Page 11

मध्यंतरी ‘Leadership or technology doesn’t know gender’ हा एक अत्यंत सुंदर सुविचार वाचनात आला आणि माझ्या डोक्यात विचारमंथन सुरु झाले की हे कितपत खरे आहे . विचार करता करता मी शोध घ्यायला सुरुवात केली की विज्ञान व संशोधन क्षेत्रामध्ये भारतीय महिलांचे योगदान कितपत आहे , व मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. भारतीय विज्ञान व संशोधन क्षेत्रामध्ये पुरुषांचे योगदान तर उलेखनीय आहे च पण स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या क्षेत्रात काम करत आहे त. खरे तर पूर्वी कधी नव्हे अश्या प्रगतीच्या किंवा कदाचित उत्क्रांतीच्या एका वेगळ्या अनवट वळणावर आपण उभे आहोत. आणखी काही वर्षामध्ये अशी एक अवस्था स्त्रियांना प्राप्त होणार आहे की त्यामुळे फक्त त्यांच्यापुरतीच नव्हे, तर संपूर्ण जगाची परिमाणे बदलून जातील. आयुष्यात के आणि सी एकत्र येणे खुपच गरजेचे असते. नॉलेजचा ‘के’ आणि कम्युनिकेशनचा ‘सी’ तुम्हाला यशस्वी बनवतो. केवळ ज्ञान असून भागत नाही. कधी इतरांना सांभाळू न घेत, तर कधी त्यांची मदत घेत पुढे जावं लागतं. तरच यशस्वी होणं शक्य असतं व माझ्या मते स्त्रियांना हे तंत्र चांगलेच अवगत आहे . स्त्रिया आज फक्त आर्थिक गरज म्हणून काम करत नाहीत, तर तो त्यांच्या क्षमतांचा आविष्कार असतो. मी आज अश्याच विज्ञान व संशोधन क्षेत्रातील काही स्त्रियांचा लेखाजोखा सादर करणार आहे . डॉ. टे सी थॉमस भारताची ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगद्विख्यात टे सी थॉमस ह्या अग्नी ५ ह्या भारताच्या महत्वकांक्षी, लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्र-विकसन प्रकल्पात प्रोजेक्ट डायरे क्टर म्हणून कार्यरत होत्या. ह्या क्षेपणास्त्र विकसनामुळे, भारताला आंतरखंडीय आणि त्याच्या शत्रुदे शातील महत्वाच्या शहरावर सुद्धा हल्ला करायची क्षमता प्राप्त झाली आहे . डॉ. परमजीत खुराणा – ह्या दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पती आण्विक जीवशास्त्र विभागात कार्यरत आहे त. त्यांचे संशोधन प्रामुख्याने सर्व-हवामान (All-Weather Crops) बियाणे विषयात असून वनस्पती Genomics वर केंद्रित आहे . त्यांनी सुधारीत गहू, तांदळ ू आणि तुतीच्या दषु ्काळ-प्रतिरोधक जाती विकसित केल्या आहे त ज्यात वातावरणातील उच्चतणाव, उष्णता आणि अतिनील किरणे रोधकक्षमता आहे . हे संशोधन कृ षीक्षेत्रासाठी वरदान ठरले आहे .  डॉ. मिताली मुखर्जी - Institute Of Genomics and Integrative Biology, Delhi.

मुखर्जींचे संशोधन मानवी Genomics वर वैयक्तिक औषध (Personalized Medicines) ह्या विषयात आहे . ह्या संशोधनामध्ये प्रत्येक मानवी शरीररचनेनस ु ार औषधे विकसित / निर्माण केली जातील. डॉ. शुभा टोळे – (Tata Institute of Fundamental Research) २० ऑक्टोबर २०१० हा दिवस शुभा टोळे ह्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरला, कारण चेतासंस्था शास्त्रातील ह्यांच्या संशोधनासाठी विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित असा शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने ह्यांना सन्मानित करण्यात आले. ह्यांचे संशोधन General Science and Nature

११

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

MCS Salam Bahrain 2014  

Salam Bahrain 2014 Published by Maharashtra Cultural Society BAhrain....

Advertisement