Marathi Mandal Korea Diwali ank 2012

Page 4

बघता सुरुवातीला याहू -ग्रुप आणि नंतर फेसबुकच्या माध्यमातन ू मराठी माणसे जोडली जाऊ लागली. आजमितीस ३०० हू न अधिक मराठी मनं फेसबुकच्या माध्यमातन ू जोडली आहे त. मग काय, गणेशोत्सव, गुढीपाडवा, मकरसंक्रांत, असे सण एकत्रपणे साजरे होवू लागले. दोन मराठी माणसं भेटली की आधी पाय ओढतात, अशी एक वदंता आहे , पण इथे मराठी माणस ू दिसला की त्याला एखाद्या सणासाठी वा ‘गटग’साठी (GetTogether) हात ओढून नेऊ लागली. ओढणे महत्त्वाचे, मग पायाऐवजी हात का असेना. विनोदाचा भाग वगळला तर मराठी माणसं एकत्र येतात आणिएकापेक्षा एक सरस कार्य क्रम घेतात, हे आश्वासक चित्र मागील २ वर्षांपासन ू केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकांनाही दिसू लागलं आहे अन ते सुखावह आहे . संगीत, गायन, कला, नाट्य, नतृ ्य, विनोद, हा मराठी माणसाचा आवडता उद्योग. त्याची भरपाई सगळे विविध गटगच्या माध्यमातन ू भरून काढतच होते. पण साहित्यात आपलं योगदान नाही ही खंत मनाला सतावत होती. मराठी माणस ू अन साहित्याशी फारकत, शक्यच नाही! मराठी साहित्यात योगदान देण्यासाठी, कोरियातील मराठी मंडळीतरी कशी मागे राहतील? त्याअनुषंगाने २०११ च्या प्रथम गणेशोत्सवात दिवाळी अंक प्रकाशीत करायचे ठरले आणि मराठी मंडळ कोरियाचा ‘साहित्यशोभा’ हा पहिलावहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला.

पू र्व गं ध २ ० १ २ 2


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.