Page 28

लहान पोरच ती! तिच्या हक्काच प्रेम नव्हतं ना तिच्यापाशी....कधीकधी ती एकटीच विचार करीत बसे..

अनेक शंका अनेक कोडी

मन मलाच दे ई मनी

अंतरात का अंतर वाढे का वाढत जाई दरी

दोन दोन तान्हुल्यांना सांभाळताना अस्माबिबीची खूपच तारांबळ उडत असे. त्यांना हृदयाशी घेताना तर तिचा जीव अगदी व्याकुळ होऊन जाई.

आपण आपल्या पोरीचा अधिकार हिसकावून घेतला याची टोचणी सतत तिच्या मनाला लागलेली असे.

शेजारणीसारखा आपल्याला पुनर्जन्मही नाही हे पाप फेडायला ! असला जहन्नुमी निर्णय आपण घेतला तरी कसा... एक ना अनेक .. हे सर्व विचार तिला भयंकर अस्वस्थ करीत असत.

आज सहा महिने झाले, भेटू, भेटू म्हणून भेट टळली जात होती.

पण मुलीन फारच हल्लागुल्ला केला तेव्हा हमदचाचा सरळ तिला गावी घेऊन आले आणि थेट शाळे त येऊन पोहोचले.

जुन्या मैत्रिणींना भेटून मेहविशची तर ईदच झाली.

"चाचा, घरामागची बाग विकावी म्हणतो, कोणी गि-हाईक असेल तर सांगा”

है दराभाईंनी हतबलतेतन ू आणि नाईलाजातून घेतलेल निर्णय हमदचाचांना ऐकवला.

"अरे पण पोरीला भेट तरी आधी"

नजर चुकवन ू नुसताच आवाज आला, “नको चाचा, नकोच!”

“मलाही खूप वाटत तिला कडकडू न भेटावं, पोटाशी धरावं, पण काय करू? गळ्यात पडू न परत यायचा हट्ट धरला तर ?

पुन्हा तोच प्रसंग!

येताना एकाएका क्षणात युगांचे अंतर संपवून आलेली मुलागी जाताना मात्र पावलोपावली अडखळत होती. अंधार वेढत चालला होता, सावल्या लांब होत होत्या. पाखरू पुढे पण सावली मात्र जणू घराकडे जात होती. माया वेडीच ! होते.

परत एकदा समंजसपणाचा बुरखा मेहविशनं चढवला होता.त्यातून डोळ्यातील अश्रू बरोबर झाकले जात

आज पुन्हा मी विलग होतसे

भाग्यच माझे कापूनी खांदा दरू आम्हाला करी

माझ्या फांदीतूनी

अस्माबिबीला मेहविश येऊनही न भेटल्याच जेव्हा कळल तेव्हा तिच्या रागाचा बांध फुटला.

"तिने परत यावं हा हट्ट माझाच असेल तर तुम्ही माझही तोंड पाहणार नाही का?" निरं तर वाहणा-या जखमेतील रक्ताचा एक थेंब है दरभाईंचा काळजावर येऊन पडला आणि निखारे ठे वून गेला.

"अजून काही दिवसांनी बुरखापण पाठवावा लागेल पोरीसाठी, ती वेळ जास्त लांब नाही....

ते काही नाही,मला माझी पोरगी माझ्याजवळच पाहिजे....."

अस्माबिबीन सोडलेले हे विखारी शब्दबाण है दरभाईचे लचके तोडत होते.

नि:शब्द मनाने ते परत त्याच आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले. जखमी मन आता विचार करू लागलं...

२८

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement