी मुक्त व प्रगत जीवन जगत आहे .ही जाणीव अधिक दृढ झाली ते कंबोडीयातलं स्त्रीजीवन पाहिल्यावर.बातमबाग शहराच्या बाईकसफरीवर आम्ही निघालो होतो. आमचा स्थानिक गाईड चिनचिन याने पागोडा स्टाईल च्या एका दे वळापाशी आमच्या गाड्या थांबवल्या. तिथे एक ख्मेर महिला चुलीतून भाजलेले बांबूचे तुकडे बाहे र काढत होती. तिची मुलगी शेजारी बसून हातभर लांबीचे ते तुकडे उलगडू न बांबूच्या पाकळ्या उलगडत होती. चिनचिने त्यातला एक अर्धवट उमललेला तुकडा आमच्या समोर धरला. त्या पोकळ बांबच ू ्या नळकांड्यात चिकटा भात ठासून भरला होता. त्यात राजमा सारख्या स्थानिक बिया व बेदाणे घातले होते. कोळशाच्या शेगडीवर आतल्या आतखरपूस भाजलागेल्याने त्याला वेगळा गंध लाभला होता. आम्ही बिचकतच चिमुट भर भात तोंडात टाकला त्याची गोडू स – खारी चव सर्वाना इतकी आवडलीकी हा हा म्हणता नळकांडे रिकामे झाले. प्रत्येकी २५०० रियाल म्हणजे ३५ रुपये ला विकला जाणारा हा राईस केक इथल्या कष्टकरी समाजाची न्याहारी असतो. या गावातल्या बायका भल्या पहाटे उठू न तो घरी शिजवून तिथे विकायला आणतात तेव्हा कोठे त्या पैशावर त्यांचे घर चालते. त्या पुढचे गाव नदीकाठी असल्याने मासे मुबलक. म्हणूनच एकीकडे माश्याची साफ केलेली डोकी उन्हात वाळत घातली होती तर दस ु रीकडे त्यांचे लाल भडक मांस ! उरलेल्या शेपट्या, काटे / क्ल्यांची रवानगी मोठ्या हं ड्यात झाली होती. त्यात वारे माप मीठ घालून त्यांची टिकाऊ पेस्ट बनवणे चालू होते. तर दस ु रीकडे लांबट , चपटे स्मोक फिश वाळवून त्यांचे गठ्ठे बांधणे सुरु होते नी कुठे माशांचे लोणचे घालून किलो किलो च्या बरण्यात भरले जात होते. सगळ्या हवेत माश्याचा उग्र दर्प !आमचे हात नाकावर पण चिनचिनला या वासाची सवयच नाही तर तो आवडतो दे खील.” या मौसमात प्रत्येक घरात २० एक किलो माशांची पेस्ट बनवली जाते.पेस्ट जितकी जुनी तिचा गंध तितका उग्र ! पुढे वर्षभरात नुसता डबा उघडला तरी अख्ख्या गावाला समजत की आज या घरात स्पेशल मेजवानी आहे . माशाचे डोळे काय चविष्ट लागतात.माशांचे सूप नाहीतर बार्बेक्यू नि कालवण व भात हे रोजचच जेवण झालं.”चिनचिनच्या तोंडाला माहिती दे त असतांनाच पाणी सूटू लागलं.पुढलं गाव तांदळ ु ाचे नूडल्स व स्प्रिंगरोल्सला लागणारे तांदळ ू पिठीचे कागद बनविण्यासाठी प्रसिद्ध होते.इथे भिजवलेले तांदळ ू लाकडी उखळात कांडण,त्याच्या पिठाच्या चकलीच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या उपकरणात घालून नूडल्स पाडल्या जात होत्या.

४१

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement