Page 39

आहे . सौदीच्या कडक नियमांचा भंग न करता अमेरिकन style मध्ये राहायचं असेल तर चारही बाजुंनी भिंती असलेल्या भूप्रदेशाला ‘कम्पौंड’ म्हणतात. येथे सौदीचे नियम लागू नसतात. प्रत्येक शहरात ‘कम्पौंड’ ची सोय आहे . अश्या ठिकाणी राहण्यास भाडे जास्त मोजावे लागते ) बहारीनच्या ‘ चतुःसीमा ’ भिंतीनी वेढलेल्या नसून त्या निसर्ग निर्मित समुद्राने वेढलेल्या आहे . दे व भूमीत काय चाललं आहे याचं यांना काही दे णं नाही. घेणं मात्र आहे म्हणतात. स्वकीय व परकीय यांपासून धोका निर्माण झाला की दे व भूमितले लोक लगेच सरं क्षणासाठी कुमक पाठवतात. आहे कि नाही गंमत. तेथे महाराष्ट्र मंडळ आहे आणि तेथे सत्यनारायणाची पूजा बिनधास्तपणे करता येते. हरे कृष्ण मंदिर, शिव मंदिर .... अरे जणूकाही भारतातच आहोत. मला बहारिनी expatriates – मला म्हणायचं ‘ अनिवासी भारतीयांचा ‘ हे वा वाटत होता. ‘ स्वदे शात राहून परदे शी वेतन ’ ........काय मज्जा असेल ....... म्हणून मला डोहाळे लागले होते. बहारीनला जायचे, बहारीन बघायचे. नोव्हें बरमध्ये मी आणि उल्का गल्ली बोळ फिरलो. याची दे हा याची डोळा स्वर्ग पाहिला. खूप फोटो काढले. अगदी ‘ जुनं झाड सुध्दा, विहिरी जवळचं ’ ते सुद्धा मित्रांनी दाखवलं. ‘ बहारीनची पहिली छाप ‘ बघायची असेल तर या लिंक वर दोनदा क्लिक करा ..................... ‘ सौदी या दे शातील चालीरितींच्या पार्श्वभूमीवर हा दे श खरच पुढे आहे . मज्जा आली. मनामा येथील ओईल पेंटींग्ज आवडली. महाराष्ट मंडळातील गणपती महोत्सव आवडला. मुख्य म्हणजे सर्व ‘ महा-राष्ट्री ’ कित्येक वर्षापासून एकत्र काम करत आहे हे पाहून आनंद झाला. १५ वर्षांपासून आफ्रिकेत / अरब दे शात फिरतोय, पण बहारीन सारखं मंडळ नाही बघितलं. श्वास घ्यायला आवडला, मंडळात असतांना. लोकं आवडली. पण नंतर, नंतर बहारीनची नवलाई ओसरली. बहारीनचं ‘ छोटे पण ’ जाणवलं . बहारीन सौदीपेक्षा महाग वाटू लागलं. येणं कमी झालं. सौदितल्या ‘ सलाहाच्या ’ वेळा सांभाळणं क्रमप्राप्त झालं. किंबहुना आमच्या दै नंदिनी मध्ये ‘सलाह’ दाखल आली. दे व भूमीतली ‘ स्वस्ताई ’ हीच खरी गंमत, ‘बाकी सब झूट‘ है , असं मनाला समजावलं. दे व भूमितला ‘ कमीपणा ‘ अंगवळणी पडला. हल्ली खोबारच्या कारनिशवर गेलो कि कायम ‘बहर’लेली आकाशरे षा बघतो. समुद्राच्या पलीकडील तो सुंदर झगझगाट सुंदर दिसतो. आणि मी मनात म्हणतो ‘ लंकेत सोन्याच्या विटा, आपल्याला काय उपयोग ?’. पण हल्ली सौदीत पण बदल येऊ पाहतोय. हा बदल स्त्रियांकरिता अनुकूल आहे . अर्थात बुरखा कायम ठे ऊनच. हल्ली ‘बायकांसाठी’ कामं राखून ठे वण्यात येत आहे . त्यांनी कार्यालयीन कामे करावी अशी ‘ खुद्द सरकारची ‘ इच्छा आहे . काही स्त्रियांनी तर ‘ मोटार गाडी चालवण्याची ‘ परवानगी मागितली व रस्त्यावरून अवैधानिकरित्या चालवली सुद्धा. आज सौदीत या विषयावर गदारोळ माजलेला आहे पण ‘ उद्या ’ नक्कीच त्यांना परवानगी मिळे ल असे वाटते. ‘ चूल आणि मुल आणि नवरा ‘ यांच्या चौकटीतून ‘ बाई ‘ बाहे र पडे ल असे वाटते. चांगला बदल आहे हा कारण अजूनही मी ‘ आयुष्यभर झाकलेली बाई ‘ अशी मी कल्पनाच करू शकत नाही. असा बदल झाला कि सौदीचे ‘ बहार इन ‘ व्हायला वेळ लागणार नाही. श्री. प्रविण मानकर.

३९

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement