Page 29

पहाटे ला त्यांचा पक्का निर्धार झाला. श्रीमंत बापाचा फाटक्या शिक्षकावर विजय झाला होता.

पुढच्याच रविवारी खुप खाऊ घेऊन है दरभाई हमदचाचांकडे पोहोचले आणि आपण मेहविशला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहोत असे सांगितले.

"सुभानल्ला" ! फार नेक विचार केला तू है दर !" मी तर तुला त्याचवेळी सांगितल होतं,

तुझी वेल तुझ्याच अंगणात राहू दे ..

पण काही हरकत नाही, सर्वांच भलं होईल असा रस्ता अल्ला प्रत्येकाला दाखवतोच !"

“चार दिवस राहिली पण फार लळा लावला पोरीन.. माझी अम्मीच बनून गेली...”

नुकतीच घरात आलेली मेहविश अब्बाला बघून हरखून गेली आणि गळ्यात पडू न रडू लागली.

थोडा वेळ है दरभाईंनी अपेक्षित हट्टाची वाट बघितली आणि न राहवून स्वत:च मेहविशला म्हणाले,

"चला, आपल्याला घरी जायचय !"

"हो? खरच?" गळ्यतली मिठी सोडवत मेहविशन विचारल, मी अम्मीला भेटणार?" लाख चांदण्याची चमक त्या दोन चिमुकल्या डोळ्यात एकवटली होती.

"हो, सगळ्यांना भेटणार, आता आपण परत कधीही वेगळ व्हायचं नाही माझ्या बाळा !"..

बांध फुटला होता.. पाणी वाहत होत..

मेहविश बाजूला जाऊन एकदम शांत उभी राहिली, काहीतरी अनपेक्षित अघटित घडणार याची कुणालाच कल्पना नव्हती. "मी नाही तुमच्याबरोबर येणार.. अब्बू मी इकडे च राहणार..चाचा, चाची माझे खूप लाड करतात, ते खूप चांगले आहे त." एवढे बोलून मेहविश बाहे र पळाली.

स्वत:ला स्वत:मध्येच गाडू न घ्याव अस वाटलं है दरभाईंना क्षणभर !

सर्वांच भलं होईल असा रस्ता अल्ला प्रत्येकाला दाखवतो......पुढच प्रश्नचिन्ह सर्वांच्याच मनात उमटलं..

खिन्न मनाने है दरभाई उठले, दरवाज्यापर्यंत आलेल्या हमदचाचांकडे वळू नही न बघता चालू लागले..

मन एकीकडे .. पाऊल एकीकडे ...

बाहे र पडलेली मेहविश आता थेट आमराईत घुसली होती...फुगा परत आकाशात वर वर चालला होता..

एक असह्य उद्वेग आसमंतात भरून गेला होता…

मन मोडल्याचा आवाज थोडाच येतो?

एकच इच्छा काळजातली

ईश्वरा होऊदे पुरी

उभे असूदे झाड

गेला मोहोर करपूनी तरी.

श्री. मिहीर ठकार Email : itsmihir@gmail.com

२९

MCS Salam Bahrain 2014  
MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement