Page 40

“अन्नपूर्णा” ते “अन्न हे पूर्ण ब्रम्ह” आणि “अन्नदाता सुखी भव”

नमस्कार मित्रहो

सलाम बाहरे न २०१४ “स्त्री विशेषांक” च्या निमित्ताने शीर्षक विषया वर माझे मनोगत आपल्या सारख्या सुज्ञ व सुजाण वाचकां समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदे वो भव, अतिथिदे वो भव” हे सुभाषित आपण अगदी लहानपणा पासून ऐकत आणि बोलत आलो आहोत. त्या मध्ये “मातृ” म्हणजे माता, आई हिचे स्थान सर्वप्रथम आहे . पुरुषाचा जन्म झाल्या पासून त्याच्या आयुष्यात स्त्रीची अनेक रूपे त्याला साथ दे त असतात ज्यामधे आई, बहिण, आजी, काकू, आत्या, मावशी, मामी, गुरुजन (शाळे मधील शिक्षिका) मैत्रीण, मुलगी आणि सर्वात महत्वाची त्याची जीवनसाथी पत्नी म्हणजे बायको. अश्या अनेक स्त्रीनात्यांची गुंफण त्याच्या जीवनात असते. माणूस कितीही मोठा, कर्तुत्ववान झाला तरी त्याचे जीवन हे वर उल्लेख केल्या प्रमाणे त्याच्या जीवनातील अनेक स्त्रियांच्या सहवासाने आणि प्रेमाने घडलेले आणि परिपूर्ण झालेले असते. स्त्रीला सनातन हिं द ू धर्मा मधे “दे वी” चा दर्जा दिला आहे आणि तिची अनेक रूपे आहे त, जशी की “या दे वी सर्व भूतेषु “श्रद्धा” रूपेण संस्थितः (आणि ह्याच प्रमाणे “शक्ती”, “लक्ष्मी”, “दया”, “क्षमा”, “शांती” रूपेण संस्थितः) अशी किती तरी स्त्रीची रूपे आपण बघतो. त्याचप्रमाणे स्त्रीचे एक महत्वाचे रूप म्हणजे “अन्नपूर्णा” हे होय. जन्म झाल्या पासून मरे पर्यंत आपले भरण पोषण ज्या अन्नामुळे होत असते ते नेहमी एका अन्नपूर्णा स्त्रीनेच बनवलेले असते. त्यामधे तिचे निरालस प्रेम असते. आपण बाहे र कितीही महागातले, चांगलचुंगल खाल्ले तरी आई, पत्नी आणि वरील कोणत्याही नात्यांमधील इतर स्त्रियांच्या हातच्या स्वयंपाकाची चव त्याला येउच शकत नाही. आईच्या हातच्या जेवणाची सर इतर कुठल्याही जेवणास येऊ शकत नाही आणि म्हणूनच तर आपण सर्वजण तिच्या हातचे जेवण्या साठी सदै व आतुर झालेले असतो. काही स्त्रियांना ईश्वरी वरदान असते म्हणा किंवा त्यांच्या हाताला अशी एक विशिष्ठ चव असते की त्यांच्या हातच्या जेवणाची बरोबरी इतर कशाशी ही होऊ शकत नाही. अशाच स्त्रीयांना आपण “अन्नपूर्णा” असे म्हणतो. तर अशा सर्व अन्नपुर्णच ां ा मोठा अपमान म्हणजे त्यांनी केलेल्या अन्नाला नावे ठे वणे, अन्नावर राग काढणे, आणि अन्न वाया घालवणे. आज समाजा मधे लहानांपासून थोरांपर्यंत घर, समारं भ, उपहार गृहे, दे वालये अशा कितीतरी ठिकाणी बिनदिक्कत पणे अन्नाचा एवढा अपव्यय होताना दिसतो कि मन व्यथित होते. आपल्या नात्यांमधील स्त्रियाच आपल्याला संस्कार द्यायला कमी पडल्या की काय असा प्रश्न पडतो. एकीकडे दषु ्काळ, उपासमारी, कुपोषणा मुळे कित्येक लोकांचे जीव जात आहे त तर दस ु रीकडे मोठ्या प्रमाणावर अन्नपाणी, फळे , भाज्या, धान्य वाया जाते आहे . माझी सर्वांनाच कळकळीची विनंती आहे की आपण स्वतःहून अन्न वाया घालवणे तर जाणीवपूर्वक टाळावेच, परं तु आपल्या मुलांना आणि इतरांना दे खील तशी शिकवण आणि संस्कार द्यावेत की जेणेकरून अन्नाचा अपव्यय टाळता येऊ शकेल. अन्नपाणी आणि इतर वस्तू ह्यांची नासधूस करण्यात फक्त अन्नपूर्णेचाच अपमान होत नाही तर त्याच बरोबर आपले गरीब, कष्टाळू शेतकरी, इतर श्रमिक बांधव ह्यांचा दे खील अपमान होतो. म्हणूनच आपण स्वतःहून, मुले आणि इतरांना आधुनिक काळाला साजेश्या खालील श्लोकाचे महत्व पटवून दे ऊन तो आचरणात आणावा असे वाटते. “वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभच ू े l सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे l कृ षीवल कृ षीकर्मी राबती दिनरात l श्रमिक श्रम करोनि वस्तू ह्या निर्मितात l करून स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल l उदर भरण आहे चित्त ठे वा विशाल l मुखी घास घेता करावा विचार l कशासाठी मी अन्न हे सेवणार l घडो माझिया हातोनि दे शसेवा l म्हणोनि मिळावी मला शक्ती दे वा” l ll जय जय रघुवीर समर्थ ll ll अन्नदाता, महद्त्राता, पाककर्ता सुखी भव ll प्रस्तुत लेखा मधे काही चूका आढळल्यास किंवा अभिप्राय अथवा सूचना असल्यास मला अवश्य कळवावे हि नम्र विनंती. धन्यवाद. श्री. शरद मधुकर कुलकर्णी ईमेल: sharadkul@hotmail.com

४०

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement