Page 16

योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा दवा ु . प्राचीन काळापासून भारतात प्रचलित असलेली ही विद्या आता साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे . योगासनांमळ ु े शरीर तर सुडौल होतेच, त्याचबरोबर मनालाही स्थैर्य मिळते. योगासनांचा विचार करताना प्रामुख्याने तीन अंगांचा विचार केला जातो - आसने, प्राणायाम आणि ध्यान. योगासने हा प्रत्येक वयोगटातील लोकांना करता येण्याजोगा व्यायाम आहे . मुलांना योगासनांचा फायदा शरीर लवचिक करण्यासाठी होतो. विविध अवयवांना योग्य ताण दिल्याने उं ची वाढते. तसेच एकाग्रता वाढण्याचा फायदा अभ्यासात होतो. तरुण आणि वृद्ध व्यक्तींनाही योगाभ्यासाचा खूप फायदा होतो. स्नायू बळकट होतात; कामाचा शीण येत नाही आणि शांत झोप लागते. आज आपण महिलांसाठी योग आणि तो ही विशेषतः चाळीशी नंतरचा योग ह्याचा विचार करणार आहोत. चाळीशीनंतर शरीरात अनेक बदल होतात. Hormonal imbalance, thyroid, रक्तदाब, मधुमेह अशा तक्रारी सुरु होतात. इथून पुढे रजोनिवृत्ती म्हणजेच menopause ची सुरुवात होते. अशा वेळी शरीर सुदृढ आणि मन शांत असणे गरजेचे असते. त्यासाठी योगासनांसारखा दस ु रा उत्तम पर्याय नाही. आता आपण वेगवेगळ्या समस्या आणि त्यासाठी करावयाची आसने बघूया. (१) वजन कमी करणे – योगासनांनी वजन खूप कमी झाले नाही तरी शरीर सुडौल होते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. खालील आसने नियमित करून त्याच्याबरोबर चालण्यासारखा सोपा व्यायाम आणि थोडे से आहाराकडे लक्ष दिल्यास वजन निश्चितच कमी होते. (१.१) सूर्यनमस्कार – सूर्यनमस्कार हा सर्वार्थाने चांगला व्यायाम आहे . ह्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतो. एका सूर्यनमस्कारात १० आसने आहे त. जलद गतीने सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा calorie burning साठी उपयोग होतो. सुरुवात १२ पासून करून हळू हळू नमस्कार वाढवत जावेत. (१.२) सायकलींग – पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात दम ु डू न सरळ करा. पाय जमिनीवर न टे कता परत वर आणा. (१.३) पोलो – पाठीवर झोपा. डावा पाय पहिल्यांदा डावीकडू न आणि नंतर उजवीकडू न गोलाकार फिरवा. नंतर उजवा पाय उजवीकडू न आणि डावीकडू न गोलाकार फिरवा. आणि मग दोन्ही पाय एकत्र जुळवून हा व्यायाम साधारण ५ ते १० वेळा करा.

(१.४) अनंतासन – डाव्या कुशीवर झोपा. उजवा पाय गुडघ्यात न वाकवता वर खाली करा. नंतर उजव्या कुशीवर झोपून डावा पाय वर खाली करा. हा व्यायाम साधारण २० वेळा करा. (२) मधुमेह – ह्यामध्ये मुख्यत्वे pancreas (स्वादपि ु ंडला चालना दे णारी) activate करणारी आसने आहे त.

(२.१) जठर परिवर्तनासन – हे आसन कापडी पट्ट्याच्या सहाय्याने केले जाते. पाठीवर झोपा. दोन्ही पायांच्या तळव्यांमध्ये पट्टा अडकवा. पाय ९०o मध्ये वर उचला. पट्टा वापरल्यामुळे पाय ताठ रहाण्यास मदत होते. नंतर पाय डोक्याच्या सरळ रे षेत उजवीकडे जमिनीवर टे कवण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोटाला चांगला पीळ बसतो. हे आसन प्रत्येक बाजूने २ ते ३ मिनिटे करावे.

१६

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement