Page 20

आई प्रत्येकाच्या जीवनातला अखंड प्रेमाचा निर्मळ झरा. आयुष्यात ज्याला आईचे भरभरून प्रेम लाभले तो खरा ऐश्वर्यसंपन्न.

"आई सारखे दै वत साऱ्या जगातावर नाही." म्हणून ‘श्री’ काराच्या नंतर शिकणे अ आ ई” ह्या भावगीताच्या ओळी मला सतत आठवतात. असं म्हणतात की परमेश्वर माता-पित्याच्या रुपात प्रत्येक घराघरात वसतो आणी आपली कृ पादृष्टी ठे वतो. आई, माता, मा, जननी, मदर अशी वेगवेगळी संबोधन पण तिच्यातले भाव मात्र सर्वत्र सारखेच. ममता, वात्सल्य,करुणा, शांती,क्षमा, पावित्र्य, त्याग, मांगल्य, प्रेम अशा अनेक गुणांची ती खाण. तिला आयुष्यात फक्त आणि फक्त नि: स्वार्थ दे णंच माहीती आहे . त्याच्या मोबदल्यात काहीही न मागणार असं हे परमेश्वराच रुप खरोखरच अतर्क्य. परमेश्वरानी स्त्रीरुपात घेतलेले हे सगळ्यात श्रेष्ठ रूप.आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचे जगज्जेते स्वामी विवेकानंद, श्रीमद् आद्य शंकराचार्य हे जरी या स्थूल जगापासून विरक्त होते, तरीही आईच्या अंत्यक्षणी ते आईच्या सान्निध्यात राहिले. तिचे ऋण, तिचे श्रेष्ठत्व त्यांनी जपलं. मानव ह्याचा अर्थ ज्याला नऊ माता आहे त असा तो मानव.त्या नऊ मातांपासून मानव आपलं आयुष्य समृद्ध करतो. जन्मदात्री, गोमाता, गुरुमाता, जन्मभूमी, सरस्वतीमाता, लक्ष्मीमाता, धरणीमाता, गंगामाता, तुलसीमाता अश्या या नऊ मातांमध्ये जन्मदात्री ही अग्रणी. आणि हया सर्वमाता मनुष्याला जीवनाच्या सर्वांगानी समृद्ध करतात. आपण सर्वजण हया सर्वमातांचे ऋण समजून जर त्यांचे ऋणी राहिलो तर तो परमेश्वर संतष्ट ु होऊन या पृथ्वीवर स्वर्ग वसेल यात काही आश्चर्यच नाही. 'वंदे मातरम ्'

सौ. अनघा लक्ष्मीकांत दे शमुख

स्त्री भ्रूण हत्या – व्यथा गर्भवतीची माझ्या पोटातील गर्भ, माझ्या काळजाचा तुकडा, कसे धजावते मन, करण्या मुली तुझी हत्या?

करण्या गर्भपात, माझ्यावर सगळ्यांचाच दबाव, जगणे झाले नकोसे, दे वा आता तरी धाव.

नाहीस तू वंशाचा दिवा, साऱ्या गोतावळ्यासाठी, दे वाघरातील समईची, ज्योत तू माझ्यासाठी.

आतुरले मन, नाद पैजणांचा घुमावा कानात,

विकृ त वासना जगाची, बांधेल चाळ तुझ्या पायात.

अर्थार्जनासाठी मी घराबाहे र, परी जीवाला असे घोर, नासावेल का कोणी? घरी एकली माझी पोर.

सगळी कमाई लागेल ओताया, तुझ्या सासरच्या पायाशी, काय खाऊ? कशी जगू? कर्जाचा डोंगर उशाशी.

रूढी, कुळाचार, चालीरीती, माझ्या भोवती पाश, आधी सुधारा समाज, करा अविचारांचा नाश.

माझ्या पोटी गर्भ मुलीचा, दोष मला, कारण मी बाई, दे ण्यास जन्म मूलाला, लागतेचना पण एक आई?

२०

सौ. वृंदा अरुण अभ्यंकर

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement