Page 17

(२.२) पश्चिमोत्तानासन – या आसनात सबंध शरीराची मागची म्हणजे पश्चिम बाजू अतिशय तीव्रतेने ताणली जाते. सुखासनात बसून पाय सरळ करा. श्वास सोडा. हात लांबवा. हाताचा अंगठा आणि दोन बोटांनी पायाचा अंगठा पकडा. पाठीचा कणा ताणा. सुरुवातीला पाठ कुबड आल्यासारखी दिसेल, कारण पाठीचा कणा फक्त खांद्याच्या भागापासून ताणला जाईल; परं तु पाठीच्या ओटीपोटाच्या मागच्या भागापासून कणा ताणायचा प्रयत्न करा आणि हात खांद्यापासून पुढे लांबवा. कपाळ गुडघ्याला टे का. या आसनामुळे पोटातील अवयवांचे कार्य सुधारते. पचनक्रिया सुधारते. Pancreas activate होतात. या आसनांबरोबरच अर्धमत्स्येन्द्रासन, वक्रासन, सर्वांगासन, हलासन हि आसनेदेखील उपयोगी पडतात. (३) पाठदख ु ी, कंबरदख ु ी – ही आसने back bending प्रकारात येतात. Back bending मुळे पाठीचे स्नायू बळकट होतात. मात्र हि आसने preventive म्हणून केली जातात. खूप प्रमाणात पाठदख ु ी अथवा कंबरदख ु ी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही आसने करावीत. (३.१) भुजंगासन – हे आसन पोटावर झोपून ३ टप्प्यांमध्ये केले जाते. पहिल्या प्रकारात, पोट संपन ू छाती सुरु होते त्याठिकाणी तळवे जमिनीवर टे कवा. श्वास घ्या. तळवे जमिनीवर घट्ट दाबा आणि धडापासून शरीर वर उचला. थोडा वेळ दीर्घ श्वसन करीत आसन टिकवा. दस ु ऱ्या प्रकाराला वक्रहस्त भुजंगासन म्हणतात. तळवे खांद्यांच्या रे षेत जमिनीवर दाबा आणि फक्त नाभीपर्यंतचा भाग वर उचला. कोपरे जमिनीपासून वर वाकवलेल्या अवस्थेत ठे वा. ह्यात पाठीच्या मध्यभागावर चांगला ताण जाणवतो. तिसऱ्या प्रकारात हात डोक्याच्या रे षेत जमिनीवर दाबा आणि धडापासून शरीर वर उचला. पाठीच्या सर्वात शेवटच्या मणक्याला ताण जाणवतो. भुजांगासनाचे हे तीनही प्रकार सरावाने थोडा वेळ टिकवण्याचा प्रयत्न करा. हे आसन म्हणजे दख ु ावलेल्या पाठीच्या कण्यावर रामबाण उपाय आहे . मणक्याच्या चकत्या किंचित सरकलेल्या असतील तर हे आसन केल्यामुळे त्या मूळच्या जागी येतात. पाठीच्या कण्याला बळकटी येते आणि छाती पूर्णपणे फुगवली जाते. (३.२) ऊर्ध्वमुख श्वानासन – ऊर्ध्वमुख म्हणजे वरती केलेले तोंड आणि श्वान म्हणजे कुत्रा. हे आसन कुत्र्याने स्वताःचे अंग ताणून डोके उचलले म्हणजे दिसणाऱ्या दृश्याप्रमाणे दिसते. पोटावर झोपा. पायांमध्ये २ फुट अंतर ठे वा. तळवे कंबरे च्या बाजूला जमिनीवर ठे वा. श्वास घेऊन डोके व घड वर उचला. हात पूर्णपणे ताणा. गुडघे जमिनीवर न टे कवता डोके व धड शक्य तितके मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. हि स्थिती अर्धे ते एक मिनिट टिकवा. या आसनामुळे पाठीच्या कण्याला नवजीवन मिळते. पाठीतील उसण, सायटिका हे विकार असलेल्या लोकांना व कण्यातील चकत्या सरकलेल्या लोकांना हे आसन लाभदायक ठरते. या आसनामुळे पाठीचा कणा सुधढ ृ बनतो आणि पाठदख ु ी बरी होते. ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण योग्य रितीने होऊ लागते आणि तो भाग निकोपी बनतो. (४) cholesterol & thyroid (४.१) सर्वांगासन – या आसनात सर्व शरीराला व्यायाम मिळतो. पाठीवर झोपा. श्वास घ्या आणि पाय ९०o मध्ये वर उचला. त्यानंतर हलकासा झोका घेऊन कंबर उचला आणि धड काटकोनात वर आणा. डोके, मान, खांदे व दं ड एवढे च भाग जमिनीवर टे कलेले असावेत. हे आसन सरावाने ५ मिनिटांपर्यंत टिकवता येते. ह्या आसनाचे महत्व कितीही सांगितले तरी थोडे च. आपल्या प्राचीन ऋषींनी मानवतेला दिलेले हे एक महान वरदान आहे . सगळ्या सर्वसाधारण विकारांवर हे एक रामबाण औषध आहे . Hormonal imbalance साठी हे आसन प्रामुख्याने केले जाते. मानेतील thyroid आणि parathyroid ग्रंथींना जालंदरबंधामुळे (हनवटी कंठात जाणे) रक्ताचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊ लागतो. शरीराचे गुरुत्व या आसनात बदलते. त्यामुळे पोटाच्या अवयवांवर चांगला परिणाम होतो. शरीर यंत्रणेमधील विषद्रव्ये (toxins) निघून जातात, मूत्रमार्गाच्या तक्रारी, गर्भाशय सरकणे, मासिक पाळीच्या बाबतीतील त्रास, मुळव्याध हे त्रास असणाऱ्या व्यक्तींना हे आसन उपयोगी पडते. हे आसन योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावे. उच्च रक्तदाब अथवा मानेचे आजार असणाऱ्या लोकांनी हे आसन करू नये.

१७

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement