Page 35

ह्या प्रमाणे आपल्याला कोणत्या ही दिवसाची कोणत्या ही ग्रहाची आकाशातील पोझिशन कळू शकते.

नक्षत्र व राशींच्या आकार व त्यातील निरनिराळ्या तार्यांबद्दल मात्र एखादे पुस्तक वाचून शिवाय एखाद्या जाणकाराकडू न माहिती करून घ्यावी.

पंचांग हे आयनिक वृत्ता वरील व राशी नक्षत्रे,ग्रह यांचाच अभ्यास करते. त्यामुळे उर्वरित आकाशातील तारका समुह व इतर गोष्टी पाहण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण इतर तारका समुह, नक्षत्रे व राशी आपल्या जागा व आकार लाखो वर्षे बदलत नाहीत. एकदा पूर्ण आकाशाचा नकाशा माहीत झाला की निरीक्षण करणे एकदम सोप्पे जाते. निरीक्षकाच्या सदृश फक्त वेळ बदलते.

आता थोडे आकाश दर्शना साठी च्या लक्षात ठे वण्याच्या बाबी.

पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाशात रात्रभर असल्याने बाकी आकाशा वर चंद्र प्रकाशाचा परिणाम होऊन इतर ग्रह व तारे नीट दिसत नाहीत. व सूर्य हा चंद्राच्या समोर असल्यामुळे चंद्र पृष्टभागही नीट दिसत नाही. दप ु ारी बारा पेक्षा संध्याकाळी व सकाळी निसर्ग जास्त छान दिसतो कारण की उजेड तिरपा पडलेला असतो. चंद्र पाहण्यासाठी शुक्ल किवा शुद्धपक्षातील चतुर्थी ते अष्टमी हा काळ चांगला असतो जेव्हा पृथ्वी सदृश चंद्रावर प्रकाश हा काटकोनात असल्या मुळे त्या ठिकाणच्या डोंगर दऱ्या, विवरे इत्यादी गोष्टी छान पाहता येतात. तसेच चंद्र हा रात्री १०-११ वाजता मावळल्या मुळे बाकीचे ग्रह तारे स्पष्ट दिसतात. आकाश पाहण्यासाठी शहरापासून लांब जिथे लाइट पोल्यूशन किंवा सिटी ग्लो दिसणार नाही अश्या भरपूर अंधार आणि क्षितिज मोकळे असेलेल्या सुरक्षित जागी पहावे. महाराष्ट्रातील डोंगरीकिल्ले हे सर्वात छान. तसेच आकाश पाहण्या च्या जागी अंधार असावा व काही वाचायचे असल्यास टॉर्च वर लाल जिलेटिन पेपर लावून पहावे. पूर्ण अंधार असलेल्या जागेतन ू हजारो तारे दिसू शकतात.

आयनिक वृत ् (Ecliptic) म्हणजे ज्या मार्गाने पृथ्वी सुर्या भोवती फिरते तो म्हणजेच, उलट अर्थाने सूर्याचा पृथ्वी भोवती फिरण्याचा भासमान मार्ग.

पूर्व क्षितिज ते पश्चिम क्षितिज हा १८० अंश एरिया असतो. (शाळे तील कम्पास बॉक्स मधील अर्धवर्तुळाकृ ती कोन मापक आठवा.)

डोळ्यासमोर लांब हात करून आकाशाकडे बोटाच्या दिशेने (नेमधरल्या प्रमाणे) पाहिल्यास बोटाच्या टोकाने जेवढी जागा झाकली जाते व दिसत नाही ती सुमारे १अंश असते.

डोक्यावर असताना पूर्ण चंद्रबिंबाचा व सूर्याचा ऑपरन्ट (Apparent) आकार हा फक्त १/२ अंश असतो.

तसेच पंजाच्या ४ बोटांनी झाकला जाणारा भाग हा सुमारे ५ अंश असतो.

युरेनस, नेपचून, प्लूटो हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. युरेनस हा नुसत्या डोळ्याने एखाद्या बारीक व मंद ताराया सारखा दिसतो. आकाश निरीक्षणासाठी एखादी द्विनेत्रि (बाइनाक्युलर) किंवा छोटी दर्बि ु ण असल्यास बरे च अविष्कार पाहता येतात. परं तु त्या विकत घेण्यापुर्वी, आधी कुठे व काय पाहायची ह्याची माहिती व अभ्यास करून नुसते आकाश पाहण्याचा सराव करावा.

आपल्या हिं द ू महिन्यांची नावे ही सुध्दा नक्षत्रांवरूनच ठे वलेली आहे त. एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असेल ते त्या महिन्याचे नाव असते. उदा : चित्रा नक्षत्रात ज्या पौर्णिमेला चंद्र असतो तो चैत्र महिना.

विशाखा नक्षत्रात ज्या पोर्णिमेला चंद्र असतो तो वैशाख महिना , इत्यादी....

आपणा सर्वाना अशीच आकाश निरीक्षणाची गोडी लागो ही इच्छा व्यक्त करून हा लेख संपवतो.

असे आपल्याला रोजचे आकाश पण आपण तिकडे फारसे लक्ष दे त नाही. परं तु आकाशाची चांगली ओळख असल्यास आपल्याला ती अनेक ठिकाणी उपयोगी पडते. आकाशाची ही ओळख ट्रेकर्स ते जहाजचालक यांना संकटकाळी नक्कीच मार्गदर्शक ठरते. कधी रात्री निवांत एकटे बसलात तर ग्रह तार्यांचा वेध घेत सहज एकटे पणावर मात कराल.

बहारीन महाराष्ट्र मंडळा ला माझ्या अनेक शुभेच्छा.

३५

श्री. अविनाश फडणीस

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement